Thursday 30 July 2020

अंतराळवीर Bob Behnken आणी Doug Hurley पृथ्वीवर परतणार

The International Space Station's two newest crew members, NASA astronauts Bob Behnken, left, and Doug Hurley
            अंतराळवीर Bob Behnken आणी Doug Hurley स्थानकातील वास्तव्यादरम्यान  -फोटो -नासा संस्था

नासा संस्था-25 जुलै
अंतराळवीर Bob Behnken आणी Doug Hurley अमेरिकन भुमीवरुन अमेरिकन मेड अंतराळयान Space X 
Dragon Endeavour मधून अंतराळ स्थानकात रहायला गेले होते अकरा वर्षानंतर अमेरीकेची बंद पडलेली
स्वयंपुर्ण अंतराळ मोहीम Space X Dragon मुळे पुन्हा सुरु झाली ह्या ऐतिहासिक Space X Dragon च्या Flight test 2 अंतर्गत हे दोघे अंतराळस्थानकात गेले होते 
हे दोनही अंतराळवीर 30 मेला Endeavour अंतराळ यानातुन पृथ्वीवरुन अंतराळात झेपावले आणी एकोणीस तासांनी 31 मेला अंतराळ स्थानकात पोहोचले होते ह्या अमेरिकन मेड अंतराळयानाची रचना अत्याधुनिक, सुटसुटीत आणी आरामदायी असल्याच त्यांनी सांगितले होते 
आता अंतराळ स्थानकातील त्यांच वास्तव्य संपवुन एक ऑगस्टला  शनिवारी 7.34p.m.ला हे दोघे पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकाबाहेर पडतील त्या आधी अंतराळ स्थानकात त्यांचा Farewell ceremony व Departure preparations प्रक्रिया पार पडेल रविवारी दोन ऑगस्टला हे दोघे पृथ्वीवर परततील पृथ्वीच्या कक्षेत पोहोचल्यावर
त्यांचे अंतराळयान Endeavour Atlantic Ocean कींवा Gulf of Mexico Coast Florida येथील समुद्रात ऊतरेल (बुडी मारेल) 
हे दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप पोहोचल्यावर अमेरीकेची हि दुसरी यशस्वी अंतराळ मोहीम ठरेल 
ह्या अंतराळविरांचा स्थानकातील Farewell Ceremony, त्याच्या स्थानकातून बाहेर पडण्यासाठीची अंतराळ यान आणी स्थानकातील Departure प्रक्रिया आणी परतीच्या प्रवासाचे लाईव्ह प्रक्षेपण नासा T.V.वरून करण्यात येणार आहे 
अमेरिकेत कोरोनाच्या महामारी मुळे Lock Down सुरू असल्यामुळे पत्रकारांना ह्या अंतराळवीरांंना परतल्यानंतर वार्तांकन करण्यासाठी प्रत्यक्ष ऊपस्थीत राहता येणार नाही आणी अंतराळविरांची मुलाखतही घेता येणार नाही परंतु सोशल मिडिया वरुन काही निवडक पत्रकारांना यांच्याशी लाईव्ह संवाद साधता येईल 

Wednesday 29 July 2020

Perseverance Mars Rover उद्या मंगळाकडे झेपावणार नासाने दिली Excitement शेअर करण्याची संधी


NASA's Mars 2020 Perseverance rover and NASA's Ingenuity Mars Helicopter (shown in an artist's concept)
              Perseverance Mars Rover आणी Ingenuity Mars Helicopter -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -23 जुलै
नासाचे Perseverance मंगळ यान उद्या मंगळ ग्रहावर जाण्यासाठी अंतराळ प्रवासास निघणार आहे अमेरिकेतील कोरोना महामारीच्या संकटावर मात करत नासाने ह्या मंगळ मोहीमेची जय्यत तयारी पूर्ण केली आहे
उद्या 30 जुलैला गुरुवारी 7.50 a.m.ला अमेरिकेतील Florida Cape Canaveral Air Force Station येथील उड्डाण भूमीवरून Perseverance यान मंगळ प्रवासासाठी अंतराळात झेपावणार आहे
