Thursday 30 January 2020

Christina Koch आणी Jessica Meir ह्यांनी साधला विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद


नासा Astronauts Jessica Meir आणी Christina Koch विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -24 जानेवारी
नासाच्या अंतराळ मोहीम 61च्या महिला अंतराळवीर Christina Koch आणी Jessica Meir ह्यांनी नुकताच अमेरिकेतील पनामा येथील इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली
सुरवातीला International School च्या टीचर Dani Di Pietro ह्यांनी Christina आणि Jessica शी संवाद साधला आणि त्यांना त्यांच्या शाळेतील 1400 विध्यार्थी आणि अमेरिकेच्या विविध भागातून आलेले विध्यार्थी तुमच्याशी संवाद साधायला उत्सुक असल्याचे सांगत सर्वांतर्फे त्यांनी बोलण्यासाठी वेळ दिल्याबद्दल आभार मानले आणी संवादाला सुरवात केली
 Panama International School चे विध्यार्थी Jessica Meir आणी Christina Koch ह्यांच्याशी लाईव्ह संवाद साधताना फोटो -नासा संस्था
Dani - " Hey girls You Rock "! congratulations for your Historical Only Woman Space Walk " असे म्हणत त्यांचे अभिनंदन केले आणि संभाषणाला सुरवात झाली
सर्वात आधी सगळ्यात लहान Kinder garden मधल्या मुलीन प्रश्न विचारला
Christina जेव्हा तु पहिल्यांदा अंतराळ स्थानकातून पृथ्वीकडे,आपल्या देशाकडे आणि शहराकडे पाहिलस  तेव्हाचा क्षण कसा होता ? 
Christina - खूप छान प्रश्न विचारलास ! खूपच अद्भुत अनुभव होता तो ! मला अजूनही आठवतो तो क्षण ! मी अंतराळातून पहिल्यांदा जेव्हा पृथ्वीकडे पाहील तेव्हा पृथ्वीच ते अलौकिक अद्भुत सौन्दर्य पाहून क्षणभर स्तब्ध झाले आणि श्वास रोखून मी माझ्या नॉर्थ Carolina ह्या शहराकडे पाहील तेव्हा आणि अजूनही कित्येकदा माझ्या देशाकडे,शहराकडे पाहण्याचा तो क्षण अद्भुत असतो आनंददायी असतो ! आपण नकाशात पहातो तसच ह्या खऱ्या जगाच्या नकाशात आम्ही आपला देश शहर पाहण्याचा आनंद घेतो आणि त्यातले वेगवेगळे देश आणि राज्य ओळखायला मला खूप आवडत
Sonia-(6th )- सध्या मानवी वास्तव्यासाठी पृथ्वी हे एकमेव ठिकाण आहे आणि म्हणूनच आमची पिढी आमच्या भावी आयुष्यासाठी पृथ्वीच्या रक्षणासाठी प्रयत्न करतेय आगामी Artemis Mission त्या साठी किती उपयुक्त ठरेल असे तुला वाटते ?
Jessica- पृथ्वीची काळजी घेण हि चांगली गोष्ट आहे आपण आपल्या घराची काळजी घेतो तशीच शेवटी पृथ्वी म्हणजे आपल घरच ! चंद्र मंगळ ह्या ग्रहांच सखोल संशोधन करताना,निरीक्षण नोंदवताना आम्हाला पृथ्वीसंबंधित आणखी माहिती मिळते इतर ग्रहांसारखीच पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली आणि त्या नंतरचा सजीव सृष्टीचा विकास कसा झाला असावा ह्याची नव्याने माहिती होते आणि पृथ्वी वरील पर्यावरणाच योग्य संतुलन राखण्यासाठी काय करायला हव ह्याचीही जाणीव होते
Artemis program मध्ये आताच्या चांद्र मोहिमेसाठी आणि आगामी मंगळ मोहिमेसाठी अत्याधुनिक अद्ययावत तंत्रज्ञान विकसित केल्या जातेय भविष्यातील परग्रहावरील मानवी वास्तव्यासाठी आवश्यक गोष्टींचे (घर,शेती आणि इतर गोष्टी ) योग्य नियोजन करण्यासाठीचे संशोधित आराखडे तयार करण्यात येतेय नवीन यांत्रिक उपकरणे,हार्डवेअर,सॉफ्टवेअर ह्यावर सखोल संशोधन करण्यात शास्त्रज्ञ व्यस्त आहेत आणि आम्ही इथे करत असलेल्या  संशोधनाचा उपयोग पृथ्वीवरील अनेक क्षेत्रात होतो आम्ही अंतराळ स्थानकातील किंवा यानासाठी  बनविलेला रोबोटिक आर्म अंतराळवीरांना अवजड वस्तू उचलण्यासाठी आणि इतर कामासाठी होतो तसाच तो पृथ्वीवरील हॉस्पिटल्स मध्ये Nero Surgery करण्यासाठी झालाय आणि इतर क्षेत्रातही होतोय तसाच फायदा Artemis program मधल्या संशोधनाचा होईल एखादे नवे तंत्रज्ञान शोधताना असे अनेक उपयुक्त अनपेक्षित फायदेही होतात
Samuel -8th- Christina तुझी निवड जर Artemis Program मध्ये सहभागी होण्यासाठी झाली तर चंद्रावर जाऊन तुला कुठला प्रयोग करायला आवडेल ?
