Thursday 30 May 2019

नासाने जाहीर केली मंगळावर नाव पाठवण्याची हौशी नागरिकांसाठी सुवर्ण संधी

Souvenir boarding passes will display names submitted by the public, which will also be on microchips aboard the Mars 2020 rover
 मंगळावर 2020 मध्ये पाठवण्यात येणाऱ्या Mars Rover सोबत पाठवण्यात येणाऱ्या नावांचा हा नमुना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -22 मे
नासा संस्थेतर्फे हौशी नागरिकांना मंगळ ग्रहावर त्यांची नावे पाठवण्याची संधी जाहीर करण्यात आली आहे ज्यांना आपली नावे मंगळावर पाठवायची आहेत त्यांच्यासाठी हि ऐतिहासिक सुवर्णसंधी आहे पुढच्या वर्षी मंगळ ग्रहावर पाठवण्यात येणाऱ्या मंगळयानासोबत हि नावे पाठवण्यात येणार आहेत
2020च्या जुलै महिन्यात Mars Rover मंगळ ग्रहाच्या दिशेने प्रवासास निघेल आणि 2021च्या फेब्रुवारी महिन्यात Rover मंगळ ग्रहावर पोहोचेल Mars Roverचे वजन 1000 k.g इतके आहे
मंगळावरील पुरातन काळी अस्तित्वात असलेल्या सजीव सृष्टीचे अवशेष,मंगळ ग्रहाच्या भूपृष्ठभागाखालील अंतर्गत माहिती आणि मंगळावरील वातावरण ह्याची सखोल माहिती गोळा करण्यासाठी हे यान मंगळावर पाठवण्यात येणार आहे रोव्हर हि माहिती गोळा करून त्यांचे सॅम्पल्स पृथ्वीवर पाठवनार आहे
आता जरी तिथे मानवी अस्तित्व नसले तरीही पुरातन काळी तिथे मानवी अस्तित्वाच्या शक्यतेचे,तेथील सुक्षम अवस्थेतील बर्फाच्या स्वरूपातील पाण्याचे आटलेल्या स्रोताचे आणि आटलेल्या नद्यांच्या,दऱ्याखोऱ्यातून वाहणाऱ्या प्रवाहांच्या ठिकाणांचे पुरावे सापडले आहेत
"आणि हीच आगामी मानवसहित मंगळमोहिमेसाठी तिथल्या मानवी वस्त्यांसाठी,निवासासाठीची पाऊलवाट ठरेल आणि भविष्यात मंगळावर मानवी पाऊल पडेल असा विश्वास आम्हाला वाटतोय! हा आताचा काळ आमच्यासाठी अत्यंत रोमांचक आहे!" असे नासाच्या वॉशिंग्टन येथील नासा संस्थेचे Directorate Thomas Zurbuchen म्हणतात ह्या मंगळ मोहिमेत मंगळावर पुरातन काळी जीवसृष्टी अस्तित्वात होती का? असेल तर ती कशी होती तेथील वातावरण मानवी निवासासाठी पोषक आहे का?आपल्या ग्रहमालेतील हा शेजारी ग्रह कसा आहे त्याची उत्पत्ती कशी झाली असावी ह्या प्रश्नांची उत्तरे शोधता येतील वर्षानुवर्षे मानवी मनाला मंगळाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे म्हणूनच सर्वांनी ह्या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी व्हावे असे आम्हाला वाटतेय आणि त्यासाठी आम्ही हौशी नागरिकांना मंगळावर नावे पाठवण्याची संधी देत आहोत
ह्या आधीच्या InSight मंगळ मोहिमेत 2मिलियन लोकांची नावे मंगळ यानासोबत मंगळावर पाठवण्यात आली होती आणि Parker Solar Probe ह्या सौर यानासोबत सूर्यावरही नागरिकांनी पाठवलेली नावे पोहोचली आहेत
आताच्या Mars Rover मोहिमेत नागरिकांची नावे यानासोबत सिलिकॉन चिपवर सबमिट करण्यात येतील हि नावे अत्यंत सूक्ष्म म्हणजे मानवी केसाच्या एक हजारांश इतक्या लहान आकाराची असतील आणि ह्या नावावर ग्लास कव्हर बसवण्यात येईल
आतापासून तीस सप्टेंबर पर्यंत हि नावे नासा संस्थेकडे पाठवता येतील आणि जे नागरिक त्यांची नावे मंगळावर पाठवण्यासाठी देतील त्यांना स्मृतिचिह्न व बोर्डिंग पासही देण्यात येणार आहे अशी माहिती नासा संस्थेने जाहीर केली आहे 

Saturday 18 May 2019

स्थानकातून अंतराळवीर Nick Hague ह्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद


 Expedition 59 Flight Engineer Nick Hague performs maintenance on the Advanced Combustion via Microgravity Experiments Chamber
         अंतराळवीर Nick Hague अंतराळस्थानकातील चेंबर मध्ये काम करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था 10 मे
नासाचे अंतराळवीर स्थानकातील फिरत्या लॅबमध्ये राहून कसे संशोधन करतात अंतराळवीरांच्या स्थानकातील  झिरो ग्रॅविटीतील तरंगत्या अवस्थेतील वास्तव्या विषयी,राहणीविषयी विद्यार्थ्यांना नेहमीच कुतूहल असत म्हणूनच अंतराळवीर त्यांना मिळालेल्या फावल्या वेळात विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतात नुकताच अंतराळवीर Nick Hague ह्यांनी अमेरिकेतील Cosmosphere ,Hulchinson Kansas येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याचाच हा वृत्तांत
नुकताच मदर्स डे साजरा झाला ह्या दिवसाचे औचित्त साधून सुरवात Nick Hague ह्यांची आई Beverly Hague ह्यांनी केली आणि ऐकू येतय का ? असं विचारताच Nick ने आश्चर्यचकित होत आईचा आवाज ओळखून हो मॉम! असे उत्तर दिले आणि तिला मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या
1)- Nick Robin -5th grade- अंतराळवीर होण्यासाठी तुम्हाला कोणी प्रेरित केले ?
Nick Hague -
मी लहानपणी तुझ्या एव्हढा होतो तेव्हा मी आकाशातील ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण करायचो आणि मी अडव्हेंचर्स नेचरचा असल्यामुळे मलाही वेगळ काहीतरी करावस वाटायच अवकाशात भरारी घ्यावीशी वाटायची त्यांना जवळून पाहावस वाटायच त्या मुळेच मी अंतराळवीर होण्यासाठी प्रेरित झालो माझ्या घरच्यांनी मला साथ दिली आवश्यक ती मदत केली त्यांनीही मला प्रोत्साहित केल
 2)- Jodan Moog-  (4th grade)-  शिक्षणा व्यतिरिक्त अंतराळवीर होण्यासाठी काय आवश्यक असत ?
Nick Hague -
अर्थातच टीम वर्क!आम्ही अंतराळ स्थानकात सध्या सहा अंतराळवीर मिळून राहतो,संशोधन करतो पण पृथ्वीवरून हजारो शास्त्रज्ञ आम्हाला गाईड करतात आवश्यक त्या सूचना देतात हे काम एकट्याने करायचे नाही एकमेकाला समजून घेत एकत्रितपणे हे काम करावे लागते मी,हायस्कुल मध्ये होतो तेव्हा Gymnasium मध्ये जायचो तेव्हा आम्हाला शाळेत नासाचे space program दाखवायचे ते पाहून मी इन्स्पायर झालो मला स्पेस बद्दल कळाल ,टीम वर्कची माहिती मिळाली त्या मुळे अंतराळवीर होण्यासाठी टीम वर्क करण्याची हातोटी आत्मसात करण आवश्यक आहे 
3) Nody- (3rd grade)- अंतराळवीर होण्यासाठी सगळ्यात अवघड गोष्ट कोणती होती तुमच्यासाठी ?
Nick Hague -
निश्चितच रशियन भाषा शिकण ! मला अंतराळवीर होण्यासाठी रशियन शिक्षण आवश्यक होत आणि ती माझ्यासाठी अवघड गोष्ट होती  पण नंतर शिकल्यावर सोपी झाली
4)- Zimboby-(1st grade)- अंतराळातील मायक्रोग्रॅविटीत कोणती गोष्ट करायला तुम्हाला आवडते?आम्हाला दाखवू शकता का ? मोकळ्या वेळेत काय करायला आवडत
Nick Hague -
मायक्रोग्रॅव्हीटीत सगळ्या वस्तू तरंगतात हा माईक,आम्ही,पाणी,अन्नाची पाकीट सारच!हे पाहण मजेशीर असत ! मला तरंगायला आवडत कुठेही कसेही तरंगत जाता येता येत अन्न खाताना,पाणी पीतानाची मजा मी अनुभवतो अस म्हणत त्यांनी ज्युसचा तरंगणारा आणि मोठा होत जाणारा बबल तोंडाने पकडून पितानाची कसरत दाखवली
शिवाय मला स्थानकाच्या क्युपूला मधून बाहेर पृथ्वीकडे पाहायला आवडते ती रंगीत आणि खूप सुंदर दिसते अस सांगत त्यांनी सुंदर भासणारी पृथ्वी खिडकीतून दाखवली
Erisa Linski - (2nd grade )- स्थानकातून पृथ्वीवर कुटुंबियांशी कसा संपर्क करता तिथे वायफाय नेटवर्क आहे का ? 
 Nick Hague -
हो ! इथे तशी सोयआहे  इथे खूप चांगले वायफाय आहे वायरलेस नेटवर्क आहे ते satelliteला जोडलेले असते आपल्या पृथ्वीभोवती खूप satellitesआहेत ते आमचे सिग्नल्स पृथ्वीवर पाठवतात त्या मुळेच हा संवाद होऊ शकतो आम्ही फोनवरून,इ-मेलने आमच्या कुटुंबियांशी संपर्क साधतो ती आमच्यासाठी महत्वाची गोष्ट असते आठवड्याच्या शेवटी व्हिडीओ कॉन्फरन्सी द्वारे आम्ही कुटुंबियांशी बोलतो माझ्या पत्नीकडून मला मुलांविषयी कळत तिथल्या घडामोडीबद्दल कळत कधी तिथे खूप पाऊस आला आणि मुलांच्या शाळेला सुट्टी मिळाली हेही कळत !
