Wednesday 31 July 2019

अंतराळ स्थानकात उगवली Mizuna Mustard green ची भाजी

Nick Hague harvests Mizuna mustard greens on the station  स्थानकातील व्हेजी चेंबर मधील Mizuna Mustard green हि भाजी काढताना अंतराळ वीर - Nick Hague
फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -25 जुलै
अंतराळ स्थानकातील अंतराळ वीरांना पृथ्वीवरील फ्रोझन प्रिझर्व केलेल्या भाज्या खाव्या लागतात त्यांना पृथ्वी वरील मानवासारखे ताजे अन्न,फळे भाज्या मिळत नाहीत त्यांना पृथ्वीप्रमाणेच ताजे अन्न,भाजी आणि फळे मिळावीत ह्या साठी सतत प्रयत्न आणि संशोधन सुरु असते
त्यासाठी स्थानकात व्हेजि प्रोजेक्ट राबवण्यात येतोय ह्या प्रोजेक्ट अंतर्गत स्थानकातील व्हेजि चेंबरमध्ये पृथ्वीवरील वातावरणासारखे कृत्रिम वातावरण तयार करून त्यात कलर लाईट्स,tempची व्यवस्था करण्यात आली आहे आणि त्यात पृथ्वीवरील वेगवेगळ्या जातीची भाजी,फुले आणी धान्य लागवड करण्यात आली आणि ती यशस्वीही झाली ह्या आधी स्थानकात झिनियाची फुले ,पालेभाजी लाल कोबी आणि गहूही उगवले होते
अंतराळवीर Scott Kelly,PeggyWhitson आणि इतर अंतराळवीरांनी स्थानकातील चेंबर मध्ये भाजी फुले ,गहू लागवड यशस्वी केलीय आणि भाजीचा आस्वादही घेतलाय
आता स्थानकात मोहीम 60च्या अंतराळवीरांनी Mizuna Mustard green ह्या भाजीची यशस्वी लागवड केली आहे स्थानकात उगवलेली हि भाजी सलाद टाईपची आहे अंतराळवीर Nick Hague ह्यांनी हि भाजी चेम्बरमधू न काढली हि भाजी हिरवीगार आणि ताजी टवटवीत आहे
आता त्यातील थोडी भाजी सॅम्पल साठी ठेवून अंतराळवीर त्यांच्या जेवणात ह्या भाजीचा समावेश करून त्याची चव चाखतील आणि येताना भाजीचे थोडे सॅम्पल पृथ्वीवर आणतील
पृथ्वीवर परतल्यावर ह्या भाजीवर शास्त्रज्ञ संशोधन करतील पृथ्वीवर उगवणारी आणि अंतराळातील झिरो ग्रॅव्हिटी मध्ये उगवलेली भाजी ह्यातील फरक अभ्यासतील
भविष्यात अंतराळात आणखी नवनवीन भाजी धान्य आणि फळांची लागवड अंतराळवीर करतील ह्याचा उपयोग आगामी दूरवरच्या अंतराळ मोहीमांतील अंतराळवीरांना ताजे आणि स्थानकात पिकवलेले अन्न खाण्यासाठी होईल

 

Monday 29 July 2019

नासाने जागविला पन्नास वर्षांपूर्वीचा चांद्रमोहिमेचा क्षण


Apollo 11 चांद्र यान सागरात उतरल्यानंतर अंतराळवीरांना बाहेर काढताना -फोटो - नासा संस्था

