Ingenuity Mars हेलिकॉप्टर मंगळभूमीवरील आकाशात उड्डाण करताना घेतलेला फोटो-फोटो नासा संस्था
नासा संस्था -28 मे
नासाच्या Perseverance मंगळयानासोबत मंगळावर पोहोचलेल्या Ingenuity हेलिकॉप्टरने मंगळावरील आकाशात पाच उड्डाण टेस्ट यशस्वी केल्यानंतर मंगळ ग्रहावरील 91व्या दिवशी सहावी उड्डानटेस्ट हेलिकॉप्टर काही वेळ आकाशात भरकटल्यानंतरही पूर्ण केली
Ingenuity ने सहाव्या उड्डानटेस्ट मधील पश्चिम भागातील उड्डाणादरम्यान तेथील डोंगर दऱ्या,नदीनाल्यांचे आटलेले स्रोत वै भौगोलिक माहिती मिळवण्यासाठी उंचावरून फोटो घेतले Ingenuity हेलिकॉप्टर मंगळावरील आकाशात 33 फूट उंचीवरुन 492 फूट (150 मीटर ) अंतरावर 9mph प्रति सेकंद इतक्या वेगाने दक्षिणेकडून पश्चिमेकडे उड्डाण करत होते आणि उड्डाणादरम्यान उंचावरून फोटो घेत होते पहिल्या 150 मीटर अंतरापर्यंत हेलिकॉप्टर व्यवस्थित उड्डाण करत होते त्यानंतर हेलिकॉप्टर 49 फूट उंचीवर पोहोचले व तेथील फोटोही घेतले नंतर ते 164 फूट उंचीवर पोहोचले आणि उत्तरेकडे गेले आणि खाली उतरले
Ingenuity हेलिकॉप्टर ऊड्डाणादरम्यान भरकटताना-व्हिडीओ-नासा संस्था
Ingenuity हेलिकॉप्टर शेवटच्या टप्प्यात आल्यावर अचानक हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला आणी ते हवेत भरकटू लागले आणि अनियंत्रित झाले त्याचे पंखे प्रचंड वेगाने फिरू लागले आणि आता हे हेलिकॉप्टर प्रचंड वेगाने खाली कोसळेल आणि crash होईल असे वाटत असतानाच काही क्षणातच Ingenuity च्या स्वयंचलित यंत्रणेने ह्या बिघाडावर नियंत्रण मिळवले आणि सहावी टेस्ट यशस्वी करीत हेलिकॉप्टर सुरक्षितपणे मंगळ भूमीवर उतरले
Ingenuity हेलिकॉप्टर मध्ये बसविलेल्या I.M.U ह्या अत्याधुनिक यंत्रणेमुळे अनियंत्रित झालेल्या Ingenuityच्या वेगावर व उड्डाणावर नियंत्रण केल्या गेले ह्या यंत्रणेमुळे Ingenuity हेलिकॉप्टरची position आणि वेग ह्या वर नियंत्रण मिळवता येते शीवाय हे हेलिकॉप्टर किती वेगाने आणि कोठे उड्डाण करत आहे आणि त्याची सध्याची स्थिती काय आहे ह्याची त्वरित माहिती पृथ्वीवरील नासा संस्थेत त्वरित ऊपलब्ध होते
Ingenuity हेलिकॉप्टर मध्ये बसविलेल्या Navigation सिस्टिम मधील Navcams द्वारे प्रती सेकंदाला तीस फोटो भराभर घेतले जातात Ingenuity मंगळावरील आकाशात झेपावले आणि व्यवस्थित मार्गक्रमण करीत ऊड्डान करु लागले पण उड्डाणानंतरच्या 54 सेकंदांनंतर ह्या सिस्टिममध्ये किंचित बिघाड झाला आणि एक फोटो काढल्या गेला नाही आणि तो फोटो नासा संस्थेत न पोहोचल्याने हा टेक्निकल प्रॉब्लेम निर्माण झाला पण नंतरच्या फोटोतून Ingenuity भरकटल्याचे आणि प्रचंड वेगाने अनियंत्रित झाल्याचे नासा टीमच्या लक्षात आले काही क्षणातच Ingenuity हेलिकॉप्टरने स्वयंचलित यंत्रणेने त्यावर मात करून नियंत्रण मिळवले आणि हे हेलिकॉप्टर 16 फूट उंचीवरून सुरक्षित खाली उतरले Ingenuity मधील Rotor system , actuators आणि power system मुळे Ingenuity च्या उड्डाणात अडथळा आला तरी उड्डाण न थांबता यशस्वी झाले