Angie- (5th grade)- स्थानकातील दिवस कसा असतो?सगळ्यांच वेळापत्रक सारखच असत का ? सगळे एकाच वेळी झोपता का ?
Nick Hague -
हो ! आमच वेळापत्रक ठरलेल असत,सकाळी साडेसहाला आम्ही उठतो साडेसातपर्यंत फ्रेश होतो मग आमच काम सुरु होत आम्ही व्यायाम करतो दुपारचं जेवण करतो संशोधन,मेंटेनन्सच कामही करतोआम्हाला दिवसभराच ठरवून दिलेल काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो
Dylan Mader( KIndergarden चा प्रश्न) Carl Bekman 8th - स्पेस स्टेशन मध्ये तुम्ही रोपे कोठेआणि कशी लावता ? - Maya Hill-( 4th grade)- अंतराळात Oxygen अभावी रोपे कशी वाढतात ?
Nick Hague -
मी सध्या स्थानकातील कोलंबस लॅब मध्ये आहे हा युरोपियन एजन्सीचा भाग आहे अशा चार लॅब स्थानकात आहेत त्यात veggie project साठी खास चेंबर बनवले आहेत त्यातील रॅक मध्ये वेगवेगळी रोपे वाढवली जातात
त्यात कलर लाईट्स आणि पाण्याची विशेष सोय केली जाते एका बॅग(veggie pond ) मध्ये रोप लावले जाते कारण इथे साऱ्या वस्तू तरंगतात त्या मुळे पाणीही सगळीकडे थेंबाच्या रूपात तरंगते ते थेंब रोपावर कोठेही जाऊन थांबते (हे प्रात्यक्षित त्यांनी करून दाखवले )गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे पाणी मुळच्या दिशेने वाहात नाही,पोहोचत नाही म्हणून ह्या बॅगेत खास सोय केलेली असते
पृथ्वीवर झाडे कॉर्बन डाय ऑक्साइड शोषून घेतात जे माणूस आणि सजीवांच्या स्वासोच्छवासातून त्यांना मिळते शिवाय सूर्यप्रकाशात झाडे वाढतात पण इथे तस नसत म्हणून अंधार उजेडासाठी लाईटिंगची खास सोय टेम्परेचर व पाण्याचे योग्य नियोजन करून रोपे वाढवली जातात दिवस रात्रीचे चक्र पृथ्वी प्रमाणेच असते रोपाच्या प्रकारावर ते अवलंबून असते शास्त्रज्ञ पृथ्वीवरून ते मॅनेज करतात त्या नुसार लाइटींगची सोय केलेली आहे
Nick -(7th grade)- स्थानकातील दिवस रात्रीचे चक्र कसे असते? तुम्हाला सकाळ आणि रात्र कशी कळते ?
Nick Hague -
आम्ही सोळावेळा पृथ्वीभोवती फिरतो त्या मुळे सोळा वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त होतो खिडकीतून उजेड व अंधार दिसतो पण इथे पृथ्वीपेक्षा वेगळी स्थिती असल्याने इथे आमच्या साठीही लाईटची सोय केलेली आहे सकाळी जास्त निळ्या प्रकाशाचे प्रखर लाईट लावतो तर रात्री लाईट्स बंद करून अंधार करतो खिडकीचे शटरही बंद करतो
Fisher Symantec- (11th grade)- ज्यांना diabetes ,Cancer,Asthma आहे अशा व्यक्तीला अंतराळात जाता येऊ शकेल का ?तुमचा अनुभव कसा आहे ?
Nick Hague -
अंतराळ स्थानकात निरोगी व्यक्तींच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो स्थानकातील मायक्रोग्रॅविटी मध्ये मानवाची उंची दोन इंचाने वाढते आणि पृथ्वीवर आल्यावर पूर्ववत होते सतत तरंगत राहिल्याने हाडांवर परिणाम होतो ताठ उभे राहता येत नसल्याने पाठीचा कणा वाकलेल्या अवस्थेत राहतो हाडे ठिसूळ होतात नजर कमजोर होते गुरुत्वाकर्षण नसल्याने शरीरातील द्रव पदार्थ उलट्या दिशेने वाहतात डोक्यावर विशेषतः मेंदूवर प्रेशर येत डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह वाहत असल्याने हार्टवर परिणाम होऊ शकतो सतत cosmic रेडिएशन होत असल्यामुळे स्किनवरही दुष्परिणाम होऊ शकतो अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते पण हळू हळू सवय होते आता हे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून संशोधन सुरु आहे त्या साठीचआम्ही रोज बॉयलॉजिकल सॅम्पल्स घेतो त्या मुळे सध्या तरी आजारी व्यक्तीला अंतराळात जण अशक्य आहे त्या साठी मेडिकली फिट असाव लागत
Eslic -(5th grade)- स्थानकात आजारी पडलात किंवा दुखापत झाली तर उपचार कसे करता ? अशी स्थिती मंगळावर गेल्यावर आली तर काय कराल ?
Nick Hague -
आम्हाला प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिलेले असते त्या मुळे उपचार करता येतो आम्ही जखमेवर टाके घालू शकतो आम्हाला oxygen देता येतो कित्येकदा टीममध्ये एखादा डॉक्टर असतो आता आमच्या सोबत कॅनडियन अंतराळवीर David Saint हे डॉक्टर आहेत ते अशा प्रसंगी उपचार करतात मंगळावर मात्र डॉक्टर आणि सर्व मेडिकल सामुग्री सोबत घेऊन जावे लागेल
