Sunday 24 March 2019

अंतराळवीर Nick Hague आणि Anne McClain ह्यांचा Space Walk यशस्वी

Spacewalkers Nick Hague and Anne McClain
 अंतराळवीर Nick Hague आणि Anne McClain अंतराळात Space Walk करताना फोटो -नासा संस्था

नासा संस्था -22 मार्च
नासाच्या अंतराळ मोहीम 59 चे flight Engineers Nick Hague आणि Anne McClain ह्यांनी अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेला Space Walk सुरळीतपणे पार पडला
22मार्चला सकाळी 8.01a,m.ला दोन्हीही अंतराळवीरांनी Space Walk ला सुरवात केली आणि दुपारी 2.40 p.m.ला सर्व काम पूर्ण करून त्यांनी Space Walk संपवला विशेष म्हणजे ह्या स्पेसवॉकचे नेहमीप्रमाणेच नासा T.V. वरून लाईव्ह प्रसारण करण्यात आले होतेच शिवाय स्पेसवॉक पाहणाऱ्या नागरिकांना लाईव्ह चॅट ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती आणि प्रश्न विचारण्याची आणि कमेंट्स करण्याची मुभाही त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
सहा तास 39मिनिटांच्या ह्या स्पेसवॉक दरम्यान अंतराळवीरांनी अनेक कामे पूर्ण केली त्यांनी प्रथम अंतराळस्थानकाबाहेरील कचरा साफ केला नंतर त्यांनी अंतराळस्थानकाच्या बाहेरील भागातील solar Arrays  वरील जुन्या बॅटरिज बदलून नव्या बॅटरिज बसवल्या जुन्या बॅटरिज Nickel hydrogen च्या होत्या तर नवीन बॅटरिज Lithium -ion च्या आहेत ह्या बॅटरिज जास्त पॉवरफुल व कमी वजनाच्या आहेत शिवाय त्यांचा आकार लहान असल्याने त्या कमी जागा व्यापतात त्या मुळे जागेची बचत होते
ह्या बॅटरीज अंतराळस्थानकाला बसवलेल्या सौर उर्जेवर चार्जित व कार्यान्वित होतात जेव्हा सूर्य प्रकाश नसतो तेव्हा अंधारात अंतराळस्थानक प्रकाशमान करण्यासाठी ह्या बॅटरीजचा उपयोग केल्या जातो
प्रथमच स्थानकाबाहेरील बारा Nickel बॅटरीजच्या जागी सहा Lithium बॅटरीज बसविण्यात आल्या त्यातील तीन बॅटरीजच्या केबल कनेक्शन साठी adapter plate बसवण्यात आल्या
सप्टेंबर मध्ये स्थानकात आलेल्या जापनीज कार्गोशिप मधून ह्या बॅटरीज स्थानकात पाठवण्यात आल्या होत्या
 ह्या सर्व कामासाठी रोबोटिक आर्म आणि रोबोटिक कॅमेऱ्याचा उपयोग करण्यात आला
अंतराळवीरांनी Solar Arrays वरच्या ब्लॅंकेट बॉक्सच्या केबल ओढून बाँक्स पुन्हा व्यवस्थित फिट केला शिवाय स्थानकाबाहेरील थर्मल कव्हरचे फोटो काढले हे थर्मल कव्हर स्पेसवॉक दरम्यान उघडल्या व झाकले जाते
अंतराळ स्थानकाच्या दुरुस्तीसाठी अंतराळवीरांनी केलेला हा 214वा स्पेसवॉक होता Anne McClain आणि Nick Hague ह्या दोघांचाही हा पहिलाच स्पेसवॉक होता ह्या स्पेसवॉक साठी Anne हिने घातलेल्या स्पेससूट वर लाल रंगाच्या strips होत्या तर Nick Hague ह्यांच्या सूटवर मात्र strips नव्हत्या
आता 29 मार्चला अंतराळ स्थानकाच्या देखभालीसाठी पुन्हा स्पेसवॉक केल्या जाईल आणि विशेष म्हणजे हा स्पेसवॉक Anne McClain व Kristina Koch ह्या दोन महिला Astronauts मिळून करणार आहेत आणि अमेरिकेतील इतिहासात पहिल्यांदाच दोन महिला एकत्रित हा अंतराळ स्पेसवॉक करणार असल्याने हा स्पेसवॉक ऐतिहासिक ठरणार आहे

