नासा संस्था- 18 सप्टेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 53 चे अंतराळवीर Mark Vande Hei ह्यांनीं नुकताच अमेरिकेतील Pine over back at school मधील विद्यार्थ्यांशी Space To Earth साधलेल्या लाईव्ह संवादाचा हा वृत्तांत
P.V.K स्कूलच्या Emma ह्यांनी स्कूल तर्फे mark ह्यांच स्वागत केल Senator Eichorn आणि Representative Layman ह्या क्षणी उपस्थित असल्याचे सांगीतले शिवाय आम्ही तुमच्या पहिल्या इंटरव्हू मध्ये सहभागी होतेय हे आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगत मुलाखतीला प्रारंभ केला
P.V.K.schoolच्या Emma Mark ह्यांच्याशी लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था
Emma - मिलिटरीमन असल्याचा अनुभव तुमच्या अंतराळवीर होण्यासाठी व अंतराळ मोहिमेसाठी फायदेमंद ठरला का ?
Mark - मिलिटरी मधल्या अनुभवाचा आणि अंतराळात काम करण्याचा निश्चितच फायदा झाला मिलिटरी मध्ये लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण तसच आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेण महत्वाच असत अंतराळातील अंतराळ स्थानकात आम्ही सहाजण पृथ्वीपासून सारया लोकांपासून दूर राहतो इथल्या विपरीत परिस्थितीत काम करताना तशीच एकमेकांची काळजी घेतो आणि संघर्षरत आयुष्य जगताना मिलिटरीमन असल्याचा निश्चितच फायदा होतो
Abilene (विध्यार्थी )- लाँचिंगच्या वेळेस अंतराळात झेप घेताना गुरुत्वाकर्षणाचा अनुभव कसा होता?
Mark -अंतराळात प्रक्षेपणाचा वेळेस यानासाठी वापरण्यात येणारा G-force नेहमीच्या फोर्सपेक्षा तिप्पट असतो पाठीवर बसलेल्या स्थितीतल्या आम्हाला प्रक्षेपणाच्या ह्या प्रचंड फोर्स मुळे जोरात सीटवर ढकलल्या गेल्याचा अनुभव आला तो थरारक आणि इंटरेस्टिंग होता !
Kyla -तुम्हाला कधीतरी Oh! My God! I am in Space! असा विचार मनात येऊन भीती वाटते का ?
Mark - हो अनेकवेळा असे Wow ! क्षण आले कारण इथल्या मायक्रो ग्रॅव्हिटी मध्ये तरंगण सोप पण चालण महाकठीण असत इथे आल्यानंतर इथल्या परिस्थितीत adjust व्हायला दोनतीन दिवस लागले चालण्याचा अनुभव इतका वेगळा आहे कि लहानपणी चालायला शिकतानाची आठवण झाली नव्यान चालायला शिकण्याचा अनुभव विलक्षण होता सतत तरंगत्या अवस्थेत असल्यामुळे जिथे थांबायच असत त्याच्या पुढे आम्ही पोहोचतो म्हणून सतत तोल सावरत सजग राहाव लागत म्हणजे जिथे उभ राहायचय तिथे स्थिर राहता येत कधी अंतराळ स्थानकाच्या भिंतीवर पाय ठेवून आधार घ्यावा लागतो आणि तरंगत जाणारया वस्तू पकडताना तारांबळ उडते ,कसरत करावी लागते आणि आम्ही ते सार एन्जॉय करतो! भीती नाही वाटत!
अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात भिंतीचा आधार घेताना Mark Vande Hei फोटो -नासा संस्था
Eleanor -तुम्ही तिथे कोणते प्रयोग करत आहात ?
खूपच छान प्रश्न आहे ! इथे शंभरावर सायन्स विषयक प्रयोगांवर संशोधन सुरु आहे आम्ही lung cancer वरील आधुनिक उपचारावर संशोधन करणार आहोत ईथल्या अंतराळ संशोधकांनी अंतराळातील वातावरणात lung tissue growth वर संशोधन करून त्यांचे सॅम्पल्स नुकतेच पृथ्वीवर आणलेत आणि हे त्यांचे संशोधन भविष्यात कॅन्सर वरील प्रभावी इलाजासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल
River - अंतराळ स्थानकातील वास्तव्यादरम्यान तुम्हाला तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत बोलायला कितीवेळा संधी मिळते
Mark -इथे फोन असला तरीही स्थानकातून पृथ्वीवर संवाद साधण तिथल्या सारख सोप नसत कित्येकदा संपर्क होत नाही कारण कधी कधी satellite च coverage नसत तरीही आम्ही बरेचदा घरच्यांशी संवाद साधतो दोन दिवसातून एकदातरी मी पत्नीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो काल पहिल्यांदा मी माझ्या मुलांशी बोललो त्यांना स्पेस स्टेशनची टुर घडवली त्यांनींही ती खूप एन्जॉय केली!