Christina -माझी निवड होण माझ्यासाठी अभिमानास्पद असेल तशी विशिष्ठ प्रयोगाची निवड करण कठीणच असेल कारण तिथे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीन करता येण्यासारखे खूप महत्वपूर्ण प्रयोग आहेत काही आपल्या सौरमालेतील अज्ञात अनुत्तरित गोष्टीची उकल करणारे असतील पण मला स्वत:ला तंत्रज्ञान आवडत त्या मुळे त्यातच विकसित संशोधन आणि operation development करायला आवडेल माझ्या मते चंद्रावर वास्तव्यासाठी जाण म्हणजे आगामी मंगळ मोहिमेची तयारी करण शिवाय माझ्यासाठी सर्वात महत्वाच म्हणजे ह्या ब्रह्मांडात आपण पृथ्वीवासी एकटेच आहोत की,आपल्यासारखी सजीवसृष्टी अस्तित्वात असलेल्या ग्रह ह्या ब्रह्मांडात आहे ? ह्याचा शोध घेण आणि ह्याच गुढ कदाचित मंगळावर गेल्यावर उकलेल म्हणून मी चंद्राचा उपयोग Test Bed सारखा करेन मंगळ मोहिमेसाठीच्या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी करेन आणि कदाचित मंगळावरील जीवसृष्टी शोधण्यासाठी ते उपयुक्त ठरेल
Jaun-(1st)- स्पेससूट घातल्यानंतर जर शरीरावर खाज सुटली तर तुम्ही काय करता ?
Christina -हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे आणि आम्हा दोघींना स्पेसवॉक करताना हि समस्या उदभवते स्पेससूट घातल्यावर सहजतेने चेहऱ्याला हात लावता येत नाही आमच्या हेल्मेट मध्ये एक छोटस उपकरण Valsalva Device बसविलेले असते जे आम्हाला आमचे कान मोकळे करायला उपयोगी पडत पाण्यात डुबकी मारली कि पाण्याच्या आणि हवेच्या प्रेशर मधील फरकामुळे जसे आपल्याला कान मोकळे करावे लागतात तसेच अंतराळातील प्रचंड प्रेशरच्या संपर्कात आल्यावरही अशी समस्या उदभवते ह्या उपकरणाचा वापर आम्ही खाजवण्यासाठी करतो मी अंतराळात स्पेसवॉक करताना माझ्या नाकाला खाज सुटली तेव्हा मी ते उपकरण खाली आणून नाक खाजवल !
Lilly & katalina -(3rd) -Christina तुझ्यासाठी  स्पेस स्टेशन मधला सर्वात भीतीदायक क्षण कोणता होता?
Christina -जेव्हा मला t.v. वर लाईव्ह Interview द्यायचे असतात तो क्षण माझ्यासाठी घाबरवणारा असतो! सगळ्यात भीतीदायक क्षण मी मार्च एप्रिलच्या माझ्या पहिल्या स्पेसवॉक मध्ये अनुभवला आमच्या स्पेससूट मधली सर्व हवा बाहेर काढून आम्ही स्पेसवॉक साठी तयार होतो स्थानकाच hatch उघडल गेल आणी आम्ही बाहेर पडलो तेव्हाचा क्षण! माझ्या पायाखाली स्थानकाचा परिचित तळ नव्हता निर्वात पोकळीतील प्रचंड काळोख आणी प्रकाशाचा मागमूस नसलेल प्रचंड अंतराळ! क्षणभर हृदयाची धडधड वाढली!पण दुसऱ्याच क्षणी मला माझ्या कर्तव्याची,काम पूर्ण करण्याच्या जबाबदारीची जाणीव झाली,मी स्वत:ला सावरत भीतीवर मात केली परिस्थितीला सामोरे गेले आणि यशस्वीही झाले!
Karim -(3rd)- अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅविटीत पृथ्वीच्या विपरीत परिस्थितीत तुम्ही तुमचे मानसिक स्वास्थ कसे राखता ? अंतराळवीर Mindfulness चा सराव करतात का ?
Jessica - हा महत्वाचा मुद्देसूद प्रश्न आहे!खरोखरच आम्ही इथे पृथ्वीच्या विपरीत आणि धोकादायक परिस्थितीत
वास्तव्य करतो अशा वेळेस मानसिक स्थिती सांभाळण्याची गरज असते प्रत्येकजण आपल्या परीने त्याला सामोरे जातो प्रत्येक क्षणी जागृत राहावे लागते लक्ष केंद्रित करण थोडक्यात एकाग्रता आवश्यक असते इथे येण्याआधी आम्हाला सहा वर्ष विशेष ट्रेनींग दिल्या जात त्या वेळेस ह्या गोष्टी शिकवल्या जातात स्पेससूट घालून अंतराळासारख्याच तयार केलेल्या कृत्रिम वातावरणात आम्ही स्पेसवॉकची प्रॅक्टिस करतो प्रत्यक्षातला खराखुरा अनुभव वेगळा असतो रोमांचकारी असतो पण प्रॅक्टिसमुळे आमच्या शरीरातल्या स्नायूंना सवय होते त्या मुळे  प्रत्यक्षात अंतराळात काम करताना आमचे स्नायू स्मृतीप्रमाणे कार्यरत होतात! त्या मुळेच आम्ही सतर्क राहू शकतो !
Tiago (3rd)- Christina तू पृथ्वीवर परतल्यावर सगळ्यात आधी काय करणार आहेस ?
Christina - मी दोन आठवड्यात इथला मुक्काम संपवून पृथ्वीवर परतणार असल्याने मी त्याचाच विचार सध्या करतेय ! मी माझ्या कुटुंबियांना विशेषतः माझ्या नवऱ्याला भेटायला उत्सुक आहे मला त्यांच्या सोबत राहायला आवडत तसच बाहेर फिरायलाही ! माझ घर समुद्राजवळ असल्यामुळे मला किनाऱ्यावर फेरफटका मारायलाही  खूप आवडत त्या मुळे मी केव्हा तिथे जाते आणी फेरफटका मारते असं झालय मला !