नासा संस्था -25 जुलै
पन्नास वर्षांपूर्वी अमेरिकन अंतराळवीरांनी पहिल्यांदा चांद्रभूमीवर पहिले मानवी पाऊल ठेवले होते त्या ऐतिहासिक घटनेला पन्नासवर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ हा दिवस अमेरिकेत उत्साहात आणि आनंदात  साजरा झाला नासा संस्थेने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून ह्या दिवसाचा आनंद द्विगुणित केला नासा संस्थेने पन्नास वर्षांपूर्वीचा तो चांद्रभूमीवरच्या मानवी प्रवासाचा,मानवीपाऊल स्पर्शाचा थरारक क्षण पुन्हा एकदा अनुभवला नासा संस्थेने t.v. वरून ह्या तीन अंतराळवीरांच्या चंद्राकडे प्रयाणाच्या,चंद्रावर पोहोचल्याचा आणि प्रुथ्वीकडे परतण्याच्या व्हिडीओचे प्रक्षेपण करून सामान्य नागरिकांना त्या ऐतिहासिक थरारक क्षणाचे दर्शन घडवले
पन्नास वर्षांपूर्वी चंद्रावर जाण आणि ती मोहीम यशस्वी करून पृथ्वीवर सुखरूप परतण आजच्या इतक सोप नव्हत त्या आधीच्या मोहिमा अयशस्वी झाल्या होत्या त्या मुळेच ह्या ऐतिहासिक मोहिमेच यश अभूतपूर्व होत
अंतराळवीर Neil Armstrong,Buzz Aldrin आणि Micheal Collins चांद्र मोहीम यशस्वीपणे पार पाडून चंद्र भूमीला स्पर्शून,त्यांच्या पाऊलखुणा मागे ठेवून पृथ्वीवर परततानाचा आणि परतल्यानंतरचा हा वृत्तांत

 24 जुलै 1969 Apollo 11 चांद्र मोहीम यशस्वी करून पृथ्वीवर परतत होत क्षणाक्षणाला पृथ्वीवासीयांची उत्कंठा वाढत होती अंतराळवीर Niel Armstrong यानाची स्थिती आणि पृथ्वीपासूनच यानाच अंतर ह्याची माहिती देत होतें यान खाली खाली येत अखेर पृथ्वीवर सुखरूप परतल यान सागरात उतरल
लष्करी अधिकाऱ्यांनी अंतराळवीरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी यानाकडे धाव घेतली वॉटर बोट यानाला जोडण्यात आली यानाच्या वरच्या बाजूची खिडकी उघडली गेली आणि एक,एक अंतराळवीरांना बाहेर काढण्यात आले
अंतराळवीरांना सुरक्षितपणे बाहेर आणुन त्यांच्या मेडिकल चेकअप नंतर काचेच्या खोलीत ठेवण्यात आले त्यानंतर झालेल्या  अंतराळवीरांच्या स्वागत सोहळ्यात अमेरिकेचे त्यावेळेसचे President Richard Nixon ह्यांनी अंतराळवीरांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्याशी संवाद साधला
                  President Richard Nixon अंतराळवीरांशी संवाद साधताना -फोटो -नासा संस्था

