Tuesday 31 May 2022

Insight मंगळयानाने पाठविला शेवटचा सेल्फी

 NASA’s InSight lander took this final selfie on April 24, 2022, the 1,211th Martian day, or sol, of the mission. The lander is covered with far more dust than it was in its first selfie, taken in December 2018, not long after landing – or in its second selfie, taken in March and April of 2019.

नासाच्या Insight Mars Rover ने पाठविलेला शेवटचा सेल्फी -फोटो -नासा संस्था (J.PL Lab)

नासा  संस्था -23मे 

नासाचे Insight Mars Rover मंगळ ग्रहावरील भूपृष्ठाखालील भागातील अंतर्गत माहिती गोळा करण्यासाठी आणि मंगळावरील पुरातन सजीवसृष्ठीच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरावे शोधण्यासाठी 20 नोव्हेंबर 2018 साली मंगळावर पोहोचले होते Insight मंगळ यान मंगळावरील Elysium Planitia ह्या भागात उतरले होते आजवर Insight यानाने मंगळावरील महत्वपूर्ण संशोधित माहिती पृथ्वीवर पाठविली आहे 

Insight Mars Rover ने मागच्या महिन्यात 24 एप्रिलला शेवटचा सेल्फी पाठवला आहे हा सेल्फी यानाच्या मंगळ ग्रहावरील 1,211व्या मंगळ दिवशी (Sol) काढलेला आहे ह्या सेल्फीत मंगळयानावर खूप धूळ जमलेली दिसत असून हा फोटो अस्पष्ट आहे ह्या आधी Insight यानाने 2018च्या डिसेंबर मध्ये म्हणजे मंगळावर पोहोचल्यानंतर काही दिवसातच सेल्फी काढून पाठवला होता त्यानंतर 2019 च्या एप्रिलमध्ये Insight यानाने पुन्हा सेल्फी काढून पृथ्वीवर पाठविला होता ह्या दोन्ही सेल्फीतील Insight यानाचे फोटो स्पष्ट व चांगले आले आहेत पण आताच्या सेल्फीतील Insight यानाचा फोटो पुसट,अस्पष्ट आणि धुळीने माखलेला आहे 

नासाच्या J.PL Labमधील Insight Mars Rover च्या टीम प्रमुखानी प्रसारित केलेल्या माहिती नुसार यानातील रोबोटिक आर्मद्वारे हा सेल्फी काढताना यानाला अनेकवेळा प्रयत्न करावे लागले मंगळावर झालेल्या धुळीच्या वादळामुळे Insight  यान आणि यानातील सौर पॅनलवर धूळ जमा झाली आहे त्या मुळे सौरऊर्जा निर्मितीवर परिणाम झाला आहे Insight मंगळ यानाच्या सोलर पॉवर युनिट मधून ताशी 5,000 Watt सौर ऊर्जेची निर्मिती होते पण धुळीमुळे आणि वातावरणातील बदलामुळे ह्या सौर पॅनल ची सौरऊर्जा निर्मितीची क्षमता कमी झाली असून सध्या ती दसपटीने कमी म्हणजे फक्त 500 Watt इतकी आहे त्या मुळे यानातील अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणेवर परिणाम झाला आहे आणि येणाऱ्या काही महिन्यात मंगळावरील धुळीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे वातावरणात बदल होईल आणि मंगळ ग्रहावर सूर्यप्रकाश देखील कमी पडेल अशा अवस्थेत Insight यानाची कार्यक्षमता देखील कमी होईल त्या मुळे सौर पॅनल वरील धूळ दूर करणे आवश्यक आहे पण सध्या तरी हे काम अत्यंत कठीण आहे Insight मंगळयानाच्या टीम मधील शास्त्रज्ञांनी म्हणूनच मंगळयानाच्या रोबोटिक आर्मचे काम काही काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे रोबोटिक आर्मच्या ह्या स्थितीला "Retirement Pose " असे म्हणतात लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल 