Nihilo -(3rd)- Jessica तू पृथ्वीवरची कुठली गोष्ट सर्वात जास्त miss करतेस ?
Jessica -आम्हाला नेहमीच हा प्रश्न विचारला जातो पण मला माझच आश्चर्य वाटत कि मी काही miss केलय असं मला का वाटत नाही? अर्थात माझ्या परिवाराला मित्रमैत्रिणींना मी miss करतेच पण तरीही इथला हा अलौकिक नाविन्यपूर्ण रोमांचकारी अनुभव पहाता मला तस वाटत असाव इथे नवनवीन विषयांवर संशोधन करायला मिळतात स्थानकाच्या खिडकीतून पृथ्वीच अभूतपूर्व सौन्दर्य पाहायला मिळत स्वप्नातच पाहायची इच्छा करणाऱ्या मला ग्रहताऱ्यांना जवळून पाहायला त्याचा अभ्यास करायला मिळत आणि अंतराळात तरंगत्या अवस्थेतला स्पेसवॉकचा अनुभव तर अविस्मरणीयच ! हे सार मला पृथ्वीवर राहून करता आल नसत त्या मुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतेय! खरच इथल तरंगत्या अवस्थेतल वास्तव्य रोमांचकारी आहे !
Lia -(5th)-Christina अंतराळातून पृथ्वीवरील बदलत वातावरण दिसत का ?
Christina -हो! पृथ्वीवरचे हिमनग वितळताना त्यांच्या आकारात होणारे बदल आणि वितळलेल्या बर्फाच्या पाण्याने निर्माण झालेले Glaciers आम्ही सहजतेने इथून पाहू शकतो आम्ही दोघीनींही Glacier वर होणारे परिणाम पाहिले आहेत शिवाय पाण्याच्या कमीजास्त होणाऱ्या स्थरामुळे बेटांच्या क्षेत्रफळात होणाऱ्या बदलांचे आम्ही निरीक्षण केलय इथे आम्ही पृथ्वीवरच्या बदलाच्या अभ्यासासाठी सतत संशोधनात्मक प्रयोग करत असतो
Alan -(5th)- Jessica Artemis मोहिमेसाठी अंतराळवीर निवडीचे निकष काय आहेत ?
Jessica -नेमके निकष काय आहेत हे मी सांगू शकत नाही कारण मी निवड समितीत नाही पण नक्कीच बाकीच्या अंतराळ मिशन पेक्षा वेगळे नसणार !अंतराळवीरांना ऑल राऊंडर असण,सर्वच क्षेत्रातल सखोल ज्ञान असण आवश्यक असत शाळेत जस अभ्यासा व्यतिरिक्त खेळ कला ह्या गोष्टी आवश्यक असतात तसच त्याच्यात नेतृत्व गुण,त्वरित निर्णयक्षमता आणि सर्वांशी जुळवून घेऊन टीमवर्क करता यायला हव स्थानकातील सहा महिन्यांच्या एकत्रित वास्तव्यात आनंदाने राहण्यासाठी हे गुण उपयुक्त ठरतात बरचस Camping trip सारखच शिवाय इथे आपली आणि आपल्यासारखीच इतरांचीही काळजी घेता यायला हवी आणि टीमबद्दल सांगायच झालं तर मूलभूत क्षेत्रातले तज्ञ डॉक्टर्स,इंजिनिअर्स,सायंटिस्टची निवड प्रथम केली जाते
Andreas - (7th)- Jessica अंतराळात पृथ्वीपेक्षा वेगळी स्वप्ने पडतात का ?
Jessica - हो! इथल्या स्वप्नांच निश्चितच वेगळेपण आहे आम्ही एका स्लीपिंग बॅग मध्ये झोपतो आणि ती बॅग स्थानकाच्या भिंतीला अडकवलेली असते आम्ही तरंगत्या अवस्थेतही इथे खूप गाढ झोपतो आणि आमची झोपही आरामदायी असते त्या मुळे माझ्या स्वप्नातही मी कधी तरंगत्या अवस्थेत असते तर कधी मी पृथ्वीवर असते
Isabella -(7th)- Jessica-अंतराळ स्थानकातील वास्तव्यामुळे तुझ्या जीवनाकडे आणि जगाकडे बघण्याच्या दृष्ठीकोनात काही बदल झालाय का ?
Jessica -हो !निश्चितच! इथे येण्याआधी मी पृथ्वी किती अनमोल आहे आणि सुंदर आहे असा विचार करायची तीच महत्व जाणवायच इथे आल्यावर वरून पृथ्वीकडे पाहताना पृथ्वीवरच विरळ वातावरण जमीन,समुद्र स्पष्टपणे पाहता आल आणि पृथ्वीवरच विरळ वातावरण पाहताना भावी पिढीसाठी हे वातावरण राखण त्याची काळजी घेणं किती आवश्यक आहे ह्याची प्रकर्षाने जाणीव झाली तसच ह्या प्रचंड ब्रम्हांडात आपण जेव्हा पृथ्वीपासून दूर जातो तेव्हा आपण किती क्षुल्लक आहोत ह्याची जाणीव होते आपणच नाही तर पृथ्वीसुद्धा ह्या सौरमालेत एक छोट्या बिंदूसमान भासते मी आणि Christina नेहमीच ह्या बद्दल बोलत असतो आम्ही स्पेसवॉक केला तेव्हा Martin Luther king डे होता तेव्हा मला त्यांच वाक्य आठवल ते म्हणाले होते आपण सगळे वेगवेगळ्या बोटीतून आलो असलो तरीही आता आपण एका ship मध्ये प्रवास करतोय मला ते खूप योग्य वाटत
 Ronia -(7th)- Christina तुझी निवड जर चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली महिला अंतराळवीर म्हणून झाली तर सगळ्यात जास्त कशाबद्दल उत्साहित असशील ?
