Tuesday 28 February 2023

रशियाचे सोयुझ MS-23अंतराळयान स्थानकात पोहोचले

  The Soyuz MS-23 spacecraft is seen approaching the Poisk module of the space station prior to docking at 7:58 p.m. EST as the space station was flying 260 miles above northern Mongolia.

 

नासा संस्था-24फेब्रुवारी

रशियाचे मानवविरहित अंतराळयान अंतराळस्थानकात पोहोचले रशियाचे MS-23 हे अंतराळयान 23फेब्रुवारीला 7.24 ला कझाकस्थानातील बैकोनुर ह्या ऊड्डाणस्थळावरून अंतराळस्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणी 25 तारखेला 7.58p.m.ला  स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील Poisk Module ह्या भागाजवळ पोहोचले

ह्या पायलट विरहित स्वयंचलित अंतराळयानातुन अंतराळवीर व स्थानकाच्या कामासाठी लागणारे 946पौंड वजनाचे सामान स्थानकात पाठविण्यात आले आहे 

रशियाच्या सोयुझ MS-22 ह्या अंतराळयानात बिघाड झाल्यामुळे त्या बदल्यात हे नवीन सोयुझ यान स्थानकात पाठविण्यात आले आहे सोयुझ MS-22 हे अंतराळयान मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये नासाच्या तीन अंतराळविरांना घेऊन स्थानकात पोहोचले होते 14 डिसेंबरला स्पेसवॉक दरम्यान ह्या यानात बिघाड झाल्याचे अंतराळवीरांच्या लक्षात आले ह्या सोयुझ यानातील Coolant radiator मध्ये बिघाड झाल्याने लिकेज होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते 

ह्या सोयुझ यानातुन पृथ्वीवर परतणे अंतराळवीरांंसाठी धोकादायक होते त्यामुळे नासा स्ंस्थेने ह्या यानातुन स्थानकात गेलेल्या नासाचे अंतराळवीर Frank Rubio,रशियन अंतराळवीर Sergey Prokopyev आणी Dmitri Petelin ह्या तीन अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नवीन सोयुझ यान पाठविण्याचा निर्णय घेतला होता

आता हे तिघे सोयुझ MS-23 ह्या यानातुन पृथ्वीवर परततील आणी आधीचे नादुरुस्त MS-22 हे मानवविरहित अंतराळयान मार्च महिन्याच्या शेवटी पृथ्वीवर परत येईल पृथ्वीच्या कक्षेत पोहोचल्यावर पॅराशुटच्या सहाय्याने सोयुझ यान खाली ऊतरेल

Tuesday 21 February 2023

Space X Crew-6 मोहिमेतील अंतराळवीर 26 तारखेला स्थानकात राहायला जाणार

  The four crew members that comprise the SpaceX Crew-6 mission are seated inside the SpaceX Dragon crew ship during a training session at the company's headquarters in Hawthorne, California.

 Space X Crew -6 चे नासाचे अंतराळवीर Andrey Fedyaev,अंतराळवीर Warren Hoburg ,रशियन अंतराळवीर Stephen Bowen आणि अरबी अंतराळवीर Sultan Alneyaddi  Space X Dragon मध्ये ट्रेनिंग दरम्यान -फोटो नासा संस्था

नासा संस्था  -19 फेब्रुवारी 

नासाच्या Space X Crew -6 अंतराळ मोहिमेअंतर्गत चार अंतराळवीरांना घेऊन Space X Crew Dragon सातव्यांदा अंतराळस्थानकात जाणार आहे नासाचे अंतराळवीर Stephen Bowen अंतराळवीर Warren Hoburg अरबचे अंतराळवीर (UAE) Sultan Alneyadi आणि रशियन अंतराळवीर Andrey Fedyaev ह्यांचा त्यात समावेश आहे 

26 फेब्रुवारीला नासाच्या  Kennedy Space Center Florida येथील 39 Aउड्डाण स्थळावरून Space X Dragon स्थानकात जाण्यासाठी अंतराळात ऊड्डाण करणार आहे  Endeavour अंतराळयान ह्या चार अंतराळवीरांना घेऊन सकाळी 2.07a.m.(EST) वाजता स्थानकाच्या दिशेने अंतराळात झेपावणार आहे आणि23 तासांच्या अंतराळ प्रवासानंतर 27 फेब्रुवारीला सकाळी 2.54a.m.वाजता स्थानकाच्या समोरील Port ह्या भागातील Harmony Module जवळ पोहोचेल 