Richard Nixon President of America
Mike ,Buzz आणि Neil मी आज पृथ्वीवरचा सर्वात नशीबवान माणूस आहे मी हे USA चा अध्यक्ष आहे म्हणून नाही तर सगळ्यांच्या वतीने तुमचे स्वागत करण्याचे भाग्य मिळाले म्हणून म्हणतोय सगळ्या जगातून तुमच्यासाठी खूप संदेश आले आहेत शंभरावर परदेशी सरकार,देशाचे अध्यक्ष,पंतप्रधान,राजे महाराजे ह्यांनी भावपूर्ण संदेश पाठवले आहेत ते ह्या पृथ्वीवरील दोन कोटी लोकांचे प्रातिनिधीत्व करतात त्यांनी तुम्हाला टीव्ही वर हे ऐतिहासिक अभूतपूर्व कार्य करताना पाहिलय मी तुमच्यापर्यंत संसद,मंत्री आणि स्पेस एजन्सीज ह्यांनी दिलेले शुभेच्छांचे संदेशही पोहचवतोय
आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे मी खूप छान टेलिफोन कॉल केलाय तुम्हाला चंद्रावर केलेल्या कॉल एव्हडा खर्चिक नव्हता तो! पण माझ्या दृष्टीने जगातील सर्वात धैर्यशीलअशा तीन महिलांशी मी बोललोय तुमच्या पत्नींशी आणि Jan Joanआणि Pat  ह्यांच्याही प्रेमळ शुभेच्छा मी तुमच्यासाठी आणल्या आहेत त्या आज इथे उपस्थित राहू शकल्या नाहीत पण मी तुम्हाला एक गुपित सांगतोय मी त्यांच्या सोबत एक डेट फिक्स केलीय मी त्यांना तेरा ऑगस्टला शाही भोजनासाठी आमंत्रित केलेय U.S.A. च्या पन्नासही राज्याचे राज्यपाल ,राजदूत आणि महत्वाचे निमंत्रित पाहुणेही येणार आहेत तुम्ही Quarantine मधून बाहेर पडल्यानंतर हि पार्टी आयोजित केली आहे आणी तुमच्या पत्नींंनी तुमच्या वतीने आमंत्रण स्विकारले आहे तुम्ही येणार ना पार्टीला? अंतराळ वीर हसत ऊत्तरतातJ
हो!हो! नक्की तुम्ही जस म्हणाल तस!
President -मला तुम्हाला विचारायच अर्थात सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल ,तुम्ही समुद्रात ऊतरताना पाहताना जाणवल हे काम अत्यंत कठीण आहे सोप नक्कीच नाही हि शेवटच्या वेळेसची स्थिती खुप अवघड वाटली का?खुप त्रास झाला का?
अंतराळवीर - हो! खुप कठीण परिस्थिती होती ती! पण आमच्या कठीण कामाचा शेवटचा भाग होता तो,पण पृथ्वी वर परतण्याच्या अंतिम आनंदापुढे हा त्रास किरकोळ वाटला
President - तुम्ही आठवडाभर ईथे नव्हतात तेव्हा प्रुथ्वीवरील घडामोडी बद्दल माहिती आहे का?
 Old Star Games बद्दल कळले का?
अंतराळवीर - हो! आम्हाला प्रुथ्वीवरुन वेळोवेळी माहीती मिळत होती गेमबद्दलही!
President - तुम्ही अमेरिकन लीगचे चाहते आहात की National लिगचे
अंतराळवीर - National लिग!
President - Oh! मला ह्या टिममधे एक ऊदयोनमुख राजकारणी दिसतोय
अंतराळवीर -फक्त गेम सर!
President - तुम्हाला पावसाबद्दलही कळले का?
अंतराळवीर - हो!आपण सद्या तरी पावसावर नियंत्रण आणु शकत नाही पण भविष्यात ते शक्य होईल
President - तुम्हाला अजून बरेच काम करायचेय तुम्ही फ्रेश दिसताय तुम्ही तेव्हढेच फ्रेश आहात ना? Frank म्हणतोय की,तुम्ही स्पेस मध्ये जाऊन आल्यावर जास्तच तरुण झाल्यासारखे वाटतय
तुम्हाला खरच तस वाटतय?
अंतराळवीर - मी Frank पेक्षा नक्कीच तरुण आहे
President -ईकडे ये त्यांना पाहुदे म्हणताच Frank जवळ जाऊन पहातात
अंतराळवीर -अरे हो! हे म्हातारे झाल्यासारखे वाटतात
 Mr.President-  मला अस सांगायचय की Mike Collins मध्ये एक कवी दबलाय त्यने मला खूप छळल त्याने चार fantastic आणी दोन beautiful वर्णन करण्यासाठी तीन मिनिटे वापरली
मी आता समोपचाराकडे वळतोय
तुम्ही कठीण कार्य यशस्वी पणे पार पाडून सुखरुप पृथ्वीवर परतला आहात तुम्ही फक्त आठवडाभर ईथे नव्हता पण हा आठवडा संपूर्ण जगात कायम लक्षात राहील हि ऐतिहासिक अदभूत असामान्य कामगिरी अमेरीकेच्याच नाही तर साऱ्या जगाच्या ईतिहासात सुवर्ण अक्षरात कोरली जाईल
कधी नव्हे एव्हढ्या जवळ सार जग ह्या आठवड्यात आल होत मी तुमचा खुप आभारी आहे आणी मी अशी आशा करतो की,तुम्ही आमच्यासाठी हे महान कार्य केले आहे त्यामुळे सारे अमेरिकन तुमचे आभारी आहेत तुमचे मनःपुर्वक अभिनंदन! आम्ही सगळेआपले काम अजून चांगले करु शकु
तुम्हाला काही सांगायचेय का?Promotion बद्दल काही?
अंतराळवीर - नाही! आम्ही खुप भारावलो आहोत पृथ्वीवर परतल्याचा आनंदी क्षण अनुभवतोय Quarantine बाहेर पडल्यानंतर glass च्या भिंती बाहेर मोकळ्या हवेत तुमच्याशी संवाद साधण्याची प्रतिक्षा करतोय
President - Dinner ला आल्यावर तुम्ही छोटेसे भाषण करु शकाल पण please नवीन विशेषण शोधु नका fantastic,beautiful पण चालेल मला आणि साऱ्यांनाच
तुम्हाला टिव्ही वर पहाताना देवाने आमची प्रार्थना ऐकली अस वाटल म्हणून Thanks giving ची प्रार्थना म्हणून देवाचे आभार मानु या!