तब्बल सात महिन्यांच्या अंतराळ प्रवासानंतर हे यान 18 फेब्रुवारी 2021ला मंगळ ग्रहावर पोहोचेल आणि तेथील Jezero Crater ह्या भागात उतरुन तेथेच स्थिरावेल ह्या 2,300 पाउण्ड (1,043 kg) वजनाच्या रोबोटिक सायंटिस्ट सोबत  प्रथमच परग्रहावर अत्याधुनिक यंत्रणेने अद्ययावत Ingenuity Mars Helicopter ही पाठवण्यात येणार आहे
Perseverance मंगळ यान अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज असून यानातील कॅमेरे,computer आणि रोबोटिक आर्मच्या साहायाने मंगळ ग्रहांच्या भूपृष्ठावरील आणि भूगर्भातील भूमीचे उत्खनन करून तेथील माती,खडक ,मिनरल्स आणि मंगळ ग्रहावर अस्तित्वात असलेल्या पुरातन सजीवांचे सूक्ष्म स्वरूपातील (Fossils )अवशेष शोधून त्यांचे नमुने गोळा करून पृथ्वीवर आणणार आहे शिवाय मंगळावर पुरातन काळी सजीव सृष्टी अस्तित्वात होती ह्याला दुजोरा देणारे आटलेले नदीचे प्रवाह ,स्रोत,पाण्याचे पुरावे देणारी ठिकाणे ,किनारे शोधून त्यांचे फोटो त्वरित पृथ्वीवर पाठवणार आहे मंगळ ग्रहावरील वातावरणात अस्तित्वात असलेले वायू आणि आगामी भविष्यकालीन मानवी निवास आणि वस्तीसाठी पोषक वातावरण असलेले मंगळ ग्रहावरील ठिकाणही हे यान शोधणार आहे मंगळावर मागच्या वर्षी प्रचंड धुलीवादळ झाले होते त्या मुळे ह्या आधीच्या मोहिमेतील मंगळयान भरकटले आणि त्यातील यंत्रणा काही काळ ठप्प झाली नंतर बंद पडली होती म्हणून ह्या वेळेस ह्या सारख्या संकटावर मात करण्यासाठी काही नव्या सुधारित यंत्रणेचा वापर यानात करण्यात आला आहे अशा वेळेस यान वर उडू शकत नाही पण यानासोबत पाठवण्यात येणारे Ingenuity Helicopter मात्र अशा संकटकालीन परिस्थितीत वर उडून इतरत्र सुरक्षित स्थळी जाऊ शकते आणि सुरक्षित स्थळ शोधूही शकते शिवाय तेथील परिस्थितीचे फोटो आणि इतर माहिती पृथ्वीवर पाठऊ शकते म्हणून यानासोबत Helicopter पाठवण्यात येणार आहे
 NASA संस्थेने संस्थेने दिली Excitement शेअर करायची संधी 
 #Countdown To Mars
Perseverance च्या launching ची तारीख जसजशी जवळ येतेय तसतशी उत्साही अमेरिकन नागरिकांची Excitementही वाढतेय पण ह्या वेळेस कोरोना महामारी मुळे जाहीर झालेल्या लॉक डाऊनच्या कडक निर्बंधामुळे हौशी नागरिकांना ह्या ऐतिहासिक मंगळ यानाच launching प्रत्यक्ष उपस्थीत राहून पाहता येणार नाही म्हणून नासा संस्थेतर्फे नागरिकांना सोशल मीडियावरून हा launching सोहळा पाहण्याची संधी देण्यात आली आहे एरव्ही launching स्थळी उपस्थित असलेल्या Guest कडून नागरिकांना माहिती दिली जाते ह्या वेळेस lock down मुळे पत्रकारांनाही वार्तांकन करण्यासाठी तिथे उपस्थित राहण्याची परवानगी नाही फक्त Florida स्थित निवडक नासा संस्थेतील पत्रकारांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे नासा संस्थेने लोकांचा उत्साह पाहून त्यांच्या Excitement शेअर करण्याची संधी दिली आहे कोणत्याही वयाच्या व्यक्तींना त्यांच्या भावना #Countdown To Mars ह्या id वर video द्वारे रेकॉर्ड करून  किंवा tagging करून  शेअर करण्याची संधी  देण्यात आलीय त्यातील निवडक video launching च्या  लाईव्ह प्रक्षेपण कार्यक्रमादरम्यान दाखवले जाणार आहेत
 Virtual NASA Social                          