Cameron - भविष्यात मानव मंगळावर राहू शकेल का?
Mark - नक्कीच ! जो पर्यंत मानव शांतीं अन समाधानान एकत्रित राहील तो पर्यंत मानव मंगळावर वस्ती करून राहू शकेल आणि त्या साठी आपल्याला खूप प्रयत्न आणि कष्ठ करावे लागतील नवीन गोष्टी आत्मसात कराव्या लागतील
Grady - आजवर अंतराळ स्थानकाला एखादी उल्का धडकली आहे का ? आणि तस घडल असेल तर कशी दुरुस्ती करण्यात आली
Mark - हो! बऱ्याचवेळा असं घडलय छोटया,छोटया उल्का धडकल्या,त्याच्या खुणाही आहेत त्यामुळे नुकसान झाल नाही कारण स्थानकाची रचनाच तशी करण्यात आलीय फक्त स्पेसवॉक साठी जाताना विशेष खबरदारी घ्यावी लागते कधी उल्का मध्ये आली तर स्थानकाचा मार्ग बदलण्यात येतो
Hannah -स्पेसमध्ये राहताना येणारया संभावित धोक्याला सामोरे जाण्यासाठी मानसिक तयारी कशी करता?
Mark आम्हाला लाँचिंगच्या आधीच ह्या सर्व गोष्ठीसाठी ट्रेनिंग दिल जात ते खूप कठीण आणि कठोर असत कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची आमची तयारी करून घेतली जाते त्या मुळे काही अडचण येत नाही म्हणूनच लाँचिंग पासून स्थानकातील प्रवेशापर्यंत सार सुरळीत पार पडल
Kelly - सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात तुमच रोजच काम कस पार पडत ?
Mark - हे काम एकाचे नाही तर साऱया टीमचे असते पृथ्वीवरून स्पेस स्टेशनच काम मॅनेज केल्या जात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाची सवय व्हायला थोडा वेळ लागतो ह्या वातावरणात काम करताना स्वत:ला स्थिर ठेवण्यासाठी आधार शोधावा लागतो दोन्ही हात कामात असतील तर पायांनी भिंतींचा आधार घेत स्थिर राहील तरच काम करता येत नाहीतर आम्ही तरंगत राहून काम करण अशक्य असत
Mark - खरतर माझा सर्वात आवडता ग्रह पृथ्वी आहे कारण आपण पृथ्वीवर जन्म घेतलाय आणि नंतर मला मंगळावर जायला आवडेल त्या साठी सध्या मंगळ मोहीम राबवल्या जातेय पृथ्वीपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि मानवी निवासासाठी अनुकूल असलेल्या ग्रहावर राहण्यासाठी जातानाचा दूरवरचा प्रवास उत्सुकतापूर्ण आणि थरारक असेल
Abbie - स्थानकात अंतराळवीर आजारी पडले तर काय करता ?
Mark -सुदैवाने आमच्या टीममध्ये एक डॉक्टर आहे पण नेहमीच असं नसत त्या मुळेच आम्हाला ट्रेनिंगच्या वेळेस डेंटल,मेडिकल ट्रेनिंग दिल्या जाते शिवाय पृथ्वीवरून नासाची टीम मार्गदर्शन करते आणि समजा खूपच कठीण परिस्थिती आली आणि पृथ्वीवर जाण अत्यावश्यक असेल तर इथे स्पेसक्राफ्ट असत त्याचा उपयोग होऊ शकतो
Miles - स्पेस स्टेशन मधून पृथ्वीपेक्षा जास्तवेळा सूर्य ग्रहण दिसत का ?
Mark - नाही !आम्ही अंतराळात असलो तरी पृथ्वीपासून जवळच्या अंतरावर असल्यामुळे पृथ्वीवर जेव्हा ग्रहण दिसत तेव्हाच आम्हालाही दिसत कारण सूर्य पृथ्वी आणि चंद्र जेव्हा एका रेषेत येतात तेव्हाच ग्रहण होत फक्त अंतराळातून पृथ्वीवर आम्हाला ग्रहणाची सावली दिसते
Hudson - स्थानकात पोहोचल्या नंतर आजवर तुमचा किती प्रवास झाला ?
