Saturday 31 August 2019

सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर सोन्याचे दर गगनाला

 31 ऑगस्ट
ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर गगनाला भिडले ह्या महिन्यात 27 तारखेला सोन्याने 40 हजारापर्यंत उसळी मारली सोन्या पाठोपाठ चांदीच्या दारातही सतत वाढ होत आहे अजूनही सोने 40 हजाराच्या आसपास आहे
अमेरिका आणि चीनचे व्यापार युद्ध ,डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन आणि त्याचाच परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेली सोने खरेदी ह्या मुळे हे भाव वाढल्याचे सांगण्यात येत आहे
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोन्याला गुंतवणूक म्हणून पसंती दिली जात असल्याने सोन्याची खरेदी वाढली आहे
भारतात आधीच सोन्यावर लावलेल्या अतिरिक्त आयात करामुळे सोन्याचे भाव वाढलेलेच होते त्यात आता आंतरराष्ट्रीय सोने खरेदीआणि रुपयाचे अवमूल्यन ह्याचा परिणाम होऊन सोन्याच्या भावात प्रचंड वाढ झाली ह्या आठवड्यात दोनदा सोन्याने 40 हजाराचा उच्चांक गाठला
सोनेवाढीचा परिणाम सोने खरेदीवर झाला असून सराफ बाजारात शुकशुकाट पाहायला मिळतोय आधीच सोन्याच्या वाढत्या भावामुळे लोकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती त्यात आता सोन्याच्या भावाने 40 हजाराच्या आसपास दराचा उच्चांक गाठल्याने सोने खरेदी आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे सोन्याच्या वाढत्या भावासोबतच सततच्या चोऱ्यांनीही नागरिक त्रस्त झाल्याने सोने खरेदी मंदावली आहे
पाकीस्तानातही सोन्याच्या दरात वाढ झालीअसून सोन्याचे दर 90 हजारावर गेले आहेत
सोन्यापाठोपाठ आता चांदीच्या दरातही सतत वाढ होत आहे जुलैच्या अखेरीस चांदी कधी 37 तर कधी 38 हजारापर्यंत स्थिर होती गेल्या सहा महिन्यात चांदीचे भाव उतरलेलेच होते पण अचानक सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही वाढ होऊ लागली आणि आता चांदीचे दर 46 हजाराच्याही वर गेले आहेत
 

Thursday 29 August 2019

स्थानकातील Micro Gravity तल्या वास्तव्यातील जीवनाविषयीची माहिती Christina Koch ने केली शेअर


