मंगळाच्या कक्षेत शिरून मंगळाभोवती भ्रमण करताना मॉम मंगळयान फोटो -इसरो संस्था
इसरो -20 जुन
इसरोने मंगळावर पाठवलेल्या मॉम ह्या मंगळ यानाने मंगळाभोवती निर्विघ्नपणे अविरत भ्रमण करत एकोणीस जुनला हजार दिवस पूर्ण केले आहेत आणि मंगळावरील दिवसांच्या गणने प्रमाणे एकूण 973.24 दिवस भ्रमण करत मंगळाभोवती 388 परिक्रमा पूर्ण केल्या आहेत
भारताच्या इसरो संस्थेमधून 5 नोव्हेंबर 2013 रोजी मार्स ऑर्बिटर मिशन( MOM ) P S L V-C25 ह्या मंगळ यानाने मंगळाकडे प्रयाण केले होते 24 सप्टेंबर 2014 रोजी कुठलेही विघ्न न येता हे मंगळ यान मंगळावर सुखरूप पोहोचले होते सुरवातीला मॉम ह्या मंगळ यानाची कालमर्यादा शास्त्रज्ञांनी सहा महिने पर्यंत गृहीत धरली होती पण सहा महिन्यानंतरही ह्या यानात आवश्यकते पेक्षा जास्त इंधन शिल्लक असल्याने त्याची कार्यमर्यादा वाढवण्यात आली आता हे मंगळयान आणखी काही वर्षे मंगळाभोवती भ्रमण करेल व मंगळावरील उपयुक्त माहिती पृथ्वीवर पाठवेल अशी आशा शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे
कमी वेळेत ,कमी खर्चात ,कमी वजनाचे आणि अध्ययावत कॅमेरा व पाच विषम पेलोड बसवून मॉम हे मंगळ यान बनवल्याने भारताचे सर्वत्र कौतुक झाले होते पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत प्रवेश करून ह्या मंगळ यानाने हि मोहीम यशस्वी केली आणि भारताने मंगळावर अंतराळ यान पाठवणारया देशात चवथा क्रमांक मिळवत बाजी मारली मॉम मंगळयान अजूनही यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहे आणि आता तर भारताचे मंगळ मिशन यशस्वी करणारया मॉम मंगळयानाने मंगळावर हजार दिवस पूर्ण केले आहेत
मॉम ह्या मंगळ यानाने यानातील कॅमेरा व ऑनबोर्ड वैज्ञानिक पेलोडच्या साहाय्याने आतापर्यंत 715 प्रतिमा तयार करून पृथ्वीवर पाठवल्या आहेत आणि ह्या यानाने अंतराळातून पाठवलेल्या माहितीचे संशोधन प्रगतीपथावर आहे
मंगळावर आढळलेल्या volcano चे मॉम मंगळयानाने पाठवलेले फोटो फोटो -इसरो संस्था
मॉम ह्या मंगळयानाच्या यशाने वैज्ञानिक आणि विध्यार्थी ह्यांना प्रेरणा मिळाली असून ह्या मोहिमेचा वापर करून वैज्ञानिकांनी व संशोधकांनी देशासाठी अधिक संशोधन करावे ह्या हेतूने इसरोने वैज्ञानिकांना ह्या मंगळ मोहिमेचा डाटा वापरण्याची मुभा दिली आहे ह्या Opportunity Program (A.O.) अंतर्गत मॉम चा डाटा R&D साठी वापरण्याची संधी जाहीर होताच त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला ह्या प्रकल्पा अंतर्गत सध्या बत्तीस प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत शास्त्रज्ञांच्या संशोधनाला आणखी बळकटी येण्यासाठी व त्यांना प्रेरित करण्यासाठी इसरो तर्फे Planetary Data Analysis वर्कशॉपचे आयोजनही करण्यात आले आहे
भारताच्या ह्या मंगळ मोहिमेतील मॉम चे यश स्पृहणीय तर आहेच शिवाय मॉमने मंगळाविषयीचे सर्व गैरसमज दूर करत मंगळ विघ्न आणणारा ग्रह नसून तिथेही पूर्वी जीवसृष्ठी होती हे सिद्ध केले आहे

No comments:
Post a Comment