Thursday 25 November 2021

अंतराळवीरांनी दिल्या स्थानकातून Thanks Giving Day च्या शुभेच्छा !

अंतराळ स्थानकातून लाईव्ह संवादादरम्यान अंतराळवीर Kayla ,Mattias ,Tom ,Mark Vande आणि Raja चारी फिस्ट चे पदार्थ दाखवताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 25 नोव्हेंबर 

दरवर्षी अमेरिकेत 25 नोव्हेंबरला Thanks Giving Day उत्साहात साजरा केल्या जातो वर्षभरात नातेवाईकांनी ,मित्रांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची मदतीची जाणीव ठेवून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातॊ त्या दिवशी सर्व कुटुंबीय कामातून वेळ काढून एकत्र जमतात आणि पार्टी करतात त्या पार्टीत मित्रांना,नातेवाईकांना बोलावतात पार्टीत वेगवेगळे पदार्थ असतात पण विशेष प्राधान्य टर्की ह्या  पक्षापासून बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थांना असते गेल्या वर्षी कोरोनाच्या निर्बंधामुळे नागरिकांनी घरातच हा डे साजरा केला होता पृथ्वीपासून दूर अंतराळस्थानकात राहणारे अंतराळवीर देखील स्थानकात हा दिवस दरवर्षी साजरा करतात नुकतेच स्थानकात पोहोचलेले Space X च्या मोहीम तीन मधील अंतराळवीर राजा चारी,Kyla Barron ,Mattias Maurer ,Tom Marshburn आणि Mark Vande Hei ह्यांनी नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधला आणि सर्वांना Thanks Giving Day निमित्य शुभेच्छा दिल्या 

त्यांनी साधलेल्या संवादाचा हा वृत्तांत 

संस्था -Johnson Space Center - Thanks Giving बद्दल तुम्ही काय सांगाल 

Kayla -माझ्यासाठी Thanks Giving म्हणजे मला आवडणाऱ्या,माझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत वेळ घालवणे म्हणजे माझे कुटुंबीय,मित्र,मैत्रिणी,नातेवाईक ह्यांच्याप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकत्रित येण आणि पार्टी enjoy करण 

Mark Vande Hei -माझही असच मत आहे! आम्ही कुटुंबीय वेगवेगळ्या ठिकाणी राहतो पण सर्वजण Thanks Giving Day ला Houston मध्ये एकत्र येतो आणि Thanks Giving Day जोशात साजरी करतो आम्ही बाहेर जेवायला जातो एकाच टेबलावर एकत्रित जेवण करतो त्या निमित्याने माझ्या कुटुंबियांना मला त्यांची किती काळजी आहे माझ त्यांच्यावर किती प्रेम आहे ते कळत आणि मी कुठेही असलो तरी मनाने त्यांच्याजवळ असतो ह्याची जाणीव होते माझ्यासाठी हे त्यांना कळण आवश्यक आहे 

Tom Marshburn - मलाही असच वाटत ! आम्ही देखील फॅमिली,फ्रेंड्स एकत्रित येतो आमच्या पार्टीत जेवणाचा मेनू आणि त्यातील पदार्थ ह्यांना प्राधान्य असत आम्ही त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि एकत्रित जेवणाचा आनंद घेतो आता आम्ही इथे एकत्रित पार्टी करणार आहोत इथे आम्ही सर्व अंतराळवीर एकत्र राहतो ,काम करतो 

Kayla -आम्ही सर्वजण इथे स्थानकात कामात बिझी आहोत पण तरीही आम्ही सर्वांना Thanks Giving च्या पार्टीत आमंत्रित करतोय मी इथे नवीन पदार्थ बनवू शकत नाही पण आमच्या जवळचे पदार्थ गरम करून त्यांचा आस्वाद आम्ही घेणार आहोत 

Tom -माझ्या कुटुंबीयांनी आमच्यासाठी काही पदार्थ पाठवलेत त्यात गरम पाणी घालून आम्ही ते खाऊ आणि नासकडूनही आम्हाला फिस्ट साठी पदार्थ आले आहेत त्याबद्दल संस्था आणि कुटुंबियांचे आभार !

