Sunday 17 February 2019

अंतराळवीर Nick Hague, Christina Koch आणि Alexey Ovichinin मार्च मध्ये अंतराळ स्थानकात जाणार जाण्याआधी पत्रकारांशी साधणार संवाद

 NASA astronauts (from left) Christina Koch and Nick Hague
       नासाची महिला Astronaut Cristina Koch आणि अंतराळवीर Nick Hague -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -13 Feb.
नासाच्या अंतराळ मोहीम 59 चे अंतराळवीर Nick Hague ,Cristina Koch आणि रशियन अंतराळवीर Alexey Ovchinin हे 14 मार्चला अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत अंतिम ट्रेनींगसाठी जाण्याआधी 22 फेब्रुवारीला ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत आणि त्यांच्या ह्या मोहिमेबद्दल माहिती देणार आहेत त्यांच्या ह्या संवादाचे लाईव्ह प्रसारण नासा T V वरून करण्यात येईल
हे तीनही अंतराळवीर 14 तारखेला MS-12 ह्या सोयूझ अंतराळ यानातून अंतराळस्थानकाकडे प्रयाण करतील कझाकस्थानातील बैकोनूर ह्या Cosmodrome वरून त्यांचे सोयूझ यान अंतराळ स्थानकाकडे झेपावेल
26 तारखेला त्यांच Final Pre Launch training सुरु होईल त्या आधी ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत
अंतराळवीर  Nick Hague ह्यांनी ह्या आधी 11 ऑक्टोबरला नासाच्या अंतराळ मोहिमेअंतर्गत अंतराळस्थानकात  जाण्यासाठी अंतराळस्थानकाकडे सोयूझ यानातून उड्डाण केले होते पण अचानक यानातील यंत्रणेत बिघाड झाल्याने अर्ध्या तासातच त्यांना पृथ्वीवर परतावे लागले होते सुदैवाने दोन्हीही अंतराळवीर सुखरूप पृथ्वीवर उतरले होते आता त्यांना पुन्हा एकदा स्थानकात जाण्याची संधी मिळाली आहे Hague दुसऱ्यांदा स्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत
रशियन अंतराळवीर Alexey Ovchinin ह्यांची हि तिसरी अंतराळवारी आहे तर Cristina Koch मात्र पहिल्यांदाच स्थानकात राहायला जाणार आहे
Christina अमेरिकेतील North Carolina मधील रहिवासी आहे तीने BE Electrical Engineer आणि Physics ची पदवी घेतली असून तिने Electrical Engineer मध्ये ME केले आहे नासाच्या Space Flight Center मधील तिच्या करिअर दरम्यान तिने Space Science Instrument Design वर विशेष भर दिला शिवाय तिने US Antarctic Program मध्ये Research Associate म्हणून आणि  Field Engineer म्हणून आर्क्टिक पोल वर काम केलय
2013 मध्ये तिचे नासा संस्थेत सिलेक्शन झाले होते आणि आता ती ट्रेनिंग पूर्ण करून अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जाणार आहे
सध्या अंतराळस्थानकात Anne Mc Clain राहत असल्याने ती गेल्यावर अंतराळस्थानकात पुन्हा एकदा दोन महिला Astronauts एकत्र येतील आणि मिळून संशोधन करतील ह्या आधी सेरेना आणि Anne अल्पकाळ स्थानकात एकत्रित राहिल्या होत्या


No comments:

Post a Comment