नासाच्या Cassini अंतराळयानाने घेतलेले शनीच्या Enceladus चंद्रावरील गोठलेल्या महासागरातून अंतराळात उडणारे बर्फ़ाचे फवारे -फोटो नासा संस्था -J.PL-Lab
नासा संस्था-JPL-Lab-17 जुन
नासाच्या शनी मोहमेतील कॅसिनी अंतराळ यान 1997 मध्ये अमेरिकेतील फ्लोरिडा येथील Cape Canveral Air Force Station येथून 13 ऑक्टोबरला शनीच्या प्रवासाला निघाले आणी तब्बल 7 वर्षे अंतराळ प्रवास करून 2004 साली शनीवर पोहोचले कॅसिनीने शनीवर पोहोचताच यशस्वी कामगिरी करत त्यातील अत्याधुनिक यंत्रणेद्वारे उपयुक्त माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवत हि मोहीम यशस्वी केली कॅसिनीतील इंधन कमी होताच आणि त्याचा अपेक्षित कार्यकाळ पूर्ण होताच शास्त्रज्ञानीं हि मोहीम थाबवण्याचे ठरवले होते पण कॅसिनीची कमी इंधनातली जास्त काळाची यशस्वी कार्यक्षमता पाहून हि मोहीम प्रथम दोन वर्षे आणि नंतर सात वर्षापर्यंत वाढवण्यात आली ह्या काळात कॅसिनीने पाठविलेली शनीची सखोल माहिती पाहून शास्त्रज्ञही अचंबित झाले शनीचे चंद्र तेथील बर्फ,वातावरण आणि मानवाला आकर्षित करणाऱ्या शनीच्या कड्याचे गूढ कॅसिनीने घेतलेल्या फोटो मूळे आणि गोळा केलेल्या माहितीमुळे उलगडले शिवाय शनीबद्दल मानवामध्ये असलेले गैरसमजही दूर झाले शनी पीडादायक नसून तोही पृथ्वी सारखाच सुंदर ग्रह असून पूर्वी तिथेही सजीवसृष्ठी अस्तित्वात असण्याची शक्यताही बळावली आता तीच माहिती नासाचे शास्त्रज्ञ संशोधीत करत आहेत नासाच्या शनी मोहिमेत शनीवर पोहोचलेल्या कॅसिनी अंतराळयानाने गोळा केलेल्या संशोधीत माहितीतुन शनीच्या चंद्रावरील गोठलेल्या समुद्रात सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या फॉस्फरस वायुचे अंश आधळले आहेत नासाच्या जर्मनी- (बर्लिन) मधील संस्थेतील Planetary Scientist Frank Post berg ह्यांनी संशोधनाअंती हि माहिती प्रसारित केली आहे
Enceladus हा शनीच्या शेकडो चंद्रापैकी एक चंद्र असुन तो लहान आकाराचा आहे ह्या चंद्रावर गोठलेला महासागर असल्याचा शोध शास्त्रज्ञांनी ह्या आधीच लावला आहे शनी ग्रहावरील ऊष्णतेमुळे ह्या समुद्राच्या गोठलेल्या वरच्या थराला तडे जातात आणी तडकलेल्या ह्या भागाखालील समुद्रातील बर्फाच्या कणांचे फवारे अंतराळात ऊडतात हा चंद्राचा दक्षीण ध्रुवावरील भाग आहे सतत ऊडणाऱ्या ह्या बर्फाच्या कणांच्या फवाऱ्यामुळे शनिच्या मुख्य तेजस्वी कड्याभोवती ह्या सुक्ष्म कणांचे धुसर अस्पष्ट आवरण दिसते
नासाच्या शनी अंतराळ मोहिमेतील कॅसिनी अंतराळयान शनीग्रहावर माहिती गोळा करण्यासाठी गेले होते 2004 ते 2017 ह्या काळात ह्या यानाने अनेक महत्त्वपुर्ण संशोधीत माहिती गोळा केली ह्या काळात शनीच्या कड्याभोवती कॅसिनी यानाने अनेक वेळा भ्रमण केले त्यावेळी अनेकदा यानाने हे ऊडणारे बर्फाच्या कणाचे फवारे पाहिले कॅसिनी यानाच्या Cosmic Dust Analyzer Instrument च्या सहाय्याने यानाने त्या कणांचे samples गोळा केले त्या Samples वर शास्त्रज्ञांनी सखोल संशोधन केले तेव्हा त्यांना हि माहिती मिळाली ह्या