अंतराळवीर Mark Vande आणि Noishige Kanai स्पेसवॉक दरम्यान -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -16 feb
नासाच्या अंतराळमोहीम 54 चे फ्लाईट इंजिनिअर Mark Vande Hei आणि जपानचे अंतराळवीर Noishige Kanai ह्या दोघांनी 16 फेब्रुवारीला अंतराळस्थानकाच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी स्पेसवॉक पूर्ण केला
स्पेसवॉक पाच तास सत्तावन्न मिनिटांनी संपला ह्या स्पेसवॉक मध्ये ह्या दोन्ही अंतराळवीरांनी अंतराळस्थानकाच्या रोबोटिक आर्मवर काम केले
ह्या रोबोटिक आर्मच्या दोन Latching End Effector पैकी एक long term storage location मध्ये ठेवला हा पार्ट भविष्यात स्पेअर पार्ट म्हणून उपयोगी पडेल आणि दुसरा पार्ट काढून अंतराळस्थानकात आणला तो नंतर पृथ्वीवर परत आणल्या जाईल
हे काम नियोजित वेळेच्या आधी पूर्ण करून उरलेल्या वेळात ह्या अंतराळवीरांनी आणखीही कामे पूर्ण केली
तेवीस जानेवारीला केलेल्या स्पेसवॉक दरम्यान बसवण्यात आलेल्या LEE चे लुब्रिकेशन व त्याच्या एक भागात grounding strap बसवला त्यांनी स्थानकाच्या cooling system चेही काम पूर्ण केले ह्या शिवाय इतर आवश्यक कामेही पूर्ण केली अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी आजवर केलेला हा 208 वा स्पेसवॉक होता
अंतराळवीर Mark Vande ह्यांच्या करिअर मधला हा चवथा स्पेसवॉक होता तर जपानचे अंतराळवीर Noishige ह्यांचा हा पहिलाच स्पेसवॉक होता आणि जपानी अंतराळवीरांमध्ये ते चवथे स्पेसवॉकर आहेत
Mark Vande ह्यांनी ह्या स्पेसवॉक मध्ये परिधान केलेल्या सूटवर लाल रंगाच्या रेषा होत्या आणि त्यांच्या हेल्मेटवर 18 अंक प्रिंट केला होता तर Kanai ह्यांच्या स्पेससूटवर रेषा नव्हत्या पण त्यांच्या हेल्मेटवर 17अंक प्रिंट केलेला होता