                                                Happy Thanks Giving Day !

Raja Chari - आम्हीही असाच एकत्रित जमून पार्टीचा आस्वाद घेतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो Thanks Giving ला सर्वजण टर्की च्या पदार्थाचा आस्वाद घेतात आम्ही ट्रेड मिल घेणार आहोत आमच्या साठी कलर हेडबँड आणि काही पदार्थ आले आहेत खरच ह्या वर्षी Inter National thanks giving पार्टी आहे  Fantastic !Wonderful ! इथे आज सर्व सहकारी अंतराळवीरांसोबत पृथ्वीपासून दूर स्थानकातली पार्टी स्पेशल आहे माझ्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत 

Mark Vande - आम्ही खूप आभारी आहोत अस मलाही सांगावस वाटतय आम्ही सर्व अंतराळवीर एकत्रित पार्टी करू मला खात्री आहे आमची पार्टी खूप छान होणार आहे 

संस्था -पार्टीत कुठल्या पदार्थांचा आस्वाद घेणार आहात ?

Kayla -फिस्ट साठी आलेले पदार्थ खाणार आहोत माझ्याकडे असलेल्या पॅकेट्स मध्ये Crab बिस्किट्स आहेत 

Raja Chari - आणि माझ्याकडच्या पॅकेट्समध्ये Roasted Turkey,Potato ,Groton त्यात आम्ही पाणी घालून गरम करून खाऊ ते नक्कीच डेलिशिअस होतील आणि शिवाय कॅण्डी पण आहेत 

Mattias - मलाही पॅकेट्स मिळालेत.माझयाकडे डेझर्ट चेरी ,ब्लू बेरी ,Cobbler Thanks ! ह्या मोहिमेत मी सहभागी असल्याचा आनंद होतोय मोहिमेतील सर्वांचे आभार!

                                 आमच्या तर्फे सर्वांना Happy Thanks Giving Day !

Tuesday 23 November 2021

Curiosity मंगळयान शोधतोय मंगळमोहिमेतील अंतराळविरांच्या निवासासाठी सुरक्षित जागा

 Farewell to Murray Buttes Hero images

मंगळावरील Murray Buttes येथील पर्वतीय भागाचे Curiosity यानाने घेतलेले फोटो -फोटो -नासा संस्था -J.PL lab

नासा संस्था-JPL lab -15 नोव्हेंबर मिळालेल्या 

मंगळावर पुरातनकाळी सजीवसृष्ठी अस्तित्वात होती ह्या गोष्टीला पृष्ठी देणारे पुरावे आता सापडू लागले आहेत नासाचे Perseverance मंगळयान आणि Ingenuity Mars Helicopter ह्यांनी घेतलेल्या फोटोतून अशा जागांचा शोधही घेतल्या जात आहे नुकतीच Ingenuity हेलिकॉप्टरने मंगळावरील आकाशात तेरावी उंच भरारी घेऊन तेथील परिसरातील फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत आणि Perseverance मंगळयानाने मंगळभूमीवर उत्खनन करून भूगर्भातील खडकांचे नमुने दुसऱ्यांदा गोळा केले आहेत  

ह्या आधीच मंगळावर कार्यरत असलेल्या Curiosity मंगळयानाने देखील ह्या संदर्भात महत्वपूर्ण माहिती आणि फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत नासा संस्थेने प्रसारित केलेल्या बातमीनुसार आता Curiosity मंगळयाना मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे  भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांना राहण्यासाठी योग्य ठिकाण शोधण्याचे काम शास्त्रज्ञ करीत आहेत 