उत्साही नागरिकांचा हिरमोड होऊ नये म्हणून नासा संस्थेने सोशल मीडियावरून Virtually उपस्थित राहण्याची संधीही जाहीर केली आहे Public Face Book Group द्वारे Behind -the -scenes -look at the mission अंतर्गत नागरिक आभासी उपस्थित राहून ह्या संधीचा लाभ घेऊ शकतात अर्थात त्या साठी नासा संस्थेकडून रीतसर परवानगी घेणे  आवश्यक आहे
 Mars Photo Booth
 ह्या मोहिमे अंतर्गत ह्या ऐतिहासिक Perseverance मंगळयान launching सोहळ्याला आभासी उपस्थित राहण्याची आणि उपस्थित राहिल्याची आठवण म्हणून नासाच्या Mars Photo Booth वर स्वत:चा स्मरणीय फोटो काढण्याची संधीही दिलीय त्या साठी आपला फोटो सोशल मीडियावर अपलोड करून नासा संस्थेतील
Jet Propulsion Lab California ,Atlas V Rocket ,Mars Rover ह्या पैकी कुठलेही बॅकग्राउंड निवडून त्यावर आपला फोटो स्टिक करून पाठवता येईल अर्थात त्या साठीही नासा संस्थेची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे
Send Your Names To Mars, Again !
ह्या आधी नासा संस्थेने हौशी इच्छुक नागरिकांना मंगळ ग्रहावर पाठविण्यासाठी त्यांची नावे द्यायची संधी दिली होती त्याला जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तब्बल 10.9 millionलोकांनी आपली नावे पाठवली ती सर्व नावे मायक्रो chip वर कोरून सर्पाकृती पातळ अल्युमिनियम पट्टीवर चिटकवून यानासोबत पाठवण्यात येणार आहे आता पुन्हा नासा संस्थेने Perseverance Mars Rover launching निमित्ताने इच्छुक लोकांना त्यांची नावे  मंगळावर पाठविण्यासाठी देण्याची संधी जाहीर केली असून आगामी अंतराळ मोहिमेदरम्यान ती मंगळ ग्रहावर पाठविण्यात येतील
कोरोनाच्या ह्या जीवघेण्या संकटकाळातील Perseverance Mars Rover च्या launching ची आतुरतेने वाट  पाहणारे अमेरिकन नागरिक ह्या सर्व मोहिमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत
 ह्या Perseverance Mars Rover च्या launching चे लाईव्ह प्रक्षेपण नासा TV वरून करण्यात येणार आहे आणि ह्या प्रक्षेपण कार्यक्रमात अमेरिकेची Grammy Award Winner गायिका आणी गीतलेखिका Gregory Porter "America The Beautiful "हे गीत सादर करून आपल्या भावना व्यक्त करणार आहे

Sunday 19 July 2020

अंतराळवीर Kate Rubin रशियन अंतराळवीर Sergey Ryzhikov आणी Sergey Kud-Sverchkov14 ऑक्टोबरला स्थानकात वास्तव्यास जाणार

 महिला अंतराळवीर Kate Rubinsरशियन अंतराळवीर Sergey Ryzhikovआणी Sergey-Kud- Sverchkov लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -
नासाची महिला अंतराळवीर Kate Rubin, रशियन अंतराळवीर Sergey Ryzhikov आणि Sergey Kud Sverchkov 14 ऑक्टोबरला अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत नुकतेच त्यांचे प्राथमिक ट्रेनिंग पूर्ण झाले असून जाण्यापूर्वी अंतिम ट्रेनिंग आधी त्यांनी त्यांच्या ह्या अंतराळ मिशन बाबत पत्रकारांशी lock down मुळे सोशल मिडिया वरून लाईव्ह संवाद साधला
त्याचा हा वृत्तांत
Howard Eunice Napa Valley - Kate तु दुसऱ्यांदा अंतराळ स्थानकात राहायला जाणार आहेस ह्या आधीच्या अंतराळ मिशनच्या अनुभवावरून काय शिकलीस ?