Expedition 60 Flight Engineer Christina Koch
 Christina Koch अंतराळस्थानकातील संशोधनाच्या कामात व्यस्त असताना -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -14 ऑगस्ट
 "Welcome in our Bustle Digital group Christina!"Please  तुझ्या बद्दल,तु करत असलेल्या कामाबद्दल आणी सद्या तु कोठे आहेस ते आम्हाला सांग!
Christina -
हो नक्कीच! सध्या आम्ही पृथ्वीपासुन दुर 250 मैल अंतरावर अंतराळात Space Stationमधून पृथ्वीभोवती भ्रमण करत आहोत माझ नाव Christina Koch आहे आणी मी Astronaut आहे हे तुम्ही जाणताच मी माझ्या ईतर Crew mate बरोबर ईथे सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभागी होऊन संशोधन करत आहे
 प्रश्न - Woh! Amazing! स्थानकातली तुझी Biggest responsibility कोणती आहे?
Christina-
हा खुपच ईंटरेस्टींग प्रश्न आहे कारण ईथे आम्हाला खुप साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात सर्वात जास्त महत्वाच म्हणजे अंतराळ स्थानक आणी ईथल्या अंतराळवीरांच्या सुरक्षेची काळजी घेण आणी दुसर आमच संशोधनाच काम ईथे मायक्रोग्रव्हिटी मध्ये मानवासाठी ऊपयुक्त शेकडो सायंटिफिक प्रयोग सुरू आहेत आम्ही ज्यांचे प्रातिनिधीत्व करतो त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही ईथे आलो आहोत त्यामुळे नासाच हे मीशन यशस्वी करण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर आहे ते आमच ध्येय आहे त्यासाठी आम्हाला रोज Guide  करणारी टिम,नासा संस्थेतील वैज्ञानिक,तंत्रज्ञ ह्या साऱ्यांचे प्रयत्न यशस्वी करण्याची जबाबदारी आहे
प्रश्न -खरच स्थानकातल आयुष्य खुप बीझी आहे ह्यातून तु स्वतः साठी वेळ कसा काढतेस? तुमचा Weekend कसा असतो तेव्हा काय करतेस?
 Christina
हो! स्थानकातल आयुष्य खूप बीझी असत पण Weekendला आम्ही फ्री असतो शिवाय जर स्थानकात Cargo ship येणार नसेल  किंवा नवीन अंतराळवीर येतात तेव्हा Space Walk च्या वेळेस आमचा Weekend free असतो आम्ही पृथ्वीवरच्या सारखा तो घालवायचा प्रयत्न करतो पण ईथे स्थानकात तस करता येत नाही एरव्ही पृथ्वीवर गाडी काढून घरी जाता येत पण ईथे अंतराळात मायक्रोग्रव्हिटीत बाहेर पडून गाडी चालवण अशक्य !
पण आम्ही ईथुन घरी व्हिडीओ call करतो,त्यांंच्याशी संवाद साधतो मला पुस्तक वाचायला खुप आवडत
स्थानकाच्या  ह्या माझ्या मागच्या खिडकीत (Cupola )बसून मी पुस्तके वाचते कधी मोकळ्या अवकाशातील ग्रह ताऱ्यांच सौंदर्य न्याहळते,कधी खाली पृथ्वीकडे पहाते ईथुन पृथ्वीच  अलौकिक सौदर्य पाहण्याचा अनुभव विलक्षण आहे, हळूहळू भ्रमण करतानाच पृथ्वीच अदभुत सौंदर्य पहाण अफलातुनच!