नासाच्या Marshall Space Flight Center ह्या संस्थेतून Insight मंगळयानाच्या स्वयंचलित यंत्रणेवर नियंत्रण ठेवल्या जाते नासा संस्थेतील Germany,France,UK मधील Space Center मधील टीम मधील शास्त्रज्ञ देखील त्या साठी सहकार्य करतात Insight मंगळयानाचा मंगळावरील कार्यकाळ फक्त दोन वर्षांचा होता पण त्याची कार्यक्षमता पाहून तो काळ 2022 डिसेंबर पर्यंत वाढविण्यात आला होता Insight यानाने ह्या काळात अत्यंत महत्वपूर्ण माहिती गोळा केली भूगर्भातील सॅम्पल्स गोळा केले आणि हि संशोधित माहिती आणि फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत 

ह्या महिन्यात 4 मेला Insight यानाच्या मंगळावरील 1,222व्या मंगळ दिवशी  मंगळावर झालेल्या भूकंपाची माहिती व नोंद यानाने पृथ्वीवर पाठविली होती हा भूकंप 5 रिक्टर स्केल एव्हढा होता ह्या भूकंपाच्या Seismogram चा व्हिडिओ देखील यानाने पृथ्वीवर पाठविला होता

Saturday 21 May 2022

नासाचे मानवविरहित Boeing Starliner अंतराळयान अंतराळस्थानकात पोहोचले

  Boeing's Starliner crew ship is seen moments after docking to the International Space Station's forward port on the Harmony module. Credit: NASA TV

             नासाचे Boeing Starliner अंतराळयान स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -  नासा आणी Boeing ह्यांच्या सहकार्याने बनवलेले नवे व्यावसायिक Boeing Starliner अंतराळयान विस मेला स्थानकात पोहोचले मानव विरहित Flight Test -2 अंतराळ मोहिमे अंतर्गत 19 मेला रात्री 6.54 मी. वाजता  Boeing Starliner CST-100 अंतराळयान नासाच्या फ्लोरिडा येथील Cape Canaveral Space Force Station येथील ऊड्डान स्थळावरुन Atlas V रॉकेट च्या साहाय्याने अंतराळ स्थानकात जाण्यासाठी आकाशात झेपावले आणी 31 मिनिटांनी रॉकेट पासून वेगळे होऊन अंतराळ प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात पोहोचले त्या नंतर अंतराळयान स्थानकाच्या दिशेने अंतराळ प्रवासास निघाले Starliner अंतराळयान 20 मेला 8.28 p.m.ला स्थानकाच्या समोरील भागातील Harmony Module जवळ पोहोचले आणि 11.45a.m.ला अंतराळस्थानकातील अंतराळवीरांनी Boeing Starliner आणि स्थानक ह्यांच्यातील Hatching प्रक्रिया पार पाडली 

अमेरिकेची अमेरिकन भूमीवरून अमेरिकन निर्मित अंतराळ यानातून अंतराळवीरांना स्थानकात नेण्याआणण्याची मोहीम पुन्हा सुरु झाल्यानंतर नासा आणि Space X crew Dragon ह्यांच्या सहकार्याने सुरु झालेले Space X Crew Dragon अंतराळयान चारवेळा अंतराळवीरांसह अंतराळस्थानकात जाऊन आले ह्या व्यावसायिक अंतराळयान मोहिमेच्या यशानंतर नासा आणि Boeing ह्यांच्या सहकार्याने Boeing CST-100 Starliner अंतराळयानाची निर्मिती करण्यात आली ह्या यानाची उड्डाण पूर्व पहिली चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता मानवविरहित दुसरी उड्डानचाचणी घेण्यात आली आहे ह्या अंतराळयानाचा उपयोग भविष्यकालीन अंतराळ मोहोमातील अंतराळवीरांना अंतराळ स्थानकात नेण्याआणण्यासाठी होणार आहे त्यामुळेच अंतराळवीरांनी अंतराळप्रवास करण्याआधी ह्या यानात काही त्रुटी राहिल्या आहेत का ?हे तपासून पाहणे आवश्यक होते त्यासाठी हे मानवविरहित यान अंतराळस्थानकात पाठवण्यात आले आहे ह्या यानाचा उपयोग व्यावसायिक अंतराळ मोहिमांसाठी आणि त्यातील अंतराळवीरांसाठीही होणार आहे 

