अंतराळ स्थानकातील Veggie चेंबर मधील मिरच्यांच्या रोपांना आलेल्या मिरच्यांसोबत फोटो काढताना Thomas Pesqute -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -29 ऑक्टोबर
पृथ्वीपासुन दुर अंतराळात स्थानकातील झीरो ग्रॅव्हीटीत सतत तरंगत्या अवस्थेत रहाणाऱ्या अंतराळविरांना पृथ्वीवरच्या सारखे ताजे गरम जेवण ताज्या भाज्या व फळे खायला मिळत नसल्याने त्यांना पृथ्वीवरुन पाठवलेले प्रिर्झव्ह थंड अन्न व भाज्या खाव्या लागतात सतत झीरो ग्रॅव्हिटीत तरंगत्या अवस्थेत रहावे लागत असल्याने त्यांच्या शरीरावर विपरीत परीणाम होतो त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यांना व्हिटॅमिन युक्त सकस ताजे जेवण मिळावे विषेशतः ताजी हिरवी पालेभाजी व फळे मिळावीत म्हणून शास्त्रज्ञ सतत प्रयत्न करत आहेत भविष्यकालीन दुरवरच्या अंतराळ मोहीमांतील अंतराळनिवासात अंतराळविरांना पृथ्वीवरून अन्न पाठविताना वेळ लागेल त्यामुळे त्यांना स्थानकातच स्वतः अन्न ,भाजी व फळे पिकवुन खाता यावीत म्हणून नासाचे शास्त्रज्ञ स्थानकात व्हेजी प्रोजेक्ट राबवत आहेत ह्या आधी अंतराळविरांनी स्थानकात गहु, Lettuce, लाल कोबी, ह्या सारख्या भाज्या लाऊन त्यांची चवही चाखली आहे स्थानकात सध्या सुरु असलेल्या Advanced Plant Habitat -04 प्रोजेक्ट अंतर्गत स्थानकातील व्हेजी चेंबरमध्ये वेगवेगळ्या भाज्यांची रोपे व बिया लावण्यात आल्या होत्या मागच्या महिन्यात त्यातील चार मिरचीच्या रोपांना फुले आली होती आता त्यांची वाढ पूर्ण होऊन त्यांना मिरच्या आल्या आहेत
अंतराळविरांनी त्यांच्या संशोधनाच्या कामातून मिळालेल्या रिकाम्या वेळात
ह्या रोपांची निगा राखुन हि रोपे वाढविण्यात यश मिळवले आहे ह्या रोपांच्या
वाढीसाठी त्यांना नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मधील शास्त्रज्ञांनी
वेळोवेळी मार्गदर्शन केले स्थानकातील वातावरणात मिरचीची रोपे वाढविणे सोपे
नव्हते कारण मिरचीचे रोप वाढण्यासाठी खूप दिवस लागतात साधारण चार
महिन्यांचा काळ लागतो नासाचे अंतराळवीर Shane Kimbrough ह्यांनी बारा जुलैला
स्थानकातील व्हेजी चेंबरमधील उशी वाफाऱ्यात हि रोपे लावली होती त्या
रोपांची वाढ पूर्ण होऊन त्याला आता मिरच्या आल्या आहेत
अंतराळस्थानकातील Veggie चेंबर मध्ये वाढलेली मिरचीची रोपे आणि त्याला आलेल्या मिरच्या -फोटो
नासाचे अंतराळवीर Thomas Pesqute ह्यांनी सोशल मीडियावरून ह्या मिरच्यांचा सगळ्यांसोबत काढलेला फोटो शेअर केला आहे ते म्हणतात "मिरच्यांची हि रोपे अंतराळवीर Mark Vande Hei ह्यांनी लावली होती अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅविटीत हि रोपे कशी वाढतात त्यांच्या चवीत रंगात आणि आकारात काय फरक पडतो ह्याचे निरीक्षण आम्ही नोंदवले आहे ह्या मिरच्या पृथ्वीवरच्या सारख्याच दिसत आहेत त्या पाहून आम्ही त्याचा आस्वाद घेण्यास आतुर झालो आहोत आम्ही आता अजून वाट पाहू शकत नाही खरतर त्या अजूनही वाढत आहेत पण आता त्यांची पुरेशी वाढ झाली असल्याने आम्ही आज रात्री त्या तोडून त्यांचा आस्वाद घेणार आहोत स्थानकातील वातावरणात भाज्यांची रोपे लावण ती वाढवण सोप नाही आव्हानात्मक आहे स्वत; लावलेल्या भाज्यांची चव चाखण्याचा आनंद काही औरच आहे इथे पृथ्वीवरच्या सारख पाहिजे तेव्हा ताज्या भाज्या आणून खाता येत नाहीत इथे आम्ही फ्रोझन प्रिझर्व फूड खातो पण जवळपास सहा महिन्यांनी आम्ही आज ताज्या मिरच्या खाणार आहोत "
अंतराळवीर Thomas Pesqute ह्यांनी ह्या मिरच्यांसोबत अंतराळवीरांचा फोटो काढून नासा संस्थेत पाठवून त्यांचा आनंद शेअर केला आहे ह्या मिरचांच्या बिया व काही मिरच्या अंतराळवीर पृथ्वीवर परतताना नमुना म्हणून आणण्यासाठी ठेवणार आहेत