Tuesday 21 August 2018

यवतमाळात भर पावसाळ्यातही पाणी आठवड्यातून एकदाच

यवतमाळ -२१ ऑगस्ट

यवतमाळ येथे गेल्या दोन महिन्यात भरपूर पाऊस पडला त्या मुळे यवतमाळला पाणी पुरवठा करणारी धरणे ओसंडून वाहू लागली तरीही यवतमाळातील पाणी पुरवठा मात्र नियमित केल्या गेला नाही अजूनही नळाला आठ दिवसातून एकदाच पाणी सोडण्यात येतेय विशेष म्हणजे गेल्या आठवडाभरापासून यवतमाळात सतत पाऊस पडत आहे तरीही बाहेर मुसळधार पाऊस पण घरातील नळाला अर्थातच घरात पाणी नाही अशी अवस्था यवतमाळकरांची झाली आहे
आणि हे केवळ प्रशासनाची उदासीनता,निष्क्रियता आणि योग्य नियोजनाअभावी झाले आहे नागरिकांना अजूनही बिसलेरी आणि टँकरचा नाहक खर्च सोसावा लागतोय आधीच उन्हाळ्यात टँकर,बिसलेरी ,कॅन,स्टील टाक्या प्लॅस्टिकच्या मोठ्या टाक्या ,फिल्टर आदीचा खर्च सोसावा लागल्याने ते त्रस्त होते आता पावसाळ्यातही लोकांना कृत्रिम पाणीटंचाईमुळे आणि नेते आणि संबंधितांच्या निष्क्रियतेमुळे पुन्हा खर्च करावा लागतोय त्या मुळे लोक त्रासले नसले तरच नवल
आता भरपूर पाऊस पडलाय जिल्यात अनेक ठिकाणी पूर आलाय त्या मुळे पाणी समस्या संपली आहे निदान आता तरी संबंधीतांनी ह्या समस्येकडे लक्ष देऊन नियमित पाणीपुरवठा करावा अशी मागणी यवतमाळकर सतत करत आहेत
यवतमाळला पाणी पुरवठा करणारे निळोणा व चापडोह प्रकल्प पावसाळा सुरु होताच अवघ्या दोन महिन्यातच भरून वाहू लागले त्या मुळे ह्या वर्षीच्या दुष्काळातील पाणीटंचाईने त्रस्त झालेले यवतमाळचे नागरिक आनंदित झाले टंचाईच्या काळात दोन महिने बंद झालेला पाणीपुरवठा आता नियमित होईल ह्या आशेत असलेल्या नागरिकांचा आता भ्रमनिरास झाला असून अजूनही पाणी दररोज किंवा एक दिवसाआड सोडण्यास प्रशासन तयार नाही मध्यंतरी काही नागरिकांनी मोर्चा नेऊन पाणीपुरवठा विभागाला चार दिवसातून एकदा पाणी सोडण्याची विनंती केली तरीही प्रशासन पाणीपुरवठा नियमित करण्यात असमर्थ आहे
यवतमाळकरांना गेल्या पाचसहा वर्षांपासूनच पाणीसमस्येचा त्रास सोसावा लागतोय पाणी कमी दाबाने येणे पाईपलाईन फुटणे ,नियमित न येणे नित्याचेच आहे ,पाणी बेसिनच्या नळाच्या उंचीपर्यंतही पोहोचत नाही वारंवार तक्रार करूनही उपयोग होत नाही सतत नवीन पाईपलाईन टाकत असल्याचे सांगितले जाते पण वर्षभरानंतरही काम पुर्ण होत नाहीच
नागरिकांना गेले वर्षभर बेंबळा प्रकल्पातून पाणी पुरवठा करणार असे आश्वासन दिल्या जात होते ते कामही पूर्ण झाले नाहीच आणि ह्या कामासाठी जिथपर्यंत पाईप टाकण्यात आले ते पाइपही निकृष्ट दर्जाचे निघाल्याने टेस्टिंगच्या वेळी पाण्याच्या दाबाने पाइपच फुटले त्या मुळे आधीच उशिराने सुरु करणार असलेला  प्रकल्प लांबणीवर पडला शिवाय पाईप फुटल्याने दुष्काळात पाणीच वाया गेले नाही तर आसपासच्या शेतीचेही नुकसान झाले
निवडणुकीआधी नागरिकांना चोवीसतास भरपूर पाणीपुरवठा करणार असल्याचे आश्वासन देणारे मंत्री सध्या भरपूर पाऊस पडून धरणे भरून वाहत असताना दररोज तर सोडाच एक दिवसाआड पाणीपुरवठा करू शकत नाहीत आणि हि परिस्थिती पावसाळ्यातली आहे म्हणजे पावसाळा संपल्यावर काय होईल ?  ह्याच कामामुळे रस्ते खोदल्याने गेल्या ऑक्टोबर पासून इंटरनेट सेवा व लोकल फोनही बंदच आहेत आता त्यालाही वर्ष होत आले आहे अजूनही प्रशासन ढीम्म आहे आता वायफाय देण्याचे आश्वासन देण्यात येतेय हि सेवा जेव्हा सुरु होईल तेव्हा होईल तोवर इंटरनेट आणि लोकल फोन सुरु ठेवण्यास काहीच हरकत नाही
पाणीटंचाई निवारणासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही यवतमाळकरांना पाणीटंचाईचा त्रास होत आहे
अजून दोन महिने पावसाळा असल्याने पाऊस आला आणि धरणे भरून पाणी वाहू लागली कि जास्तीचे पाणी
रस्त्यांवर सोडले जाईल आणि पाणी नाहक वाया जाईल त्या ऐवजी लोकांना दररोज पाणीपुरवठा केल्यास हि वेळ येणार नाही
मागच्या वर्षी पाऊस कमी पडल्याने लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागला लोकांनी त्या काळात संयमाने प्रशासनाला साथ दिली पण आता मुसळधार पाऊस पडूनही आणि धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही पाणी योग्य नियोजना अभावी नियमित सोडल्या जात नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत पावसाळ्यातील कृत्रिम पाणीटंचाईला ते साथ तर देणार नाहीतच शिवाय पुढच्या निवडणुकीत घरचा रस्ता दाखवतील त्या मुळे संबंधितांनी ह्या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन फोर्सने नियमित पाणीपुरवठा करावा अशी यवतमाळ मधील नागरिकांची रास्त मागणी आहे
पाण्याअभावी शासनाची वृक्ष संवर्धन मोहीमही फोल आहे पाणी अत्यल्प आठवड्यातून एकदाच सोडल्यास पाणी पिण्यासाठी आणि इतर आवश्यक कामासाठीही पुरणार नाहीच आधीच दुष्काळात झाडे वाळून गेलीत सध्या पावसाळा आहे नंतरचे काय ? त्या मुळे ह्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे



Sunday 19 August 2018

नासाच्या मोहीम 56 चे अंतराळवीर Oleg आणि Sergey ह्यांचा स्पेसवॉक यशस्वी


Flight Engineers Oleg Artemyev and Sergey Prokopyev
          नासाच्या अंतराळ मोहीम 56 चे अंतराळवीर Oleg आणि Sergey  -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -17 ऑगस्ट
नासाच्या अंतराळ मोहीम 56 चे फ्लाईट इंजिनीअर  Oleg Artemyev आणि रशियाचे अंतराळवीर Sergey Prokopyev ह्यांनी अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी आणि आगामी स्पेसवॉक व कार्गोशिपच्या आगमनाच्या तयारीसाठी 15 ऑगस्टला यशस्वी स्पेसवॉक केला
हा स्पेसवॉक सात तास सेहचाळीस मिनिटांचा होता हे दोन्ही अंतराळवीर अंतराळ स्थानकातून 12.17 p.m. ला स्पेसवॉक साठी बाहेर पडले आणि 8.05 p.m. ला स्पेसवॉक पूर्ण करून स्थानकात परतले
ह्या सात तासांच्या स्पेसवॉक दरम्यान ह्या दोन्ही अंतराळवीरांनी स्थानकातील रशियन सेगमेंटचा बाहेरील भागात Small Technology Satellites आणि नव्या सायंटिफिक प्रयोगासाठी लागणारे आवश्यक पार्ट बसविण्यासाठी केबल बसवण्याचे काम पूर्ण केले

Roscosmos cosmonaut Sergey Prokopyev
       अंतराळवीर Sergey Prokopyev स्पेसवॉक दरम्यान केबल बसवताना -फोटो -नासा संस्था