Boeing Starliner अंतराळ यान मानवविरहित असले तरीही त्यातून अंतराळवीरांसाठी लागणारे आणि अंतराळ स्थानक आणि तेथे सुरु असलेल्या संशोधनासाठीचे आवश्यकअसलेले 500 टन सामान स्थानकात पाठवण्यात आले आहे आणि  25 मेला Boeing Starliner अंतराळयान पृथ्वीवर परत येण्यासाठी निघेल तेव्हा त्यामधून जवळपास 600 पौंड सामान परत पाठवण्यात येईल त्यामध्ये स्थानकातील नको असलेल्या सामानासोबत स्थानकातील अंतराळवीरांना श्वासोच्छवासासाठी लागणारे Oxygen पुरवणाऱ्या Oxygen Recharge System (NORS) Tanks चा समावेश आहे हे Tanks पृथ्वीवर दुरुस्त करून पुन्हा स्थानकात पाठवण्यात येणार आहेत 

नासाचे Administrator Bill Nelson ह्यांनी हि मोहीम यशस्वी झाल्यानंतर समाधान व्यक्त केले ते म्हणाले हे ह्या टीममधील सर्वांचे यश आहे त्यांची मेहनत धैर्य आणि कामातील निष्ठा ह्या मुळे हे यश मिळाले आहे त्यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण कामाने अमेरिकेचे नाव अंतराळ विश्वात प्रगतीपथावर नेले आहे ह्या Boeing Starliner यानाच्या सेवेमुळे भविष्यकालीन अंतराळमोहिमेतील अंतराळवीरांना अंतराळप्रवास करणे सोपे होईल हि दुसरी मानवविरहित यशस्वी अंतराळयान उड्डाण टेस्टअंतराळविश्वात मैलाचा दगड ठरेल आणि अंतराळवीरांच्या स्वतंत्रपणे स्थानकात जाण्यासाठीच्या अंतराळप्रवासाचा शुभारंभ ठरेल 

नासाच्या Associate Administrator Kathryn Leuder ह्यांनी देखील आनंद व्यक्त केला ह्या असामान्य यशस्वी उड्डाणाबद्दल आम्ही Boeing Starliner टीमचे आभारी आहोत ह्या मोहिमेत सर्वांनी एकत्रित काम करून हि मोहीम यशस्वी केली आहे आगामी काळात Boeing Starliner अंतराळ यानातून अंतराळ प्रवास करणे अंतराळवीरांना सोयीचे होईल ह्या मानाविरहित Boeing Starliner अंतराळयानाच्या उड्डाण सोहळ्याचे नासा T.V. वरून लाईव्ह प्रसारण करण्यात आले होते आणि सामान्य हौशी नागरिकांना सोशल मीडियावरून व्हर्च्युअली सहभागी होण्याची संधीही देण्यात आली होती 

Wednesday 18 May 2022

Blue Origin चे New Shepard अंतराळयान पाचव्यांदा सहा अंतराळप्रवाशांसह अंतराळात झेपावणार

  

                        Blue Originच्या NS-21 मोहिमेतील सहा अंतराळ प्रवासी -फोटो -Blue Origin 

Blue Origin -13 मे 

 Blue Origin च्या NS-21 अंतराळ पर्यटन मोहिमे अंतर्गत सहा नागरिक विस तारखेला अंतराळप्रवास करणार आहेत Blue Origin ची हि पाचवी अंतराळ मोहीम आहे ह्या आधी चारवेळा Blue Origin च्या New Shepard अंतराळयानातून नागरिकांनी अंतराळ प्रवास केला आहे आता पाचव्यांदा New Shepard अंतराळयान प्रवाशांना घेऊन अंतराळात झेपावणार आहे 