Adiee Baker -(5th grade)-Mia 3rd grade- अंतराळात वारा वाहतो का ? तिथे पृथ्वीसारखे वादळ होते का ?
Nick Hague -
आम्ही पृथ्वीच्या वातावरणाच्या वर असल्यामुळे इथे हवा नसते पण इथे सौर वादळे होतात सूर्यापासून निघालेले अत्यंत उष्ण सौरकण वादळाच्या स्वरूपात सर्वत्र फेकल्या जातात पण सुदैवाने पृथ्वीभोवती चुंबकीय आवरण असल्यामुळे आपल्याला होनी होत नाही
Ducan Bell(-6th grade )-Jensen- अंतराळातून सूर्य कसा दिसतो ?
Nick Hague -
मी जेव्हा खिडकीतून बाहेर पाहतो मला पृथ्वी लहान दिसते पण सूर्य चंद्र आणि तारे पृथ्वीवरून जसे दिसतात तसेच दिसतात कारण आम्ही पृथ्वीपासून फक्त 250मैल वर आहोत त्या मुळे आकारात फरक दिसत नाही पण सूर्याची उष्णता मात्र पृथ्वीपेक्षा जास्त जाणवते
Jayden Fellows-(6th grade )-Kensi Norndoff- स्पेस सूट घालायला किती वेळ लागतो
Nick Hague- लाँचिंग आणि परतण्याच्या वेळेस स्पेससूट घालायला फारसा वेळ लागत नाही एक तास लागतो आमच्या कडे वेगवेगळे स्पेससूट असतात जाताना आणि येतानाचा सारखा असतो पण स्पेसवॉकच्या वेळेसचा मात्र वेगळा असतो त्यात oxygen,पाणी आणि इतर आवश्यक सामान ठेवाव लागत स्पेसस्टेशनच्या बाहेर अंतराळात काम कराव लागत असल्याने तो एकदम फिटिंगचा असावा लागतो थोडीशीही गॅप चालत नाही तो घालायला बराच वेळ लागतो चार पाच तास आणि त्या साठी मदत घ्यावी लागते एकट्याने घालता येत नाही
 Nathon Wecca- (5th grade)-स्थानकातून पृथ्वीकडे बघताना दृष्ठीकोन कसा बदलतो ?काय फरक जाणवतो ?
Nick Hague -
मी स्पष्ठपणे सूर्यप्रकाशात पृथ्वीकडे पाहू शकलो इथून पृथ्वीवरील शहर पाहताना मात्र खूप प्रयत्न करूनही पटकन शहर ओळखता येत नाही मला सगळ प्लेन दिसत Denver,Dever हुन Houston कडे जायला फक्त तीन मिनिटे लागतात पृथ्वीकडे पाहताना आपण किती लहान आहोत आणि विश्व किती मोठ आहे ह्याची जाणीव होते ह्या अंधाऱ्या समुद्रात आपली पृथ्वी एका बेटा प्रमाणे भासते आपण त्याचा भाग आहोत,पृथ्वी खूप स्पेशल आहे सुंदर आहे हे जाणवते 
Genesis Harvey-( 7th grade)- तुम्हाला तुमच्या छोट्या शहरातून एकदम अंतराळ स्थानकात पोहोचल्यावर कस वाटतय ?
Nick Hague -
खरच  मी एक दिवस खरच स्थानकात पोहोचेन अस वाटलही नव्हत तीस वर्षांपूर्वी मी Hoxie मध्ये शाळेत शिकत होतो तेव्हा मला भविष्यात मी अंतराळवीर होऊन स्थानकात राहायला जाईन माझं स्वप्न साकारेल अस वाटल नव्हत मी खरच स्वत:ला खूप भाग्यवान समजतो हि माझ्यासाठी सुवर्णसंधी होती माझ स्वप्न साकार करण्याची! ती मला मिळाली अर्थात त्या साठी खूप प्रयत्न,संघर्ष करावा लागला कठोर परिश्रम करावे लागले आपण स्वप्न पाहिले आणि ते झटक्यात पूर्ण झाले असे कधीच होत नाही त्या साठी त्या स्वप्नाच्या दिशेने रोज एक एक पाऊल पुढे टाकाव लागत कधी हरल की आपल एक पाऊल मागे येत पण पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात त्यात सातत्य ठेवाव लागत आणि त्या साठी जिद्द महत्वाची आहे आणि नशीबही 
Gavin Shivers- ( 7th grade )- पहिल्यांदा launch करताना भीती वाटली का ? तुमचा अनुभव सांगा
Nick Hague -
मला भीती वाटली नाही अस म्हणण चुकीच ठरेल आम्ही रॉकेट्स वर होतो 4000 की.मी.वेगाने वर जात होतो आणि रॉकेट नष्ट झाले पण पाच वर्षांच नासा संस्थेतील ट्रेनिंग कामी आल आम्ही स्वत:ला तात्काळ सावरल आणि 
मी आणि कमांडर Alexie ने Abort चा निर्णय घेतला त्यासाठीची तयारी सुरु केली मी एअर फोर्स मध्ये होतो त्यावेळेसचा अनुभव कामी आला अशा वेळेस परिस्थिती कशी हाताळायची ह्याच ट्रेनिंग घेतल असल्यामुळे पुढचा धोका टळला ,मी खूप सुदैवी आहे 
शेवटी Madley Ziglor  हिने तुम्ही पृथ्वीवर परतल्यावर तुमच्या जन्मगावी Hoxie ला भेट देणार का ?असे विचारताच Nick म्हणाले हो! नक्कीच ! आणि आल्यावर तुम्हालाही भेटेन 
त्या नंतर Nick Hague ह्यांच्या आईने स्थानकातील तुझ्या घरच्या सर्व अंतराळवीरांना शुभेच्छा ! अस म्हणत आभार मानले तेव्हा Nick नेही आईला पुन्हा एकदा मदर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आणि नासा संस्थेने आईशी बोलण्याची अमूल्य संधी दिल्याबद्दल आभार मानले