ह्या मोहिमेचे कमांडर पद अंतराळवीर Stephen Bowen पायलटपद Warren Hoburg सांभाळणार असून अंतराळवीर Sultan आणि Andrey हे दोघे ह्या मोहिमेत मिशन स्पेशालिस्ट पद सांभाळणार आहेत अंतराळवीर Bowen ह्यांची हि चवथी अंतराळवारी आहे ह्या आधी तीनवेळा ते अंतराळस्थानकात राहून आले आहेत ह्या मोहिमेत ते कमांडर असल्यामुळे पृथ्वीवरून स्थानकाकडे उड्डाण आणि परत पृथ्वीवर लँडिंग हि महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे रशियन अंतराळवीर Andrey Fedyaev ,Warren Hoburg आणि अरबी अंतराळवीर Sultan हे मात्र पहिल्यांदाच स्थानकात राहायला जाणार असून व्यावसायिक अंतराळयानातून अंतराळप्रवास करणारे ते पहिले अरबी अंतराळवीर आहेत 

स्थानकात पोहोचल्यावर सध्या स्थानकात राहात असलेले अंतराळवीर त्यांचे तेथे स्वागत करतील ह्या अंतराळवीरांच्या अंतराळ उड्डाण आणि स्थानकातील प्रवेशाचे लाईव्ह प्रसारण नासा T.V.वरून करण्यात येणार असून हौशी नागरिकांना ह्या उड्डाण मोहिमेत आभासी उपस्थित राहण्याची संधी नासा संस्थेने उपलब्ध केलीआहे पण त्या साठी नासा संस्थेत नाव नोंदवून Virtual Gust Passport घेणे आवश्यक आहे 


Tuesday 14 February 2023

Curiosity यानाला मंगळावरील पुरातन काळच्या आटलेल्या पाण्याच्या स्रोत सापडले

 Rippled texture on the surface of Mars

Curiosity यानाने संशोधित केलेला मंगळावरील Marker Band ह्या भागातील पुरातनकाळच्या आटलेल्या लाटांच्या खुणा आणि आटलेले सरोवर -फोटो नासा संस्था -(J.PL Lab ) 

नासा संस्था -8 फेब्रुवारी 

नासाचे Curiosity मंगळयान 2012 पासून मंगळावर कार्यरत आहे मंगळावरील पुरातनकाळच्या सजीवसृष्टीच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरावे शोधण्याचे काम हे मंगळयान करत आहे आजवर ह्या यानाने तेथील अत्यंत महत्वपूर्ण संशोधित माहिती आणि नमुने गोळा केले आहेत आणि आता Curiosity मंगळयान मंगळभूमीवरील पुरातनकाळच्या पाण्याच्या आटलेल्या स्त्रोताच्या भागात पोहोचले आहे 

मंगळावरील Marker Band Valley ह्या भागात Curiosity यानाला पुरातन काळच्या प्रवाहित पाण्याच्या आटलेल्या स्वरूपातील खुणा सापडल्या आहेत हा भाग कोरडा वाळवंटीय असून तेथील मातीत Sulfate आणि मिठाचे क्षार विपुल प्रमाणात आढळले आहेत शास्त्रज्ञांच्या मते पुरातनकाळी येथे प्रवाहित पाण्याचे अस्तित्व होते ह्याचा हा ठोस पुरावा आहे करोडो वर्षांपूर्वी तेथे पाणी प्रवाहित स्वरूपात अस्तित्वात होते आणि कालांतराने ते नष्ट झाले तेव्हा त्यातील मिनरल्स,सल्फेट आणि मीठ देखील पाण्यासोबत आटले आणि सूक्ष्म स्वरूपात तेथील मातीत अस्तित्वात राहिले ह्या भागात आटलेले सरोवर आणि प्रवाहित लाटांच्या लहरीच्या खुणा फोल्डिंगच्या स्वरूपात आहेत आणि आजूबाजूला सरोवराच्या पाण्यातील गाळांमुळे तयार झालेल्या सेडीमेंटरी खडकांचे थर आढळले आहेत 

