Sunday 30 July 2017

नासाचे अंतराळवीर अंतराळस्थानकात सुखरूप पोहोचले

                            Soyuz MS-05 ह्या अंतरिक्ष यान अंतराळ वीरांना घेऊन अंतरिक्षात झेपावताना
                                                                                                                    फोटो -नासा संस्था
नासा संस्था -29 जुलै
नासाच्या अंतराळ मोहीम 52 चे अंतराळवीर Randy Bresnik ,Sergey Ryazanskiy व Paolo Nespoli शुक्रवारी संद्याकाळी 5.54  मिनिटाला सहा तासाच्या अंतराळ प्रवासानंतर अंतराळस्थानकात सुखरूप पोहोचले
कझाकस्थानातील बैकोनूर कॉस्मोड्रोमवरून सकाळी 11.41 मिनिटांनी नासाचे  MS-05 हे अंतराळयान ह्या तीन अंतराळवीरांना घेऊन अंतराळात झेपावले व पृथ्वी भोवती चार प्रदक्षिणा मारून अंतराळ स्थानकात पोहोचले तेव्हा आवश्यक दाब व लीकेजचे चेक अप झाल्यानंतर हे अंतराळ यान अंतराळ स्थानकाला जोडले गेले
संध्याकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटाला अंतराळवीरांचा स्थानकात प्रवेश झाला तेव्हा त्यांच्या चेहरयावर आनंद ओसंडून वहात होता नासाच्या अंतराळ मोहीम बावन्नचे कमांडर Fyodor Yarchiikhin , फ्लाईट इंजिनीअर Peggy Whitson आणि Jack Fischer ह्यांनी ह्या नव्या अंतराळ वीरांचे सुहास्य मुद्रेने स्थानकात स्वागत केले
हे अंतराळवीर स्थानकात पोहोचल्या नंतर नासा संस्थेने बैकोनूर येथून त्यांचा लाईव्ह टेलिकास्ट द्वारे कुटुंबीय व मित्रांशी संवाद घडविला तेव्हा अंतराळवीरांनी त्यांना सुखरूप पोहोचल्याचे सांगितले तर कुटुंबीयांनी त्यांचे  स्थानकात सुखरूप पोहोचल्याबद्दल अभिनंदन करून त्यांच्या स्थानकातील निवासासाठी व संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या

       अंतराळवीर Randy Bresnik ,Sergey Ryazanskiy व Paolo Nespoli  स्थानकातून कुटुंबियांशी            संवाद साधताना- फोटो -नासा संस्था 

तीनही अंतराळवीर आता साडे चार महिने अंतराळ स्थानकात राहून तिथे सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी होतील ऑगस्ट मध्ये अंतराळस्थानकातील Space- X ह्या कार्गो स्पेस क्राफ्टच्या आगमनानंतर ह्या नवीन अंतराळवीरांच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल
ह्या स्पेस क्राफ्ट मधून आधुनिक संशोधनाचे साहित्य अंतराळ स्थानकात पोहोचल्या नंतर हे अंतराळवीर त्यांच्या संशोधनात्मक कार्याला सुरवात करतील हे अंतराळवीर अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅविटीचा मानवांच्या  Lung Tissues वर काय परिणाम होतो हे अभ्यासून त्यावर स्टेम सेलच्या आधारे आधुनिक उपचार पद्धती संशोधीत करतील हे संशोधन आगामी मानवी अंतराळ मोहिमांसाठी उपयोगी ठरेल तसेच हे अंतराळवीर पार्किसन्स ह्या आजारावरील आधुनिक उपचार पद्धतीवर संशोधन करणार असून ते पृथ्वीवरील मानवी आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल
पृथ्वीवरील जवळच्या अंतरावरील वातावरणातील बदलांचे निरीक्षण नोंदवून पृथ्वीवर येणारया नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी व इतर वातावरणीय समस्या निवारण्यासाठी एक  Micro Satellite  हे अंतराळवीर launch करतील त्या साठीचे आवश्यक पार्टस कार्गोशिप मधून पाठवण्यात येणार आहेत
ह्या शिवाय हे अंतराळवीर त्यांच्या साडेचार महिन्यांच्या कार्यकाळात स्थानकात येणारया  Orbital Cygnus ह्या मालवाहू अंतरिक्ष यानाचे स्थानकात स्वागत करतील व त्या साठी आवश्यक डॉकिंगची जोडणी करतील अमेरिका व रशिया ह्यांच्या संयुक्त विद्यमाने अंतराळात जाणारया ह्या मालवाहू अंतरिक्ष यानातून स्थानकासाठी व अंतराळवीरांसाठी लागणारे आवश्यक अन्न,इंधन,सायंटिफिक संशोधनासाठी लागणारे साहित्य व हार्डवेअर असे काही टन सामान पाठवण्यात येईल
डिसेंबर मध्ये हे अंतराळवीर पृथ्वीवर परततील गेल्या सोळा वर्षांपासून सतत अंतराळवीर अंतराळस्थानकात राहण्यासाठी जात आहेत व स्थानकातील फिरत्या प्रयोगशाळेत मानवी आरोग्यासाठी आवश्यक असलेले आणि आगामी मानवी अंतराळमोहिमांसाठी आवश्यक असलेले सायंटिफिक प्रयोग करत आहेत आतापर्यंत सोळा देशातील दोनशेच्यावर अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकात राहून 1,900 च्याहीवर संशोधनात्मक प्रयोगात सहभाग नोंदवला आहे

