You Have Got Perseverance ह्या उपक्रमादरम्यान विध्यार्थी ,शिक्षक आणि पालकांसोबत व्हर्च्युअली संवाद साधताना JPL Lab मधील टीम- फोटो नासा संस्था
नासा संस्था -17 फेब्रुवारी
नासाच्या मंगळ मोहिमेत सर्वसामान्यांना सहभागी करून घेण्यासाठी नासा संसंस्थेतर्फे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात ह्या मंगळ मोहिमेत शाळकरी विध्यार्थ्यांना सहभागी करून त्यांच्यात अंतराळमोहिमेबद्दल जागृती निर्माण व्हावी ह्या उद्देशाने नासा संस्थेतर्फे "You Have Got Perseverance" हि अभिनव स्पर्धा जाहीर करण्यात आली होती आणि त्याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसादहि मिळाला
ह्या स्पर्धेत सहभागी मुलांच्या निवडीसाठी अनेक चाचणी परीक्षा घेण्यात आल्या अंतिम चाचणी नंतर निवड झालेल्या मुलांची बौद्धिक क्षमता,ध्येयवादी दृष्टिकोन आणि बौद्धिक कसोटी पारखून पात्र ठरलेल्या मुलांची ह्या उपक्रमासाठी निवड करण्यात आली अमेरिकेतील Cohort मधील सहावी ते आठवी मधील विध्यार्थ्यांच्या वीस जणांच्या ग्रुपला मंगळयानाशी चॅट करण्याची पहिली संधी देण्यात आली त्यांनी Perseverance मंगळयानाची निर्मिती प्रक्रिया त्याचे कार्य त्या दरम्यान आलेल्या अडचणी आणि त्यावर मात करून मोहीम यशस्वी केलेल्या टीमशी संवाद साधून ह्या विषयीची माहिती जाणून घेतली शिवाय मंगळयानाशी लाईव्ह चॅटहि केले नासा संस्थेने दिलेल्या ह्या ऐतिहासिक सुवर्णसंधीचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी मनातील अतीव इच्छा आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ह्या जगात काहीही साध्य करता येते हे सिद्ध केले
15 फेब्रुवारीला ह्या विध्यार्थ्यांना फोनवरून ह्या उपक्रमात सहभागी होण्यास सांगण्यात आले नासाच्या California मधील Jet Propulsion Lab मध्ये ह्या ऐतिहासिक उपक्रमाचा शुभारंभ झाला ह्या विद्यार्थ्यांनी Jet Propulsion Lab मधील Control room मधील Perseverance टीम मधील डझनभर मेंबरशी संवाद साधला मंगळ मोहिमेच्या टीम मॅनेजर Jessica Samuel ह्यांनी कोरोना निर्बंधाचे पालन करत ह्या विद्यार्थ्यांसोबत व्हर्च्युअली मीटिंगद्वारे संवाद साधला मुलांनी Perseverance मंगळ यान त्याची कार्यक्षमता विशेषतः त्याची मेसेज पाठवण्याची पद्धत (Seq .Echo Capability ) ह्या बाबतीत प्रश्न विचारले पृथ्वीवरून मंगळावरील ह्या यानांपर्यंत मेसेज कसे पोहोचतात ते यानाकडून कसे स्वीकारले जातात त्यानुसार मंगळयान कसे कार्य करतो तसेच मंगळयान पृथ्वीवर कसे मेसेज पाठवतो ह्या संदर्भात माहिती जाणून घेतली Samuel ह्यांनी त्या संदर्भातील व्हिडिओ दाखवून त्यांच्या शंकांचे निरसन केले ह्याचवेळी विध्यार्थ्यांना पृथ्वीपासून 200मिलियन मैल (320 मिलियन k.m.) दूर असलेल्या मंगळ ग्रहावर कार्यरत असलेल्या Perseverance मंगळ यानासोबत लाईव्ह चॅट करण्याची सुवर्णसंधीही दिली आणि यानाला Text मेसेज पाठवून त्याचा reply कसा मिळतो ह्याचे प्रात्यक्षित दाखवले ह्या वेळी प्रथमच विध्यार्त्यांनी परग्रहावरील यानाशी संपर्क साधून रिप्लाय मिळवला