Christina -Oh ! माझ्यासाठी आनंदाची अभिमानाची गोष्ट असेल ती! मी नशिबवान समजेल असं झालं तर! सर्व मानवजातीच प्रतिनिधित्व मी करत असल्याने आधी त्यांची स्वप्न त्यांच कुतूहल पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि महत्वाच म्हणजे ज्यांनी ज्यांनी चिकाटीने कष्टाने अत्यंत कठीण परिस्थितीत मला तिथे पोहचवण्यासाठी मदत केली त्या सर्वांची मी ऋणी राहीन
Lucos -(8th)- Jessica आगामी अंतराळ मोहिमांत मानव चंद्रावर किंवा मंगळावर जाऊन मानवी वस्ती तयार करण्यात स्वयंपूर्ण होण्यात यशस्वी होईल असं तुला वाटत का ?
Jessica - हो! निश्चितच ! आपल्याकडे क्षमता आहे अर्थात कायमस्वरूपी वास्तव्य हे तिथल्या राहण्यायोग्य वातावरणावर funding आणि नासा च्या Administration वर अवलंबून असेल शास्त्रज्ञाचे आजवरचे संशोधन अंतराळवारीतील अंतराळयानाने गोळा केलेला अभ्यासपूर्ण डाटा नवे शोध आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान त्या साठी कामी येईल आम्ही इथे त्या साठी सतत संशोधन करत असतो झिरो ग्रॅविटीत मानवी शरीरावर जास्त काळ राहिल्यावर होणारे परिणाम,इथल्या प्रतिकूल परिस्थितील शरीरात होणारे बदल आणि अंतराळ वीरांना लागणाऱ्या अन्न भाजीपाला,फळांची लागवड ह्या सारख्या प्रयोगात आम्हाला यशही मिळालय त्या मुळे आता लवकरच चंद्रावर पहिली महिला आणि पुरुष अंतराळवीर जातील तेव्हा मंगळ मोहिमेसाठी तो मैलाचा दगड ठरेल ती पुढची पायवाट असेल अशी आशा आम्हा सर्वांनाच आहे
शेवटी पुन्हा एकदा ह्या दोघींचे अभिनंदन करून आभार मानत निरोप घेतला

Sunday 19 January 2020

Christina Koch आणि Jessica Meir ह्यांचा दुसरा only Woman स्पेसवॉक यशस्वी


NASA astronaut Jessica Meir enters the Quest airlock
           Christina Koch आणि Jessica Meir स्थानकाबाहेर स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -15 जानेवारी
नासा संस्थेच्या अंतराळ मोहीम 61 च्या अंतराळ वीरांगना Christina Koch आणि Jessica Meir ह्या दोघींनी बुधवारी अंतराळस्थानकाच्या दुरुस्तीसाठी केलेला only महिला स्पेसवॉक यशस्वीपणे पार पडला
सकाळी 6.35a.m. ला सुरु झालेला स्पेसवॉक दुपारी 2.04p.m.ला संपला ह्या साडेसहा तासाच्या स्पेसवॉक मध्ये Jessica आणि Christina ह्या दोघींनी मिळून स्थानकाबाहेरील सौर पॅनलच्या सोलर arrays वरील जुन्या झालेल्या Nickel hydrogen बॅटऱ्या बदलवून नव्या जास्त पॉवरफुल Lithium ion बॅटऱ्या बसविल्या
शिवाय ह्या दोघीनींही पुन्हा वीस जानेवारीला अंतराळस्थानकाच्या उर्वरित तांत्रिक कामासाठी करण्यात येणाऱ्या स्पेसवॉकसाठीची पूर्व तयारीही केली
 Astronauts Christina Koch (left) and Jessica Meir
                Christina Koch आणि Jessica Meir स्पेसवॉकच्या तयारीत -फोटो -नासा संस्था
विशेष म्हणजे हा स्पेसवॉक सुरु असताना मधेच Christina च्या हेल्मेट वर बसविलेला कॅमेरा आणि लाईट्स ढिले झाले तो पुन्हा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न दोघीनी केला पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले स्पेसवॉक मधला एकएक क्षण महतवाचा असल्यामुळे नासा संस्थेतील प्रमुखांनी त्यांना तो पुन्हा बसवण्यात वेळ न घालवता तसेच काम पूर्ण करण्याचा सल्ला दिला तेव्हा Christina अपुऱ्या प्रकाशात हे काम पूर्ण करेल कि नाही अशी आशंका होती पण Jessica ने तिला ह्या कामात जवळ जाऊन साथ दिल्यामुळे दोघींनीही अनपेक्षितपणे स्पेसवॉक यशस्वी केला
अंतराळस्थानकाबाहेर केलेला ह्या वर्षीचा हा पहिलाच स्पेसवॉक होता आणि स्थानकाच्या दुरुस्तीसाठी आजवर अंतराळवीरांनी केलेला 225 वा स्पेसवॉक होता
अंतराळवीरांसोबत महिलांचा सहभाग असलेला हा 44 वा स्पेसवॉक होता तर फक्त महिलांनीच केलेला हा दुसरा स्पेसवॉक होता
आजवर अंतराळवीरांनी अंतराळस्थानकाच्या दुरुस्तीसाठी स्थानकाबाहेर स्पेसवॉकसाठी 58 दिवस 23 तास आणि 12मिनिटे व्यतीत केले आहेत