मंगळावरील कडेकपारीतील सुरक्षित जागा ,Lava Tubes आणि गुहांचे फोटो Curiosity मंगळयानाने शोधून पृथ्वीवर पाठवले आहेत ह्या जागा शोधल्यानंतर तेथील वातावरण मानवी निवासासाठी विशेषत:मानवी  आरोग्यासाठी योग्य आहे का? ह्यावर सखोल संशोधन केल्या जात आहे कारण मंगळावर पृथ्वीसारखे वातावरण नाही तेथील वातावरण अत्यंत क्षीण आहे तेथे पृथ्वीसारखे दाट चुंबकीय क्षेत्र नाही त्यामुळे तेथील वातावरणातील वायूपासून मानवासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन वेगळे करून साठवण्याचे कामही मंगळयानातील अत्याधुनिक यंत्रणेमार्फत सुरु आहे तेथे पाणी नाही पण मंगळावरील फोटोत ह्या पूर्वी गोठलेल्या अवस्थेतील बाष्फ आढळले होते त्या मुळे शास्त्रज्ञ भविष्यकालीन मंगळावरील मानवी निवासासाठी योग्य जागा आहे का ? ह्याचा शोध घेत आहेत 

मंगळावर पृथ्वीप्रमाणे चुंबकीय क्षेत्र नसल्यामुळे सूर्यापासून उत्सर्जित होणाऱे आणि वातावरणातून बाहेर पडणाऱे हानिकारक  विद्युतभारित किरण डायरेक्ट वातावरणात मिसळतात त्या मुळे मानवी अरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे ह्या घातक किरणांच्या रेडिएशनचा धोका कमी करण्यासाठी आणि भविष्यकालीन अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी नासाची Curiosity टीम यानात बसविलेल्या RAD( Radiation Assessment Detector) ह्या अत्याधुनिक उपकरणाची मदत घेत आहेत RAD  च्या साहाय्याने मंगळावरील प्राकृतिक गोष्ठी विशेषतः खडक माती वाळूचा बनलेला गाळ,चिखल (अर्थात वाळलेला )ह्यांच्या साहाय्याने हानिकारक रॅडिएशन पासून बचाव करण्यासाठी हानीकारकता कमी करण्यासाठी संशोधन करत आहेत नासाच्या South West Research Institute चे प्रमुख Bent Ehresmann ह्यांनी हि माहिती प्रकाशित केली आहे 2016 च्या सप्टेंबर मध्ये Curiosity मंगळ ग्रहावरील Murray Buttes ह्या भागात कार्यरत होते तेव्हा RAD ने नोंदविलेल्या माहितीनुसार त्या भागात त्या काळात वातावरणातील रॅडिएशन चे प्रमाण 4% पर्यंत कमी झाले होते आणि हवेतील निष्क्रिय कणांची टक्केवारी ह्या काळात 7.5% वर आली होती त्या मध्ये मानवी आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या न्यूट्रॉनचा समावेश होता ह्या माहितीवरून शस्त्रज्ञानीं असा निष्कर्ष काढला कि,हे रॅडिएशन मोकळ्या जागी जास्त प्रमाणात होते आणि डोंगर कपारीतील बंदिस्थ जागी कमी प्रमाणात होते त्या मुळे अशा जागी मानवी आरोग्यास कमी धोका होऊ शकतो 

आम्ही ह्या निष्कर्षांची खूप दिवसांपासून वाट पहातोय आम्ही Computer Model  च्या साहाय्याने हे संशोधन करतोय आता आम्ही अशा सुरक्षित जागा मंगळावर आणखी कोठे आहेत ह्याचा शोध घेतोय असे ह्या टीमचे प्रमुख संशोधक म्हणतात मंगळावर आढळलेले हे घातक कॉस्मिक किरण अवकाशातील सौरमालेबाहेर अंतराळात फिरणाऱ्या ग्रहांच्या विस्फोटापासून बाहेर पडतात तसेच सूर्यावरील सौर वादळ,सौर विस्फोट ह्या मुळे बाहेर पडणाऱ्या अती ऊष्ण विद्युत भारीत कणामुळे निर्माण होतात आणि वातावरणात मिसळतात मंगळावर पृथ्वीसारखे वातावरण नसल्यामुळे ते डायरेक्ट हवेत शिरतात अशी किरणे मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहेत पृथ्वीवर चुंबकीय क्षेत्र आहे पृथ्वीवरील ओझोन लेअर मुळे हानिकारक किरण गाळले किंवा नष्ट केल्या जातात पण मंगळावरील क्षीण वातावरणात हे शक्य होत नसल्याने अशी कॉस्मिक हानिकारक किरणे,वायू तेथील वातावरणात प्रवेश करतात त्या मुळे भविष्यात अंतराळवीर जर मंगळावर राहिले तर त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून जेथे अशा किरणांपासून बचाव करता येईल अशी जागा Curiosity यानामार्फत शोधल्या जातेय 