Friday 19 July 2019

नासाचे नवीन तीन अंतराळवीर उद्या अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जाणार


Expedition 60 crew members
अंतराळ वीर Andrew Morgan,Alexander Skvortsov आणि Luca Parmintano स्थानकात जाण्याच्या तयारीत
फोटो -नासा संस्था

नासा संस्था -19 जुलै
नासाच्या अंतराळ मोहीम 60 चे अंतराळवीर उद्या 20 जुलैला अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत
नासाचे अंतराळवीर Andrew Morgan,अंतराळवीर Luca Parmintano (ESA )आणि रशियन अंतराळवीर Alexander Skvortsov हे तीन अंतराळवीर उद्या 20 जुलैला 12.28p.m.ला कझाकस्थानातील बैकोनूर इथल्या Cosmodrome येथून MS-13 ह्या सोयूझ यानातून स्थानकाच्या दिशेने प्रयाण करतील
उड्डाणानंतर सहा तासाच्या अंतराळ प्रवासानंतर आणि चार फेऱ्या पूर्ण केल्यानंतर ते स्थानकाजवळ पोहोचतील
दोन तासांनी 6.30 min.ला स्थानकाच्या Zvezda Service Module जवळ पोहोचताच त्यांचे सोयूझ यान स्थानकाशी जोडले जाईल आणि स्थानकाचे दार उघडल्या जाईल
पोहोचल्यावर ह्या तीन अंतराळ वीरांचे स्थानकात अंतराळ मोहीम 60 चे सध्याचे कमांडर Alexey Ovchinin अंतराळ वीर Nick Hague आणि Christina Koch स्वागत करतील
स्थानकात हे तीन अंतराळवीर पोहोचल्यानंतर स्थानकातील अंतराळवीरांची संख्या सहा होईल आणि हे सहाही जण अंतराळस्थानकात सध्या सुरु असलेल्या वैज्ञानिक संशोधनात सहभागी होतील
अंतराळवीर Andrew Morgan ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी आहे तर Luca Parmitano ह्यांची हि दुसरी अंतराळवारी आहे रशियन अंतराळवीर Alexander Skvortsov मात्र तिसऱ्यांदा अंतराळ स्थानकात राहायला जाणार आहेत
ह्या अंतराळ वीरांच्या अंतराळस्थानकाकडे प्रयाणाचे लाईव्ह प्रक्षेपण नासा टी वी वरून करण्यात येणार आहे   विशेष म्हणजे उद्या वीस जुलैला अपोलो 11यानाच्या चांद्र मोहिमेला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत
मानवाच्या चंद्रावरील भूमीवर पाऊल ठेवण्याच्या ह्या ऐतिहासिक घटनेचा उद्या पन्नासावा वर्धापन दिवस अमेरिकेत उत्साहात साजरा होणार आहे आणि त्याच वेळेस हे तीन अंतराळवीर स्थानकात राहायला जाणार आहेत .

Tuesday 16 July 2019

अंतराळ वीर Nick Hague आणि Christina Koch ह्यांनी अपोलो 11 चांद्रमोहिमेच्या 50व्या वर्धापनदिना निमित्त दिल्या शुभेच्छा



 अंतराळवीर Nick Hague ,Christina Koch आणि Alexey Ovichinin स्थानकातून अपोलो 11च्या 50व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना फोटो -नासा संस्था