नासाच्या Perseverance मंगळयानाच्या प्रोजेक्ट मॅनेजर Jenifer Trosper JPL Lab मधील Perseverance टीम सोबत विद्यार्थ्यांशी व्हर्च्युअली संवाद साधताना -फोटो -नासा संस्था
फ्लोरिडा येथील Shannon Hayes ह्या जिनेटिकली विकलांग विद्यार्थिनीला Perseverance यानाशी संपर्क साधण्याची पहिली संधी देण्यात आली तेव्हा यानाने तिला Shannon तू हे सिद्ध केलेस कि जर आपल्या मनात इच्छा असेल आणि ती साध्य करण्याची जिद्द असेल तर प्रयत्नांच्या आणि बुद्धीच्या जोरावर ती साध्य करता येते हे सिद्ध करून दाखवलस असा रिप्लाय दिला Shannon जिनेटिक प्रोब्लेममुळे शाळेत जाऊ शकत नाही तिच्या शारीरिक असमर्थतेमुळे काही मर्यादा आहेत पण तिची बौद्धिक क्षमता,आकलन शक्ती आणि कुशाग्र बुद्धी आश्चर्यकारक आहे वयाच्या मानाने ती खूपच समजूतदार आहे ,बुद्धिमान आहे विशेष म्हणजे तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पॉझीटीव्ह आहे अस तिच्या टिचरने तिच्याबद्दल लिहील होत त्या मुळेच तिची निवड संस्थेने केली तिला Perseverance मंगळ यान मंगळावरील सूक्ष्म ग्रॅव्हिटी आणि खडकाळ भागात कार्यरत करण्यायोग्य बनवताना काय समस्या आल्या आणि टीमने त्यावर कशी मात केली हे जाणून घायचे होते बाकीच्या मुलांनी मंगळावरील पाण्याचे स्रोत,यानाने गोळा केलेले खडकांचे सॅम्पल्स ,मंगळयान Plutonium power चा वापर कसा करतो ह्या संदर्भातील माहिती जाणून घेतली
Perseverance मंगळ यानाच्या प्रोजेक्ट मॅनेजर Jenifer Trosper ह्यांनी ह्या उपक्रमातील निवड करतानाचा अनुभव शेअर केला त्या म्हणाल्या ह्या मुलांचे प्रश्न त्यांची जिज्ञासा त्यांची अफाट बुद्धिमत्ता पाहून ह्या मुलांची भविष्यकालीन यशाच्या मार्गावरच्या वाटचालीची जाणीव होते ह्या निवडीदरम्यान काही मुलांच्या संघर्षरत आयुष्याची वास्तविकता वाचून माझे डोळे पाणावले आणि मी त्यामुळे Inspire देखील झाले
हा अभिनव ऐतिहासिक उपक्रम नासाच्या JPL lab संस्थेद्वारे आयोजित केला होता ह्या Perseverance मंगळ यानाच्या टीमला मंगळयानाच्या निर्मितीदरम्यान अनेक समस्यांना अडचणींना सामोरे जावे लागले कारण तो काळ जागतिक महामारीचा होता पण कोरोना काळातील कडक निर्बंधाचे पालन करीत ह्या टीमने अथक परिश्रम करून हि मोहीम यशस्वी केली
नासाचा You Have Got Perseverance हा उपक्रम ह्या वर्षाखेरपर्यंत चालणार असून 28 फेब्रुवारीला ह्या स्पर्धेची अंतिम तारीख आहे 24 मार्चला निवड झालेल्या विध्यार्थ्यांच्या दुसऱ्या टीमला मंगळयानासोबत लाईव्ह चॅट करण्याची संधी देण्यात येणार आहे