Kate - मी पुन्हा एकदा अंतराळ स्थानकात जाण्यासाठी खूप  Exited आहे तिथे जाऊन तिथल्या लॅब मध्ये मी मागच्या वेळेसच्या माझ्या Tool Kit वर पुन्हा प्रयोग करण्यासाठी उत्सुक आहे तिथे अंतराळवीर Chris Cassidy सोबत संशोधन करायला मला आवडेल तो सिनिअर आहे मागच्या वेळेसचा अनुभव मला नवा होता स्थानकातील झिरो ग्रॅविटीत सर्वच वस्तू तरंगतात तिथे स्थिर उभे राहता येत नाही त्या मुळे तरंगत्या अवस्थेत तिथे राहून आपल्या दैनंदिन गोष्टी करताना खूप तारांबळ होते स्थानकात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना सामान घेऊन येताना तरंगत्या अवस्थेत पाणीही तरंगत असल्यान पाणी पिण,खाण आणि इतर गोष्टी करताना त्रास झाला स्थानकात वीस ठिकाणी फिरून वस्तू आणून काम करताना,संशोधन करताना सुरवातीला त्रास झाला पण नंतर दोनचार आठवड्यात मात्र हालचालीत सहजता आली आता पुन्हा एकदा हे सार अनुभवायला मी उत्सुक आहे अर्थात मागचा अनुभव कामी येईलच
Pacific Rim Midia-  Kate मागच्या वेळेसच्या 2016 च्या मिशन मध्ये तु DNA Sequence वर संशोधन केलेस त्या बद्दल सांग पृथ्वीवर त्याचा काय उपयोग होतो
Kate - मी सायंटिस्ट आहे मला मायक्रोऑरगॅनिझम्स वर संशोधन करण्यात इंटरेस्ट आहे पृथ्वीवर आपल्या अवतीभवती हवेत आपल्याला न दिसणारे अनेक सूक्ष्म जंतू फिरत असतात त्यातले सगळेच harmful नसतात पण इथे त्यांच्यावर प्रयोग करता येत नाही स्थानकातील झिरो ग्रॅविटीत त्यांच्यावर संशोधन करता येत कारण तिथे ते आपल्याला दिसतात त्यांना पकडून त्यांच्या वर संशोधन करता येत मानवी शरीरावर तिथल्या झिरो ग्रॅविटीत हे सूक्ष्म जंतू काय परिणाम करतात ह्याच निरीक्षण नोंदवून त्यावर मी संशोधन करणार आहे 
CBS -Harwood -  सध्याच्या कोरोना संसर्गाच्या सावटात ऑक्टोबर मध्ये स्थानकात तुमच लाँचिंग होणार आहे ह्या महामारीच्या काळात कोरोनाचा संसर्ग होऊ न देता काम करण कठीण आहे तुम्ही काय काळजी घेतलीत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तू सर्वांना काय सल्ला देशील ?
Kate - ह्या कोरोनाच्या सावटात ट्रेनिंग कठीण होत पण नासा संस्थेने घालून दिलेल्या lock down च्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी करून आम्ही आमच ट्रेनिंग पूर्ण केल आम्ही मास्क वापरले सोशल distancing पाळल वेळोवेळी आमचे हात आणि hardware sanitize केले  खरेतर सर्वानीच हा संसर्ग रोखण्यासाठी lock down चे सर्व नियम पाळण आवश्यक आहे मास्कचा वापर Sanitizeचा वापर सोशल distancing पाळण आणि तसच अनावश्यक कामासाठी घराबाहेर न पडण कारण ते तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांसाठी घातक आहे
प्रश्न - लाँचिंग आधीचा काळ कसा घालवत आहेस ?
