Wednesday 31 July 2019

अंतराळ स्थानकात उगवली Mizuna Mustard green ची भाजी

Nick Hague harvests Mizuna mustard greens on the station  स्थानकातील व्हेजी चेंबर मधील Mizuna Mustard green हि भाजी काढताना अंतराळ वीर - Nick Hague
फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -25 जुलै
अंतराळ स्थानकातील अंतराळ वीरांना पृथ्वीवरील फ्रोझन प्रिझर्व केलेल्या भाज्या खाव्या लागतात त्यांना पृथ्वी वरील मानवासारखे ताजे अन्न,फळे भाज्या मिळत नाहीत त्यांना पृथ्वीप्रमाणेच ताजे अन्न,भाजी आणि फळे मिळावीत ह्या साठी सतत प्रयत्न आणि संशोधन सुरु असते
त्यासाठी स्थानकात व्हेजि प्रोजेक्ट राबवण्यात येतोय ह्या प्रोजेक्ट अंतर्गत स्थानकातील व्हेजि चेंबरमध्ये पृथ्वीवरील वातावरणासारखे कृत्रिम वातावरण तयार करून त्यात कलर लाईट्स,tempची व्यवस्था करण्यात आली आहे आणि त्यात पृथ्वीवरील वेगवेगळ्या जातीची भाजी,फुले आणी धान्य लागवड करण्यात आली आणि ती यशस्वीही झाली ह्या आधी स्थानकात झिनियाची फुले ,पालेभाजी लाल कोबी आणि गहूही उगवले होते
अंतराळवीर Scott Kelly,PeggyWhitson आणि इतर अंतराळवीरांनी स्थानकातील चेंबर मध्ये भाजी फुले ,गहू लागवड यशस्वी केलीय आणि भाजीचा आस्वादही घेतलाय
आता स्थानकात मोहीम 60च्या अंतराळवीरांनी Mizuna Mustard green ह्या भाजीची यशस्वी लागवड केली आहे स्थानकात उगवलेली हि भाजी सलाद टाईपची आहे अंतराळवीर Nick Hague ह्यांनी हि भाजी चेम्बरमधू न काढली हि भाजी हिरवीगार आणि ताजी टवटवीत आहे
आता त्यातील थोडी भाजी सॅम्पल साठी ठेवून अंतराळवीर त्यांच्या जेवणात ह्या भाजीचा समावेश करून त्याची चव चाखतील आणि येताना भाजीचे थोडे सॅम्पल पृथ्वीवर आणतील
पृथ्वीवर परतल्यावर ह्या भाजीवर शास्त्रज्ञ संशोधन करतील पृथ्वीवर उगवणारी आणि अंतराळातील झिरो ग्रॅव्हिटी मध्ये उगवलेली भाजी ह्यातील फरक अभ्यासतील
भविष्यात अंतराळात आणखी नवनवीन भाजी धान्य आणि फळांची लागवड अंतराळवीर करतील ह्याचा उपयोग आगामी दूरवरच्या अंतराळ मोहीमांतील अंतराळवीरांना ताजे आणि स्थानकात पिकवलेले अन्न खाण्यासाठी होईल

 

No comments:

Post a Comment