Wednesday 26 July 2017

28 जुलैला तीन अंतराळवीर अंतराळस्थानकाकडे प्रयाण करणार

  Flight engineer Paolo Nespoli ( E.SA ) ,Sergey Ryazanskiy ( Roscosmos ) आणि Randy Bresnik ( NASA )
  फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -21जुलै 
नासाच्या अंतराळमोहीम 52 चे तीन अंतराळवीर 28 जुलैला अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत 
नासाचे अंतराळवीर Randy Bresnik, रशियाचे अंतराळवीर Sergey Ryazanskiy आणि युरोपियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर Paolo Nespoli हे तीन अंतराळवीर कझाकस्थानातील बैकोनूर येथील कॉस्मोड्रोम वरून MS-05 ह्या अंतराळ यानातून 28 जुलैला अंतराळस्थानकाकडे प्रयाण करतील 
सोयूझ MS-05 हे अंतराळयान सकाळी 11.41 वाजता ह्या तीन अंतराळवीरांना घेऊन अंतराळात झेपावेल ह्या अंतराळयानातून सहा तास प्रवास केल्यानंतर हे अंतराळवीर अंतराळस्थानकात पोहोचतील संध्याकाळी 7.40 वाजता सोयूझ MS-05 हे अंतराळ यान अंतराळस्थानकाला जोडल्या जाईल 
अंतराळ मोहीम 52 चे कमांडर Fyodor Yurchikhin व फ्लाईट इंजिनीअर Peggy Whitson ह्या अंतराळवीरांचे अंतराळ स्थानकात स्वागत करतील 
हे तीनही अंतराळवीर चार महिन्यांहून अधिक काळ अंतराळ स्थानकात राहतील आणि अंतराळ स्थानकात सुरु असलेल्या Biology ,Biotechnology,Earth Science ,Physical Science ह्या विषयांवरील शेकडो प्रयोगातील संशोधनात सहभागी होतील 
ह्या अंतराळवीरांच्या प्रयाणाचे लाईव्ह प्रक्षेपण सकाळी 10.45 वाजता, 
Dockingचे  प्रक्षेपण संध्याकाळी  6 वाजता ,
आणि त्यांच्या अंतराळस्थानकातील प्रवेशाचे व स्वागताचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी सात वाजता नासा T.V. वरून करण्यात येणार आहे

 नासा संस्था -27 जुलै

             उड्डाणापूर्वी अंतिम तयारीसाठी  Soyuz MS-05 आणि Soyuz booster रेल कारने नेताना

28 जुलैला  नासाचे तीन अंतराळवीर सोयूझ MS-05 ह्या अंतराळ यानातून अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत उड्डाणाआधी हे MS-05 यान व यानाचे बुस्टर चेकिंगस्थळी रेलकारने तपासणी व अंतिम तयारीसाठी नेण्यात आले
MS-05 ह्या यानाची अंतिम चाचणी 26 जुलैला करण्यात आली ह्या अंतराळवीरांची अंतराळस्थानकाकडे प्रयाणाची अंतिम तयारी जोरात सुरु आहे