Kate -सध्या lock down सुरु आहे आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही नासा संस्थेत lock downचे  सर्व नियम पाळून आमच इथल ट्रेनिंग पूर्ण केलय आता रशियातील उर्वरित ट्रेनिंग पूर्ण करणार आहोत जाण्याआधी काही काळ आम्हाला quarantine मध्ये राहाव लागेल पृथ्वीवरून स्थानकात कोरोनाचे जंतू जाऊ नयेत आणी आमची तब्येत निरोगी राहावी म्हणून हि विशेष काळजी घेतली जातेय
Eva -(सोशल मीडिया ) -तुम्ही स्थानकात केलेल्या संशोधित प्रयोगापैकी कुठल्या प्रयोगाचा उपयोग उद्योगासाठी व्हावा अस तुला वाटत
Kate - इथे स्थानकात आम्ही शेकडो प्रयोग करतो मानवी आरोग्यासाठी उपयुक्त रोगप्रतिबंधक औषध शोधण्साठी,उद्योग जगतासाठी अद्ययावत तंत्रज्ञान शोधण्यासाठी आणि पृथ्वीवरील पर्यावरणाच संतुलन योग्य राखण्यासाठी मी सायंटिस्ट आहे Micro biologist,Virologist आहे त्या मुळे tissueची अनियंत्रित वाढ रोखण्यासाठी विषेशतः Cancer वर प्रभावी औषध शोधण्यासाठी आम्ही केलेल्या संशोधीत माहितीचा ऊपयोग औषधी कंपनीत औषध तयार करण्यासाठी झालेला मला आवडेल
Russel Pound -सध्या सार जग कोरोना महामारीच्या विळख्यात सापडलय ह्या कठीण परीस्थिती बद्दल तु काय सांगशील
Kate -सध्या सार जग कोरोनाच्या संकटान त्रस्त आहे आणी सर्वच देशातील सायंटिस्ट,डॉक्टर्स कोरोना व्हायरस वर मात करण्यासाठी,औषध शोधण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत आजवर ईतक्या साऱ्या देशातील शस्त्रज्ञ  एकत्रितपणे एखाद्या रोगावर औषध शोधण्यासाठी संशोधन करताना आपण प्रथमच पहातोय कोरोनाचा संसर्गजन्य रोगाचा ईतक्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव देखील आपण प्रथमच पाहतोय तो रोखण्यासाठी, नष्ट करण्यासाठी  सगळ्या देशाचे पंतप्रधान,प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत आपण सारेही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी lock,down पाळतोय आपल्या निरोगी आयुष्यासाठी हे अत्यावश्यक आहे पण अजूनही पुर्णपणे यश मिळाले नाही पण लवकरच त्यावर औषध शोधण्यात शास्त्रज्ञ यशस्वी ठरतील अशी मला आशा आहे
Robert -अंतराळ स्थानकाला यंदा विस वर्षे पुर्ण झाली तुझ्या पहिल्या अंतराळ मिशनचा अनुभव कसा होता आणी आताच्या मिशन मधला फरक काय सांगशील?
Kate -मी जेव्हा पहिल्यांदा स्थानकात गेले तेव्हा स्थानकाची अत्याधुनिक रचना,अद्ययावत तंत्रज्ञान पाहून मी थक्क झाले आणी स्थानक बनविणारे ईंजीनीअर,तंत्रज्ञ आणी ईतर कर्मचाऱ्यांच्या असामान्य कर्तृत्वाची जाणीव झाली तिथल्या तरंगत्या अवस्थेतील वास्तव्या बद्दल मी सांगितले आहेच पण ह्या अंतराळातील फीरत्या झीरो ग्रव्हीटीतली स्थानकातील lab अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज आहे तिथे दोनशेच्या वर सायंटिफिक संशोधनात्मक प्रयोग अनेक देशाचे शास्त्रज्ञ व अंतराळवीर एकत्रितपणे करत आहेत हे खरच कौतुकास्पद आहे पहिल्या अंतराळ वारीच्या वेळेस जाण्याआधी मी स्थानकाबद्दल ऐकले होते मी सायंटिस्ट होते अंतराळवीर झाले नव्हते तेव्हा स्थानकाबद्दल आकर्षण होत जायची ईच्छा होती पण मी अंतराळवीर होऊन खरच तीथे जाईन अस वाटल नव्हत आता स्थानकात आणखी बदल झाले आहेत ह्या वेळेस मला Space X Endeavour जवळून पहायला मिळेल
-DNA Sequence बद्दल माहिती सांग हा प्रयोग ईथे करता येत नाही का?