ह्या यानातून प्रवास करणाऱ्या सहा प्रवाशांमध्ये ,Evan Dick-(Investor आणि NS-19 चे अंतराळवीर) ,Katya Echazarreta -(Test Lead -NASA) ,Hamish Harding -(Jet Pilot & Chairman of Action Aviation) Victor Correa Hespanha(Civil Production Engineer)  Jaison Robinson -(Adventurer &Dream Variation )  Victor Vescovo -Commander USN(Ret.) Explorer &Cofounder Of Private Equity Firm ह्यांचा समावेश आहे Katya पहिली सगळ्यात तरुण अमेरिकन निवासी पण (मुळची मेक्सिकन) महिला आहे  Space For Humanity ह्या संस्थेने Citizen  Astronaut प्रोग्राम अंतर्गत तिचे तिकीट स्पॉन्सर केले आहे तर Victor Correa ह्यांचे तिकीट Crypto Space Agency ने स्पॉन्सर केले आहे 

वीस मेला सकाळी 9.30 वाजता (EDT) Blue Origin च्या उड्डाणस्थळावरून New Shepard रॉकेट आणि अंतराळयानातून  हे अंतराळयात्री अंतराळात उड्डाण करतील आणि पृथ्वी आणि अंतराळ ह्यांच्यामधील Karman Line भेदून पृथ्वीच्या कक्षेच्या वर 100k.m. अंतरावर अंतराळात प्रवेश करतील आणी अंतराळ प्रवासानंतर पॅराशूटच्या साहाय्याने परत पृथ्वीवर उतरतील ह्या अंतराळ प्रवाशांच्या अंतराळ प्रवेश आणि परत पृथ्वीवर परतण्याचे लाईव्ह प्रसारण Blue Origin च्या वेबसाईट वरून करण्यात येणार आहे हवामान अनुकूल नसल्यास ह्या प्रवाशांचे अंतराळउड्डाण नियोजित वेळेत होणार नाही


Saturday 7 May 2022

नासाच्या Space X-Crew-3 चे चार अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप पोहोचले

 From left to right, ESA (European Space Agency) astronaut Matthais Maurer, NASA astronauts Tom Marshburn, Raja Chari, and Kayla Barron, are seen inside the SpaceX Crew Dragon Endurance spacecraft onboard the SpaceX Shannon recovery ship.

अंतराळवीर Matthias Maurer अंतराळवीर Tom Marshburn अंतराळवीर Raja Chari आणि Kayla Barron Endurance Space X अंतराळयानातून पृथ्वीवर परतल्यानंतर -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -6 मे 

नासाच्या अंतराळमोहीम Space X -Crew -3 चे अंतराळवीर Raja Chari,Kayla Barron,Tom Marshburn आणि युरोपियन अंतराळवीर Matthias Mourer शुक्रवारी सहा मेला पृथ्वीवर सुखरूप पोहोचले आहेत हे चारही अंतराळवीर नोव्हेंबर 2021 मध्ये सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी अंतराळस्थानकात गेले होते आता स्थानकातील 175 दिवसांचा मुक्काम संपवून पृथ्वीवर परतले आहेत 

 हे चारही अंतराळवीर पाच तारखेला दुपारी 1.05 वाजता  स्थानकातून पृथ्वीवर येण्यासाठी निघाले आणि सहा तारखेला दुपारी 2.43 वाजता पृथ्वीवर परतले निघण्याआधी स्थानकात ह्या अंतराळवीरांचा फेअरवेल सेरेमनी आणि कमांड चेंज सेरेमनी पार पडला त्यावेळी सध्याचे कमांडर Tom Marshburn ह्यांनी कमांडर पदाची सूत्रे रशियन अंतराळवीर Oleg Artemyev ह्यांच्या हाती सोपिवली 

  NASA astronaut Tom Marshburn handed over command of the International Space Station to Russian cosmonaut Oleg Artemyev in a traditional Change of Command ceremony today ahead of Crew-3’s departure tonight. Credit: NASA TV.