Jessica Meir हिचा हा दुसरा स्पेसवॉक होता त्यासाठी तिने 14तास 46 मिनिटे व्यतीत केले आहेत
Christina Koch हिचा हा पाचवा स्पेसवॉक होता त्या साठी तिने 35 तास 17 मिनिटे व्यतीत केले आहेत
Christina Koch मागच्या वर्षी मार्च मध्ये अंतराळस्थानकात राहायला गेली होती आणि फेब्रुवारीत पृथ्वीवर परतणार आहे तिने नुकताच अंतराळ स्थानकात जास्त दिवस राहणारी महिला अंतराळवीरांगना म्हणून विक्रम प्रस्थापित केला आहे तिने Peggy Whitson ह्यांचा ह्या आधीचा विक्रम मोडला आहे
Jessica Meir  सप्टेंबर मध्ये अंतराळस्थानकात राहायला गेली होती ती एप्रिल मध्ये पृथ्वीवर परतेल
ह्या दोघीही स्थानकाच्या उर्वरित तांत्रिक कामासाठी वीस तारखेला पुन्हा स्पेसवॉक करणार आहेत

Saturday 4 January 2020

अंतराळवीर Luca Parmintano आणि Jessica Meir ह्यांनी नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांशी साधला लाईव्ह संवाद


अंतराळवीर Luca Parmintano आणि Jessica Meir नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांशी संवाद साधताना -फोटो नासा संस्था

नासा संस्था -
नासाच्या अंतराळ मोहीम 61 चे सध्याचे कमांडर Luca Parmintano आणि Flight Engineer Jessica Meir ह्यांनी मागच्या महिन्यात नोबेल विजेत्या Michel Mayer (Physics),Didier Queloz आणि Stanley Whittingham(Chemistry)  ह्या शास्त्रज्ञांशी अंतराळस्थानकातून संवाद साधला Stockholm मध्ये तेव्हा Nobel Week celebration सुरु होत तिथल्याच Nobel Museum मधून नासा संस्थेने त्यांचा अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधून दिला हि बातचीत हसत खेळत मनमोकळ्या वैज्ञानिक गप्पांनी रंगली
Michel Mayor -हा खरोखरच आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे Luca तुम्ही अंतराळस्थानकातून पृथ्वीकडे पाहण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहात आणि आम्ही इथून फक्त पृथ्वीला तिथून पाहण्याच स्वप्न किंवा ईथुन पृथ्वी पाहण्याची इच्छा करू शकतो अंतराळातून रोजच पृथ्वीकडे पाहताना तुमच्या मनात आता ब्रम्हांडातील सौरमाले बाहेरच्या अज्ञात ग्रहांचा शोध घेण्याची त्यांनाही असेच पाहण्याची इच्छा जागृत होते का ?
Luca - हो ! निश्चितच असं वाटत ! मी माझा अनुभव सांगतोय,मी जेव्हा अंतराळ मोहीम 36-37 अंतर्गत अंतराळस्थानकात राहायला गेलो होतो आणि परतण्याआधीच्या काही दिवस आणि तास उरलेले असताना मी पृथ्वीकडे पाहत होतो पृथ्वीचे सतत बदलते नैसर्गिक नानाविध रंग त्यातला जिवंतपणा व सुंदरता न्याहाळताना क्षणभर आश्चर्यचकित झालो होतो त्या वेळी मला वाटायच,मी Alien असतो आणि परग्रहावरून अंतराळात प्रवास करत असतो तर! नक्कीच मला पृथ्वीवर उतरून ती पाहावी अस वाटल असत त्या वेळेस मला मी पृथ्वीवासी असल्याचा अभिमान वाटला ते माझ भाग्य वाटल,मी ह्या सुंदर जैववैविध्य असलेल्या पृथ्वीवरचा निवासी आहे हा विचारच माझ्यासाठी आनंददायी होता तेव्हा! सध्या तरी ह्या ब्रह्मांडात आपली पृथ्वी हि एकमेव जीवसृष्टी अस्तित्वात असलेला ग्रह आहे कित्येक वर्षांपासून सर्वच देशाचे शास्त्रज्ञ पृथ्वीसारख्या मानवी अस्तित्व आणि सजीवसृष्टी असलेल्या ब्रह्मांडातील ग्रहांचा शोध घेत आहेत आता तर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत आधुनिक विज्ञान आपल्याला अवगत झाल्याने ह्या प्रयत्नांना वेग आलाय त्यांना अपेक्षित यशही मिळतय मानवाने आता सूर्यावरही अंतराळ यान पाठवलाय त्या मुळे असा ग्रह असेल तर शोध नक्कीच लागेल आणि ती शास्त्रज्ञाची अदभुत कामगिरी असेल मी जेव्हा पृथ्वी निरीक्षण करतो तेव्हा प्रेरित होतो तिची सुंदरता मनाला उल्हसित करते तो क्षण आल्हाददायक असतो आमच्यासाठी!
Queloz -Jessica,तू Marine Biologist आहेस त्या मुळे बाह्यग्रहावरील जीवसृष्ठी बद्दलच तुझ मत ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल तुला काय वाटत जर एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात असेल तर ती कोणत्या स्वरूपात असेल ?