Kate -DNA Sequence म्हणजे मानवी शरीरातील पेशीतील जीन्सची रचना त्यातील RNA थोडक्यात पेशीच Architecture आपल्या शरीरातील पेशीतील Genes पृथ्वीवर आणी अंतराळात कसे कार्य करतात झीरो ग्रव्हीटीत त्यांच्या संरचनेत काय बदल होतात आणि त्यामुळे मानवी शरीरात काय बदल होतात हे आम्ही अभ्यासतो आणी त्यावर संशोधन करतो ईथे झीरो ग्रव्हीटीत ते शक्य होत कारण ईथल्या विपरीत परिस्थितीत Genesची रचना बदलते ते थोडेसे तुटतात,वेगळे होतात पण पृथ्वीवर परतल्यावर मात्र तीथल्या गुरुत्वाकर्षणीय वातावरणात पुन्हा जुळतात पूर्ववत होतात हे संशोधन फक्त स्थानकातील झीरो ग्रव्हीटीतच करता येत शीवाय आम्ही Twins मधल्या Genesमध्ये पृथ्वीवर व अंतराळात होणाऱ्या बदलांचे निरिक्षण नोंदवून त्यावर संशोधन करतोय अंतराळवीर Scott Kellyआणी त्यांचा भाऊ ह्या संशोधनात सहभागी झाले होते शिवाय मानवी Heart मधील पेशीतही स्थानकातील वातावरणात बदल होतात त्या मुळे मी Cardiovascular System वरही संशोधन करणार आहे
-आता तु Cold Atom वर संशोधन करणार आहेस त्या बद्दल सांग त्याचा पृथ्वीवर काय ऊपयोग होईल?
Kate -माझ्या संशोधनाचा विषय Use of Laser cold atoms for future quantum sensors हा आहे ह्याचा ऊपयोग Space exploration साठी Atomic clock साठी होईल शिवाय ऊद्योगजगतातही हे संशोधन ऊपयुक्त ठरेल
रशियन अंतराळवीर Sergey Ryzhikov हे देखील दुसऱ्यांदा स्थानकात जात असून त्यांनी देखील त्यांचा पहिला अनुभव शेअर केला ते म्हणाले लहानपणी पक्ष्यासारखे मुक्त आकाशात विहरण्याचे सर्वांचेच स्वप्न असते मला देखील असच वाटायच स्थानकात प्रवेश केल्यावर वजनरहित अवस्थेत तरंगताना माझ स्वप्न पूर्ण झाल पण त्या अवस्थेत सहा महिने राहण अत्यंत कठीण असत पण तिथून पृथ्वीच अलौकिक सौन्दर्य पाहण्याचा आनंद अविस्मरणीय असतो मी देखील पुन्हा स्थानकात जाऊन संशोधन करण्यासाठी उत्सुक आहे सध्या कोरोना मुळे lock down पाळत तयारी केली आता काही दिवस launching आधी आम्ही Quarantine मध्ये राहणार आहोत
 Sergey -Kud म्हणाले हि माझी पहिलीच अंतराळवारी असून माझे सर्व लक्ष मी माझ्या ट्रेनिंग वर केंद्रित केले असून हे ट्रेनिंग आमच्या launching च्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरु राहील
ह्या दोन रशियन अंतराळवीरांनी रशियन भाषेतून संवाद साधला त्याचे इंग्लिशमध्ये रूपांतर करण्यात आले तेव्हा Kate ला तू ह्या दोघांशी कसा संवाद साधणार असे सोशल मीडियावरून विचारले असता आम्ही गरजेपुरते एकमेकांची भाषा शिकलो असं तिने सांगितले

Friday 3 July 2020

Perseverance Mars Rover वीस जुलैला मंगळाकडे झेपावणार



NASA's Mars 2020 rover
   Perseverance Mars Rover चे निरीक्षण करताना नासा संस्थेतील इंजिनीअर्स -फोटो- नासा संस्था

नासा संस्था -