Friday 15 March 2019

अंतराळवीर Nick Hague,Christina Kochआणी Alexey Ovichinin हे तीनही अंतराळवीर अंतराळ स्थानकात पोहोचले

 Expedition 59 Welcome Ceremony
 अंतराळ स्थानकात Anne McClain ,Oleg Konoenko आणि David Saint नवे अंतराळवीर Nick Hague ,Christina Koch आणि Alexey Ovichinin ह्यांच्या सोबत फोटो -नासा संस्था
 
नासा संस्था -15 मार्च
नासाच्या अंतराळ मोहीम 59 चे अंतराळवीर Nick Hague अंतराळवीरांगना Christina Koch आणि अंतराळवीर Alexey Ovichinin 14 मार्चला अंतराळस्थानकात सुखरूप पोहोचले आहेत
कझाकस्थानातील बैकोनूर येथील  Cosmodrome वरून  Soyuz MS-12 ह्या अंतराळयानातून दुपारी 3.14मिनिटाला त्यांनी अंतराळस्थानकाकडे प्रयाण केले उड्डाणानंतर त्यांच्या सोयूझ यानाने पृथ्वीभोवती चार परिक्रमा पूर्ण केल्या आणि सहा तासांनी 9.01 वाजता यान अंतराळ स्थानकाच्या Rassvet Module जवळ पोहोचले
स्थानकातील Anne McClain ,David Saint आणि Oleg Kononenko ह्या तीन अंतराळवीरांनी स्थानकाचे hatch उघडून ह्या नव्या तीन अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत केले 11.10 वाजता अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला Christina Koch हिने प्रथम अंतराळस्थानकात प्रवेश केला नंतर Nick आणि Alexey ह्यांनी स्थानकात प्रवेश केला तेव्हा स्थानकातील अंतराळवीरांनी त्यांचे हसत स्वागत केले
नव्या तीन अंतराळवीरांच्या आगमनानंतर आता अंतराळस्थानकातील अंतराळवीरांची संख्या सहा झाली असून हे सहाहीजण मिळून एकत्रित तिथे सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी होतील
हे अंतराळवीर स्थानकात सहा महिने वास्तव्य करतील अंतराळवीरNick Hague ,Christina Koch आणि Anne McClain अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी ह्या महिन्यात Space Walk करतील
मार्च मध्ये 22आणि 29 तारखेला आणि एप्रिलच्या 8 तारखेला हे Space Walk केल्या जातील 29 मार्चच्या Space Walk मध्ये Anne McClain आणि Christina Koch ह्या दोन अंतराळवीरांगना  सहभागी होतील त्या मुळे महिला Space Walker च्या इतिहासात प्रथमच दोन महिलांनी एकत्रित केलेला हा पहिला Space Walk असेल
अंतराळवीर David Saint ,Anne McClain आणि Oleg Kononenko हे तीनही अंतराळवीर जूनपर्यंत स्थानकात वास्तव्य करतील 
अंतराळवीर Nick Hague ह्यांची हि दुसरी अंतराळवारी आहे ह्या आधी Oct मध्ये अंतराळ स्थानकाकडे जाताना त्यांच्या अंतराळयानात बिघाड झाल्यामुळे त्यांना अर्ध्यातूनच  पृथ्वीवर परतावे लागले होते
अंतराळवीर Ovichinin ह्यांची ही तिसरी अंतराळवारी आहे तर Christina Koch मात्र पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेली आहे
ह्या तिघांची 2013 मध्ये नासा संस्थेत निवड झाली होती अंतराळ स्थानकात राहायला जाण्याआधीचे आवश्यक  ट्रेनिंग त्यांनी नुकतेच पूर्ण केले आहे

Friday 8 March 2019

Mike Pence ह्यांनी अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधून Space X Dragon च्या यशस्वीतेसाठी केले अभिनंदन


Vice President Mike Pence and NASA Administrator Jim Bridenstine
Vice President Mike Pence व  Jim Bridenstine अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधताना फोटो-नासा संस्था