स्थानकातील कमांडर चेंज सेरेमनी दरम्यान अंतराळवीर Tom Marshburn स्थानकाची सूत्रे अंतराळवीर Oleg Artemyev ह्यांच्या हाती सोपवताना -फोटो -नासा संस्था

ह्या चारही अंतराळवीरांना घेऊन Space X चे Endurance अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत शिरताच पॅराशूटच्या साहाय्याने फ्लोरिडा येथील Gulf of Mexico ह्या खाडीत दुपारी 12.43 वाजता (स्थानिक वेळ )उतरले Space X Endurance खाडीत उतरताच Space X च्या Shannon recovery ship ची टीम त्वरित तेथे पोहोचली त्या मध्ये दोन फास्ट बोटींचा समावेश होता ह्या बोटींच्या साहाय्याने यानाला शिप पर्यंत आणून व्यवस्थित डेकवर चढवण्यात आले त्यानंतर Space X यानाचे दार उघडून अंतराळवीरांना यानातून बाहेर काढण्यात आले त्यांना पिण्यासाठी पाणीही  देण्यात आले तेव्हा अंतराळवीर राजा चारी ह्यांनी आता आम्हाला पाण्याच्या बाटलीचे वजन जाणवत आहे असे म्हटले पृथ्वीवर परतल्यानंतर सर्व अंतराळवीर आनंदित झाले होते रिकव्हरी टीम मधील डॉक्टरांनी ह्या अंतराळवीरांचे प्राथमिक चेकअप केले त्यानंतर ह्या अंतराळवीरांना नासाच्या विमानाने Johnson Space Center मध्ये नेण्यात आले 

नासाचे Administrator Bill Nelson ह्यांनी हे सर्व अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतल्यानंतर त्यांचे स्वागत केले आणि त्यांनी सहा महिने स्थानकात राहून केलेल्या संशोधनाबद्दल त्यांचे आभार मानले ते म्हणाले ह्या Space X च्या मोहिमेतील अंतराळवीरांच्या यशस्वी अंतराळप्रवासामुळे आणि स्थानकातील जाण्यायेण्यामुळे व्यावसायिक अंतराळउड्डाणांच्या सुवर्णयुगाची सुरवात झाली आहे 

अंतराळवीर Kayla Barron ,Raja Chari ,Marshburn आणि अंतराळवीर Maurer ह्यांनी त्यांच्या स्थानकातील 175 दिवसांच्या वास्तव्यादरम्यान 75,060792 मैलांचा अंतराळप्रवास केला असून त्या दरम्यान 2,832 वेळा पृथ्वीभोवती भ्रमण केले आहे 

अंतराळवीर Tom Marshburn हे तिसऱ्यांदा अंतराळस्थानकात राहायला गेले होते त्यांच्या तीन वेळच्या अंतराळ कारकिर्दीत त्यांनी स्थानकात 339 दिवस वास्तव्य केले आणि स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी पाचवेळा स्पेसवॉक केला अंतराळवीर Raja Chari,Kayla Barron आणि Matthias Maurer ह्यांची मात्र हि पहिलीच अंतराळवारी होती अंतराळवीर Raja Chari आणि Kayla ह्यांनी त्यांच्या ह्या पहिल्या मोहिमेत स्थानकाच्या कामासाठी दोनवेळा स्पेसवॉक केला तर अंतराळवीर Matthias ह्यांनी एकवेळा स्पेसवॉक केला 

ह्या चारही अंतराळवीरांनी त्यांच्या सहा महिन्यांच्या स्थानकातील वास्तव्यात तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभाग नोंदवला त्यांनी स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत Fibers कसे वाढतात Hydroponic आणि Aeroponic Technique वापरून माती आणि इतर ग्रोथ मटेरिअल्सचा वापर न करता झिरो ग्रॅव्हीटीत रोपे कशी वाढतात ह्या विषयी संशोधन केले शिवाय झिरो ग्रॅव्हीटीत मानवी शरीरांवर होणारे बदल व दुष्परिणाम ह्यांचे निरीक्षण नोंदवून त्यांचे सॅम्पल्स गोळा केले पृथ्वीवरील पर्यावरण रक्षण आणि वेगवेगळ्या मानवी रोगांवर अत्याधुनिक उपचार करण्यासाठी उपयुक्त संशोधनही केले