नासा संस्था - NASA Updates -1 Jan.
नासाच्या अंतराळ मोहीम 64 च्या अंतराळवीरांनी नाताळ प्रमाणेच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरला त्यांची कामे आटोपून रात्री पार्टी साजरी केली आणि नासा संस्थेमार्फत पृथ्वीवासीयांशी लाईव्ह संवाद साधून त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या !
सध्या अंतराळ स्थानकात राहात असलेले अंतराळवीर Kate Rubins ,Mike Hopkins ,Shannon Walker ,Victor Glover आणि Soichi Noguchi ह्यांनी पृथ्वीवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या
सुरवातीला Kate Rubins ह्यांनी संवाद साधत सांगितले आम्ही पाचही जण आज इथे स्थानकात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जमलो आहोत तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
Victor Glover -ह्या वर्षी कोरोना महामारी मुळे लॉक डाऊन आहे त्या मुळे लोकांना एकत्रित जमून नवीन वर्षाचे स्वागत करता येणार नाही मोजक्या लोकांनाच अमेरिकेतील Times Square इथे होणारा दरवर्षीचा पारंपारिक नवीन वर्षाचा स्वागत सोहळा पाहता येणार आहे खासकरून New Year Eve Ball सोडण्याचा ! तुम्ही तो पाहू शकणार नाही तुम्ही घरातच नवीन वर्षाचे स्वागत करत असाल
Mike Hopkins - तुम्हाला ह्या वर्षी घरातच नवीन वर्षाचे स्वागत करावे लागत आहे पण निराश होऊ नका आम्ही इथे स्थानकात तो सोहळा करणार आहोत
Soichi Noguchi- आम्ही इथून नवीन वर्षाचे स्वागत करणार आहोत आणि त्या साठी आम्हाला एक आयडिया सुचलीय !
Shannon Walker -काय आहे ती आयडिया ? पहा !
असे म्हणत Kate Rubins ह्यांनी स्थानकात Tree-Two-One म्हणत बॉल सोडला त्या बरोबर सर्वांनी Happy New Year म्हणत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या ! ह्या अंतराळवीरांनी नवीन वर्ष सेलिब्रेशनच्या ह्या सोहळ्याचा video सोशल मीडिया वरून त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर देखील केला आहे
No comments:
Post a Comment