नासा संस्था -7 मार्च
नासाचे प्रमुख Jim Bridenstine आणि Vice President Mike Pence ह्यांनी सहा मार्चला स्थानकातील अंतराळवीर David Saint आणि Anne McClain ह्यांच्याशी लाईव्ह संवाद साधला
ह्या संवादादरम्यान त्यांनी अमेरिकन मेड पहिल्या Space X Dragonच्या स्थानकातील आगमन बद्दल आणि त्याच्या कार्यक्षमतेबद्दल अनेक बाबींची माहिती जाणून घेतली आणि Space X Dragon चे अंतराळ स्थानकात व्यवस्थित डॉकिंग करून चाचणी यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले
Pence म्हणाले,"अमेरिकेने हे पहिले Space X Crew Dragon बनवून अंतराळविश्वात मोलाची कामगिरी केली आहे भविष्यातील अंतराळ मोहिमेसाठीचे हे ऐतिहासिक पाऊल अत्यंत उपयुक्त ठरेल ह्या पुढच्या अंतराळवीरांच्या अंतराळ प्रवासासाठी हे यश मैलाचा दगड ठरेल ह्यात शंका नाही!
हे अंतराळ यान बनवणारे Engineers ,तंत्रज्ञ शास्त्रज्ञ आणि पार्टनर्स हे सारेच ह्या यशामुळे अभिनंदनास पात्र आहेत,ह्या पुढे अमेरिकन अंतराळवीर अमेरिकेच्या भूमीवरून अमेरिकेने बनवलेल्या अंतराळ यानातून अंतराळात भरारी मारतील ह्यात शंका नाही "!
Jim Bridenstine ह्यांनी देखील अशीच प्रतिक्रिया व्यक्त करत हे यश निश्चितच स्पृहणीय असल्याचे सांगितले
आणि अंतराळवीरांशी Mike Pence ह्यांना संवाद साधायचा आहे असे सांगत अंतराळवीरांचा त्यांच्याशी लाईव्ह संपर्क साधून दिला.

अंतराळवीर David Saint आणि Anne McClain स्थानकातून Mike Pence ह्यांच्याशी संवाद साधताना
-फोटो नासा संस्था