नासा संस्था -15 जुलै
 नासाच्या अंतराळ मोहीम 60चे अंतराळवीर Nick Hague आणि Christina Koch ह्यांनी स्थानकातून पृथ्वीवर लाईव्ह संवाद साधला आणि अपोलो 11 मोहिमेला 50वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या
20 जुलै 1969 ह्या दिवशी मानवाने प्रथम चंद्रावर पाऊल ठेवले त्या ऐतिहासिक घटनेला यंदा पन्नास वर्षे पूर्ण झाले  त्या मुळे अमेरिकेत हा ऐतिहासिक दिवस उत्साहात साजरा केल्या जाणार आहे
अंतराळस्थानकातील अंतराळवीर मात्र स्थानकातच हा दिवस साजरा करणार आहेत त्या आधी ह्या दोघांनी पृथ्वीवरील नासा संस्थेशी संपर्क साधत पृथ्वीवासीयांना ह्या पन्नासाव्या वर्धापनदिना निमित्त शुभेच्छा दिल्या
अंतराळवीर Nick Hague म्हणाले
पन्नास वर्षांपूर्वीच हे यश अभुतपुर्व आहे अंतराळवीर Neil Armstrong,Buzz Aldrinआणि Michael Collins ह्या अंतराळवीरांनी Apollo 11ह्या अंतराळ यानातून प्रथम चंद्राच्या भूमीवर पाऊल ठेवले तेव्हा ह्या ऐतिहासिक क्षणाने सारे जग आनंदीत झाले होते सर्वांंनीच ह्या
अंतराळवीरांचे त्यांनी केलेल्या ह्या ऐतिहासिक यशस्वी कामगिरीचे कौतुक करून अभिनंदन केले ह्या अभुतपुर्व यशामुळे सारे जग तेव्हा एकत्रित आले होते
Christina Koch म्हणाली
 पन्नास वर्षांपुर्वी ईतक्या अत्याधुनिक सोयी सुविधा नव्हत्या तरीही हि मोहीम यशस्वी झाली ते ह्या मोहीमेतील अमेरिकन शास्त्रज्ञ,ईंजीनिअर,तत्रंज्ञ आणी टिम मधील सर्व सहकारी यांच्या जिद्द,चिकाटी अथक परीश्रम आणि अगम्य इच्छाशक्ती मुळे आज मानव दुरवरच्या ग्रहांच्या अंतराळ मोहीमांची तयारी करतोय कित्येक मोहीमा यशस्वीही झाल्या आहेत आता मंगळावर मानवी निवासाची मोहीम राबविल्या जाणार आहे त्याची तयारी जोरात सुरु आहे अंतिम टप्प्यात पोहोचली आहे
आम्ही अंतराळ स्थानकात राहु शकतो ईथे अत्याधुनिक संशोधन करतोय हे सार शक्य झाले ते Apollo 11ह्या यशस्वी मोहीमेमुळे त्यामुळेच भविष्यातील अंतराळ मोहीमांची वाट सुकर झाली
Nick Hague-
म्हणाले आता अंतराळातील अंतराळ स्थानकातील मानवी वास्तव्यालाही विस वर्षे पुर्ण झाली आहेत अंतराळ स्थानकात असंख्य प्रयोग केल्या जातात नवनवीन संशोधन केले जाते हे संशोधन मानवी आरोग्यासाठी ऊपयुक्त ठरेल शिवाय ह्याचा ऊपयोग दुरवरच्या अंतराळ मोहीमांसाठी तेथील मानवी निवासासाठी होईल आणी आता 2024 साली पुन्हा एकदा मानवी पाऊल चंद्रावर पडेल आणि विशेष म्हणजे त्यात एका महिलेचाही समावेश असेल अस जाहीर करण्यात आलय आणि हि  अमेरिकन नागरिकांसाठी अभिनंदनीय बाब आहे  ह्या वेळेसच्या चांद्र मोहिमेत अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त अंतराळ मोहीम राबवल्या जाणार आहे
पुन्हा एकदा आमच्या सर्व अंतराळ विरांतर्फे
" अपोलो 11च्या पन्नासाव्या वर्धापनदिना निमित्य हार्दिक शुभेच्छा" आम्ही तुमच्या आनंदात सहभागी आहोत!
आम्हीही स्थानकात हा वर्धापन दिन साजरा करणार आहोत

