Sunday 14 February 2021

अंतराळस्थानकात अंतराळवीरांनी केला Plant Transplant चा प्रयोगही यशस्वी

 Pak choi in Veggie aboard the ISS

 अंतराळवीर Mike Hopkins स्थानकातील Veggie चेंबर मधील वाफाऱ्यात Pak choi चे रोप transplant करताना -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -

नासाच्या अंतराळ मोहीम 64चे अंतराळवीर Mike Hopkins ह्यांनी मागच्या महिन्यात Plant Transplant चा प्रयोग केला आणि विशेष म्हणजे त्यांच्या ह्या प्रयत्नाला यश मिळाले असून ह्या Veggie project चे सायंटिस्टही ह्या यशाने आश्चर्यचकित झाले आहेत 

गेल्या वीस वर्षांपासून नासाचे अंतराळवीर सलग अंतराळस्थानकात वास्तव्य करून तिथल्या फिरत्या लॅबमध्ये मानवी आरोग्यासाठी उपयुक्त संशोधन करत आहेत पण तिथल्या झिरो ग्रॅविटीत राहताना त्यांना पृथ्वीवरच्या सारखे ताजे अन्न,भाजी व फळे मिळत नाहीत त्यांना प्रिझर्व केलेले प्रक्रियायुक्त अन्न खावे लागते त्यांना ताजे अन्न व भाजी मिळावी म्हणून अंतराळस्थानकात Veggie प्रोजेक्ट राबविल्या जात आहे आणी तो यशस्वी पण होत आहे ह्या Veggie project अंतर्गत पिकवलेल्या भाजीचा आस्वाद अंतराळवीर घेतातच शीवाय अंतराळातील झीरो ग्रँव्हिटीत हि भाजी व फळे कशी वाढतात तेथील आणी पृथ्वीवर वाढणाऱ्या रोपात काय फरक आहे ह्याचे सखोल निरीक्षण नोंदवून त्या वर संशोधन करतात त्यातील काही भाजी नमुना म्हणून ठेवून पृथ्वीवर येताना आणतात आणि नासा संस्थेच्या labमध्ये त्यावर संशोधन होते 

मागच्या महिन्यात अंतराळ वीरांनी स्थानकात ऊगवलेल्या लाल मुळ्याच्या रोपांची कापणी करून  त्यांच्या जेवणात ह्या पानांचा समावेश करून त्याची चवही घेतली होती आणी काही पाने नमुना म्हणून पृथ्वीवर पाठवली आहेत

आता VEG-031 ह्या प्रोजेक्ट अंतर्गत स्थानकात लावलेल्या ऊर्वरीत रोपांची देखभाल सध्या स्थानकात रहात असलेले अंतराळवीर करत आहेत 29 जून 2018 मध्ये स्थानकात आलेल्या नासाच्या अंतराळवीरांनी ह्या प्रोजेक्ट अंतर्गत स्थानकात भाज्यांची लागवड सुरु केली होती अंतराळवीर Mike Hopkins  मागच्या महिन्यात रोपांची देखभाल करत असताना त्यांना व्हेजी चेंबर मधील ऊशी वाफ्यात काही रोपांची वाढ खूप हळूहळू होत असल्याचे दिसले काही रोपांची वाढ मात्र जोमाने झाली होती  तेव्हा ह्या अंकुरलेल्या पण ठराविक काळात नियमित वाढ न झालेल्या रोपांना पाहुन Mike ह्यांच्या मनात plant transplant चा विचार आला अंतराळवीर Mike सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी अंतराळस्थानकात आले आणि तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी झाले संशोधनातून मिळालेल्या मोकळ्या वेळात ते ह्या Veggie चेंबर मधील रोपांची देखभाल करत आहेत ह्या Veggie चेंबरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे Lettuces आणि Mustard ची रोपे लावली आहेत ह्या व्हेजी चेंबरमध्ये पृथ्वीसारखे कृत्रिम वातावरण व तापमान निर्माण करण्यात आले आहे त्या साठी लाईटचा वापर करून दिवस आणि रात्रीसारखा उजेड आणि अंधार निर्मीती केल्या जाते ह्या उशी वाफाऱ्यात चिकण माती आणि खतांचा वापर केल्या जातो 