ह्या आटलेल्या पाण्याच्या लाटांच्या लहरी पाहून Curiosity टीम मधील शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत ह्या सरोवरातील पाणी आटले तेव्हा त्याच्या तळाशी जमलेला गाळ देखील वाळला आणि तेथे खडकाच्या स्वरूपात अस्तित्वात राहिला तेव्हा गाळातील मातीतील मिठाचे आणि सल्फेटचे अंश देखील आटलेल्या अवस्थेत अस्तित्वात राहिले नासाच्या Jet Propulsion Lab चे Curiosity Project Scientist  Dr .Ashwin Vasavada म्हणतात,Curiosity यानाने ह्या मोहिमेत आतापर्यंत संशोधित केलेल्या भागांमध्ये हा भाग मंगळावरील पुरातन काळच्या पाण्याच्या अस्तित्वाला दुजोरा देणारा उत्कृष्ट पुरावा आहे प्रवाहित पाणी आणि पाण्याच्या लाटांच्या आटलेल्या खुणा ह्या मोहिमेत आम्हाला प्रथमच आढळल्या आहेत आजवर आम्ही मंगळभूमीवरील हजारो फुटावरून सरोवराचा भाग शोधला पण असे ठिकाण सापडले नव्हते मंगळावरील Mount Sharp ह्या भागातील 5k.m.उंचीवरील पर्वतीय दऱ्याखोऱ्यांच्या ह्या भागातील उतारावरून आम्ही पाण्याच्या झऱ्याचे,प्रवाहाचे स्रोत व सरोवर पाहण्याचा प्रयत्न केला कारण ह्या भागात पुरातन काळी पाण्याचे अस्तित्व असल्याचा अंदाज आम्हाला होता हा भाग पाण्याच्या अस्तित्वाने समृद्ध असावा त्यामुळे तेथे सूक्ष्म सजीवसृष्टीच्या उत्पत्तीचीही शक्यता असावी असे आमचे मत होते पण अखेर ह्या रुक्ष वाळवंटात आम्हाला पुरातनकाळच्या पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले 

 NASA’s Curiosity used its Mastcam to capture this 360-degree panorama of “Marker Band Valley” Curiosity मंगळयान 16 डिसेंबर 2022ला मंगळावरील 3,684 व्या मंगळदिवशी Marker Band Valley  येथे कार्यरत असताना -फोटो -नासा संस्था

Mount Sharp हा भाग सेडीमेंटरी खडकांच्या लेयर्सनी बनलेला आहे त्या काळी प्रवाहित पाण्यातील वहात आलेला गाळ,माती आणि वाळू ह्या पासून तयार झालेल्या खडकांचे एकमेकांवर थर साचून हे खडक तयार झाले असावेत खालचे थर प्राचीन असून सर्वात वरचा खडकांचा थर नंतर साचलेल्या गाळापासून तयार झालेला आहे हा भाग उंच पर्वत आणि लहानमोठ्या डोंगरांचा आहे हे वातावरण आणि तेथील आटलेल्या सरोवराच्या आणि लाटांच्या खुणा पाहून शास्त्रज्ञांना मंगळावर पुरातन काळी पृथ्वीसारखे वातावरण अस्तित्वात असण्याची शक्यता वाटते त्या मुळे एकेकाळी पृथ्वीसारखे उबदार वातावरण आणि सजीवसृष्टीचे अस्तित्व असलेला हा भाग कालांतराने वाळवंटात कसा परावर्तित झाला ह्याचे संशोधन शास्त्रज्ञ करत आहेत 

ह्या पर्वतीय भागाच्या पायथ्यापासून अर्धा मैल उंचीवर Curiosity मंगळ यान चढले तेव्हा Curiosity यानाला ह्या आटलेल्या लाटांचा भाग आढळला ह्या भागाला Marker Band असे नाव देण्यात आले आहे ह्या सरोवराभोवती एक डार्क रंगाच्या खडकांचा पातळ थरही आढळला असून तो उर्वरित भागापासून वेगळा आहे आणि अत्यंत कठीण  खडकांनी बनलेला आहे Curiosity यानाला तो फोडता न आल्याने तेथील नमुना घेण्यात अपयश आले ह्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या "Vera Rubin Ridge " ह्या भागातील खडक असेच कठीण असल्याने Curiosity यानाला ते फोडण्यासाठी तीनवेळा प्रयत्न करावे लागले होते Marker Band ह्या भागात ह्या टीमला एक वैशिष्टपूर्ण आकाराचा खडक आढळला तेथील भौगोलिक घडामोडीमुळे हा खडक तयार झाला असावा

पुढच्या आठवड्यात ह्या टीममधील शास्त्रज्ञ त्या भागातील नरम खडकांचा शोध घेतील Marker Band भागापासून दुरवर Gediz Vallis Ridge ह्या भागातील आटलेल्या खोऱ्यात पाण्याच्या स्रोताचे अवशेष सापडू शकतात अशी शक्यता शास्त्रज्ञांना वाटते तेथे वादळामुळे दरी निर्माण झाली असावी आणि पर्वतावरून पाण्याचा प्रवाह खाली वहात येऊन पायथ्याशी प्रवाहाचे नदीत रूपांतर झाले असावे शिवाय मंगळावरील पुरातन काळच्या भौगोलिक घडामोडी अती पावसाने आलेला पूर आणी भूस्खलन होऊन तेथील मोठमोठे खडक,मातीचे ढिगारे वाहून खालीपर्यंत आले असावे Curiosity यानाला मागच्या वर्षी दोनवेळा असे ढिगाऱ्यांनी बनलेले दगडांचे थर आढळले होते पण हे निरीक्षण दुरून केलेले होते आता तेथे सखोल संशोधन केले जाईल 