जर्मन अंतराळ एजन्सी D LR आणि रशियन अंतराळ एजन्सी Roscosmos ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने नवा Icarus सायंटिफीक प्रयोग करण्यात येणार आहे ह्या प्रयोगांतर्गत पृथ्वीवरील  स्थलांतरित प्राण्याच्या हालचाली टिपण्यात येतील स्थानकाला बसवलेल्या अँटेना आणि GPS hardwareच्या मदतीने पृथ्वीवरील छोट्या प्राण्यांच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे जाण्याच्या हालचाली ,त्यांच्या मुळे पसरणारे रोग आणि इतर घडामोडी ट्रॅक केल्या जातील आणि त्या वर संशोधन केल्या जाईल
आजवर स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी अंतराळवीरांनी केलेला हा 212 वा स्पेसवॉक होता  Oleg Artemyev ह्यांच्या अंतराळवारीतील हा तिसरा स्पेसवॉक होता त्यांनी ह्या स्पेसवॉक साठी परिधान केलेल्या सूटवर लाल रंगाच्या रेषा होत्या आणि  20 नंबरचा आकडा असलेला हेल्मेट घातला होता
अंतराळवीर Sergey ह्यांचा हा पहिलाच स्पेसवॉक होता त्यांनी 18 नंबरचे लेबल असलेले हेल्मेट घातले होतेआणि त्यांनी परिधान केलेल्या सुटवर निळ्या रंगाच्या रेषा होत्या

Friday 10 August 2018

Curiosity Mars Rover ने केले सहाव्या वर्षात यशस्वी पदार्पण


                            मंगळावरील Curiosity Mars Rover -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -6 ऑगस्ट
नासाने मंगळावर पाठवलेले क्युरिओसिटी मंगळ यान गेल्या पाच वर्षांपासून मंगळावर अविरतपणे कार्यरत असून आता त्याने सहाव्या वर्षात यशवी पदार्पण केले आहे आणि नुकतेच Curiosity Rover ने त्याचा सहावा वाढदिवस साजरा करत असल्याच ट्विट पृथ्वीवर पाठवलय
Curiosity मंगळ यान 2011 सालच्या नोव्हेंबर मध्ये मंगळाकडे झेपावले आणि ऑगष्ट 2012 मध्ये मंगळावर पोहोचले तेव्हापासून ते मंगळावर कार्यरत आहे ह्या मंगळयानावर 17अत्याधुनिक कॅमेरे व लेन्स बसविलेले असून
त्याच्या साहाय्याने मंगळावरच्या जीवसृष्टीचे अस्तित्व शोधले जात आहे आणि त्या संबंधित माहिती व फोटो Curiosity पृथ्वीवर पाठवत आहे आणि संशोधित माहीती नुसार पूर्वी तिथे जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचे पुरावेही मिळत आहेत
Curiosity मंगळ यानाने पाच वर्षात मंगळावरील पाण्याचे अस्तित्व शोधून पुराव्यादाखल तिथल्या  आटलेल्या आणि पूर्वी तिथे पाण्याचे अस्तित्व असल्याचे सबळ पुरावे देणारे काही ठिकाणचे फोटो पाठवले आहेत आहेत विशेष म्हणजे नुकतेच तिथल्या एका भागात गोठलेल्या बर्फाखाली वाहत्या पाण्याचे सरोवरही ESA ला सापडले आहे
ह्या मंगळयानाने त्याच्या रोबोटिक आर्मच्या साहाय्याने गोळा केलेल्या भूगर्भातील मातीच्या उत्खननाचे नमुनेही पाठवले आहेत ते नमुने संशोधित केल्यानंतर त्यात जैविक अणूचे अंश ,सल्फर ,ऑक्सिजन ,कार्बन आणि नायट्रोजनचे अस्तित्व सापडले आहे

moving image showing darkening dust storm

          मंगळावरील वादळी वातावरणात Curiosity Mars Rover -फोटो -नासा संस्था

सध्या मंगळावर धुळीच्या वादळी वाऱयांचे प्रचंड वादळ उठले असून त्या वादळामुळे प्रचंड धुळीचे लोट वाहात आहेत त्या मुळेच तिथे असलेले दुसरे मंगळ यान रोवर अपारच्युनिटीचा संपर्क तुटला आहे पण Curiosity ने ह्या धुळीच्या वादळाचे फोटो जुलै मध्ये पाठवले असून सध्या ह्या यानाच्या साहाय्याने शास्त्रज्ञ ह्या वादळाची तीव्रता  आणि त्यातील धूलिकणांचा आकार व प्रमाण परमाणु ऊर्जेद्वारे संशोधित करत आहेत ह्या संशोधनाचा उपयोग आगामी मानवासहित मंगळ मोहिमेसाठी होईल अस संशोधकांच मत आहे
 2013 साली Curiosity मंगळयानाने त्याच्या पहिल्या वाढदिवशी " Happy Birthday " चा संदेश पृथ्वीवर पाठवला होता आता त्याच्या सहाव्या वाढदिवशी Curiosity वरून ट्विट करण्यात आलेय कि ,तो त्याचा सहावा वाढदिवस साजरा करतोय तेही तिथे असलेल्या आयर्न ऑक्साइड सोबत ह्या आयर्न ऑक्साईड मुळेच मंगळ ग्रहाला लाल रंग प्राप्त झालाय 