 Mike Pence ह्यांनी अंतराळ वीरांचे पुन्हा एकदा अभिनंदन करत त्यांना काही प्रश्न विचारले
तुम्ही ह्या मोहिमेत सहभागी आहात तुम्हाला ह्या बद्दल काय वाटते ?
तुम्ही ह्या Space X अंतराळयानात जाऊन पाहिले तेव्हा कसे वाटले ?
काही त्रुटी जाणवल्या का ? काही सुधारणा आवश्यक आहेत का ?
आता अंतराळवीर ह्यातून सुरक्षितपणे अंतराळ प्रवास करू शकतील का ?
काही अडचणी उद्भवतील का ? यानात अस्वस्थता जाणवली का ?
ह्या प्रश्नांना उत्तरे देताना
 Anne McClain - म्हणाली कि,आम्ही तिघांनीही ह्या अंतराळ यानाचे स्थानकात व्यवस्थित डॉकिंग केले तेव्हा काहीही अडचण आली नाही,अस्वस्थता जाणवली नाही ! हे यान अत्यंत कुशलतेने बनवलेले असल्याने त्यात काहीही त्रुटी जाणवल्या नाहीत अंतराळवीर ह्या यानातून सुरक्षित प्रवास करू शकतील ह्यात पृथ्वीवरून आलेला Ripley हा डमी तर मला खूप आवडला तो उत्कृष्ठतेचा उत्तम नमुना आहे म्हणून हा डमी बनवणाऱ्या तंत्रज्ञाचे मला विशेष कौतुक करावेसे वाटतेय त्याला मानवा प्रमाणे बसवलेल्या सेन्सर्स मुळे अंतराळातील झिरो ग्रॅव्हिटीचा मानवी आरोग्यावर होणारे परिणाम गोळा करताना अचूकता येईल हे अंतराळ यान बनवणारी कंपनी त्यातील सहभागी चमू खरोखरच अभिनंदनास पात्र ठरतात अमेरिकेच्या इतिहासातील हा ऐतिहासिक क्षण खूप मोलाचा आणि आनंददायी आहे! अमेरिकेसाठी गौरवास्पद आहे! ह्याचा उपयोग आगामी अंतराळ मोहिमांना होईल आम्हाला ह्या Space X Dragon ची चाचणी करायला मिळाली हे आमचे भाग्य आहे त्या मुळे आम्हाला हि संधी दिल्याबद्दल आम्ही नासा संस्थेचे आभारी आहोत असही तिने म्हटले
Mike pence ह्यांनी Anne ला तू महिला Astronaut आहेस,तुझ्या Space Walkची तयारी झाली का ? आता सध्या काय संशोधन करत आहेस ? असे विचारले तेव्हा
Anne म्हणाली - हो ! आता येणाऱ्या Space Walk ची आम्ही तयारी करतोय,Space Suite रेडी आहे असे सांगून तिने तिथे सुरु असलेल्या संशोधनाबद्दल त्यांना आवश्यक माहिती दिली
Mike Pence -ह्यांनी  David Saint ह्यांच्याशीही संवाद साधत
तुम्हाला Space X Dragon कसे वाटले ? तुम्हीही Space X  यानात जाऊन पाहिलेत ना ! असे विचारले
David Saint -म्हणाले ,खूपच छान ! आणि अमेरिकन अंतराळवीरांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे Space X Dragon आहे मलाही ह्या Space X  बनवणाऱ्या साऱ्यांचे अभिनंदन करावेसे वाटतेय आमच्या प्रमाणेच आमच्या नंतरच्या भावी अंतराळवीरांना ह्या यानाचा नक्कीच फायदा होईल
शिवाय नासा संस्थेतील इतर देशातील अंतराळवीरांच्या अंतराळ प्रवासासाठीही हे अंतराळ यान अत्यंत मोलाचे आणि उपयुक्त ठरेल
त्या नंतर Mike Pence ह्यांनी दोघांनीही त्यांचा अमूल्य वेळ देऊन संवाद साधल्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार  मानले आणि  तुम्ही अंतराळवीर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झिरो ग्रॅव्हिटीत मानवी आरोग्यासाठी उपयुक्त संशोधन करता म्हणून त्यांचे विशेष आभार मानून अभिनंदन केले आणि त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या शिवाय तब्येतीची काळजी घेण्याची सूचनाही दिली
दरम्यान शुक्रवारी 2.31 a.m.(EST) वाजता Space X Dragon स्थानकातील मुक्काम आटोपून पृथ्वीच्या दिशेने अंतराळात झेपावेल आणि पृथ्वीवर 8.45 a.m.(EST)वाजता पोहोचेल आणि Atlantic महासागरावर पोहोचताच अंतराळयान पॅराशूटच्या साहाय्याने सुमुद्रात उतरवले जाईल
अंतराळवीरांनी अंतराळ यान पृथ्वीवर पाठवण्यासाठीची तयारी पूर्ण केली असून लवकरच हे यान पृथ्वीवर सुखरूप परतेल ह्या ऐतिहासिक क्षणाचे लाईव्ह प्रक्षेपण नासा T.V. वरून करण्यात येणार आहे