लाटांचे तरंग,आटलेल्या ढिगाऱ्यांचे प्रवाह आणि तेथील लयबद्ध थर पाहून मंगळावर करोडो वर्षांपूर्वी प्रवाहित स्वरूपात पाण्याचे अस्तित्व होते आणि कालांतराने नंतर ते आटले आणि नष्ट झाले ह्याचा हा सबळ पुरावा आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात

Saturday 4 February 2023

अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी अंतराळवीर Nicole Mann आणि Koichi Wakata ह्यांचा स्पेसवॉक


Spacewalkers Koichi Wakata (top) and Nicole Mann (bottom) work on the starboard truss structure to upgrade the space station's power generation system.

नासाच्या अंतराळ मोहीम 68चे जपानी अंतराळवीर Koichi Wakata आणि अंतराळवीर Nicole Mann  स्थानकाच्या बाहेरील Power generation System upgrade करण्यासाठी स्पेसवॉक करताना -फोटो नासा संस्था

नासा संस्था -3 फेब्रुवारी

नासाच्या अंतराळ मोहीम 68 चे अंतराळवीर Nicole Mann आणी जपानी अंतराळवीर Koichi Wakata ह्यांंनी दोन फेब्रुवारीला गुरुवारी स्थानकाच्या बाहेरील भागातील Power Generation System मधील कामासाठी स्पेसवॉक केला

ह्या दोन्ही अंतराळवीरांनी आदल्या दिवशीच ह्या स्पेसवॉक साठीची तयारी करून ठेवली होती त्यांनी स्पेसवॉकसाठी लागणारा स्पेससुट चार्ज करून चेक केला शिवाय स्पेसवॉकसाठी लागणारा टुल बॉक्स,हार्डवेअर,कॅमेरा आणी इतर आवश्यक सामान तयार ठेवले हे दोन्ही अंतराळवीर गुरुवारी सकाळी 7.45 मिनिटाला स्पेसवॉक साठी स्थानकाबाहेर पडले आणी 6 तास 41 मिनिटांचा स्पेसवॉक संपवून दुपारी 2 वाजुन 26 मिनिटांनी स्थानकात परतले

सहा तासांच्या ह्या स्पेसवॉक दरम्यान ह्या दोन्ही अंतराळवीरांनी स्थानकाच्या Starboard Truss ह्या भागातील सोलर System मध्ये काम केले ह्या भागातील ऊर्जा निर्मिती आणी बॅटरी चार्जिंगची क्षमता वाढविण्यासाठी त्यांनी हा स्पेसवॉक केला त्यांनी स्थानकाच्या Starboard Truss मधील 1A Solar Power Channel मध्ये नवीन Solar Array  install करण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार केला ह्या भागातून स्थानकाला लागणारा प्रकाश,संशोधनासाठी व इतर कामासाठी लागणारी ऊर्जा निर्मिती केली जाते

ह्या आधी 20 जानेवारीला ह्याच कामासाठी स्पेसवॉक करण्यात आला होता ह्या शिवाय ह्या अंतराळवीरांनी ह्या स्पेसवॉक मध्ये ईतर कामेही पुर्ण केली आणी पुढिल स्पेसवॉकची पुर्वतयारीही करुन ठेवली आतापर्यंत स्थानकाच्या बाहेरील भागातील Solar Power channel मध्ये चार Solar Array install करण्यात आले आहेत ऊरलेले दोन Solar Array पुढिल स्पेसवॉक मध्ये install करण्यात येतील त्यासाठी लागणारे केबल व ईतर साहित्य ह्या अंतराळवीरांनी त्या ठिकाणी नेऊन ठेवले 

अंतराळवीर Nicole Mann ह्यांनी ह्या स्पेसवॉक मध्ये परीधान केलेल्या स्पेससुटवर लाल रंगाच्या रेषा होत्या  अंतराळवीर Koichi Wakata ह्यांचा स्पेससूट मात्र रेषाविरहित होता ह्या दोन्ही अंतराळवीरांच्या अंतराळ कारकिर्दीतला हा दुसरा स्पेसवॉक होता 

आजवर स्थानकाच्या कामासाठी केलेला हा 269 वा स्पेसवॉक होता आणी ह्या वर्षातला हा दुसरा स्पेसवॉक होता