Sunday 7 July 2019

Happy 4th July From Space Station


   अंतराळवीर Nick Hague आणि Christina Koch  स्थानकात 4 जुलै साजरा करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -5 जुलै  
चार जुलै हा अमेरिका निर्मिती दिन अमेरिकेत उत्साहात साजरा झाला सारेच अमेरिकन ह्या आनंदात सामील झाले पण पृथ्वीपासून दूर अंतराळात फिरणाऱ्या अंतराळस्थानकातील अंतराळवीरांना मात्र पृथ्वीवर हा दिवस ह्या वर्षी साजरा करता आला नाही
पण ह्या अंतराळवीरांनी अंतराळस्थानकात हा दिन उत्साहात साजरा केला
नासाच्या अंतराळ मोहीम 60 चे अंतराळवीर Nick Hague आणि Christina Koch ह्या दोघांनी स्थानकातून पृथ्वीवर संपर्क साधून अमेरिकेच्या 243 व्या वाढदिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या
ह्या अंतराळवीरांनी स्थानकातील भिंतीला अमेरिकेचा झेंडा लावला होता आणि त्या दोघांनीही अमेरिकेच्या झेंड्यातील रंगाचे साधर्म्य साधत लाल,पांढरा आणि निळा रंग असलेला ड्रेस घातला होता
पृथ्वीवर नासा संस्थेशी संपर्क होताच
 अंतराळवीर Nick Hague आणि Christina Koch ह्यांनी
                         "Very Happy 4th July" अशा शुभेच्छा दिल्या 
अंतराळ वीर Nick Hague म्हणाले,अमेरिकन Space Flight मधल्या ऐतिहासिक क्षणांचा हा अभूतपूर्व काळ आहे अमेरिकेने अंतराळात यशस्वी अंतराळभरारी मारलीय आणि नवनवीन शोध लावले आहेत हे यश निश्चितच अभिमानास्पद आहे आता 2024 मध्ये पुन्हा अमेरिकन अंतराळवीर चंद्रावर जातील तेव्हा त्यात एका महिला Astronaut चाही समावेश असेल आणि हा ऐतिहासिक क्षण असेल
माझ्या अंतराळ कार्यकाळातील Commercial Space Flight हा तर युनिक ऐतिहासिक क्षण आहे मला अमेरिकेचा आणि अमेरिकन असल्याचा अभिमान वाटतो
ISS च्या सर्व अंतराळवीरांच्या वतीने आम्ही सर्वांना Wish करतोय आणि त्यांचे आभारही मानतोय सर्वच अमेरिकन जगात कोठेही असतील तिथे हा दिवस उत्साहात  आनंदात साजरा करत असतील त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत
Christina Koch म्हणाली कि आजची अंतराळ प्रगती खरोखरच आश्चर्यकारक आणि अभिमानास्पद आहे म्हणूनच आम्ही नासा संस्थेतील अधिकारी,सायंटिस्ट,कर्मचारी,इंजिनीअर्स आणि सर्वच संबंधितांना Wish करतोय आम्ही जेव्हा स्थानकातून अंतराळात वर पहातो तेव्हा असंख्य तारे तारका आणि त्यातील स्वर्गीयसौन्दर्य पहातो तेव्हा आम्हाला आम्ही अमेरिकन असल्याचा आनंद होतो,अभिमान वाटतो
अमेरिकेचा झेन्डा आता जगभरातच नाही तर अंतराळात पोहोचला आहे रोबोट द्वारे अंतराळमोहीमेद्वारे आश्चर्य वाटेल अशा ठिकाणीही तो पोहोचला आहे आणि अमेरिकन माणसांच्या जिद्द,चिकाटी,मेहनत आणि हुशारीमुळेच हे शक्य झाले आहे
आज रात्री आम्ही विशेष डिनर पार्टी करणार आहोत त्यात Beef,patties,Corn Blueberry,Cobbler आणि  Lemonade अशा पदार्थांचा मेनू असेल आणि दहा पंधरा मिनिटात आम्ही ते तयार करणार आहोत
Nick Hague ह्यांनी ट्विटरवरूनही सर्वांना Wish केले आहे तसेच त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधत त्यांच्या पत्नीला Wish करत तिला प्रमोशन मिळाल्याबद्दल तिचे अभिनंदनही केले आहे
हे दोघेही म्हणतात आम्ही अंतराळस्थानकात हा ऐतिहासिक अमेरिकन बर्थडे साजरा करताना स्थानकातील  खिडकीतून अमेरिकेच्या भूमीवरून साजरा होणाऱ्या ह्या दिवसाचा आनंद घेऊ आणि आकाशात  उडणाऱ्या फटाक्यांची आतिषबाजी पाहण्याचा आनंद लुटू
पुन्हा एकदा
                            " Happy 4th July " to all Americans"