Thursday 13 July 2017

Life In Space Station -Jack Fischer

                              Jack Fischer अंतराळ स्थानकातून संवाद साधताना   फोटो -नासा संस्था

नासा संस्था -10 जुलै
सध्या नासाच्या अंतराळ मोहीम 52 चे अंतराळवीर अंतराळ स्थानकात राहून संशोधन करत आहेत
ते तिथे कसे राहतात? काय खातात? त्यांची दिनचर्या कशी असते ?त्यांच्या कामाच स्वरूप काय ?असे प्रश्न साऱ्यांनाच सतत पडत असतात आणि वेळोवेळी नासा संस्थेमार्फत विध्यार्थी,नागरिक ,संस्थेतील पदाधिकारी ह्या अंतराळवीरांशी लाईव्ह टेलीकास्ट द्वारे संवाद साधत ह्या प्रश्नांचे निरसन करत असतात
नुकतेच नासा संस्थेने पत्रकारांना ह्या अंतराळ वीरांसोबत लाईव्ह टेलिकास्टद्वारे संवाद साधण्याची संधी दिली तेव्हा अंतरराळवीर Jack  Fischer ह्यांनी पत्रकारांना अंतराळवीरांच्या स्पेस लाईफ बद्दल माहिती देत साधलेला हा मोकळा संवाद

4 जुलैला तुम्ही पाठवलेले फोटो पाहिले त्यात तुमची आनंदी मुद्रा दिसतेय! तुम्ही फोटो शूट ,विडिओ ह्या व्यतिरिक्त सेलिब्रेशन करण्यासाठी आणखी काय केल ? की कामच केलत ?
हो ! आम्हाला खूप काम होत ,आहे ! नुकताच अंतराळ स्थानकात Space X  कार्गोशिप आल त्यात सायंटीफिक प्रयोगासाठी लागणार साहित्य होत ते सेटअप केलं शिवाय इथे सुरु असलेल्या संशोधनात्मक प्रयोगाचे सॅम्पल्स पृथ्वीवर पाठवण्यासाठी तयार केले आणखीही खूप कामे आहेत

Peggy Whitson  ह्यांचा अंतराळ स्थानकातील कार्यकाळ वाढवण्यात आलाय त्यांच्या बरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे ?

Peggy सायंटिस्ट आहे,अनुभवी आहे,ती खूप उत्साही पण आहे तिच्यात चार माणसांचं काम एकटीन करण्याची क्षमता आहे  म्हणूनच तीच काम आम्हाला प्रेरित करत आमच्या सगळ्यात ती जास्त अनुभवी असल्यामुळे ती आमच्या साऱ्यांच्याच संशोधनात सहभाग नोंदवते तीच कुशल नेतृत्व आम्हाला उपयोगी पडत आम्हाला आमच काम खूप आवडत त्या मुळेच आम्ही निष्ठेने संशोधन करू शकतो

लाँचिंगचा पहिला अनुभव कसा होता ? तुला अपेक्षित तसाच अनुभव होता कि वेगळा ?

तो अदभुत अनुभव होता ! सुरवातीला लाँचिंग नंतर झटका बसला अन आठ मिनिटानंतर वजनविरहित अवस्था व्हायला सुरवात झाली बाहेरच दृश्य कल्पनातीत होत! समोर अंतराळस्थानक दिसत होत त्यात आपण वास्तव्य करणार आहोत हि बाबच क्षणभर अविश्वसनीय वाटली स्वप्नवत वाटली !

स्पेस स्टेशन मधला दिवस कसा सुरु होतो ?

सकाळी लवकर सहाला उठून आम्ही फ्रेश होतो नंतर व्यायाम करतो कारण मायक्रो ग्रॅव्हिटीमुळे शरीरावर विपरीत परिणाम होतो तिथे नेहमीच्या शारीरिक हालचाली नसतात त्या मुळे हाडांवर परिणाम होतो इथे व्यायामाची साधने आहेत नंतर कामाला सुरवात होते

तुझा अर्धा कार्यकाळ आता संपत आलाय तरीही स्थानकात राहताना भीती नाही का वाटत ?