Curiosity मंगळ यानातील RAD हे  अत्याधुनिक उपकरण तेथे हवामान केंद्रासारखे काम करते शास्त्रज्ञाच्या मते जेव्हा तेथे मोठ्या किंवा तीव्र स्वरूपात रॅडिएशन होते तेव्हा ह्यातील यंत्रणा रॅडिएशनचा धोका 30 ते 50  टक्क्यापर्यंत कमी करून तेथील वातावरण अंतराळवीरांसाठी सुरक्षित करू शकते अशा वेळेस भविष्यकालीन मोहिमेतील अंतराळवीरांना संरक्षण मिळणे आवश्यक आहे त्या साठीच शास्त्रज्ञ सुर्यावरील सौरवादळ आणि सौर ज्वालांचे विस्फोट त्यामुळे बाहेर पडणारे विद्युतभारित कण ,किरणे आणि वायू ,त्यांची तीव्रता ह्या वर संशोधन करीत आहेत ह्याचा उपयोग करून अंतराळवीरांसाठी अशा घातक किरणांपासून बचाव करण्यासाठीचा सुरक्षित काळ आणि निवासासाठी सुरक्षित जागा सध्या शोधल्या जात आहेत 28ऑक्टोबर 2021 मध्ये RAD ने नोंदवलेल्या माहितीच्या आधारे आता सुरक्षित जागा शोधण्याचे काम सुरु आहे

Saturday 13 November 2021

Space X -3 चे अंतराळवीर Raja chari,Kayla,Tom आणी Matthias स्थानकात पोहोचताच Welcome Ceremony ने झाले स्वागत

 The Expedition 66 crew poses for a photo after SpaceX Crew-3's arrival to station.

 Space X Crew 3चे अंतराळवीर Raja Chari ,Kayla Barron ,Matthias Maurer आणि Tom Marshburn स्थानकात पोहोचल्यानंतर Welcoming Ceremony दरम्यान स्थानकातील अंतराळवीरांसोबत -फोटो नासा संस्था 

नासा संस्था - 11नोव्हेंबर 

नासाच्या Space X -3 चे अंतराळवीर Raja Chari,Kayla Barron,Matthias Maurer आणि Tom Marshburn हे चारहीजण बुधवारी अंतराळस्थानकात सहा महिने राहायला गेले आहेत अमेरिकेतील फ्लोरिडातील Kennedy Space Center येथील उड्डाणस्थळावरून Endurance अंतराळयान ह्या चौघांना घेऊन बुधवारी रात्री 9.03 वाजता स्थानकाच्या दिशेने अंतराळप्रवासास निघाले जाण्याआधी चारही अंतराळवीरांना कोरोना निर्बंधामुळे संस्थेच्या Crew Quarters मध्ये Quarantine मध्ये ठेवण्यात आले होते उड्डाणस्थळी जाण्याआधी अंतराळवीरांची उड्डाणपूर्व चाचणी घेण्यात आली  त्या नंतर इतर आवश्यक प्रक्रिया पार पडल्यावर अंतराळवीरांनी त्यांना सोडायला आलेल्या त्यांच्या नातेवाईकांशी काही वेळ संवाद साधला ठरलेल्या वेळी  उड्डाणस्थळावरून Falcon 9 रॉकेटच्या साहाय्याने अंतराळयान अंतराळात झेपावले आणि स्वयंचलित यंत्रणेने सर्व प्रक्रिया पार पाडत अंतराळयानाने अंतराळात प्रवेश केला त्या नंतर काही वेळातच यान स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर अंतराळवीरांनी अंतराळयानातुन संस्थेशी संपर्क साधत सर्व ठीक असल्याचे सांगत लाईव्ह संवाद साधला 