Wednesday 15 May 2019

Anne-McClain ने अंतराळस्थानकातून दिल्या मदर्स डे च्या शुभेच्छा

             अंतराळ स्थानकातून मदर्स डे च्या शुभेच्छा देताना Anne McClain -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -12 मे
नुकताच मदर्स डे सर्वत्र उत्साहात साजरा झाला सोशल मीडियावरून मदर्स डे निमित्य शुभेच्छा व्हिडीओ,मेसेजेस फॉरवर्ड झाले अमेरिकेतही मदर्स डे साजरा झाला सध्या अंतराळस्थानकात राहात असलेल्याअंतराळवीरांनीही हा दिवस साजरा केला अंतराळवीर स्थानकातील त्यांच्या घरी पृथ्वीवरील मानवासारखेच सण ,डेज साजरे करतात त्यांच्या कुटुंबियांशी,चाहत्यांशी वेळोवेळी लाईव्ह संवाद साधतात त्यांना शुभेच्छा देतात
मदर्स डे च्या दिवशी Anne McClain ने ट्विटर वरून पृथ्वीवासीयांना शुभेच्छा दिल्या त्या अशा
" Happy Mothers Day to all the moms,Surrogate moms,Birth Moms,Stand in Mom sand Mother Figures"! You make everything possible !


               Anne McClain तिच्या मुलासोबत -फोटो -नासा संस्था

Anne चा हा फोटो नासा संस्थेत Astronaut Portraits साठी काढलेला होता त्या वेळेस तिच्या सोबत तिचा मुलगाही होता
 "Happy Mothers Day to you too Anne! (You gate the prize for Awesome Astronaut Portraits ever)"
Anne ने स्वत:च Astronaut होण्याच,अंतराळस्थानकात राहण्याच लहानपणापासूनच स्वप्न अथक प्रयत्नाने आणि परिश्रमाने संघर्ष करून प्राप्त केलय त्या मुळे ती म्हणते "स्वप्न पहा,आणि ध्येय साध्य करण्यासाठी संघर्ष करा मग यश निश्चित मिळेल अशक्य काही नाही"!

Thursday 9 May 2019

InSight मंगळ यानाने पाठवले मंगळावरील सूर्योदय आणि सूर्यास्ताचे फोटो

NASA's InSight lander
 InSight मंगळयानाच्या रोबोटिक आर्मचा कॅमेरा मंगळावरील सूर्योदयाचा क्षण टिपताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -1 मे सध्या मंगळावर कार्यरत असलेल्या नासाच्या InSight मंगळ यानाने मंगळावरील सूर्योदय आणि सूर्यास्ताचे नयनरम्य फोटो टिपले असून ते त्वरित पृथ्वीवर पाठवले आहेत
InSight मंगळयान अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज असून ह्या यानातील अध्ययावत यंत्र सामुग्री मंगळावरील सूक्ष्म घडामोडींचे निरीक्षण करून त्याची माहिती पृथ्वीवर त्वरित पाठवण्याचे कार्य यशस्वी पणे पार पाडत आहे
नुकतेच 24 आणि 25 एप्रिलला InSight मंगळ यानाने Landerच्या रोबोटिक आर्मवर बसविलेल्या अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या साहाय्याने तेथील आकाशातील सूर्योदय आणि सूर्यास्ताचे फोटो अचूक टिपले आहेत
मंगळावरील दीनगणनेनुसार InSight मंगळयानाच्या 145 व्या मंगळदिनी मंगळ वेळेनुसार पहाटे 5.30 वाजता  सूर्योदयाचा नयनरम्य क्षण कॅमेराबद्ध केला आणि संध्याकाळी मंगळवेळेनुसार 6.30 वाजता सूर्यास्ताचा सुंदर क्षणही अचूक टिपला हे फोटो अप्रतिम आहेतच शिवाय InSight मंगळयानाने त्यावेळेसच्या मंगळावरील आकाशातील सूर्याभोवतीच्या ढगांच्या रंगीबिरंगी छटा त्यांची हालचाल आणि रंगांची मनोहारी उधळणही अचूक टिपलीय