Thursday 9 August 2018

नासाच्या पहिल्या कमर्शिअल अंतराळयान उड्डाणासाठी अंतराळवीरांची निवड जाहीर

https://www.nasa.gov/sites/default/files/thumbnails/image/group_photo.pngसुनीता विल्यम्स आठ अंतराळवीरांसोबत अमेरिकेच्या नव्या अंतराळ यानातून झेप घेण्यासाठी सज्ज
फोटो -नासा संस्था

नासा संस्था -3 ऑगस्ट
पहिल्या अमेरिकनमेड कमर्शियल अंतराळयानाच्या अंतराळ उड्डाणासाठी नासा संस्थेने नुकतीच नऊ  अंतराळवीरांच्या चमूची निवड जाहीर केली आहे
2011नंतर प्रथमच अमेरिकेच्या भूमीवरून अंतराळवीर अंतराळस्थानकाकडे झेप घेतील 2011 मध्ये स्पेस शटल मोहीम बंद करण्यात आल्यानंतर अंतराळवीर रशियाच्या भूमीवरून सोयूझ यानातून अंतराळ स्थानकाकडे उड्डाण करत होते आता ह्या नव्या मोहिमेमुळे अंतराळवीर अमेरिकेच्या भूमीवरून अमेरिकन बनावटीच्या अंतराळ यानातून अंतराळस्थानकाकडे उड्डाण करतील
नासाचे प्रमुख प्रबंधक Jim Bridenstine ह्या मोहिमेबद्दल बोलताना म्हणतात  ,"ह्या नव्या मोहिमेमुळे नासाचे अंतराळवीर अमेरिकेच्या भूमीवरून अमेरिकन बनावटीच्या अंतराळयानातून अंतराळात झेप घेतील!"
अमेरिकेने Boeing CST-100 Starline Space Xs आणि Crew Dragon ह्या दोन कंपन्यांच्या साहाय्याने तयार केलेल्या अमेरिकन अंतराळ यानाच्या निर्मितीमुळे अमेरिका आता स्वयंपूर्ण झाला आहे ह्या मोहिमेमुळे नव्या युगातील अंतराळ मोहिमेच्या स्पर्धेत अमेरिकेचे नेतृत्व मजबूत होईल आणि अमेरिकेचे प्रभुत्व मिळवण्याचे स्वप्नही साकारेल 
अमेरिकेचे हे पहिलेच कमर्शियल स्पेस फ्लाईट असल्यामुळे नासाचे अधिकारी उत्साहित आहेत अंतराळवीरांच्या अमेरिकेच्या भूमीवरून अमेरिकन बनावटीच्या  स्वयंनिर्मित यानातून अंतराळस्थानकाकडे झेप घेण्याचा अनुभव आमच्यासाठी रोमांचकारी असल्याचे ते म्हणतात अमेरिकेने ह्या दोन कंपन्यासोबत मिळून ह्या यानाची डिझाईन तयार केली
नासा संस्थेने पुढच्या वर्षीच्या रॉकेट व अंतराळयानाच्या पहिल्या उड्डाणासाठी नऊ अंतराळवीरांच्या चमूची निवड जाहीर केली आहे त्यात भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्सचा समावेश आहे ह्या नऊ जणांपैकी आठजण  नासामध्ये कार्यरत असून एक अंतराळवीर माजी अंतराळयात्री आहे
सुनीता विल्यम्स 1998 मध्ये नेव्हीतून नासा मध्ये स्पेस पायलट पदावर नियुक्त झाली आणि तिच्या कार्यकाळात बढती मिळवत वेगवेगळी पदे भूषवित रिटायर होण्याआधी तिने कॅप्टनपदही भूषविले अंतराळ मोहीम 14-15 व 32-33 ह्या दोन अंतराळमोहीमेमध्ये ती अंतराळस्थानकात राहण्यासाठी गेली तिने ह्या दोन मोहिमेदरम्यान अंतराळ स्थानकात 322दिवस वास्तव्य केले आणि सातवेळा स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी स्पेसवॉकही केला
52 वर्षीय सुनीता विल्यम्स आणि 45वर्षीय Josh Cassada हे दोघेजण Starliner मिशनमध्ये उड्डाण करतील
Josh cassada  2013 मध्ये अंतराळस्थानकात गेले होते त्यांनी आधी नेव्ही कमांडर म्हणून काम केले आणि  त्यांनी टेस्ट पायलट म्हणून चाळीस एअर क्राफ्ट मधून 3,500 पेक्षा वेळा उड्डाण केले आहे
ह्या शिवाय नासा संस्थेचे Robert Behnken,व  Douglas Hurley हे स्पेस X च्या पहिल्या मिशनचे चालक असतील
ह्या चारअंतराळवीरांव्यतिरिक्त बोईंग चे प्रबंधक Christopher Ferguson ,Victor Glover,Michoal Hopking,Nicole Aunapu Mann ह्यांचीही ह्या पहिल्या कमर्शियल उड्डाणासाठी निवड झाली आहे
ह्या नव्याअंतराळ  मिशनचा उपयोग ज्या देशाकडे स्वत:चे अंतराळयान नाही त्यांनादेखील अंतराळ उड्डाणासाठी होईल