Mark -स्पेस स्टेशन ताशी 17000700 मैल वेगाने फिरत आहे आणि दिवसाचे चोवीस तास आम्ही बुधवारी पोहोचलो आता सहा दिवस झालेत तेव्हा हिशोब कर
RD -तुम्ही स्थानकातून घरी परत कसे येता ?
Mark - आणखी एक इंटरेस्टिंग प्रश्न ! आम्ही पृथ्वीवर सोयूझ यानाने परत येतो ज्या यानाने स्थानकात आलो त्याच यानाने परतताना यानाचा वेग कमी करत पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून पॅराशूटच्या सहाय्यानें पृथ्वीवर परततो
Modi - तुम्हाला अंतराळवीर व्हाव असं का वाटलं?
Mark - मला हे काम शारीरिक आणि मानसिक दृष्टया आव्हानात्मक वाटल तसही मला परिघाबाहेरच काम करायला आवडत इथे वेगवेगळ्या देशातील संशोधकांसोबत मानवी आरोग्यासाठी उपयुक्त प्रयोगांमध्ये सहभाग नोंदवायला मिळतो
Lyton - अंतराळ वीर होण्यासाठी कितीकाळ ट्रेनिंग घ्याव लागत
Mark - तस तर आयुष्यभर! मी 2009 साली नासा मध्ये अंतराळवीर म्हणून दाखल झालो आणि आता 2017साली स्थानकात पोहोचालो तब्बल आठ वर्षांनी
Toni - सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा तुमच्यावर काय परिणाम झाला ?
Mark - खूपच विनम्र करणारा अनुभव आहे हा ! नवीन अंतराळवीरांच्या आजूबाजूला जेव्हा आधीचे अंतराळवीर सारी कामे सराईतपणे करतात तेव्हा सवय व्हायला वेळ लागतो एखाद काम करताना एखादी वस्तू तिथेच ठेवून दुसरीकडे वळल तर ती वस्तू तिथे नसते कारण तरंगत ती दुसरीकडे जाते कधी कधी लक्ष नसल कि धडक लागते आता हळू हळू सवयीन स्वत:वर नियंत्रण ठेवता येतेय
स्थानकात तोल सावरतानाचे प्रात्यक्षित दाखवताना Mark Vande Hei -फोटो -नासा संस्था
Billy - स्थानकातून चंद्र कसा दिसतो ?
Mark - पृथ्वीपेक्षा वेगळा नसला तरी मध्ये ढग नसतात त्या मुळे चंद्र स्पष्टपणे दिसतो
Brook - अंतराळात कितीकाळ राहता येत ? तुम्ही सध्या ज्या मोड्युल मध्ये राहताय त्या बद्दल सांगा
इथल्या सारखेच Northern lights दिसतात कि वेगळे ? Aurora कसा दिसतो तिथून ?
Mark -तशी ठराविक मर्यादा अजून माहीत नाही पण वर्षभर मानव राहू शकतो आम्ही आगामी दूरवरच्या मानवासहित अंतराळ मोहिमेत मानव निरोगी आणि दीर्घकाळ वास्तव्य करू शकेल असे प्रयत्न करतोय
मी सध्या US Hub मध्ये आहे तिथे खूप सोयी सुविधा आहेत ,इंटरनॅशनल पेलोड रॉक्स आहेत इथली बहुतांश जागा यंत्रांनी आणि storage ने व्यापलीय आम्हाला लागणारे प्रयोगांसाठीचे सामान स्थानकासाठीची आवश्यक सामग्री इथेच आहे
मी स्थानकात पोहोचलो तेव्हा सार खूप वेलकमिंग होत आम्हाला खूप काम असल्याने बिझी होतो नंतर मात्र मी विश्रांती न घेता खिडकी जवळ सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यासाठी गेलो तेव्हा आधीच्या अंतराळवीरांनी northern lights आणि aurora दाखवला पृथ्वीवरून हिरव्या पडद्याप्रमाणे दिसणारा aurora इथून हिरव्या तरंगाप्रमाणे अप्रतिम दिसतो
मुलांना जर अंतराळवीर व्हायचे असेल तर त्या साठी खूप कष्ट करत ध्येय साध्य करा असे सांगत Mark ह्यांनी मुलाखतीचा शेवट केला