मला लहाणपणापासुनच फोटोग्राफीचा छंद आहे ती आवड मला ईथे एकांतात कामी आलीय अंतराळ स्थानकातुन अंतराळातील घडामोडी कॅमेऱ्याने टिपण्याची अभुतपुर्व संधी मला मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते मी भरपूर फोटो काढते
आम्ही Weekend ला सगळे अंतराळवीर एकत्र जमतो,गप्पा मारतो,एकमेकांचे अनुभव शेअर करतो,एकत्र जेवतो आणी आमचा Weekend जितका आनंदात घालवता येईल तितका घालवण्याचा प्रयत्न करतो कधीकधी सिनेमाही पहातो
प्रश्न - Christina आम्ही तुला एका फोटोत लसूण भाजताना पाहिले छान फोटो होता तो तुम्ही स्थानकात Cooking पण करता का?
Christina-
नाही आम्ही इथे Cooking नाही करत इथे मायक्रो ग्रॅविटीत सध्या तरी ते अशक्य आहे आम्ही पृथ्वीवरून आलेले फ्रोझन,प्रिझर्व केलेले Dehydrated पदार्थ खातो तेच गरम करून त्यावर प्रक्रिया करून खातो पण कधी,कधी इथे येणाऱ्या कार्गोशिप मधून किंवा अंतराळवीर स्थानकात येतात तेव्हा मात्र आमच्यासाठी पृथ्वीवरून फ्रेश फळे आणि भाजीपाला पाठविल्या जातो तेव्हा आम्ही त्यांना लसूण पाठविण्याची विनंती करतो टेस्ट साठी असेच एकदा आमच्यासाठी पृथ्वीवरून आलेल्या सामानात लसूणही आले होते अर्थात इथे तिथल्यासारखे लसूण सोलण शक्य नाही कारण लसणाच्या पाकळ्या त्याची साले स्थानकात सर्वत्र उडून फिरत राहतील त्या मुळे आम्ही एक ट्रिक केली आहे लसणाला टेप लाऊन तो सोलतो त्यामुळे त्याची साल इतरत्र उडत नाहीत नंतर लसूण एका पाऊच मध्ये घालून Food Warmer ठेवतो आम्ही आमचे अन्न त्यातच गरम करतो Food Warmer मध्ये जास्तवेळ लसूण ठेवला कि तो छान भाजल्या जातो आणि  त्याची टेस्टही वाढते पण अस नेहमी करता येत नाही तो फोटो असाच एकदा काढलेला आहे अधून मधून मला ह्या Crew Member साठी अस काहीतरी टेस्टी करून द्यायला आवडत
प्रश्न - Space Station मध्ये तुमच्यासाठी स्वतंत्र रूम असते का ? ती किती मोठी असते
Christina
हो ! आमच्यासाठी स्थानकात Crew Quarters असत म्हणजे आमची बेडरूमच! ती खूप मोठी नसते एखाद्या टेलिफोन बूथ एव्हढी असते हात लांब केला कि भिंतिला टच होईल इतकी छोटी ! तिथेच आमची स्लीपिंग बॅग लटकवलेली असते ती तिथे अडकवली नाही तर आम्ही बॅग सोबत झोपेतही तरंगत राहू आणि लक्ष नसल्याने कोठेही धडकून आम्हाला इजा होईल म्हणून हि खबरदारी घ्यावी लागते  एक Computer असतो तो आम्ही एका सॉफ्टवेअरच्या मदतीने फोन म्हणूनही वापरतो ह्या शिवाय आमच्या पर्सनल वस्तू ,Care Package मध्ये पाठवलेल्या वस्तू आणि फोटो ह्यांनी आम्ही आमचे Quarter सजवतो पृथ्वीसारख एखाद्या टेबलावर जस सामान मांडून ठेवता येत तास मात्र इथे करता येत नाही
प्रश्न - तुम्ही अंतराळ स्थानकात येताना काय सामान न्यायच हे कस ठरवता ? तू काय,काय नेलस तिथे ?