अंतराळवीरांनी संस्थेमार्फत नागरिकांना अंतराळयानाची सफर घडविली चारही अंतराळवीरांनी लाईव्ह संवाद साधून व्हिडीओ शेअर केला कायला आणि राजा चारी ह्यांनी त्यांच्या सोबत एक Zero g Indicator Foul कासव नेला आहे कायलाने ते खेळणे दाखवले आणि सांगितले  ट्रेनिंग दरम्यान तिने आणि राजा ह्यांनी हे कासव सोबत नेण्याचे ठरवले मॅथिअस मात्र त्याला peacock म्हणतो असही तिने सांगितले ती म्हणाली आम्ही ट्रेनिंग दरम्यान खूप मजा केली आमच launching लांबल्यामुळे आम्हाला जास्तीचा वेळ मिळाला तेव्हा आम्ही खूप आवडीचे पदार्थ खाल्ले काही नवीन रेसिपीज करून पाहिल्या त्यातलेच थोडे अंतराळप्रवासात खाण्यासाठी घेतले इथे झिरो ग्रॅविटीत ते कसे फिरतात ते पहा असे म्हणून तिने प्रात्यक्षिक दाखवल टॉम ह्यांनी झिरो ग्रॅविटीत पाणी देखील कस फिरत हे दाखवील राजा चारी आणि Tom ह्यांनी Space X चा प्रवास खूप आरामदायी असल्याचं सांगितल तर मॅथिअस ह्यांनी देखील cupola मधून बाहेरच दृष्य पाहता येत हे सांगत अंतराळातील चंद्राच दर्शन घडवल हे अंतराळवीर 24  तासांच्या अंतराळप्रवासानंतर गुरुवारी रात्री 6.32 वाजता स्थानकात पोहोचले त्या नंतर स्थानक आणि अंतराळ यान ह्यांच्यातील Docking आणि Hatching प्रक्रिया पार पडली आणि ह्या अंतराळवीरांनी 8.10 वाजता स्थानकात प्रवेश केला 

अंतराळात सध्या राहात असलेल्या अंतराळवीरांनी ह्या चारही अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत केले त्या नंतर ह्या अंतराळवीरांच्या Welcome Ceremony पार पडला नासाच्या Space Flight Administrator Kathy Leaders आणि E.SA चे Director General Josef Aschbacher ह्यांनी ह्या चारही अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत केले 

Kathy leaders -"Welcome Raja Chari ,Kayla Tom &Matthias ! तुमच स्थानकात सहर्ष स्वागत आणि राजा आणि Tom तुम्ही Space X मधून सर्वांना सुखरूप स्थानकात पोहोचवल्या बद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन! दोनवेळा लांबलेल तुमच launching अखेर झाल आणी तुम्ही सुखरूप पोहोचलात हे पाहून आम्हाला आनंद झालाय तुमच्या पेशन्सची आम्हाला कल्पना आहेच कारण तुमच जाण लांबल तरी तुम्ही सहनशीलतेने परिस्थितीला सामोरे गेलात आणि तो लांबलेला काळ एन्जॉय केलात आता येणाऱ्या सहा महिन्यांच्या वास्तव्यात आम्हाला तुमच्या कडून नवनवीन संशोधनाची आशा आहे राजा तुमचा Space X चा प्रवास कसा झाला? कसा अनुभव होता? तुम्ही स्थानकात सोबत कासव नेल्याच ऐकलय स्थानकातील झिरो ग्रॅविटीत एखाद्या टॉयच निरीक्षण नोंदवण चांगलच आहे 