Friday 3 August 2018

मंगळावर पुन्हा आढळले पाण्याचे अस्तित्व


मंगल पर विशाल भूमिगत झील का पता चला

नासा संस्था -26 जुलै
बऱ्याच वर्षांपासून शास्त्रज्ञ मंगळावर सजीवांचे अस्तित्व होते का ? ह्याचा शोध घेत आहेत आणि त्या साठी आता मंगळावर गेलेल्या अत्याधुनिक मंगळ यानांच्या यंत्रणेद्वारा तिथल्या पृष्ठभागावरील मातीचे ,जमिनीखालचे आणि पृष्ठभागावरील पाण्याचे अवशेष संशोधित केल्या जात आहेत आणी विशेष म्हणजे शास्त्रज्ञाच्या प्रयत्नांना यश मिळत तिथे करोडो वर्षांपूर्वी जीवसृष्ठी अस्तित्वात असल्याचे पुरावेहि  मिळत आहेत
आता इटालियन स्पेस एजन्सीच्या शास्त्रज्ञानी मंगळावर पाण्याचे सरोवर सापडल्याची माहिती science Journal मधून प्रकाशित केली आहे 2003साली मंगळावर गेलेल्या Mars एक्सप्रेस ऑर्बिटरच्या साहाय्याने त्यांनी हा शोध लागला आहे

Radar detection of water under the south pole of Mars. Image courtesy: ESA
 मंगळावरील दक्षिणेकडील भागात आढळलेले बर्फ़ाखालील खाऱ्या पाण्याचे सरोवर -फोटो E S A

 मंगळ ग्रहाच्या दक्षिणेकडील अती शीत भागात बर्फाच्या दीड किलोमीटर जाड थराखाली वीस किलोमीटर लांबीचे  पाण्याचे सरोवर सापडले आहे शास्त्रज्ञांच्या मते 3.6 अरब वर्षांआधी तिथे जीवसृष्ठी अस्तित्वात असावी आणि कालांतराने ती नष्ट झाली असावी ह्या आधीही मंगळावर पाण्याचे वाळलेले स्रोत सापडले आहेत आता ह्या नव्या शोधाने मंगळावर पाणी असल्याच्या शक्यतेला पृष्ठी मिळाली आहे ह्या नव्या शोधामुळे मंगळावरील अनादिकालातील सजीवांच्या अस्तित्वा विषयी संशोधन करता येईलच शिवाय भविष्यात मानव मंगळावर राहू शकेल का ? ह्या वरही शात्रज्ञ संशोधन करतील
सध्या जरी मंगळ ग्रहावर पाण्याचे बर्फाखालील सरोवर सापडले असले तरीही हे पाणी पिण्यायोग्य नाही ते अत्यंत खारट आहे कारण त्यात मिठाचे प्रमाण खूप जास्त आहे ,हे पाणी अत्यंत थंड आहे त्यातील मिनरल्सचे  प्रमाणही जास्त आहे ह्या पाण्याचे तापमानही नार्मल तापमानापेक्षा कमी असल्याने ते गोठण्याच्या स्थितीत आहे परंतु ह्या पाण्यात मॅग्नेशियम ,कॅल्शियम आणि सोडियम असल्याने हे पाणी प्रवाही आहे
हे पाणी अत्यंत थंड आणि खारे असल्याने त्या मध्ये सजीव प्राणी अस्तित्वात असण्याची शक्यता नसल्याची शक्यता आहे असे शास्त्रज्ञांना वाटतेय तरीही तिथल्या सजीवांच्या अस्तित्वाचा पुरावा शोधण्यासाठी ह्या माहितीचा त्यांना नक्कीच मदत होईल