Christina-
खर सांगायच तर इतरांपेक्षा मला तयारीला खूपच कमी वेळ मिळाला होता कारण माझ ट्रेनिंग खूप कमी वेळात झाल त्या मुळे अंतराळ प्रवासात काय  सोबत न्याव हा विचार करायला,तयारीला वेळच मिळाला नव्हता मिळालेल्या थोड्याशा वेळात मी मला मिळालेली पारितोषिके,वेगवेगळ्या संस्थांनी मला दिलेली स्मृतिचिह्न वै माझ्या सोबत आणली आणि संबंधितांना ते सामान दिल तेव्हा त्यांनी त्यात माझ वैयक्तिक सामान नसल्याच लक्षात आणून दिल आणि मला एक दिवस तयारीसाठी वाढवून दिला मी घरी जाऊन सामान गोळा केल Socks ,Photos आणि इतर आवश्यक  गोष्टी मी आणल्या  माझ्यासाठी शॉपिंग केल्यासारखाच अनुभव होता तो!
 प्रश्न - अशी एखादी वैशिष्टपूर्ण वस्तू आहे का त्यात जी पाहून तुला घरची आठवण येते ?
Christina
 हो आहे न! आम्ही उभयता दोघे जेव्हा ट्रीपला जातो तेव्हा तिथून खूप साऱ्या Base ball कॅप किंवा Trucker स्टाईल Hat नेहमी आणतो  त्यातल्या दोन मी इथे आणल्यात त्या पाहून मला माझ्या नवऱ्याची आणि आम्ही केलेल्या प्रवासाची आठवण येते 
प्रश्न -Space station मधल्या वास्तव्यादरम्यान तुला कुठल्या गोष्ठिच जास्त नवल वाटत  ?
Christina -
तस तर इथे आल्यावर सारच आश्चर्यकारक वाटत इथून पृथ्वीच निरीक्षण करताना,अवकाशातील
ग्रहतारे न्याहाळताना,ईथे तंरगत्या अवस्थेत राहून काम करताना खुपच नवल वाटत अशा अवस्थेत जिथे नीट ऊभ रहाता येत नाही,खातापीता येत नाही,आजुबाजुला कोणी आमच्याव्यतिरिक्त मानव प्राणी नाही बाहेर फिरता येत नाही सारच वेगळ,विपरीत ! सुरवातीला खुपच अवघड असत सार! पण हळूहळू सवय होते अन आपण सहजतेने सगळ्या गोष्टी करायला लागतो तेव्हा खरच अचंबित व्हायला होत आपण कीती सहजतेने ह्या वातावरणात रूळलो ह्याच,आपल शरीर.मन ह्या वातावरणात कीती पटकन सहजतेन Adjust  झाल ह्याच आपण ईथे तग धरू शकलो  स्थिरावलो ह्या गोष्टीच नवल वाटायला लागत जेव्हा स्थानकात नवीन अंतराळवीर येतात तेव्हा त्यांना ईथल्या वातावरणात जुळवून घेतानाची धडपड पाहिली की, आम्हाला आमचे पहिले दिवस आठवतात आणि आपण कीती बदललोय ह्याची प्रकर्षाने जाणीव होते आम्ही त्यांना मदत करतो Adjust व्हायला कधी कधी ईथे T.V.वर सिनेमा, मालिका पहाताना तीथे सगळ्या वस्तू तंरगत का नाहीत? अस मनात येऊन आणखीनच नवल वाटत
 प्रश्न -तिथे सगळ्यात कठीण गोष्ट कोणती होती जी तुला Adjust करायला कठीण गेली?
Christina-
आमच्या टिमन सगळ्या गोष्टीची खबरदारी आधीच घेतलेली असल्याने मी ईथे खुप छान रूळले असले तरीही आम्ही अंतराळात आहोत ह्याची जाणीव सदैव असतेच कारण इथे सगळ Normal दिसत असल तरीही धोका  असततोच ईथे स्थानकात,अंतराळात आमच्या शिवाय कोणी मानव नसतो  त्या मूळे विशेष काळजी घ्यावी लागते ईथली परिस्थिती धोकादायक असते  कधी स्फोट होईल कठीण परिस्थिती उद्भवेल सांगता येत नाही त्या मूळे सतत सतर्क रहाव लागत तंत्रज्ञानाशीवाय ईथे रहाण अशक्यच तेव्हा कठीण परीस्थितीला धैर्याने,चातुर्याने सामोरे जाण्याची तयारी,कसब असाव लागत हे अत्यंत कठीण असत ह्याची जाणीव सतत ठेऊन ईथल्या विपरीत परिस्थितीत तग धरून आपला तोल सांभाळत,बुद्धी शाबूत ठेऊन संशोधन करण खरच खूपच कठीण असत
प्रश्न -आता वर्षभरानंतर तु पृथ्वीवर परतशील स्थानकातील वास्तव्यातील तुझ मुख्य ध्येय काय आहे?
Christina-
माझ्या टिमसोबत संशोधन करण त्यांना साथ देण गरज पडली तर मदत करण आणी मानवी आरोग्यासाठी ऊपयुक्त अत्याधुनिक संशोधन करण हे माझ प्रमुख ध्येय आहे नासातर्फे आम्ही ईथे आलो आहोत तेव्हा त्यांनी ज्या विश्वासाने आम्हाला इथे पाठवलय तो विश्वास सार्थ करण आम्हाला ट्रेन करणाऱ्या आमच्या ट्रेनरच्या मेहनतीच चीज करण,फक्त स्थानकात येऊन रहायच अन पृथ्वी निरीक्षण करायच हे आमच काम नाही आम्ही कीतीतरी शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांच्या स्वप्नांंच.आशाआकांशाच प्रातिनिधीत्व करतो ते पुर्ण करण माझ पहिल ध्येय आहे आणी भावी अंतराळ विरांसाठी प्रेरणाश्रोत बनण हे माझे ऊद्दिष्ठ आहे जे ईथे येऊ शकत नाहीत त्यांच्याशी माझे अनुभव मला शेअरही करायचेत
शिवाय आम्ही उभयतांनी इथे येण्याआधी ठरवल होत की, दोघांनीही एकमेकांना साथ द्यायची दुर राहून नात चांगल्याप्रकारे दृढ त्या द्रुष्टीने आता आम्ही पावल टाकत आहोतच पुढेही आम्ही एकमेकांना साथ देऊच
Thank you Christina आमच्याशी बोलल्या बद्दल तुझ्या बिझी शेड्युल मधुन वेळ काढून आम्हाला उपयुक्त माहिती दिल्या बद्दल