https://www.nasa.gov/sites/default/files/thumbnails/image/pia23202_cc-16.jpg
 InSight मंगळयानाच्या रोबोटिक आर्मच्या कॅमेऱ्याने टिपलेला मंगळावरील सूर्यास्त -फोटो-नासा संस्था

InSight मंगळयानाने ह्या नैसर्गिक क्षणांचे टिपलेले हे फोटो प्राथमिक स्वरूपातील आहेत त्या फोटोमध्ये आकाशातील नैसर्गिक घडामोडींच डिटेल अवलोकन करता येत असले तरीही शास्त्रज्ञांनी त्या फोटोवर कलर प्रक्रिया केली आहे त्यामुळे हे फोटो मानवी डोळ्यांना जास्तच आकर्षक दिसत आहेत
पृथ्वीप्रमाणेच मंगळावरील सूर्योदय आणि सूर्यास्त सुंदर दिसतोय पण सूर्याचा आकार मात्र पृथ्वीवरून दिसतो तेव्हढा मोठा दिसत नाही कारण मंगळ ग्रह पृथ्वीच्या तुलनेत सूर्यापासून लांब अंतरावर आहे त्या मुळे तिथून सूर्य 2/3 एव्हढा दिसतो
InSight मंगळ यानाने दुसऱ्यांदा ह्या दैनिक घडामोडी कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत ह्या आधी दोन आणि दहा मार्चला InSight च्या कॅमेऱ्याने practice shot घेण्यात आले ते फोटो पाहून त्यावर चर्चा करून त्यानंतर शास्त्रज्ञांनी पुन्हा मंगळावरील सूर्योदय आणि सूर्यास्त कॅमेराबद्ध करण्याचे ठरविले आणि हे फोटो घेण्यात आले

 NASA's InSight used its Instrument Context Camera (ICC) beneath the lander's deck to image these drifting clouds at sunset.
 InSight मंगळयानाने टिपलेले मंगळावरील आकाशातील ढगांची हि नयनरम्य रंगांची उधळण -फोटो -नासा संस्था

ह्या आधीच्या Viking-1 missionमध्ये 21Aug.1976 ला आणि Viking-2 missionमध्ये 14 जून 1978 मध्ये मंगळावरील सूर्योदय आणि सूर्यास्ताचे फोटो कॅमेराबद्ध करण्यात आले होते त्या नंतरच्या Spirit,Opportunity, Curiosity Rover ह्या मंगळयानांनी देखील मंगळावरील सूर्योदय आणि सूर्यास्ताचा क्षण टिपला आणि त्याचे
Recording ही करण्यात आले होते. 

Thursday 2 May 2019

Christina Koch चा स्थानकातील मुक्काम वाढला एक वर्ष राहण्याचा करणार विक्रम

NASA astronaut Christina Koch conducts botany research aboard the International Space Station. 
          Christina Koch अंतराळस्थानकातील प्रयोगशाळेत संशोधन करताना फोटो -नासा संस्था

