नासाच्या अंतराळमोहीम 58 ची महिला Astronaut Anne McClain स्थानकाच्या Cupola Module मध्ये
फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 17 Feb.
नासाच्या अंतराळ मोहीम 58 अंतर्गत सध्या अंतराळस्थानकात राहात असलेली महिला Astronaut Anne McClain हिने नुकताच स्थानकातून पृथ्वीवर लाईव्ह संवाद साधला Washington D.C. येथील Georgetown Day School मधील छोट्या मुलांशीआणि फ्लोरिडा मधील विद्यार्थ्यांशी तिने नुकताच संवाद साधला आणि त्यांच्या कुतूहल मिश्रीत प्रश्नांना कधी प्रात्यक्षित करून दाखवत तर कधी त्या मागच सायंटिफिक कारण समजावुन सांगत दिलखुलासपणे उत्तरे दिली ह्या महिन्यात तिच्या संशोधनाच्या कामातून मिळालेल्या रिकाम्या वेळात बऱ्याचदा तिने वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधला आणि अंतराळवीरांच्या स्थानकातील वास्तव्यासंदर्भात माहिती दिली त्याचाच हा वृत्तांत
What do you eat in space ? and just what does one do all day in space ?
तुला लहानपणापासूनच astronaut व्हायच होत का ?
तुझ्या आवडीच फूड कोणत ? तुम्ही काय आणि कस खाता?
तुम्ही कसे झोपता ? चालता ? तुम्हाला वेळ कशी कळते ?
या सारख्या अनेक प्रश्नांना तिने दिलेली उत्तरे
Anne -McClain म्हणते
-हो! मी लहानपणी जेव्हा तुमच्या वयाची होते आणि माझा शाळेतला पहिला दिवस होता तेव्हाच मी सांगून टाकल होत कि मला Astronaut व्हायचय !
त्या वेळेस त्यांना एक प्रोजेक्ट होता तेव्हा तिने एक पुस्तक लिहल होत Flying to Space On the Soyuz Vehicle ते तीच स्वप्न होत आणि आज ती स्थानकातून रोज पृथ्वीला फेऱ्या मारते आणि स्थानकातील झिरो ग्रॅव्हिटी मध्ये तरंगत्या अवस्थेत राहतेय
ती म्हणते लहानपणी पाहिलेल स्वप्न कधी कधी प्रत्यक्षात उतरत हे मी माझ्या अनुभवावरून सांगतेय
जेव्हा खरोखरच प्रथमच मी अंतराळयानातून अंतराळ प्रवासाला निघाले आणि मागे वळून पृथ्वीकडे शेवटच पाहिल तेव्हा मला जाणवल आज मी आणि माझ स्वप्न यात कोणीही नाही!
त्या वेळेसच्या क्षणाच वर्णन शब्दातीत आहे! तो अभुतपुर्व अलौकिक अनुभव शब्दात व्यक्त करण अवघड आहे !
McClain आता 39 वर्षांची आहे आणि लहानपणी पाहिलेल्या स्वप्नांचा अनुभव ती प्रत्यक्षात घेतेय हे खरंच अविश्वसनीय आहेआणि आनंददायीही
अंतराळस्थानकातून दररोज ती पृथ्वीभोवती सोळा वेळा फेऱ्या मारते आणि दर पंचेचाळीस मिनिटांनी ती सूर्याला उगवताना आणि मावळताना पाहते त्यांचा दिवस 45मिनिटांचा असतो
स्थानकाच्या खिडकीतून चंद्राकडे पाहण तिला जास्त आवडत चंद्र उगवताना आणि मावळताना पाहताना ती आश्चर्यचकित होते कारण चंद्राच उगवण,मावळण इतक फास्ट असत अगदी उडी मारल्यागत चंद्र कधी क्षितीजाच्या वर तर कधी खाली असतो तर कधी क्षितिजावर दिसतो हे पाहण फार गमतीशीर असत
अंतराळस्थानकात अंतराळवीर तरंगत्या अवस्थेत कसे वावरतात,फिरताना शरीर स्थानकाच्या भिंतीवर धडकून इजा होऊ नये म्हणून कशी काळजी घेतात छताला कसे पकडतात मागे पुढे जाताना काय ट्रिक करतात उलट्या अवस्थेतही ते कसे बोलू चालू शकतात व्यायाम कसे करतात वस्तू कशा पकडतात कसे खातात पाणी कसे पितात हे तिने विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवल
अंतराळ स्थानकात पाकिटबंद प्रिझर्व केलेल अन्न मिळत अन्नाचे दोन प्रकारचे पाउच असतात एक shelf stabilized असत ते उघडून चमच्याने काढून डायरेक्ट खाता येत तर दुसर पाउच ड्राय अन्नाच असत ते उघडून त्यात स्पेस स्टेशन मधल पाणी मिसळून पातळ करून खाता येत आम्हाला कार्गोशिप मधून अन्नाची पाकीट येतात शेकडो प्रकारचे अन्न पदार्थ अंतराळवीरांसाठी आलटून पालटून पाठवले जातात त्यांच्या चवीत आवश्यक बदल करून ते टेस्टी बनवले जातात त्या मुळे एकाच प्रकारचे अन्न खाण्याचा कंटाळा अंतराळवीरांना येत नाही
Anne ला Chicken with peanut sauce,Chicken आणि Mushroom soup ,turkey tetrazzmi हे पदार्थ विशेष आवडतात
Anne म्हणते अंतराळवीर स्लीपिंग बॅग मध्ये झोपतात आणि बॅग स्थानकाच्या भिंतीला attach करतात नाहीतर ते तरंगत राहतील आणि झोपेत कोठेही धडकून त्यांना इजा होईल पण त्यांचे हात मात्र बाहेर तरंगत असतात ते खूप फनी दिसत जिथल्या भागात स्पेस सटेशन असत तिथली वेळ त्यांच्या घड्याळात दिसते अंधार उजेड पाहून रात्र दिवस समजतो आम्ही दिवसभरात सहा सात तास झोप घेतो पृथ्वीपेक्षा जरा कमी वेळ पण सकाळी आम्ही पुन्हा फ्रेश होऊन कामाला सुरवात करतो
आपण इतके दिवस पृथ्वीवर चालत असतो आणि अचानक एक दिवस अंतराळात तरंगत असतो हे खरंच स्वप्नवत असत रोज आजूबाजूच्या ताऱ्यांच्या सोबतीने तरंगत्या अवस्थेत दिवस घालवतानाचा अनुभव विलक्षण असतो रोजचा नवा दिवस माझ्यासाठी Good Day असतो सुंदर असतो
पृथ्वीवरून हजारो शास्त्रज्ञ तंत्रज्ञ आमच्या सुरक्षिततेसाठी सतत प्रयत्न करत असतात आवश्यक त्या सूचना देत असतात आम्ही नासा संस्थेत वेगवेगळ्या देशांच्या अंतराळवीरांसोबत काम करतो त्या सर्व देशांचे झेंडे स्थानकात मागे लावलेले आहेत हे तिने दाखवले आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आम्ही सुटी घेतो तेव्हा आवडीची कामे करतो स्पेस स्टेशन मधल्या veggie चेंबर मधल्या झाडांची भाजीची निगा राखतो कधी कधी आवडीचे सिनेमे पाहतो आमच्या घरच्यांशी मित्रांशी संवाद साधतो
तू ह्या मुलांना काय संदेश देशील असं विचारल असता ती म्हणाली
ती तिच्या तरुण फॅन्सला,विध्यार्थ्यांना सांगते कि, तुम्ही आवश्य स्वप्न पहा आपल ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करा ते सत्यात उतरण्यासाठी आवश्यक ते कष्ठ करा मध्येच सोडून न देता सतत त्या दिशेने प्रयत्न करत राहा तेव्हाच ते प्रत्यक्षात येईल
Anne नेहमीच सोशल मीडिया वरून तिच्या चाहत्यांशी संपर्क साधते आणि तिथल्या कामाची लेटेस्ट माहिती शेअर करते नुकतीच तिने अंतराळस्थानकातून कार्गोशिप पृथ्वीकडे परततानाचा व्हिडीओ शेअर केला ती म्हणते मी तुम्हाला इथे घेऊन येऊ शकत नाही पण इथल दृश्य दाखवू शकते शक्य झाल तर तेही करेन
Anne McClain ने Astronaut होण्यासाठी अत्यंत कठीण परिश्रम ,कठोर ट्रेनिंग घेतल आणि लहानपणीच स्वप्न पूर्ण केल अर्थात आपल्याला ते सोप वाटत असल तरीही पृथ्वीपासून दूर माणसांपासून दूर तरंगत्या अवस्थेत राहून संशोधन करण खूपच कठीण असत सध्या अंतराळस्थानकातील अंतराळवीर पृथ्वीवरील मानवी आरोग्यासाठी आवश्यक संशोधन करत आहेत विविध रोगांवर सध्या उपलब्ध नसलेले अत्याधुनिक औषधे ते संशोधित करत आहेत जे पृथ्वीवर संशोधित करण शक्य नाही .