Sunday 25 August 2019

Nick Hague ह्यांनी Space To Ground साधला विद्यार्थ्यांशी संवाद

अंतराळवीर Nick Hague ह्यांनी ह्या महिन्यात Virginia,Norfolk येथील लोकल Schools आणि youth organizations मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याचा हा वृतांत
 सुरवातीला Mallory Dudley ह्यांनी Nick Hague ह्यांच्याशी पृथ्वीवरून लाईव्ह संपर्क करत त्यांचे स्वागत केले आणि संवादाला सुरवात झाली

NASA astronaut Nick Hague during a HAM radio session
अंतराळवीर स्थानकातून संवाद साधताना विध्यार्थ्यांशी संवाद साधताना -फोटो -नासा संस्था

Brandon- तुम्ही अंतराळात झेपावतानाचा अनुभव कसा होता? अंतराळ यान कीती वेगाने स्थानकाकडे ऊड्डान करत
Nick Hague - पृथ्वीवरुन अंतराळात झेपावतानाचा अनुभव विलक्षण असतो आम्ही आमच्या सीटकडे प्रचंड वेगामुळे ओढल्या जात होतो तेव्हा आमचे वजन चौपटीने वाढल्यासारखे जाणवत होते आमचे Rocket आवाजाच्या पंचवीस पट जास्त वेगाने (4G force) म्हणजे ताशी 17,500 मैंल इतक्या वेगाने अंतराळात ऊड्डान करत होत अंतराळात प्रवेशण्यासाठी ईतक्या प्रचंड वेगाची आवश्यकता असते
Paige- तुम्हाला स्थानकात झोपल्यावर ईथल्या सारखच स्वप्न पडतात का? तिथे झीरो ग्रव्हिटीमध्ये तंरगत्या अवस्थेतील पडलेली स्वप्ने वेगळी असतात का?
Nick Hague -आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या गोष्टीचा आपण सतत विचार करत असतो आणी स्वप्नात आपल्याला तशाच गोष्टी दिसतात तसच ईथेही मी सतत तरंगत्या अवस्थेत वावरतो काम करतो दुसऱ्या दिवसाच्या,संशोधनाच्या कामाचा विचार करतो त्यामुळे स्वप्ने पण तशीच दिसतात आम्ही झोपतो तेव्हा crew quarters मध्ये अंधार असतो तेव्हा पूर्ण अंधार दिसतो पण मधुन,मधून radiation चा प्रकाश चमकतो तेव्हा माझी optic nerve activate होते आणी मला त्या प्रकाशाची जाणीव होते
Adair- स्थानकातील झीरो ग्रव्हिटीमध्ये पाणी सुध्दा तरंगत मग ते तुम्ही कसे पिता?
Nick Hague -हो! ईथे झीरो ग्रव्हिटीमध्ये पाण्याला control करण कठीण जात पृथ्वीवर पाणी वरुन खाली पडत ग्लास मध्ये टाकल तर त्यातच रहात पण ईथे आमच्या सारख पाणीही तंरगत सगळीकडे थेंबाच्या रुपात पसरलेल्या स्वरूपात तंरगत्या अवस्थेत फिरत रहात त्यामुळे ते पकडून पिण म्हणजे कसरतच असते पण आम्हाला स्पेशल bag दिलेली असते त्याला Straw जोडलेला असतो त्यातून थेंब,थेंब काढून आम्ही पाणी पितो ते खूप मजेशीर असत कित्येकदा जेवताना आम्ही ती मजा अनुभवतो त्यांनी विद्यार्थ्यांना पाणी पिण्याच प्रात्यक्षित करून दाखवल
Jackson- चंद्रावर मानवी वसाहतीचे plan आहेत का?स्पेस स्टेशन त्यासाठी Base Camp असेल का?
Nick Hague - अतिशय छान प्रश्न! ह्या साठी छान कारण आता त्या दृष्ठीने आमचे प्रयत्न सुरु आहेत मला माहिती नाही कि,तुम्हाला Artemis Program बद्दल माहिती आहे कि नाही Artemis ह्या चांद्रयानातुन लवकरच एक महिला व पुरुष अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत तिथे ऊतरणार सुद्धा आहेत आणि हि सुरवात असेल मग सतत प्रयोग सुरु होतील सद्या मी स्थानकातील US lab मध्ये संशोधन करतोय ईथे सगळ्या प्रकारची ऊपकरणे आहेत आणी इथे सतत शेकडो प्रयोग सुरू असतात सध्या आम्ही एक Hardware चे testing करत आहोत जे चंद्रभोवती फिरण्यासाठी ऊपयोगी पडणार आहे आगामी पाच वर्षात चंद्रावर उतरण्यासाठीचे आमचे सगळे प्रयत्न सुरु आहेत
Raquel- तुम्ही किती दिवस स्थानकात रहाणार आहात? सुरुवातीला तिथे रहाण कठीण होत का?