नासा संस्था -26 एप्रिल
नासाच्या अंतराळ मोहीम 59ची महिला Astronaut Christina Koch आता अंतराळ स्थानकात जास्त दिवस राहण्याचा विक्रम स्थापित करणार आहे ह्या आधी अंतराळवीर Scott Kelly आणि Peggy Whitson ह्यांनी अंतराळस्थानकात जास्त काळ राहण्याचा विक्रम स्थापित केला आहे तो विक्रम Christina मोडणार आहे
ती आता एक वर्ष अंतराळ स्थानकात वास्तव्य करणार आहे
Christina Koch 14 मार्चला अंतराळस्थानकात राहायला गेली आणि आता तिचा मुक्काम वाढल्याने ती फेब्रुवारी 2020 मध्ये पृथ्वीवर परतेल एकाच अंतराळ प्रवासात ती हा जास्त दिवस राहण्याचा विक्रम स्थापित करणार आहे
ह्या आधी नासाची महिला अंतराळवीर Peggy Whitson हिने 2016-17मध्ये अंतराळस्थानकात सलग 288 दिवस राहण्याचा विक्रम स्थापित केला होता तर Scott Kelly ह्यांनी 2015-16 मध्ये स्थानकात 340 दिवस राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता आणि आता Christina त्यांचा रेकॉर्ड मोडणार आहे
Christina नासाच्या अंतराळ मोहीम 59 अंतर्गत स्थानकात राहायला गेली आणि तिथल्या फिरत्या प्रयोगशाळेतील संशोधनात सहभागी झाली आता नासाच्या मोहीम 60 आणि मोहीम 61मध्येही ती सहभागी होणार असून जवळपास एक वर्षे ती स्थानकात राहून संशोधन करेल
नासाच्या Human Research Program अंतर्गत केल्या जाणाऱ्या प्रयोगा मध्ये Scott Kelly ,Peggy Whitson आणि आता Christina Koch सहभागी झाले आहेत अंतराळातील झिरो ग्रॅविटीत जास्त दिवस राहिल्यावर मानवी शरीरावर काय परिणाम होतो अंतराळवीरांचे शरीर त्याला कसा प्रतिसाद देते त्यांची प्रतिकार शक्ती ,विपरीत परिस्थितीत तग धरून राहण्याची क्षमता ह्या सारख्या अनेक बाबींवर संशोधन केले जात आहे ह्या संशोधनाची संशोधित माहिती दूरवरच्या अंतराळ मोहिमेत जास्तकाळ अंतराळात वास्तव्य करण्यासाठी होणार आहे
Christina स्थानकात  328दिवस वास्तव्य करेल आणि त्या दरम्यान तिच्या शरीरात होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करून आवश्यक सॅम्पल्स पृथ्वीवर पाठवेल
Christina म्हणते की",हा अनुभव तिच्यासाठी exiting आहे! तिचे अंतराळवीर होण्याचे स्थानकात राहण्याचे स्वप्न साकार झाले लहानपणापासूनच तिने अंतराळवीर होण्याचे स्वप्न पाहिले होते खूप,खूप वर्षांपासून ती Peggy Whitson ह्यांची फॅन आहे त्या तिच्यासाठी रोल मॉडेल आहेत तिच्यासाठी त्या हिरोईन आहेत त्यांच्याकडे पाहूनच ती प्रेरित झाली ती म्हणते Peggy च्या पाऊलवाटेवरूनच मीही प्रवास करणार आहे स्थानकात एक वर्ष राहताना मला रोज त्यांची त्यांच्या अनुभवाची आठवण येईल मी त्यांची आणि त्यांच्या सारख्या यशस्वी लोकांची आभारी आहे त्यांच्या मुळेच मला यशाची वाट सापडली आहे त्यांनी त्यांच्या उदाहरणातून कठीण परिस्थितीत बिकट वाट चालत यश कस साध्य करायच हे शिकवल मीही तो अनुभव घेण्यास उत्सुक आहे

Wednesday 1 May 2019

मंगळाला बसले भूकंपाचे धक्के InSight मंगळयानाने भूकंपाचा आवाज केला रेकॉर्ड

       नासाच्या मंगळावर कार्यरत InSight यानातील Seismometer वरील थर्मल शिल्ड -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -23 एप्रिल
भविष्यवेत्यांनी मंगळाला पत्रिकेतील अपशकुनी ग्रह म्हणून कितीही वाईट ठरवले असले तरी शास्त्रज्ञ मात्र मंगळ मोहीम जास्त जोमाने राबवत आहेत आणि सुदैवाने त्यांच्या प्रयत्नांना यश तर मिळत आहेच शिवाय मंगळाविषयीचे गैरसमज दूर करणारे पुरावेही प्राप्त होत आहेत
मंगळावर पुरातन काळी सजीव सृष्टी अस्तित्वात होती पण कालांतराने तिथले वातावरण नष्ट होत गेल्याने सजीव सृष्टीही नष्ट झाली परंतु तिथे अस्तित्वाचे पुरावे मात्र तसेच राहिले नासाच्या मंगळ मोहिमे अंतर्गत मंगळावर  पोहोचलेल्या मंगळ यानाने तिथे असलेल्या दऱ्या,खोरे नदयांचे आटलेले प्रवाह पाण्याचे स्रोत,नदीकाठच्या मातीचे दगडांचे अवशेष खडकातील केमिकल्स,वायू ह्यांचे संशोधित नमुने शोधून त्याचे फोटो आणि माहिती वेळोवेळी पृथ्वीवर पाठवली आहे त्या मुळेच मंगळही पृथ्वीप्रमाणे सूर्यमालेतील एक ग्रह आहे तिथले वातावरण मात्र अत्यंत थंड आहे त्याच्या कक्षेतील विरळ वातावरणात ग्रॅव्हिटी अत्यल्प आहे तिथे वादळी वारे वाहतात,धुळीचे लोट उठतात हि माहिती शास्त्रज्ञांना मिळाली आणी आता मंगळावर पृथ्वीप्रमाणे भूकंपही होतो ह्याचीअत्याधुनिक माहितीही मिळाली आहे
नुकतेच मंगळावरील धुळीच्या प्रचंड वादळाचे फोटो आणि माहिती Opportunity मंगळ यानाने पृथ्वीवर पाठवली होती त्या नंतर त्याचे काम ठप्प झाल्याने हि मोहीम थांबविण्यात आली आणि आता नासाच्या InSight मंगळ यानाने मंगळावरील भूकंपाचा आवाज रेकॉर्ड करून पृथ्वीवर पाठवला आहे
सध्या मंगळावर नासाचे InSight Mars Lander कार्यरत आहे आणि ह्या मंगळ यानाने मंगळावरचे 128 मार्टिन डे अविरत कार्यरत राहून यशस्वीपणे पूर्ण केले आहेत आणि त्याच्या कार्यकाळात पहिल्यांदाच मंगळावर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत
InSight मंगळयानाला बसविलेल्या अत्याधुनिक Seismometer च्या साहाय्याने तेथील भूकंपाची तीव्रता व आवाज रेकॉर्ड करून ह्या यानाने पृथ्वीवर पाठवला आहे सहा एप्रिलला मंगळावर झालेल्या भूकंपाचा हा आवाज आहे प्रथम 14 मार्चला नंतर 6एप्रिल,10एप्रिल आणि 11तारखेलाही असे धक्के जाणवले आहेत
सहा तारखेला भूकंपाची मिळालेली रेकॉर्डेड माहिती जरी उपयुक्त असली तरीही ती धूसर आहे हे भूकंप प्रवण क्षेत्र अत्यंत कमी असल्याने आणि भूकंपाची तीव्रताही कमी असल्यामुळे मंगळाच्या भुपृष्ठा खालील घाडामोडींची
 जास्ती सखोल माहिती उपलब्ध होऊ शकली नाही हा भूकंप जरी कमी तीव्रतेचा असला तरीही तिथल्या शांत वातावरणात भूकंपाचा क्षीण आवाजही रेकॉर्ड झाला आहे बाकीच्या तारखेच्या भूकंपाबद्दल शास्त्रज्ञ सध्या शाशंक आहेत त्यांच्या मते कदाचित ते आवाज तिथे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचे असतील त्या मुळे तेथील भूभागावरच्या  जमीनीवर हालचाली जाणवल्या असतील पण ह्या तीन भूकंपाच्या धक्क्यांचा काळ पाहता हे मंगळावरील भूकंपाचे धक्के असल्याचे जाणवते त्यामुळे शास्त्रज्ञ ह्या माहितीवर अधिक संशोधन करत आहेत
 
