Friday 15 February 2019

Opportunity Rover मंगळ यानाचा शानदार निरोप,मोहीम थांबवण्याचा नासाचा निर्णय

 pia04413.jpg
             मंगळ ग्रहांच्या भूमीवर कार्यरत असलेले Opportunity Rover -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 13 Feb.
गेल्या पंधरा वर्षांपासून अखंडितपणे यशस्वी कामगिरी पार पाडून अत्यंत उपयुक्त माहिती संशोधित करणाऱ्या नासाच्या Opportunity Rover ने आता आपले काम थांबवले आहे मंगळावरील धुलीवादळाला सामोरे जात त्याही अवस्थेत तिथले फोटो घेऊन पृथ्वीवर पाठवत Opportunity Rover ने शानदार निरोप घेतला आहे त्या मुळे नासा संस्थेने आता Opportunity मंगळ मोहीम थांबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे
जून महिन्यात मंगळ ग्रहावर प्रचंड धुळीवादळ उठले होते तेव्हा त्याचा पृथ्वीवर शेवटचा संपर्क झाला होता तिथल्या प्रचंड धुळीच्या वादळातही ह्या मंगळयानाने तिथले फोटो घेऊन पृथ्वीवर पाठवल्यामुळे मंगळावरील धुळीच्या वादळाची तीव्रता,आवाज आणि तिथली स्थिती शास्त्रज्ञांना जाणून घेता आली पण त्या नंतर तिथल्या कमी प्रकाशाने सौर उर्जेवर कार्यरत असलेले हे मंगळ यान क्षीण झाले आणि त्याचे काम ठप्प झाले कार्यप्रणाली बंद पडली
त्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून नासाच्या Jet Propulsion Lab मधील Space Flight Operation विभागातील engineers नी  हजारो कमांड्स देऊन Opportunity Rover शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला
दहा जूनला Opportunity मंगळ यानाचा पृथ्वीशी शेवटचा संपर्क झाला होता मंगळावरील धुळीवादळात Opportunity यानाची ट्रान्समिशन क्षमता क्षीण झाली असल्यामुळे पुन्हा हे यान कार्यक्षम होण्यात अपयश आले
24 जानेवारी 2004 मध्ये Opportunity Rover मंगळ यान मंगळ ग्रहाकडे झेपावले होते सुरवातीला शास्त्रज्ञांनी ह्या मंगळयानाचा कार्यकाळ फक्त तीन महिने अपेक्षित केला होता पण Opportunity Rover ने पंधरावर्षे अखंडित कार्यरत राहून शास्त्रज्ञांना आश्चर्यचकित केले Opportunityच्या अनपेक्षित यशस्वीतेमुळे शास्त्रज्ञांनी त्याचा कार्यकाळ वाढवून हि मोहीम चालूच ठेवली होती आता 2020 मध्ये नासा संस्था मंगळ ग्रहावर पुन्हा मंगळ यान पाठवेल
नासाचे प्रमुख Jim Bridenstine म्हणाले Opportunity Rover च्या पंधरा वर्षांच्या अनपेक्षित यशस्वी कामगिरीमुळे भविष्यात मानव मंगळावर पाऊल ठेवेल तेव्हा Opportunity Rover च्या तिथल्या अस्तित्वाच्या पाऊल खुणा त्यांना मार्गदर्शक ठरतील
मंगळ ग्रहांच्या भूपृष्ठावर एक किलोमीटर अंतर पार करण्याची क्षमता असलेल्या ह्या मंगळ यानाने शास्त्रज्ञांचा कयास खोटा ठरवत पंचेचाळीस किलोमीटर अंतर पार करून तिथली उपयुक्त माहिती संशोधित केली आहे  मंगळावरील पुरातन काळातील अस्तित्वात असलेल्या दऱ्या,खोरे, तिथले वातावरण आणि आता आटलेले पण पूर्वी अस्तित्वात असलेले पाण्याचे स्रोत,माती,खडक आणि मिनरल्सचे नमुने शोधून त्याचे फोटो घेऊन पृथ्वीवर पाठवले आहेत शिवाय आजवर शास्त्रज्ञांना माहीत नसलेली संशोधित अत्याधुनिक उपयुक्त माहिती Opportunity यानाने पृथ्वीवर पाठवली आहे त्याचा उपयोग आगामी मंगळ मोहिमेसाठी आणि मंगळावरील मानवी निवासासाठी होणार आहे
पण आता ह्या यानातील यंत्रणा बंद पडली असल्याने हि मोहीम थांबवण्यात आल्याची माहिती नासा संस्थेकडून देण्यात आली आहे

No comments:

Post a Comment