Nick Hague - सुरुवातीला ईथे रहाण अत्यंत कठीण जात कारण आपण आणि आपल्या बरोबर साऱ्याच वस्तू तरंगत असतात पण हळूहळू सवय होते आमच शरीर ईथल्या वातावरणात adjust होत माझ Schedule सात महिन्यांच आहे आणी आता पाच महिने झालेत दोन महिने ऊरलेत
Precious- तुम्ही स्थानकातुन तुमच्या कुटुंबियांशी कसा आणी किती वेळा संवाद साधु शकता?
Nick Hague - आम्ही आमच्या कुटुंबियांशी नियमित संवाद साधतो कारण ते आमच्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे तसेच आम्ही मोठ्या मिशनवर असताना घरच्यांना आमची सतत काळजी असते शिवाय आम्हालाही कुटुंबिंयाबद्दल जाणून घ्यायचे असते माझी मुले आता Texas मधील शाळा सुरु झाल्यावर शाळेत जातील हे मला इथे त्यांच्याशी फोनवर बोलल्यावरच कळल आम्ही आठवड्यातून एकदा फोनवरून Video Conference करतो ईथे Internet सुविधा आहे
Daniel- Astronaut होण्यासाठी सर्वात अवघड गोष्ट कोणती असते? तुमचा अनुभव कसा होता?
Nick Hague -Astronaut होण्यासाठी अत्यंत कठीण परिस्थितीशी सामना करावा लागतो कठोर ट्रेनिंग चिकाटीने, धैर्याने पुर्ण कराव लागत आपल ईच्छित ध्येय साध्य करण्यासाठी संकटापुढे हार न मानता जिद्दिने परीश्रम करून त्याला सामोरे जाण्याची क्षमता असावी लागते मी माझ अंतराळवीर होण्याच स्वप्न पुर्ण करण्यासाठी हे सार केल मी तिनदा प्रयत्न केला तेव्हा दहा वर्षांनी माझ स्वप्न साकार झाल पण तरीही हा प्रवास सोपा नव्हता खूप आव्हाने झेलावी लागली अंतराळ स्थानकात जाण्यासाठी ऊड्डान केल्यानंतर मागच्या वेळेस अचानक Rocket मध्ये बिघाड झाला अत्यंत कठीण प्रसंग ओढवला होता पण आम्ही त्यावर मात करून सुखरूप प्रुथ्वीकडे परतलो आणी जिद्दीने आता पुन्हा अंतराळ स्थानकात पोहोचलो
Joet-Space Station मध्ये तुमच्या सोबत प्राणीही रहातात का?तिथे कुत्रा कींवा ईतर पाळीव प्राणी आहेत का?
Nick Hague - ईथे पाळीव प्राणी नाहीत पण आमच्या सोबत ऊंदीर,Spider व काही micro organisms आहेत त्यांच्यावरही आमच्या शरीरावर होतो तसा झीरो ग्रव्हिटीचा परीणाम होतो का ह्यावर आम्ही सतत  निरीक्षण नोंदवुन संशोधन करत असतो
Cora- तुम्ही स्थानकात बागकाम कसे करता? रोपांची लागवड कशी करता?
Nick Hague - आमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी,विरंगुळ्यासाठी आणी आम्हाला ताजी भाजी मिळावी म्हणून स्थानकात व्हेजी प्रोजेक्ट यशस्वीपणे राबविण्यात येतोय त्यासाठी खास व्हेजी चेंबर बनविण्यात आला असून त्यात पृथ्वीप्रमाणे वातावरण निर्माण करून  त्यात रंगीत लाईटची सोय करून ऊजेड,अंधार व योग्य तापमानाची सोय केली जाते शिवाय पाणी न तरंगता झाडाच्या मुळाकडे पोहोचेल ह्याचीही सोय केली आहे सध्या lettuce आणी ईतर भाज्याची लागवड केली आहे आम्ही त्यांची नियमितपणे देखभाल करतो कारण आगामी दुरवरच्या अंतराळ मोहीमामध्ये अंतराळवीरांना त्याचा ऊपयोग होईल सध्या आम्ही पृथ्वीवरुन आलेले Frozen Food खातो
Briona- तुम्ही स्थानकात तुमच्या कोणकोणत्या वैयक्तीक गोष्टी नेऊ शकता पुस्तके,I pad नेऊ शकता का?
Nick Hague -काही वैयक्तिक गोष्टी आम्ही ईथे आणु शकतो मी बऱ्याच आवश्यक वस्तू आणल्यात त्या माझ्या कुटुंबियांशी संबंधीत आहेत ईथे पुस्तके,I pad आणु शकतो मी ईथे तिथल्या सारखेच रिकाम्या वेळात वाचन करतो त्यामुळे ज्ञानात भर पडते आणि आपण अपडेट रहातो तुम्हीही समर व्हेकेशन मध्ये वाचता ना? वाचन खूप आवश्यक आहे
Savannah- Space Station मधून तुम्ही कोणती अद्भुत गोष्ट  पाहिलीत ?