नासाचे Perseverance मंगळ यान वीस जुलैला मंगळाकडे झेपावणार आहे सध्या ह्या यानाच्या launching ची तयारी अंतिम टप्प्यात आहे कोरोना महामारीच्या संकटातही लोक Perseverance मंगळ यानाच्या launchingची ऊत्सुकतेने वाट पहात आहेत नासा संस्थेतर्फे launch America प्रमाणेच ह्याही वेळेस #Countdown To Mars ह्या मोहिमे अंतर्गत हौशी नागरिकांना त्यांच्या भावना सोशल मीडियावरून व्यक्त करण्याची संधी दिली गेली आणी  लोकांनीही ह्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय
नासा प्रमुख Jim Brownstone म्हणतात,"पन्नास वर्षांपूर्वी आम्ही चांद्रमोहिमेची तयारी करत होतो आणी आता आम्ही मंगळभुमीवरील Samples गोळा करण्याची तयारी करतोय जसे आपण आता अपोलो मोहीमेतील अंतराळ वीरांचा गौरव करतो तसेच भविष्यात मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांचा गौरव केल्या जाईल त्यात महिला अंतराळवीरांचाही समावेश असेल Perseveranceचाही असाच गौरव केल्या जाईल"
नुकताच  नासा संस्थेतर्फे  Perseverance मंगळ यानाच्या  तयारीचा आढावा घेण्यासाठी perseverance टिमचे
Project manager,तंत्रज्ञ,शास्त्रज्ञ व टिममधील संबंधीत कर्मचाऱ्यांशी lock downच्या निर्बंधामुळ सोशल मीडियावरून लाईव्ह संवाद साधण्यात आला
सध्या सारे जग कोरोना महामारीने त्रस्त आहे अमेरिकेत देखील lock down सुरु आहे त्यामुळे कडक निर्बंध पाळुन हि मोहीम राबवण आव्हानात्मक होत पण ह्या प्रोजेक्ट टीममधील कर्मचाऱ्यांनी आम्हाला ऊत्तम साथ देत  आणी कडक नियमांचे पालन करत खूप मेहनत करून हि मोहीम पुर्णत्वास नेण्यात मदत केली असे Perseveranceचे Project Manager म्हणाले Perseveranceच उड्डाण ऊन्हाळ्यात होणार होत पण कोरोना महामारी मुळे आता विस जुलैला यानाच ऊड्डान करण्यात येेणार आहे पण जर त्या वेळेस हवामान ठिक नसेल किंवा काही अडचण आल्यास  तर मात्र ऑगस्ट मध्ये हे ऊड्डान करण्यात येईल सध्या Perseverance  नासाच्या Florida येथील Launching Pad वर नेण्यात आले आहे तिथे यानाची अंतीम चाचणी घेण्यात आली असून सर्व यंत्रणा व्यवस्थित कार्य करत आहे
सध्या अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग वाढत चाललाय शास्त्रज्ञ,डॉक्टर्स आणि विविध संस्थेतर्फे कोरोनावर औषध व लस शोधण्याचे काम जोरात सुरु आहे पण अजूनही यश आलेले नाही अशा वेळेस कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टर्स,नर्सेस,पोलीस समाजसेवी अहोरात्र आपल्या जीवाची पर्वा न करता प्रयत्न करत आहेत त्या सर्व करोना वॉरीअर्सचा सन्मान करण्यासाठी ह्या सर्वांची नावे एका सर्पाकृती पातळ aluminumपट्टिवर कोरुन Perseverance यानावर बसविण्यात आली आहे त्यामुळे भविष्यात मंगळावर मानवी वस्ती वसल्यास तेथील लोकांना पृथ्वीवरील कोरोना महामारी आणी कोरोना वॉरीअरची आठवण राहिल
 A snake-entwined rod to symbolize healing and medicine