Raja Chari - Thanks ! आमच्या अपेक्षेपेक्षा खूप सुखकर.आरामदायी आणि स्मूथ ड्रायविंग होत Space X च्या सर्व testing येण्याआधीच झाल्याने काही प्रॉब्लेम आला नाही सर्व इंजिन्स व्यवस्थित काम करत होते अंतराळयान पहिल्या स्टेज मधून दुसऱ्या स्टेज मध्ये प्रवेश करताना आणी यान राँकेट पासून वेगळे होताना प्रत्यक्ष पाहता आल Tom सोडून आमचा सर्वांचाच हा पहिला अंतराळप्रवास होता तो आम्ही एन्जॉय केला आता आम्ही झिरो ग्रॅविटीचा अनुभव घेतोय आणि नक्कीच आम्ही नवनवीन संशोधनात सहभागी होऊन चांगले काम करू होय !आम्ही कासव सोबत आणलाय पुन्हा एकदा नासा संस्थेने आणि तुम्ही आम्हाला संधी दिल्याबद्दल आभार !

Mark Vande -ह्या सर्वांना सुखरूप पोहोचलेले पाहून आनंद झालाय मागच्या आठवड्यात आमचे जवळपास साठ पासष्ट संशोधनात्मक प्रयोग पूर्णत्वास आले हे चौघे स्थानकात पोहोचल्याने आम्हाला नक्कीच त्यांची मदत मिळेल 

E.SA चे Director General Joseph Oshbacher -"Hello Matthias!Welcome !" Matthias तुम्हाला स्थानकात पोहोचलेल पाहून खूप आनंद होतोय आणी तुमचे आनंदी हसरे चेहरे पाहण खरच अमेझिंग आहे ! तु पहिल्या अंतराळप्रवासाचा अनुभव घेतलास आणी आता झीरो ग्रव्हिटीत तरंगण्याचा अनुभव घेत असशील मला खात्री वाटते की तु ह्या संधीचा ऊपयोग करून घेशील आणी तीथल्या संशोधनात सहभागी होऊन छान काम करशील विषेशतः तुला  रोबोटिक आर्म आणी ईतर नवीन सायंटिफिक प्रयोगात सहभागी होऊन संशोधन करताना पहायला आम्ही ऊत्सुक आहोत आम्ही त्याची आतुरतेने वाट पहातो आहोत आम्हाला, E.SAला आणी युरोपियन जनतेला तुझा अभिमान वाटतोय तुला नासा संस्थेत रशियन स्पेससुट घालुन काम करताना पाहुन आनंद होतोय आता तीथल वातावरण नवीन आहे लवकरच तु तीथे रुळशील आणी स्थानकाच्या Cupola मधून पृथ्वीवरच्या आणी अंतराळातील  घडामोडींचे निरीक्षण करून त्याचे फोटो शेअर करशील पुन्हा एकदा तुझ स्थानकात सहर्ष स्वागत आणी अभिनंदन! राजा,कायला आणी Tom तुमचही स्वागत आणी अभिनंदन!तुमच्या सहा महिन्यांच स्थानकातील वास्तव्यासाठी शुभेच्छा!

Matthias-Thanks! खरच आमचा कालचा दिवस खूप exciting होता Space X आणी Falcon-9च सेपरेशन पहाण रोमांचकारी होत आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता तो! माझ कित्येक वर्षांपासूनच स्वप्न पुर्ण झालय Thanks NASA &E.SA ! Space X अंतराळयानातील प्रवास आरामदायी होता स्मुथ होता माझे सहकारी छान आहेत आम्ही खूप enjoy केल अंतराळात यानाचा प्रवेश होताच माझ्या सहकारी मित्रांनी मला सन्मानाने Cupola ऊघडुन दिला त्यातून पृथ्वीकडे अंतराळात पाहण्याचा पहिला अनुभव खूप आनंददायी होता आणी येणाऱ्या सहा महिन्यात येथील वास्तव्यात संशोधनात सहभागी होऊन मी नक्कीच चांगल काम करेन आणी देशाच नाव ऊंचावेल. 