Nick Hague -खरतर इथल सतत  तरंगत राहण त्याच अवस्थेत सारी काम करण झोपण,जेवण,संशोधन सारच अद्भुत आहे त्या बद्दल मी वेळोवेळी सांगितल पण आहेच पण सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजे रिकाम्या वेळी स्थानकाच्या Cupola मधून पृथ्वीकडे पाहण खरच खूप अद्भुत विस्मयकारी आणि सुंदर गोष्ट आहे ती ! आपली पृथ्वी हळू,हळू सरकताना पाहण्याचा आनंद विलक्षण आहे एका क्षणात इथून कॅनडा दिसत तस मेक्सिकोही दिसत तेही एकाच वेळेस ! इथून पृथ्वीवर वाहणाऱ्या नद्या,पर्वत पाहताना क्षणभर भान हरपत आपणही ह्या पृथ्वीचा एक भाग आहोत हि जाणीव विलक्षणच !
Truman - Galieli library New Jersey -तुमची तिथली दिनचर्या पृथ्वीवर असते तशीच आहे कि वेगळी ?
Nick Hague -आम्ही सहाही जण सकाळी सहाला उठतो आणि फ्रेश होऊन साडेसातला कामाला सुरवात करतो संध्याकाळी साडे सातला आमच काम संपत नंतर आमची मिटिंग होते आणि दिवस संपतो विकेंडला मात्र आम्हाला मोकळा वेळ मिळतो आम्हाला सपोर्ट करण्यासाठी पृथ्वीवरून जगभरातून लाखो शास्त्रज्ञांची टीम काम करत असते आणि सगळ्यांचा ताळमेळ जुळावा म्हणून आम्ही Greenwich Standard Time fallow करतो
Mckenzie- पृथ्वी व्यतिरिक्त तुमचा आवडता दुसरा ग्रह कोणता आहे ?
Nick Hague - हा प्रश्न खरच अवघड आहे कारण स्थानकातून पाहताना पृथ्वी एव्हढा सुंदर दुसरा कुठलाच ग्रह नाही असं वाटत आता आपण चंद्राकडे वाटचाल करतोय चांद्रमोहीम पूर्ण करून मग मंगळाकडे वाटचाल करायचीय त्या मुळे माझा आवडता दुसरा ग्रह मंगळ आहे
Henry- Florida -तुम्ही स्थानकात आजारी पडता का ? तिथे पृथ्वीपेक्षा वेगळे जंतू आहेत का ?
Nick Hague - हो ! आम्ही इथेही आजारी पडू शकतो पण आम्ही सारेच जण आजारी पडू नये म्हणून स्वत:ची खूप काळजी घेतो लाँचिंग आधी आम्हाला Quarantine मध्ये ठेवले जाते म्हणजे आम्ही कमीतकमी लोकांच्या संपर्कात राहू आणि पृथ्वीवरील कमीतकमी जंतू आमच्यासोबत अंतराळस्थानकात प्रवेश करतील पृथ्वीवरील टीम आमच्या सर्वांची खूप काळजी घेत असते  
Scarlet -तुम्ही तुमच मिशन संपवून पृथ्वीवर परतल्यानंतर नार्मल व्हायला किती वेळ लागतो ?
 Nick Hague -पृथ्वीवर परतल्यानंतर पंचेचाळीस दिवसांचा Rehabilitation चा प्रोग्राम असतो इथे स्थानकात तरंगत्या अवस्थेत हालचाल कमी असते त्या मुळे शरीर,स्नायू व हाडे कमजोर होतात  तसे होऊ नये म्हणून आम्ही इथे रोज दोनतास ट्रेडमिलवर व्यायाम करतो पण झिरो ग्रॅव्हिटी मध्ये शरीरात बदल होतातच म्हणून पृथ्वीवरील वातावरणाशी जुळवून घ्यायला  वेळ लागतो अंतर्गत शारीरिक बदल चार महिन्यात नॉर्मल होतात बाकी महिना दीड महिना नार्मल व्हायला लागतो
Giovanna -स्थानकात अवघड  व धोकादायक अशा कोणत्या गोष्ठी तुम्हाला कराव्या लागतात ?
Nick Hague -इथे माझ्या आजूबाजूला असंख्य उपकरणे आहेत त्यातच आम्ही वावरतो त्या मुळे धोका हा असतोच पण सगळ्यात अवघड आणि धोकादायक गोष्ट म्हणजे स्थानकाबाहेर अंतराळातील Space Walk करण  हे तितकच आव्हानात्मक आणि रिस्की आहे त्या साठी आधीपासून स्पेससूटची तयारी करावी लागते खरतर ह्या स्पेससूट मध्ये आम्ही एखाद्या सटलाईट सारखे असतो आम्हाला लागणाऱ्या सगळ्या आवश्यक गोष्टी स्पेससूट मध्ये असतात माझा Wingman माझ्या बरोबर काम करत असतो पृथ्वीवरची एक टीमही मला सपोर्ट करत असते त्या वेळी अंतराळातील अनंत पोकळीत वर ताऱ्यांची साथ अन खाली पृथ्वी अशा वातावरणात काम करण्याचा अनुभव रोमांचकारी आणि अद्भुत असत
शेवटी Nick Hague ह्यांचे आभार मानून मुलाखत संपली

