नासा संस्था - 28 Nov.
ह्या वर्षीचा Thanks Giving Day अमेरिकेसाठी वेगळा होता सर्व जगाप्रमाणेच अमेरिका देखील कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे लॉक डाऊन शिथिल होताच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि लोक पुन्हा घरात बंदिस्त झाले दरवर्षी प्रमाणे अमेरिकन नागरिक एकमेकांच्या घरी जाऊन हॉटेलात सामुदायिकरित्या उत्साहात हा दिवस साजरा करू शकले नाहीत पण अंतराळ स्थानकात सद्या वास्तव्यास असलेल्या अंतराळवीरांनी मात्र एकत्रितपणे हा दिवस साजरा केला आणि त्याचे फोटो,व्हिडीओ सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत
आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी Thanks Giving Day दरवर्षी अमेरिकेत उत्साहात साजरा केला जातो ह्या दिवशी आपल्या कुटुंबियांसोबत खास पार्टीचे आयोजन करून त्यात त्यांचे मित्र व आप्तस्वकीय ह्यांना देखील आमंत्रित केल्या जाते त्या दिवशी पार्टीचा मेन्यू देखील खास असतो इतर पदार्थांसोबतच टर्की ह्या पक्षाच्या पदार्थाला विशेष महत्व असते
सध्या स्थानकात सात अंतराळवीर वास्तव्य करत आहेत नासाचे अंतराळवीर Kate Rubins,Michael Hopkins Victor Gloverआणि Shannon Walker हे चोघे त्यांचे सहकारी जपानचे अंतराळवीर Soichi Noguchi रशियन अंतराळवीर Sergey Rhyzikov आणि Sergey Sverchkov ह्यांच्या सोबत एकत्रित पार्टी करून Thanks Giving Day साजरा करणार असल्याचे लाईव्ह संवादादरम्यान ह्या सर्वांनी सांगितले होते ह्या सर्वच अंतराळवीरांनी त्यांच्या संशोधनाची ह्या आठवड्यातील कामे लवकर आटोपून खास वेळ राखून ठेवत ह्या दिवसाच्या पार्टीची तयारी केली ह्या अंतराळवीरांनी लाईव्ह संवादादरम्यान संस्थेतील प्रमुखांशी बातचीत केली
सुरवातीला Flight Engineer Kate Rubins ने सर्वाना Thanks Giving Day च्या शुभेच्छा देत संवाद साधताना सांगितल ,"हा दिवस स्थानकात साजरा करण माझ्यासाठी आनंददायी आहे ह्या वर्षी आम्ही चौघे अमेरिकन इथे स्थानकात एकत्र आलो आहोत जेव्हा हे चौघे Resilience Crew Dragon मधून स्थानकात पोहोचले तो क्षण माझ्यासाठी खूप आनंददायी होता ह्या स्थानकातील घरात तुमच सहर्ष स्वागत!अस मी आनंदाने म्हटल होत आम्ही आज आमच्या इंटरनॅशनल मित्रांसोबत हा दिवस साजरा करणार आहोत आज स्पेशल डिनर घेणार आहोत त्या बद्दल माझे सहकारी अंतराळवीर तुम्हाला सांगतील
Shannon Walker - हा दिवस दुसऱ्यांदा मी स्थानकात साजरा करतेय हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे हा अमेरिकन नागरिकांचा पारंपारिक सण आहे आणि तो आम्ही आमच्या इंटरनॅशनल सहकाऱ्यांसोबत साजरा करतोय आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत
नासाच्या अंतराळ मोहीम 64 Victor Glover Frozen Corn bread चे पॅकेट दाखवताना लाईव्ह संवादादरम्यान -फोटो -नासा संस्था
Victor Glover-Awesome ! प्रथमच स्थानकातील झिरो ग्रॅविटीत Thanks Giving Day साजरा करायला मिळतय मी भाग्यवान आहे खरतर पृथ्वीवरून स्थानकात येतानाचा अंतराळ प्रवास आणि इथून स्थानकाच्या खिडकीतून पृथ्वीच अलौकिक सौन्दर्य पाहायला मिळण आणि आता Thanks Giving Day Celebration सारच अद्भुत !एरव्ही मी पृथ्वीवर माझ्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत हा सण साजरा केला असता पण आता मी आमच्या इंटरनॅशनल फ्रेंड्स सोबत हा दिवस साजरा करणार आहे आम्ही आमच्या पार्टीत फ्रोझन फूड खाणार आहोत असे म्हणत त्यांनी फ्रोझन Corn bread चे पॅकेट दाखवले आणि सर्वांना Thanks Giving Day च्या शुभेच्छा दिल्या
Soichi Noguchi -हे 2020 च वर्ष कोरोना मुळे खूप टफ आहे पण इतक्या कठीण परिस्थितीतही अमेरिकेचे Perseverance मंगळ यान मंगळाच्या वाटेवर आहे आणि Resilience Space X मधून आम्ही स्थानकात पोहोचलो आहोत त्या मुळे हे वर्ष Perseverance आणि Resilience च आहे आज आम्ही सर्वजण एकत्रित हा दिवस साजरा करतोय मी दुसऱ्यांदा स्थानकात हा दिवस साजरा करणार असल्याने मीही आनंदित आहे आमच्या पार्टी मेनूत Corn bread dressing ,Smoked turkey,green beans,mashed potatoes ह्याचा समावेश आहेच शिवाय जपानमधील high school student नि खास अंतराळवीरांसाठी तयार केलेल seafood आणि जापनीज curry rice ,red bean rice ह्याचाही समावेश आहे तुम्हा सर्वांना Happy Thanks Giving Day ! हा दिवस दिवसातील प्रत्येक क्षण तुम्हाला आनंदाचा जावो!
Michael Hopkins - मीही दुसऱ्यांदा स्थानकात हा दिवस साजरा करतोय 2013 मध्ये मी स्थानकात हा दिवस साजरा केला होता हा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी स्पेशल असतो आता मी माझ्या इंटरनॅशनल फॅमिलीसोबत स्थानकात तो साजरा करतोय हा दिवस साजरा करताना पृथ्वीवर आणि आता इथेही खूप छान वाटत आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत तुम्हा सर्वांना Thanks Giving Day निमित्य हार्दिक शुभेच्छा ! आम्ही सर्वजण आता आमच्या कुटुंबियांशी संवाद साधणार आहोत अंतराळवीरांनी सांगितल्या प्रमाणे Thanks Giving Day साजरा केला आणि त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांशी शेअरही केले .