सुरवातीला भीती तर वाटतेच पण हळू हळू सवय होते स्वत:बरोबर स्थानकातील सिस्टीम वर विश्वास ठेवावा लागतो इथल्या सर्वच सिस्टीम आपल्या नियंत्रणात नसतात जगभरातल्या कुशल शास्त्रज्ञाच्या टीमवर आम्ही विसंबून असतो कधीही काहीही होऊ शकत ह्याची भीती तर असतेच पण म्हणून घाबरून त्याचाच विचार करत बसल तर कामावर लक्ष कस केंद्रित करणार ?

तुझा स्पेसवॉकचा अनुभव कसा होता buoyancy lab मध्ये कठीण प्रॅक्टिस केली होतीस ? प्रत्यक्ष अनुभव कसा होता ?

मला buoyancy lab मध्ये प्रॅक्टिस करताना खूप मजा आली होती प्रत्यक्षात स्पेसवॉकच्या वेळेसचा अनुभवही मजेशीरच होता आम्ही नेहमीच स्थानकातून खिडकी बाहेर पहात असतो पण प्रत्यक्ष अंतराळात जाण म्हणजे ,अदभूत अद्वितीय अवर्णनीय अनुभव होता तो ! वाव ! काय अलौकिक दृश्य असत !अंतराळात फक्त आपण एकटेच, आजूबाजूला कोणीच नाही,सोबतीला आकाशातील असंख्य तारे,दूरवर ब्रह्मांडात खोल आकाशगंगा वातावरणात निरव शांतता अगदी स्वप्नात पाहतो तस प्रात्यक्षातल दृश्य, एक वेगळाच अविस्मरणीय अलौकिक अनुभव असतो तो आगळ वेगळं विश्वदर्शन होत खाली नजर टाकताच पृथ्वीच पूर्ण रूप पहायला मिळत ते अदभुत सौन्दर्य पहातानाचा अनुभव आनंददायी असतो ,पुन्हा: पुन्हा तिथे जावस वाटत !

स्पेस स्टेशन मधली सगळयात उत्तम गोष्ठ कोणती ? आणि वाईट कोणती ? दोन्हीही अनुभव शेअर कर

वाईट म्हणाल तर माझी बायको माझ्यासोबत नाही,तिची उणीव भासतेच तिच्या असण्यान आयुष्यात खूप फरक पडतो !
आणि चांगली गोष्ठ म्हणाल तर मला उडायला अत्यंत आवडत.आणि अत्याधिक आवडीची गोष्ठ म्हणजे इथे रोज नवनवीन गोष्ठी करायला मिळतात नवीन वैज्ञानिक प्रयोग करायला मिळतात हे वैज्ञानिक संशोधन मानवी आरोग्याशी निगडित आणि उपयुक्त असल्यामुळे चांगल वाटत आता सुद्धा Peggy  दुसऱया रूममध्ये कॅन्सर lang Tissue culture वर संशोधन करतेय त्याचा फायदा cancer वर प्रभावी उपचारासाठी होईल हे काम निश्चितच अभिमानास्पद आहे समाधानकारक आहे

सध्या स्पेसस्टेशन मध्ये तुम्ही तिघेच आहात त्या मुळे बरीच मोकळी जागा आहे पण लवकरच स्थानकात आणखी तिन अंतराळवीर येतील तेव्हा जागा कमी होईल ह्याच दुःख होईल कि आपल्या मदतीला आणखी तीन जण आल्याचा आनंद ?

सगळ्याच बाबीला चांगली वाईट बाजू असतेच तसाच जागेचा प्रॉब्लेम होईल पण तरीही आम्ही ह्या नवीन अंतराळवीरांच्या येण्याची उत्सुकतेने वाट पाहतोय आता स्थानकाचा पूर्ण क्षमतेने वापर होईल आणि आम्ही सर्वजण मिळून करणार असलेल्या संशोधनात्मक प्रयोगाबद्दल देखील मला उत्सुकता आहे

स्पेस स्टेशन मध्ये तुम्ही फक्त कामच करत असता मग ,कामाचा थकवा घालवण्यासाठी तुम्ही मिळालेल्या मोकळ्या वेळेचा कसा उपयोग करता ?