Wednesday 10 November 2021

Space X Crew -3 चे चार अंतराळवीर आज स्थानकात राहायला जाणार

The official crew portrait for NASA's SpaceX Crew-3 mission.

Space X Crew -3 चे अंतराळवीर Raja Chari अंतराळवीर Thomas Mashburn अंतराळवीर Mattias Maurer आणि Kayla Barron -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -9 नोव्हेंबर 

नासाच्या  Space X -2 चे अंतराळवीर कालच पृथ्वीवर सुखरूप परतल्यानंतर आता  Space X Crew -3  मोहीमेतील चार अंतराळवीर आज रात्री अंतराळस्थानकात राहायला जाणार आहेत ह्या आधी दोनवेळा ह्या अंतराळवीरांच्या उड्डाणाची तारीख हवामान उड्डाणासाठी अनुकूल नसल्यामुळे लांबली होती अखेर आज अंतराळवीर स्थानकात राहायला जाणार आहेत 

Space X Crew -3 मोहिमे अंतर्गत भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर Raja Chari ,Tom Marshburn ,Kayla Barron आणि युरोपियन अंतराळवीर Matthias Maurer हे चार अंतराळवीर सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार आहेत ह्या मोहिमेचे कमांडरपदी Raja Chari पायलटपदी Tom Marshburn तर Kayla Barron आणि Matthias Maurer हे दोघांची ह्या मोहिमेच्या मिशन स्पेशॅलिस्टपदी नियुक्ती करण्यात आली आहे ह्या आधी तीनवेळा Space X Crew Dragon अंतराळस्थानकात गेले होते आता चवथ्यांदा Dragon स्थानकात जाणार आहे

नासाच्या Florida येथील Kennedy Space Center मधील 39 -A ह्या उड्डाणस्थळावरून Space X चे Endurance हे अंतराळयान ह्या अंतराळवीरांसह Falcon 9 रॉकेटच्या साहाय्याने रात्री 9.03 वाजता (स्थानिक वेळ) अंतराळात उड्डाण करेल आणि 11नोव्हेंबरला गुरुवारी रात्री 7.10 वाजता स्थानकात पोहोचेल स्थानकात सध्या राहात असलेले अंतराळवीर त्यांचे स्थानकात स्वागत करतील हे चारही अंतराळवीर स्थानकात सहा महिने राहतील व तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील ह्या आधी 31 ऑक्टोबरला किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे अंतराळवीर स्थानकात जाणार असल्यामुळे उड्डाणपूर्व ट्रेनिंग आटोपून चारही अंतराळवीर स्थानकात जाण्यासाठी सज्ज झाले होते 

ह्या  अंतराळवीरांच्या स्थानकाकडील उड्डाण,स्थानकातील Docking ,Hatching आणि स्थानकातील Welcoming Ceremony चे लाईव्ह प्रसारण नासा T.V. आणि सोशल मीडियावरून करण्यात येणार आहे 

(ह्या संदर्भातील बातमी ह्याच ब्लॉगवर)

Tuesday 9 November 2021

नासाच्या Space X -2 चे चारही अंतराळवीर Florida येथील समुद्रात पृथ्वीवर सुखरूप उतरले

NASA's SpaceX Crew-2 mission astronauts smile and wave after splashing on Nov. 8, 2021. 

