अंतराळ वीर Andrew Morgan,Alexander Skvortsov आणि Luca Parmintano स्थानकात जाण्याच्या तयारीत
फोटो -नासा संस्था
नासा संस्था -19 जुलै
नासाच्या अंतराळ मोहीम 60 चे अंतराळवीर उद्या 20 जुलैला अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत
नासाचे अंतराळवीर Andrew Morgan,अंतराळवीर Luca Parmintano (ESA )आणि रशियन अंतराळवीर Alexander Skvortsov हे तीन अंतराळवीर उद्या 20 जुलैला 12.28p.m.ला कझाकस्थानातील बैकोनूर इथल्या Cosmodrome येथून MS-13 ह्या सोयूझ यानातून स्थानकाच्या दिशेने प्रयाण करतील
उड्डाणानंतर सहा तासाच्या अंतराळ प्रवासानंतर आणि चार फेऱ्या पूर्ण केल्यानंतर ते स्थानकाजवळ पोहोचतील
दोन तासांनी 6.30 min.ला स्थानकाच्या Zvezda Service Module जवळ पोहोचताच त्यांचे सोयूझ यान स्थानकाशी जोडले जाईल आणि स्थानकाचे दार उघडल्या जाईल
पोहोचल्यावर ह्या तीन अंतराळ वीरांचे स्थानकात अंतराळ मोहीम 60 चे सध्याचे कमांडर Alexey Ovchinin अंतराळ वीर Nick Hague आणि Christina Koch स्वागत करतील
स्थानकात हे तीन अंतराळवीर पोहोचल्यानंतर स्थानकातील अंतराळवीरांची संख्या सहा होईल आणि हे सहाही जण अंतराळस्थानकात सध्या सुरु असलेल्या वैज्ञानिक संशोधनात सहभागी होतील
अंतराळवीर Andrew Morgan ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी आहे तर Luca Parmitano ह्यांची हि दुसरी अंतराळवारी आहे रशियन अंतराळवीर Alexander Skvortsov मात्र तिसऱ्यांदा अंतराळ स्थानकात राहायला जाणार आहेत
ह्या अंतराळ वीरांच्या अंतराळस्थानकाकडे प्रयाणाचे लाईव्ह प्रक्षेपण नासा टी वी वरून करण्यात येणार आहे विशेष म्हणजे उद्या वीस जुलैला अपोलो 11यानाच्या चांद्र मोहिमेला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत
मानवाच्या चंद्रावरील भूमीवर पाऊल ठेवण्याच्या ह्या ऐतिहासिक घटनेचा उद्या पन्नासावा वर्धापन दिवस अमेरिकेत उत्साहात साजरा होणार आहे आणि त्याच वेळेस हे तीन अंतराळवीर स्थानकात राहायला जाणार आहेत .
No comments:
Post a Comment