नासाचे Perseverance Mars rover मंगळावर पोहोचल्यानंतर Supersonic Parachute च्या साहाय्याने लँडिंग करतानाचे संभाव्य दृश्य -फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 16 जानेवारी
नासाचे Perseverance मंगळ यान आता मंगळाच्या जवळ पोहोचले असून पुढच्या महिन्यात 18 फेब्रुवारीला ते मंगळावर उतरेल Perseverance मंगळ यान 30 जुलै 2020 ला मंगळावर जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणी सात महिन्यांच्या अंतराळ प्रवासानंतर आता मंगळ ग्रहानजीक पोहोचले आहे ह्या सात महिन्याच्या अंतराळ प्रवासादरम्यान ह्या मंगळ यानाने त्याला बसविलेल्या अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने अत्यंत मोलाची माहिती गोळा करून ती पृथ्वीवरील नासा संस्थेत पाठवली आहे
Perseverance मंगळ यान जेव्हा 18 फेब्रुवारीला प्रत्यक्ष मंगळ ग्रहाच्या भूमीवर उतरेल तेव्हाच्या थरारक प्रसंगाचे ऐतिहासिक क्षण पृथ्वीवासीयांना पाहण्याची अमूल्य संधी नासा संस्थेने जाहीर केली असून ह्या मंगळावरील लाँचिंगचे लाईव्ह प्रक्षेपण नासा T.V. वरून करण्यात येणार आहे
27 जानेवारीला नासा संस्थेच्या California येथील Jet Propulsion lab येथे ह्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी एका मिटिंगचे आयोजन करण्यात आले आहे ह्या मिटिंगमध्ये नासाचे Associate Administrator Thomas Zurbuchen, director Lori Glaze JPLचे project Manager,Matt Wallace व Perseverance मंगळ यानाच्या प्रोजेक्ट टिम मधील शास्त्रज्ञ आणी तंत्रज्ञ ऊपस्थित रहाणार आहेत ह्या वेळी काही निवडक पत्रकारांना ह्या मंगळयानाच्या प्रत्यक्ष मंगळभुमीवरील landing च्या लाईव्ह सोहळ्याविषयी प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे शीवाय हौशी नागरिकांना सोशल मिडीया वरून ट्विटर वर # Countdown ह्या वर प्रश्न विचारण्याची संधी नासाने जाहीर केली आहे
Perseverance मंगळ यान 30 जुलैला मंगळावर जाण्यासाठी अंतराळात झेपावले होते आणि आठ महिन्यांच्या अंतराळप्रवासानंतर आता ते मंगळाच्या जवळ पोहोचले असून अठरा फेब्रुवारीला ते मंगळभूमीला स्पर्श करेल ह्या यानासोबत Ingenuity हे हेलिकॉफ्टर ही मंगळावर पाठवण्यात आले आहे Perseverance मंगळ यान मंगळावर पोहोचताच ह्या यानाला बसविलेल्या मायक्रो फोन द्वारे प्रत्यक्ष लँडिंगच्यावेळेसचा आवाज टेप करून पृथ्वीवर पाठवेल मंगळावर पृथ्वीच्या तुलनेत अत्यंत क्षीण वातावरण असल्याने तेथील विरळ वातावरणात मंगळ यान उतरल्यानंतरचा आवाज वेगळा असेल शिवाय यान उतरताना आणि उतरल्यानंतर हवेत उडालेल्या धुरळीचा किंवा वादळाचा ऐतिहासिक आवाज इथे पृथ्वीवर बसून ऐकायला मिळणार आहे
Perseverance यानाचे महत्वाचे काम म्हणजे मंगळ ग्रहावरील पुरातन सजीवांच्या अस्तित्वाचे पुरावे गोळा करणे ह्या यानाला बसविलेल्या अत्याधुनिक यंत्रणेने हे काम केले जाईल यानाच्या रोबोटिक आर्मच्या साहाय्याने मंगळ भूमीवरील भूपृष्ठाखालील माती खोदल्या जाईल आणि भूगर्भातील माती,खडक,मिनरल्स वै चे नमुने गोळा करून त्यांचे फोटो पृथ्वीवर पाठवल्या जातील शिवाय यान पृथ्वीवर परतल्यावर त्याचे नमुनेही पृथ्वीवर आणल्या जातील या शिवाय ह्या यानाला बसविलेल्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने तेथील पाण्याचे स्रोत,दऱ्या,खोरे आणि भविष्यात मानवी निवासासाठी सजीवांना आवश्यक असलेले वातावरण शोधले जाईल त्या साठी Ingenuity हेलिकॉफ्टर तेथील भूमीवर उड्डाण करून जागा शोधेल व त्याचे फोटो पृथ्वीवर पाठवेल तेथील वातावरणाचे निरीक्षण नोंदवून आणि तेथील मातीवर संशोधन करून आगामी काळातील मंगळावरील मानवी निवासासाठी अन्न धान्य पिकवण्याचे संशोधन करण्यात येईल सध्या तिथल्यासारखे कृत्रिम वातावरण निर्मिती व माती तयार करून त्यात धान्य व भाजी उगवण्याचा प्रयोग शास्त्रज्ञानी यशस्वी केला आहे त्या साठी आधी मंगळावर गेलेल्या मंगळयानांनी पाठविलेल्या माहितीचा उपयोग केला गेला आहे
No comments:
Post a Comment