बर्फाच्या कणात शास्त्रज्ञांना विपुल प्रमाणात मिनरल्स आणी Organic compound आधळले आहेत त्या मध्ये सजीवांच्या ऊत्पत्तीसाठी आवश्यक असलेले Amino acid व फॉस्फरस आधळले ह्या बर्फाच्या कणात गोठलेल्या स्वरूपात फॉस्फरस आणी मीठ आधळले फॉस्फरस सजीवांच्या ऊत्पत्तीसाठी आवश्यक घटक आहे तो सजीवांच्या पेशीमधील DNA मध्ये अस्तित्वात असतो त्या पासून मानवी पेशीतील Chromosome ची निर्मिती होते मानवी शरीरातील हाडे Cell membrane मध्ये देखील त्याचे अस्तित्व असते समुद्राच्या तळाशी असलेल्या सुक्ष्म सजीवांमध्ये देखील त्याचे अस्तित्व असते पृथ्वीवरील वातावरणात सर्वत्र ह्या वायूचे अस्तित्व आहे आणी मानवी जीवनासाठी तो आवश्यक आहे
Frank post berg ह्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या आधी शनीग्रहावर सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेले Sodium,Potassium, Chlorine आणी Carbonate compounds वायुंचे अस्तित्व सापडले होते आता सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या फास्फरस वायूचे अंश देखील आधळले आहे सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक हे सर्व वायु तेथे आधळले असल्याने तेथे पुरातन काळी सजीव सृष्ठि अस्तित्वात होती का?अजूनही आहे का? ह्या बाबतीत नक्की काही सध्या तरी सांगता येत नसले तरी भविष्यात शास्त्रज्ञ त्या बाबतीत निश्चितच सखोल संशोधन करतील
2017 मध्ये वीस वर्षांच्या ह्या यानाच्या यशस्वीते नंतर शास्त्रज्ञांनी हे यान नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता नष्ट करण्यापूर्वी कॅसिनीला शनिग्रहाच्या कक्षेत
धडकवून यानाचा शेवट करण्याचा धाडसी निर्णय नासा संस्थेने घेतला होता सव्वीस एप्रिल 2017 ला बुधवारी हे यान नष्ट करण्याच्या ग्रॅन्ड फिनालेला सुरवात झाली तेव्हा कॅसिनी यान शनी ग्रह व
त्याच्या कड्यामधील 1500 मैल रुंद पट्यात शिरले होते आजवर एकही यान शनीच्या कक्षेत शिरले नव्हते पण नासा संस्थेने हे धाडस
करण्याचे ठरवले होते कारण ह्या धाडसामुळे ब्रम्हांडातील मोठे ग्रह
व ग्रहमालांच्या उगमाचे रहस्य उलगडेल शिवाय ह्या कॅसिनी यानाचा शेवट जरी
झाला तरी तो नवीन मोहिमेसारखाच असेल अशी आशा शास्त्रज्ञांना वाटत होती
इतक्या वर्षांमध्ये कॅसिनीने मिळवलेल्या माहितीच्या आधारे कॅसिनीच्या इंजिनीअर्सनी Flight Plan तयार केला होता त्या नुसार 22 एप्रिलला कॅसिनी यानाने Titan ह्या शनीच्या चंद्राच्या अतिशय जवळून प्रवास केला तेव्हा Titan च्या
गुरुत्वाकर्षणाच्या परिणामामुळे कॅसिनीची भ्रमण कक्षा थोडीशी खाली झुकली
त्यामुळे हे यान कड्यांच्या बाहेरून न फिरता ग्रह व कड्यांच्या आतल्या
कक्षेत शिरले होते हे यान नष्ठ होण्याआधी शनीच्या चंद्राच्या वायुमंडळातील थंड वातावरणात शीरले होते आणी प्रचंड वेगाने फिरता फिरता गोते खात असताना स्फोट घडवून ते नष्ट करण्यात आले होते शेवटी नष्ठ होता होता कॅसिनी यानाने तेथील बर्फाच्या कणांचे नमुने आणि फोटो गोळा करून त्याचा व्हिडीओ पृथ्वीवर पाठवला होता