Thursday 22 August 2019

अंतराळ वीर Nick Hague आणी Andrew Marhan ह्यांनी केलेला Space Walk यशस्वी



अंतराळवीर Nick Hague आणी अंतराळवीर Andrew Margen स्पेसवॉक करताना -फोटो-नासा संस्था

नासा संस्था- 22 आगस्ट
नासाच्या अंतराळ मोहीम 60 चे अंतराळवीर Nick Hague आणीAndrew Margen ह्यांंनी काल 21 तारखेला
अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेला Space Walk सुरळीतपणे पार पडला

Christina Koch आणी अंतराळ वीर Luca parmintano अंतराळ वीर Nick Hague आणी Andrew Marhan सोबत Space Walk आधी portrait घेताना- फोटो-नासा संस्था

ह्या दोन्ही अंतराळ विरांनी सकाळी 8.27 वाजताच त्यांचे Space Suits चार्ज करुन Space Walk ची तयारी सुरु केली होती Hague ह्यांनी लाल रंगाच्या रेशा असलेला स्पेससुट घातला होता तर Andrew ह्यांंनी रेशाविरहित स्पेस सुट परीधान केला होता 2.59 p.m.ला सुरू झालेला हा Space Walk सहा तास बत्तीस मिनिटांनी संपला
ह्या Space Walk दरम्यान ह्या दोन्ही अंतराळ वीरांनी स्थानकाच्या बाहेरील भागात स्थानकात आगामी काळात येणाऱ्या Space Crafts साठीच्या Docking(मार्गाची) ची सोय करण्यासाठी तांत्रिक जोडणीचे काम केले ह्या अंतराळ विरांनी स्थानकाच्या बाहेरील भागात Docking Adopter(IDA-3) Install केले
ह्या Docking Adopter चा ऊपयोग आगामी काळात स्थानकात येणाऱ्या Commercial Space Craft साठी होणार आहे हे Space Craft Boeing आणि Nasa Commercial Crew ह्यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आले असून आता अमेरिकन अंतराळवीर अमेरिकेच्या भूमीवरून ह्या अमेरिकेन मेड अंतराळ यानातुन आणी अमेरिकन Roket च्या सहाय्याने अंतराळात झेप घेतील सध्या त्या साठी रशियाची मदत घेतली जाते
शिवाय ह्या अंतराळ यानाचा ऊपयोग आगामी चंद्र मोहीम,मंगळ मोहीम व ईतर अंतराळ मोहिमासाठी होणार आहे ह्या शिवाय अंतराळ विरांनी ह्या Space Walk मध्ये ईतर तांत्रिक कामेही पुर्ण केली ह्या दोन्ही अंतराळवीरांना Christina Koch हिने स्थानकातून मार्गदर्शन केले
या शिवाय अंतराळवीरांनी स्थानकाच्या Wireless Internetचेही काम पूर्ण केले शिवाय त्यांनी नवीन High Definition T.V.Camera स्थानकाच्या Truss ह्या भागात Install केला ह्या आधी 2016 मध्ये स्थानकाच्या दुसऱ्या भागात IDA 2 हे Docking Adopter Install केले होते ह्या Space Walk मध्ये केलेल्या तांत्रिक कामासाठी रोबोटिक आर्मचा ऊपयोग केल्या गेला ह्या Space Walk साठी लागणारे सामान स्थानकात 27 जुलैला आलेल्या Cargo Ship मधून पाठवण्यात आले होते
2019 मधला अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेला हा पाचवा Space Walk होता
अंतराळवीर Nick Hague ह्यांचा हा तिसरा Space Walk होता त्यांनी आजवर केलेल्या Space Walk साठी त्यांनी अंतराळात 19 तास 59 मिनिटे व्यतीत केले आहेत तर Andrew Marhan ह्यांचा हा पहिलाच Space Walk होता
आतापर्यंत अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेला हा 218 वा Space Walk होता आणी त्यासाठी आजवर अंतराळ विरांनी 56 दिवस 23 तास आणी 26 मिनिटे अंतराळात व्यतित केले आहेत
ह्या Space Walk चे लाईव्ह प्रक्षेपण नासा T.V. वरून करण्यात आले होते आणि त्या सोबतच हौशी नागरिकांना लाईव्ह chat ची संधीही देण्यात आली होती