          InSight मंगळ यानाने रेकॉर्ड करून पाठवलेली भूकंपाच्या आवाजाची माहिती -फोटो -नाससंस्था

InSightने  सहा एप्रिलला झालेल्या भूकंपाची तीव्रता,क्षेत्र आणि आवाज रेकॉर्ड करून पाठवल्याने शास्त्रज्ञ
आनंदित  झाले असून आता मंगळावरील भूकंप हा नवीन विषय संशोधकांना संशोधित करण्यासाठी मिळाला आहे त्या मुळे ते उत्साहित झाले आहेत ही माहिती त्यांच्यासाठी आणि आगामी मंगळ मोहिमेसाठी मैलाचा दगड ठरेल अशी आशा ते व्यक्त करतात
19 डिसेंबर 2018 ला InSight मंगळ यानावर बसविलेला Seisometer यानाने मंगळाच्या पृष्ठभागावर land केला  कारण मंगळाच्या भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातील घडामोडी आणि तिथल्या Rocky World ची माहिती आणि मातीचे आणि खडकांचे नमुने गोळा करणे हा हेतू होता आणि आता ह्या मिळालेल्या माहितीचे संशोधन शास्त्रज्ञ करीत आहेत मंगळावरील सूक्ष्म घडामोडींचे क्षीण आवाज आणि जमिनीचे तडकणे किंवा इतर आवाज रेकॉर्ड व्हावे या साठी खास डिझाईन केलेला Seismometer InSight यानात बसविण्यात आला आणि त्याचे रिझल्ट खरोखरच उत्साहजनक आहेत आम्ही कित्येक दिवसांपासून अशा सिग्नलची आतुरतेने वाट पाहात होतो कारण पृथ्वीप्रमाणे मंगळ आणि चंद्र ह्या ग्रहांवर Tectonic Plates नाहीत ह्या प्लेट्समधील अंतर्गत घडामोडीमुळे पृथ्वीवर भूकंप होतो
मंगळ ग्रहावर मात्र अत्यंत विरळ वातावरण आहे तिथे उष्णताही कमी आहे थंड आहे अजूनही मंगळाचा पृष्ठभाग थंड होत असतो त्या मुळे तेथील पृष्ठभाग सतत थंड आणि आकुंचित होतो आणि हि प्रक्रिया सतत चालू असते त्या दरम्यान जर प्रचंड हवेचा किंवा इतर दाब निर्माण झाला तर तेथील भूभाग तडकतो
सुरवातीला हा आवाज वाऱ्याचा असावा असे शास्त्रज्ञांना वाटले पण नंतर मिळालेल्या माहितीचे संशोधन केल्यावर हा भूकंप होता ह्याची खात्री त्यांना पटली त्यांच्या मते मंगळ ग्रह अजूनही Seismically active असल्याचा हा ठोस पुरावा आहे त्या मुळे भविष्यातील मानवासहित मंगळ मोहीम आणि मंगळावरील मानवी वस्ती निर्माण करण्याचे शास्त्रज्ञाचे स्वप्न नक्कीच साकार होईल अशी आशा त्यांना वाटते