                        अंतराळ स्थानकात सिनेमा पाहताना अंतराळवीर -फोटो -जॅक आणि पेगी -नासा संस्था     

आम्ही कधी कधी शुक्रवारी रात्री picture पाहतो त्या साठी स्थानकातील projector चा वापर करतो आम्ही तात्पुरती सिलींगवर screen  लावतो Peggy ने lounge chairs तयार केल्या आहेत ज्यावर बसून आम्ही सिलींगवर लावलेल्या स्क्रीनवर सिनेमा पाहतो आम्ही आमच्या कुटुंबियांशी संपर्क साधत त्यांच्याशी बातचीत करतो कधी फोटो काढतो एकूणच मोकळा वेळ मिळाला तरीही आम्ही बिझीच असतो
                         

Wednesday 5 July 2017

Happy 4th July From Space Station




                 अंतराळवीर Jack Fischer व Peggy Whitson अंतराळ स्थानकातुन देशाला अभिवादन करताना
                                                                                                                                    फोटो -नासा संस्था

नासा संस्था- 5 जुलै
नासाच्या अंतराळमोहीम 52 चे अंतराळ वीर Jack Fischer व Peggy Whitson ह्यांनी चार जुलैला अंतराळ स्थानकात अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला तेव्हा त्यांनी अमेरिकेच्या झेंडयाच्या डिझाईन सारखा ड्रेस परिधान केला होता
पृथ्वीपासून अडीचशे मैल दूर अवकाशातील फिरत्या अंतराळस्थानकातील ह्या क्षणाचे फोटो पृथवरील नागरिकांना पाहण्यासाठी अंतराळवीर Jack Fischer ह्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत
Jack Fischer व Peggy Whitson म्हणतात
                                               " Happy 4th July from Space Station " 
आम्हाला अंतराळ स्थानकात काही वेळ ताठ उभे राहताना त्रास होतो पण आमच्या देशासाठी तो त्रास सहन करत ताठ उभे राहून देशाला अभिवादन करताना आम्हाला अभिमान वाटतोय

Sunday 2 July 2017

इसरोने केले G.SAT-17 ह्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

     फोटो -इसरो संस्था

इसरो संस्था -30 जुन
भारतीय संशोधन संस्था इसरोने G.SAT-17 ह्या उपग्रहाचे फ्रेंच गियाना मधल्या  Kourou  येथील अवकाश केंद्रातून 29 जूनला रात्री 2  वाजून 45 मिनिटाला यशस्वी प्रक्षेपण केले.
3477 k.g.वजनाच्या G SAT-17 ह्या उपग्रहाचा उपयोग विविध दळणवळण सेवा पुरविण्यासाठी होणार आहे
ह्या उपग्रहामध्ये त्या साठी नॉर्मल C-band Payload, Extended C-band आणि S-band बसविले आहेत ह्या आधीच्या INSAT उपग्रहात माहिती पुरवण्यासाठी बसवण्यात आलेल्या यंत्रणेसोबतच अत्याधुनिक संशोधन करून खगोल शास्त्रीय व इतर वैज्ञानिक माहिती पुरवण्यासाठी खास अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ह्यात करण्यात आला आहे.


         अत्याधुनिक यंत्रणेने बनवलेला  GSAT- 17 उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज फोटो -इसरो संस्था

GSAT-17 ह्या उपग्रहाने अंतराळात यशस्वी झेप घेताच कर्नाटकातील हसन येथील इसरोच्या मुख्यालयातील वैज्ञानिकांनी या उपग्रहावर नियंत्रण मिळवीत प्रक्षेपण यशस्वी झाल्याचा आनंद साजरा केला आता हा उपग्रह अवकाशातील नियोजित स्थळी स्थापित झाला असुन अवकाशातून कार्यरत होऊन शास्त्रज्ञांना अपेक्षित माहिती पाठवेल.हा उपग्रह पंधरा वर्षे अवकाशात कार्यरत राहील