नासाच्या पहिल्या कमर्शियल Crew Space Craft ची चाचणी यशस्वी

https://www.nasa.gov/sites/default/files/thumbnails/image/screen_shot_2019-03-02_at_3.04.41_am.png
नासाचे पहिले अमेरिकन बनावटीच्या Space X Dragon अंतराळयानाच्या लाँचिंगच्या वेळेस जमलेले नागरिक
फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 4 मार्च
नासा संस्थेचे पहिल्या अमेरिकन बनावटीच्या Space X Dragon ह्या अंतराळवीरांच्या अंतराळ प्रवासासाठी बनवलेल्या अंतराळयानाची उड्डाण चाचणी यशस्वी झाली आहे
अमेरिकेच्या पहिल्या Crew Program अंतर्गत मानव विरहित Space X Crew Dragon अंतराळयान स्थानकाकडे शनिवारी रवाना झाले नासाच्या अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केनडी स्पेस सेन्टर येथून शनिवारी 2.49a.m.(EST) वाजता Space X Dragon स्थानकाकडे झेपावले आणि रविवारी सकाळी स्थानकात पोहोचले
अंतराळस्थानकात सध्या राहात असलेले अंतराळवीर David Saint, Anne McClain आणि Oleg Konenonko ह्या तीन अंतराळवीरांनी ह्या यानाची स्थानकाशी यशस्वी जोडणी केली
Space X अंतराळयान स्थानकाजवळ पोहोचताच स्थानकाची खिडकी उघडून रोबोटिक आर्मच्या साहाय्याने यान स्थानकाशी जोडण्यात आले त्या नंतर दोन तासांनी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून अंतराळवीरांनी अंतराळ सूट व ऑक्सिजन मास्क घालून स्पेस X मध्ये प्रवेश केला त्या नंतर यानाची अंतर्गत सुरक्षा व इतर बाबींची पाहणी करून यानातील हवेचे नमुने गोळा केले शिवाय यानातून आलेल्या 400 पाऊंड वजनाचे अंतराळवीरांसाठी आवश्यक असलेल्या सामानाचे पार्सलही काढले काम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी मास्क काढले त्या नंतर त्यांनी नासा संस्थेशी संपर्क साधून आवश्यक माहिती दिली
Expedition 58 welcomes Crew Dragon
अंतराळस्थानकातील अंतराळवीर Space X Dragon च्या डॉकिंगची सोया करताना -फोटो-नासा संस्था

ह्या यानाच्या प्रथम व्यावसायिक उड्डाणाआधी यानाच्या कार्यक्षमतेची चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वी ठरली हे उड्डाण चाचणी घेण्यासाठी करण्यात आल्याने Space X मध्ये अंतराळवीरांऐवजी डमीला पाठवण्यात आले 1979साली हॉलिवूड फिल्मच्या एलियन नावावरून ह्या डमीचे नाव रिपले असे ठेवण्यात आले
ह्या डमीला मानवा प्रमाणे सेन्सर बसवण्यात आल्यामुळे मानवाला अंतराळ सैर करताना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल ह्याची माहिती मिळेल
हे यान पाच दिवस अंतराळस्थानकात राहून शुक्रवारी पृथ्वीवर परतेल त्या दरम्यान ह्या यानामार्फत तिथली माहिती गोळा केल्या जाईल Space X ह्या अंतराळयानाचे डिझाईन अंतराळस्थानकात 210 दिवस राहता येईल असे केले आहे परंतु हि फक्त व्यावसायिक चाचणी असल्याने हे यान फक्त पाचच दिवस स्थानकात राहील
लवकरच उन्हाळ्यात ह्या यानातून अंतराळवीर स्थानकाकडे उड्डाण करतील त्या साठी अंतराळवीर आणि वैमानिकांची निवडही निश्चित झाली आहे
2011नंतर प्रथमच पहिले अमेरिकन बनावटीचे व्यावसायिक अंतराळयान अमेरिकेहून अंतराळस्थानकाकडे यशवीपणे झेपावले 2011मध्ये अमेरिकेने स्पेस शटल मोहीम बंद केली होती त्या मुळे नासाचे अंतराळवीर रशियाच्या भूमीवरून सोयूझ अंतराळयानातून अंतराळप्रवास करत होते
आता ह्या नव्या Space X Dragon मोहिमेमुळे अमेरिकन अंतराळवीर अमेरिकेच्या भूमीवरून अवकाशात यशस्वी झेप घेतील आणि नव्या युगातील अंतराळमोहिमेत अमेरिकेला प्रभुत्व मिळेल आता अमेरिका स्वयंपूर्ण झाला आहे असे नासा प्रमुख Jim Bridenstine म्हणाले
Boeing CST-100 Star line Space Xआणि Crew program ह्या दोन कंपन्यांनी मिळून ह्या यानाची निर्मीती केली आहे भविष्यात इतर देशातील अंतराळवीरांना अंतराळ प्रवासासाठी ह्या यानाचा व्यावसायिक उपयोग करण्यात   येणार आहे शिवाय भविष्यात सामान्य हौशी नागरिकांनाही ह्या अंतराळयानातून अंतराळ सैर करता येणा