ह्या रोपांच्या निरीक्षणा दरम्यान Mike ह्यांच्या लक्षात आले की,दोन उशी वाफाऱ्यातील Red Romaine आणि Dragon Lettuce ह्या भाजीच्या बिया खूप हळूहळू अंकुरत आहेत तर काही रोपांची वाढ व्यवस्थित झाली असून ती रोपे दुसऱ्या रोपांमागे हळूहळू उगवत आहेत त्यांनी हि बाब पृथ्वीवरील नासा संस्थेतील ह्या व्हेजी प्रोजेक्टच्या प्रमुख सायंटिस्टला सांगीतली तेव्हा त्यांच्या सल्ल्याने हा Plant Transplant चा निर्णय घेण्यात आला अंतराळवीर Mike ह्यांनी वाफाऱ्यातील जास्तीची अंकुरित रोपे काढून ह्या दोन वाफाऱ्यात लावली खरतर अशा अंकुरित अवस्थेतील नाजूक रोपे काढून ती पुन्हा दुसऱ्या जागी लावण इथे पृथ्वीवर देखील रिस्की आहे अशी एकीकडून काढलेली रोपे दुसरीकडे लावली तर पुन्हा उगवतील ह्याची शाश्वती नसते मग अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅविटीत तर हा प्रयोग यशस्वी होण तस  कठीणच होत पण आश्चर्य म्हणजे इथे कठीण असलेला हा प्रयोग अंतराळस्थानकात मात्र यशस्वी झाला 

 Red kale in Veggie aboard the ISS

अंतराळवीर Mike Hopkins Veggie चेंबर मधील Red Kaleचे  रोप transplant करताना

अंतराळवीर Mike ह्यांनी  Plant transplant चा प्रयोग यशस्वी केला त्यांनी लावलेली Red Russian Kale आणि Extra Dwarf pak choi हि रोपे व्यवस्थित उगवली आणि तग धरून जोमाने वाढतही आहेत हि दोन रोपे डोनर Kale आणि Pak choi सोबत वाढत आहेत आता उर्वरित वाफाऱ्यातील Red Romaine lettuce आणि Wasabi mustard हि रोपे सुद्धा चागली वाढली असून लवकरच अंतराळवीर त्यांची कापणी करून ह्या भाज्यांचा त्यांच्या जेवणात आस्वाद घेतील 

 Pak choi transplant on the ISS

 स्थानकातील Veggie चेंबरमध्ये लावलेले Pak choi चे  वाढलेले रोप-फोटो -नासा संस्था 

नासाच्या ह्या VEG-031 च्या Project प्रमुख सायंटिस्ट Gioia Masa ह्या plant transplant च्या यशाने आनंदित झाल्या आहेत त्या म्हणतात कि,खरंच हे आश्चर्यकारक यश आहे इथे पृथ्वीवर अशी नाजूक अंकुरित रोपे काढून  दुसरीकडे लावली तर सुकतात किंवा मरतात मग स्थानकातील झिरो ग्रॅविटीतील वातावरणात तर हा प्रयोग यशस्वी होण अत्यंत कठीण होत पण अंतराळवीरांनी अत्यंत कुशलतेने हा प्रयोग यशस्वी केलाय हे यश अंतराळवीर Mike ह्यांच आहे स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत द्रव पदार्थ  उलट्या दिशेने वाहतात पण तिथल्या रोपांना मात्र हि परिस्थिती अनुकूल ठरतेय इथे पृथ्वीवरच्या रोपांपेक्षा स्थानकात लावलेली रोपे जास्त जोमाने वाढत आहेत जेव्हा Mike ह्यांनी हि रोपे काढतानाचे फोटो मला दाखवले तेव्हा ती पुन्हा उगवतील अशी आशा नव्हती पण ती खोटी ठरली आणि रोपे छान वाढली plant transplantचा हा प्रयोग अंतराळवीरांसाठी उपयुक्त ठरला तिथे अंतराळात त्यांना पृथ्वीवरच्या सारखे ताजे अन्न,फळे भाज्या खायला मिळत नाहीत अन्न प्रक्रिया करताना प्रिझर्व करताना त्यातील जीवनसत्वे कमी होतात पण आता त्यांना स्थानकात उगवलेल्या भाज्यांमधून ती मिळतील शिवाय आगामी दूरवरच्या अंतराळ मोहीमांतील अंतराळवीरांना स्थानकात आणि मंगळ मोहिमेतील निवासात स्वतःचे अन्न धान्य पिकवण्यासाठी होणार आहे

No comments:

Post a Comment