Jessica - आम्हाला Interview मध्ये बरेचदा हा प्रश्न विचारला जातो पृथ्वीबाहेर एखाद्या ग्रहावरील जीवसृष्ठीची शक्यता नाकारण चुकीचे होईल त्या मुळे अशी शक्यता गृहीत धरूनच शात्रज्ञांचे शोध सतत सुरूच आहेत माझ्या मते जर एखाद्या ग्रहावर जीवसृष्ठी अस्तित्वात असेल तर ती आपल्या पृथ्वीसारखी नसेल खूपच वेगळ्या स्वरूपात असेल कदाचित कार्बन वर आधारित नसेल तर molecule (रेणू) च्या स्वरूपात वेगळ्या रूपात अस्तित्वात असेल कदाचित आपल्या कल्पनेपेक्षाही वेगळ्या स्वरूपात! माझ्या मरिन बायॉलॉजी बद्दल सांगायच तर1970 ला माझ्या जन्माच्या वेळी समुद्राच्या अतिशय खोल तळाशी Hydro Thermal Vent चा शोध (मी शिकलेल्या Scribs Institute of Oceonagraphy ह्या संस्थेतील)शास्त्रज्ञांनी लावला होता तो पर्यंत असा समज होता की,पृथ्वीवरची सगळी जीवसृष्ठी सूर्याकडून येणाऱ्या उर्जेवरच अवलंबून असते आणि Photosynthesis मुळेच सजीवसृष्टीचे अस्तित्व आहे पण त्यांनी लावलेल्या ह्या शोधाने हा समज खोटा ठरला ह्या Hydro Thermal vent मध्ये आढळलेली जीवसृष्ठी पूर्णपणे सल्फरच्या साहाय्याने Chemosynthesis करणाऱ्या बॅक्टरीयावर आधारित होती आधी शास्त्रज्ञांना वाटले कि वरून होणाऱ्या बर्फ़वृष्टीमुळे त्यांचे न्यूट्रिशन झाले असेल पण नंतर सखोल संशोधनानंतर असे लक्षात आले की,ह्या सजीवसृष्ठीची वाढ सूर्यप्रकाशावर किंवा त्याच्या उर्जेवर अवलंबून नव्हती तर Thermal vents मधल्या सल्फरमुळे तग धरून जिवंत राहिली म्हणून मला पण वाटत ब्रम्हांडातील एखाद्या ग्रहावर जर जीवसृष्टी अस्तित्वात असेल तर ती सुद्धा अशीच वेगळी असेल आणि ती पाहिल्यानंतर आपलाही जीवसृष्टी बद्दलचा दृष्टीकोन बदलेल
 Mayor- Luca, Space Science Exploration आणि त्यांचे results ह्या साठी संयम,बांधिलकी आणि समर्पणाची गरज असते ह्यात इंटरेस्ट असणाऱ्या तरुण शास्त्रज्ञांना तुम्ही काय सल्ला द्याल? तुमचा अनुभव कसा आहे
तुमच ध्येय काय आहे ? ते साध्य करण्यासाठीची जिद्द चिकाटी आणि मिळवलेल यश ह्या बद्दल सांगा ?
 Luca -दुसरा प्रश्न सोपा आहे आधी त्याबद्दल सांगतो,फक्त शास्त्रज्ञच नाही तर अवकाश संबंधित विज्ञान आणि तंत्रज्ञानात इंटरेस्ट असणाऱ्या सर्वच तरुणांनी त्यांचे कुतूहल,चौकसता जागृत ठेवायला हवी एखादी गोष्ठ आहे तशी न स्वीकारता ती तशी का आहे ह्याचा विचार करून त्याचा मागोवा घ्या आणि उत्तर शोधा ह्या अवकाशात अनेक अनुत्तरित न उलगडणारी कोडी आहेत तुम्ही एक कोडे उलगडायचा प्रयत्न कराल तर दहा नवीन प्रश्न तुम्हाला पडतील म्हणून सतत उत्तराच्या शोधात राहा इथे अंतराळस्थानकात आम्ही दररोज हेच करत असतो,प्रयोग करून संशोधन करत असतो हेच संशोधनाच काम आम्हाला सतत प्रेरित करत नवनवीन उत्तरे शोधायला प्रवृत्त करत मी शास्त्रज्ञ नाही तर तंत्रज्ञ आहे तरीही मी चौकस आहे मलाही आजूबाजूच्या गोष्टींच प्रचंड कुतूहल वाटत
मी सतत उत्तरे शोधतो तज्ज्ञांकडून माहिती घेतो physiology,biology,chemistry,astrophysics अशा अनेक विषयांशी निगडित प्रश्नांची उत्तरे मी माझ्या त्या,त्या विषयातील प्रोफेसर असलेल्या
 मित्रांकडून मिळवतो माझा एक मित्र extra planetary expert आहे त्याच्या कडून जाणून घेतो,पुस्तक वाचतो ह्या सर्व गोष्ठींनी मी प्रेरित होतो माझ ध्येय म्हणाल तर मला space science विभागातील विद्यार्थ्यांसाठी काम करायचय
Queloz-Jessica तुला आम्ही अवघड प्रश्न विचारतोय सध्या सौरमालेबाहेरील ग्रहांचा शोध सुरु आहे त्यांची सखोल संशोधनात्मक माहिती मिळविल्या जातेय तुम्ही अंतराळस्थानकात सध्या करत असलेल्या प्रयोगांपैकी कोणते प्रयोग ह्या आगामी अंतराळ मोहिमेत उपयुक्त ठरतील?