       यानावर बसविण्यात आलेली कोरोना वॉरियर्सची नावे कोरलेली पट्टी - फोटो -नासा संस्था

Perseverance यानाचे डिझाईन अत्याधुनिक व नावीन्यपूर्ण आहे आधीच्या मंगळ यानातील त्रुटी दुर करून हे यान बनविण्यात आले आहे  ह्या यानातील रोबोटिक आर्म वरील Computers,microphoneआणी Camera हे पुर्वीच्या यानाच्या तुलनेत जास्त powerful आहेत आणी त्यांच्यात मंगळावरील अद्ययावत माहिती अत्यंत कमी वेळेत पृथ्वीवर पाठवण्याची क्षमता आहे त्यासाठी यान अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने युक्त बनविले आहे आणी यानातील यंत्रणा देखील अत्याधुनिक व जास्त कार्यक्षम आहे
ह्या मोहिमेत आधीच्या मंगळमोहिमे प्रमाणेच मंगळावरील लोप पावलेल्या पुरातन सजीव सृष्ठिच्या अस्तित्वाचे पुरावे शोधण्यात येणार आहेत Perseverance यान मंगळावरील Jezero Crater ह्या भुपृष्ठावर ऊतरणार आहे आणी तेथील भुभागातील व भूगर्भातील माती,दगड,केमिकल,वायू व सजीव सृष्ठिच्या लोप पावलेल्या ऐतिहासिक खाणा खुणा आणी त्याला दुजोरा देणारे Biologicalअवशेष (Fossils) शोधून त्यांचे फोटो नमुने आणी सखोल संशोधीत माहिती पृथ्वीवर त्वरित पाठवली जाणार आहे ह्यासाठी रोबोटिक आर्मच्या सहाय्याने ऊत्खनन करण्यात येणार आहे
Perseverance यानाच्या सहाय्याने मंगळाच्या भूमीवरील सजीवांच्या अस्तित्वाला पृष्ठि देणारे पुरावे  पुर्वी संशोधीत केलेल्या दऱ्या खोरे,पर्वत व नदिकिनाऱ्यावरील आटलेल्या पाण्याच्या अस्तित्वाच्या खुणा दर्शविणारे स्त्रोत,त्यांच्या कडा ह्यांचे फोटो व नमुने गोळा करुन ते पृथ्वीवर पाठविण्यात येणार आहेत  शिवाय नदिकाठची चिखलयुक्त माती,दगड,गोटे वाळु ,धुळ आणी मंगळावरील प्राचंड,वादळ,वारा ,ऊन ह्यामुळे तयार झालेले झीजलेले दगड,त्यांचा चुरा ह्यांचे नमुनेही गोळा करण्यात येणार आहेत
ह्याचा ऊपयोग आगामी मानवसहीत मंगळमोहिमेत होईल शीवाय आगामी मंगळ मोहीमेतील मानवी वस्तीच्या निवासासाठी साठी
अनुकल वातावरण असणारी जागाही ह्या मोहिमेत शोधण्यात येणार आहे ह्यासाठी ह्या यानासोबत Ingenuity नावाचे helicopter ही पाठवण्यात येणार असून जीथे Perseverance यान जाऊ शकत नाही तीथे ऊड्डान करुन हे helicopter मानवी वस्ती निवासासाठी पोषक वातावरण असणारी जागा शोधेल व प्रतिकूल परिस्थितीत सुरक्षित स्थळी ऊड्डान करून तेथील माहिती व फोटो  पृथ्वीवर त्वरित पाठवेल त्यासाठी ह्या helicopter मध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे प्रथमच परग्रहावर यानासोबत  helicopter पाठविण्यात येणार असून त्याचीही चाचणी पूर्ण झाली आहे ह्या helicopter च्या सहाय्याने तेथील भौगोलिक माहिती मिळेल व तेथील वातावरण आणी हवामानातील बदल नोंदवले जातील
यानाच्या Parachute चे डिझाइन पण वैशिष्ट्यपूर्ण व तेथील वातावरणाचा विचार करुन बनविण्यात आले आहे