 नासाच्या Space X Crew -2 चे युरोपियन अंतराळवीर Thomas Pesqute ,नासाचे अंतराळवीर Megan McArthur ,अंतराळवीर Shane Kimbrough आणि जपानी अंतराळवीर Aki Hoshide Space X Crew Dragon Endeavour अंतराळयानातून पृथ्वीवर परतताना -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -9 नोव्हेंबर 

नासाच्या अंतराळमोहीम Space X Crew -2 चे अंतराळवीर Shane Kimbrough ,Megan McArthur युरोपियन अंतराळवीर Thomas Pesqute आणि जपानचे अंतराळवीर Aki Hoside सोमवारी पृथ्वीवर सुखरूप पोहोचले आहेत ह्या चारही अंतराळवीरांना घेऊन Space X चे Endeavour अंतराळयान Florida तील Gulf Of Mexico येथील खाडीत सोमवारी रात्री 10.33.वाजता पोहोचले त्यानंतर हे चारही जण parachute च्या साहाय्याने समुद्रात उतरले 

 नासाची recovery टीम आधीच ह्या अंतराळवीरांना आणण्यासाठी तेथे पोहोचली होती अंतराळवीर पृथ्वीवर पोहोचताच ह्या टीमने चारही अंतराळवीरांना यानातून सुरक्षितपणे बाहेर काढले नासाच्या recovery टीममधील डॉक्टरांनी ह्या अंतराळवीरांचे प्राथमिक चेकअप केले त्या नंतर ह्या चारही अंतराळवीरांना विमानाने नासाच्या Houston येथील Johnson Space Center मध्ये नेण्यात आले 

नासाचे Administrator Bill Nelson ह्यांनी ह्या अंतराळवीरांचे  संस्थेत स्वागत केले ,"Welcome Shane ,Megan ,Thomas & Aki ! तुम्ही हि अत्यंत अवघड मोहीम यशस्वी केलीत Endeavour Space X अंतराळयान सुरक्षितपणे अंतराळात नेऊन पृथ्वीवर परत आणत हि दुसरी सहा महिन्यांची अंतराळ मोहीम यशस्वी केलीत त्या बद्दल अभिनंदन ! स्थानकातील तुमच्या सहा महिन्यांच्या वास्तव्यात तुम्ही अनेक कठीण जबाबदाऱ्या पार पाडल्या ,स्थानकात आलेल्या अंतराळयानांना रिसिव्ह केल आणि नवीन संशोधनात सहभागी झालात हि कामगिरी भविष्याकालीन अमेरिकन अंतराळ मोहिमांसाठी उपयुक्त ठरेल !" अशा शब्दात त्यांचे कौतुक केले

हे चारही अंतराळवीर 23 एप्रिलला स्थानकात राहायला गेले होते आणि 24 एप्रिलला स्थानकात पोहोचले होते त्यांनी स्थानकात 199 दिवस वास्तव्य केले ह्या दरम्यान त्यांनी पृथ्वीभोवती 3,194 वेळा प्रदक्षिणा केल्या आणि जवळपास 84,653,119 मैल अंतराळप्रवास केला ह्या सहा महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी स्थानकातील झिरो ग्रॅविटीतील फिरत्या प्रयोगशाळेत अनेक सायंटिफिक प्रयोग केले  आणी तेथे सुरू असलेल्या संशोधनात सहभाग नोंदवला त्यांनी स्थानकातील झिरो ग्रॅविटीत Gaseous Flame कशी पेटते तिचा आकार कसा बदलतो व इतर परिणामांचे निरीक्षण नोंदवून त्यावर संशोधन केले स्थानकातील व्हेजी चेंबर मधील व्हेजी प्रोजेक्ट अंतर्गत वेगवेगळ्या भाज्यांची रोपे लावली नुकतीच त्यांनी स्थानकात उगवलेल्या मिरच्याचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले  ह्या शिवाय त्यांनी स्थानकात Free Flying Robotic Assistant install केला आणि स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी अनेक वेळा स्पेस वॉकही केला 

ह्या सहा महिन्यांच्या काळात त्यांच्या कामातून मिळालेल्या रिकाम्या वेळात पृथ्वीवरील नासा संस्थेत आणि त्यांच्या सहकार्याने पत्रकारांशी ,विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली त्या दरम्यान घडलेल्या अंतराळातील आणि पृथ्वीवरील घडामोडी फोटोबद्ध करत त्याही त्यांनी त्यांच्या चाहत्यांशी शेअर केल्या