Jessica -आम्ही इथे सायन्सच्या सर्वच विषयांवर संशोधनात्मक शेकडो प्रयोग करत आहोत काही मानवी आरोग्याशी निगडित आहेत काही प्रयोग बेसिक ग्रॅव्हिटेशनल फिजिक्सच्या नियमांवर आधारित आहेत ह्या प्रयोगा अंतर्गत आम्ही ह्या साठी spectrometer वापरून पहिल्यांदाच पृथ्वीच्या वातावरणात शिरणाऱ्या उल्का वर्षावाचे त्यांच्या रचनेचे रासायनिक निरीक्षण नोंदवले आहे आणि ह्या माहितीचा उपयोग सौरमालेतील आणि बाहेरील ग्रहांच्या उत्पत्तीची माहिती मिळवण्यासाठी होईल आणि दुसऱ्या एक प्रयोगामुळे आपल्याला ग्रहांच्या उत्पत्तीबद्दल सखोल माहिती कळेल
Stan Whittingham -Jessica तुम्ही नुकत्याच केलेल्या स्पेसवॉक मध्ये जुन्या Nickel batteries बदलून नव्या Lithium Ion batteries बसविल्या आहेत ह्या नव्या बॅटरीज जुन्या बॅटरीपेक्षा किती वेगळ्या आहेत नोबेल विजेते Stan ह्यांनी Jessicaला विचारल
Jessica - तुम्हीच तर ह्या बॅटरीचे जनक आहात !आम्ही तुमचे खूप आभारी आहोत आणि तुमच्या सारख्या तिन्ही नोबेल विनर शास्त्रज्ञांशी संवाद साधताना आम्हाला  अभिमानास्पद वाटतय हा आमच्या साठीही अविस्मरणीय क्षण आहे
हो! आम्ही जुन्या बॅटऱ्या बदलून नव्या बॅटऱ्या बसविल्या एकतर त्या जुन्या झाल्या होत्या ह्या नव्या बॅटऱ्या वजनाने हलक्या कमी जागा व्यापणाऱ्या,भरपूर प्रकाश देणाऱ्या आहेत आणि त्या पॉवरफुल असल्यामुळे दोन ऐवजी एक बसविल्या तरी चालतात त्या मुळे त्या कमी लागतात शिवाय त्या जास्त दिवस काम करतात आधीच्या बॅटऱ्या सहा वर्ष चालायच्या तर ह्या बॅटऱ्या दहावर्षे चालतात बॅटऱ्या आधीच खर्चिक असतात आणि पृथ्वीवरून इथे आणताना आणखी खर्च वाढतो तुमच्या बॅटऱ्या जास्त काळ प्रकाश देणाऱ्या आणि कमी लागत असल्यामुळे खर्चही कमी होतो आमच्या अंतराळस्थानकात ह्या बॅटऱ्या खूप मोट्या ऊर्जास्रोत आहेत ह्या मोलाच्या योगदानामुळे आम्ही तुमचे ऋणी आहोत
 Wittingham - Luca,तु सांग अंतराळातील अतीतप्त किंवा अती ऊष्ण तापमानाचा lithium ion battery वर काही विपरीत परिणाम होतो का?
Luca- हो! निस्चितच होतो! आम्ही ऊजेडात असतो तेंव्हा स्थानकातील तापमान 150-180c.पर्यंत पोहोचत आणी आम्ही सावलीत किंवा अंधारात असतो तेव्हा स्थानकात अतिशय थंड वातावरण असत-180ते-150 पर्यंत खाली येत ह्या टोकाच्या तापमानात battery च तापमान थर्मली stable ठेवाव लागत त्यासाठी आम्ही स्थानकातील सोलर हिटींग सिस्टीम आणि अमोनिया based कुलींग सिस्टीमचा वापर करतो दिवसा सोलर Arrayमुळे आणी रात्री batteries मुळे प्रकाश आणी ऊर्जा मिळते शिवाय स्थानकातील computer व ईतर कामासाठीही lithium ion batteries च वापरतो आधी आम्हाला वाटल की अतीतप्त वातावरणात batteries burst होतील स्फोट होईल म्हणून आम्ही सुरक्षितते साठी carbon based fire extinguisher,mist based extinguisher मध्ये बदलले आणी सगळीकडे ठेवले सुदैवाने तशी वेळ आली नाही आता आमची अशी ईच्छा आहे की ह्या batteries ची expiry
डेट संपल्यावर आम्हाला त्याचा ऊपयोग आग विझवण्यापेक्षा shower सारखा करता यावा Luca गमतीने म्हणाले
नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांनी नंतर ह्या दोन अंतराळ वीरांना त्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली
Jessica - मलाही तुम्हाला तोच प्रश्न विचारायचाय! ब्रह्मांडातील मानवाला अज्ञात असलेल्या ग्रहावर जर जीवसृष्टी अस्तित्वात असेल तर ती कशी असेल ? तुमच मत काय आहे ?
तुम्ही बायालॉजिस्ट असल्याने मला तुमच ह्या बाबतीतला दृष्ठीकोन ऐकायला आवडला मलाही असच वाटत ह्या विषयावर वेगवेगळ्या दृष्ठीकोनातून बघायला हव शक्यता अश्यक्यता ह्यावर विचार करायला हवा chemistry ,astrophysics च्या माध्यमातून विशेषतः chemistry सध्या ह्या विषयात बरेच प्रगत संशोधन होतेय जीवसृष्ठी ज्या अमिनो acids पासून बनली आहे त्याच्या उत्पत्तीबद्दल संशोधन सुरु आहे खरेतर जीवन हि एक chemistry च आहे त्या ग्रहांवरच्या वातावरणावर जीवसृष्ठीची निर्मिती अवलंबून असेल ते जीवनिर्मितीसाठी पोषक होत का आहे का? ज्या मुळे रासायनिक प्रक्रिया होऊन सजीवांची उत्पत्ती झाली किंवा होऊ शकेल अशा दोन्ही बाजूने सखोल विचार करायला हवा अजून आपल्याला बरीच मजल गाठायची आहे ह्या दहा वर्षात शास्त्रज्ञांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन आपल्या सौरमाले बाहेरीलही ग्रह शोधले
 आहेत काही ग्रहांवर पृथ्वीसारखे वातावरण असल्याचा शोध लागलाय आता आगामी काळातील अंतराळ मोहिमात नव्या अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अत्याधुनिक James Web Telescope च्या साहाय्याने आणी येत्या पन्नास वर्षात ह्याहुनही प्रगत अत्याधुनिक यंत्रांच्या साहाय्याने नक्कीच एखाद्या ग्रहावरच्या संभाव्य अज्ञात जीवसृष्ठीचा शोध लागेल मंगळावर जीवसृष्टी असण्याची शक्यता वाटल्यानेच मानवाने तिथे मंगळयान पाठवले आणि तिथे पूर्वी जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळत आहेत आगामी  मानवासहित मंगळमोहिमेत आणखी शोध लागेलच आपण थोडी वाट पाहूया ! तुम्हालाही जायला आवडेल का ?
