अंतराळवीर Mike Hopkins आणि Victor Glover स्थानकाबाहेरील Columbus Module भागात स्पेसवॉक करताना -फोटो नासा संस्था
नासा संस्था - 28 जानेवारी
नासाच्या अंतराळमोहीम 64 च्या अंतराळवीरांनी ह्या आठवड्यात स्थानकाच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी दोन वेळा Space Walk केला 27 जानेवारी आणि एक फेब्रुवारीला Mike Hopkins आणि Victor Glover ह्यांनी स्थानकाच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी स्पेसवॉक केला
27 जानेवारीला दुपारी 1.24 मिनिटाला स्पेसवॉक सुरु झाला आणि साडेसहा तासांनी संपला Mike Hopkins आणि Victor Glover ह्या दोन्ही अंतराळवीरांनी सकाळीच स्पेसवॉकची तयारी सुरु केली होती त्यांनी त्यांच्या स्पेससूटची बॅटरी आधीच चार्ज करून ठेवली होती
अंतराळवीर Victor Glover आणि Mike Hopkins स्पेससूट घालून स्पेसवॉक साठी बाहेर पडण्याच्या तयारीत सोबत Kate Rubins आणि जपानी अंतराळवीर Soichi Noguchi -फोटो नासा संस्था
ह्या साडेसहा तासांच्या स्पेसवॉक दरम्यान अंतराळवीर Mike Hopkins आणि Victor Glover ह्यांनी स्थानकाच्या बाहेरील भागातील तांत्रिक दुरुस्तीचे काम केले त्यांनी स्थानकाच्या युरोपियन स्पेस एजन्सीच्या Columbus Module ह्या भागात नवीन अद्ययावत व जास्त कार्यक्षमतेचा antenna fix केला आणि त्यासाठी लागणारे केबल व adapter बसविण्याचे कामही पूर्ण केले ह्या नवीन केबल प्रणाली आणि अँटेना मुळे आता पृथ्वीवरील युरोपियन संस्थेशी स्थानकातून सहजतेने संपर्क साधणे सोपे होईल
ह्या शिवाय ह्या अंतराळवीरांनी पुढच्या 1 फेब्रुवारीच्या दुसऱ्या स्पेसवॉकच्या तयारीसाठी आवश्यक कामेही केली त्यांनी स्थानकाच्या Truss ह्या भागातील जुने Grapple Fixture Brackets हि काढून ठेवले अंतराळवीर Victor Glover ह्यांनी स्थानकातील Airlock सिस्टिम दुरुस्त केली व त्यांनी त्यातील खराब झालेला पार्ट replace केला
अंतराळवीर Mike Hopkins ह्यांचा हा तिसरा स्पेसवॉक होता त्या दरम्यान त्यांनी अंतराळात 19 तास 54 मिनिटे व्यतीत केली तर अंतराळवीर Victor Glover ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी असल्यामुळे त्यांचा हा पहिलाच स्पेसवॉक होता त्या दरम्यान त्यांनी अंतराळात 6 तास 56 मिनिटे व्यतीत केली
अंतराळवीरांनी आजवर स्थानकाच्या तांत्रिक कामाच्या दुरुस्तीसाठी केलेला हा 233वा स्पेसवॉक होता त्या साठी अंतराळवीरांनी अंतराळात 61दिवस एक तास 54 मिनिटे व्यतीत केली
No comments:
Post a Comment