Jessica -हो ! आम्ही दोघेही आनंदाने मंगळावर जाऊ
Luca - शेवटी माझा तुम्हा तिघांनाही छोटासा प्रश्न -आम्हाला नेहमी विचारल जात कि,अंतराळवीर होण्याच तुमच स्वप्न होत का ? तुम्ही तर नोबेल विजेते आहात हा तुमचा जीवन गौरव आहे पण मला अस विचारायचय तुम्हाला माझ्या जागी इथे यायला आवडेल का ?
 Whittingham- अवघड आहे ! आता ह्या वयात? पण तरुणपणी म्हणाल तर नक्कीच हो !
 Mayor- I am not sure!
 Queloz - Yes ! नक्कीच हो ! कारण Astronauts पण Nobel Prize मिळवू शकतात ना !

Wednesday 1 January 2020

Christina Koch ने प्रस्थापित केला अंतराळस्थानकात जास्ती दिवस राहण्याचा विक्रम


NASA astronaut Christina Koch conducts botany research aboard the International Space Station.

             Christina Koch स्थानकातील वास्तव्यादरम्यान संशोधन करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -31 डिसेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 60-61ची अंतराळवीरांगना Christina Koch हिने नुकताच अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत जास्त दिवस राहण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे प्रस्थापित केला आहे तिने ह्या आधीचा Peggy Whitson ह्यांचा अंतराळस्थानकात जास्त दिवस वास्तव्य करण्याचा विक्रम मोडला आहे
शनिवारी Christina Koch हिच्या स्थानकातील वास्तव्याला 288 दिवस पूर्ण झाले ह्या आधी Peggy Whitson ह्यांनी अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅविटीत 288 दिवस वास्तव्य केले होते तो रेकॉर्ड Christina हिने मोडला अजूनही Christina स्थानकात मुक्काम करणार असून 6 फेब्रुवारी 2020मध्ये ती पृथ्वीवर परतणार आहे तोवर स्थानकातील तिच्या वास्तव्याचे दिवसही वाढणार आहेत ती 326 दिवस स्थानकात राहणार आहे 14 मार्च 2019ला Christina अंतराळस्थानकात राहायला गेली होती
ह्या आधी अंतराळवीर Scott Kelly ह्यांनी अंतराळस्थानकात जास्त दिवस राहण्याचा विक्रम स्थापित केला होता त्यांनी 2015-16 च्या अंतराळ मोहिमेत सलग 340 दिवस  स्थानकात वास्तव्य केले होते तर सर्वात जास्त दिवस सलग अंतराळस्थानकात राहण्याच्याअंतराळ विरांगनेच्या यादीत Peggy Whitson ह्यांनी 2016-17 सालच्या अंतराळ मोहिमेत रेकॉर्ड स्थापित केला होता Peggy ह्यांनी त्यांच्या पाचवेळच्या अंतराळवारीत स्थानकात 665 दिवस मुक्काम केला आहे
हे तीनही अंतराळवीर त्यांच्या स्थानकातील सायंटिफिक प्रयोगाच्या संशोधनासोबतच अंतराळ स्थानकातील झिरो ग्रॅविटीत जास्त दिवस राहिल्यावर मानवी आरोग्यावर,मानसिक व शारीरिक काय परिणाम होतो त्यांच्या प्रतिकार क्षमतेत,कार्यक्षमतेत काय आणि कसा परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी होत असलेल्या प्रयोगात सामील झाले आहेत
Christina Koch ह्या यशाचे श्रेय अंतराळ वीरांगना Peggy Whitson ह्यांना देते ती म्हणते लहानपणापासूनच मी  Peggy ह्यांची फॅन होते त्या माझ्या साठी रोल मॉडेल होत्या मला त्यांच्या सारखेच व्हायचे होते माझे स्वप्न आता साकार झाले आहे हि अलौकिक अनमोल संधी मला मिळाल्यामुळे मी खूप आनंदी आहे जेव्हा माझे  अंतराळस्थानकात राहण्यासाठी सिलेक्शन झाले तेव्हा पासूनच मी Peggy ह्यांचा सल्ला घेतला त्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले अंतराळस्थानकातील वास्तव्यादरम्यान दररोजच मला त्यांनी केलेले मार्गदर्शन कामी येते
मी त्यांच्याच पाऊलवाटेवरून चालतेय मीही पृथ्वीवर परतल्यानंतर इतर अंतराळवीरांना मार्गदर्शन करेन
Christina Koch हिने अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅविटीत संशोधना सोबतच स्थानकातील veggie प्रोजेक्ट मध्ये
सहभाग नोंदवून वेगवेगळ्या भाजी व धान्याची जोपासना केली आणि अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी चारवेळा स्पेसवॉक केला शिवाय Christina Koch ने ह्या अंतराळमोहिमेत Jessica Meir सोबत आणखी एक रेकॉर्ड स्थापित केलाय ह्या दोघींनी only Woman Astronaut Space Walk यशस्वी केलाय
Christina ला योगा,रनिंग,पर्वतारोहण,बोटिंग,ट्रॅव्हलिंग आणि फोटोग्राफीची आवड आहे
Christinaच्या ह्या यशाबद्दल Peggy Whitson ,Anne McClain आणि इतर अंतराळवीरांनी अभिनंदन केले आहे