नासाच्या 2018 च्या सौर मिशन साठी बनवलेले पार्कर सोलर प्रोब अंतरिक्ष यान -फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 8 जुन
( नासा संस्थेकडून 31 मेला मिळालेल्या माहिती नुसार )
सूर्य आकाशात प्रचंड उष्णतेने आणि प्रखर तेजान तळपताना त्याच्याकडे जास्तवेळ पाहणही मानवाला अवघड जात सध्यातर उन्हान लोक हैराण झालेत कधी एकदा ह्या असह्य उकाडयातून सुटका होतेय अन पाऊस बरसतोय अस लोकांना झालय तेही सूर्य आपल्यापासून कित्येक हजारो मैल दूर असताना पण पावसाच्या आगमना आधीच ह्याच तळपत्या आणि सतत आगीचा डोंब बाहेर टाकणाऱया सूर्याच्या कक्षेत नासाचे वैज्ञानिक आता अंतरिक्ष यान पाठवणार असल्याची आश्चर्यकारक बातमी नुकतीच नासाच्या वैज्ञानिकांनी दिलीय हि बातमी अविश्व्सनीय असली तरी खरी आहे
नासाचे अंतरिक्ष यान आता सूर्याला गवसणी घालणार असल्याच नासाने जाहीर केलय आणि त्याची तयारीही सुरु आहे त्या साठी खास अंतरिक्ष यान बनवण्यात देखील आले आहे
2018 च्या उन्हाळ्यात नासाचे वैज्ञानिक पार्कर सोलर प्रोब नावाच अंतरिक्ष यान सूर्याच्या कक्षेत पाठवणार आहेत शिकागो युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर असलेले शास्त्रज्ञ डॉ युजीन पार्कर ( astrophysicist ) ह्यांच्या नावावरून ह्या अंतरिक्ष यानाच नाव ठेवण्यात आलय पहिल्यांदाच जिवंत शास्त्रज्ञाच्या नावावरून यानाला हे नाव देण्यात आलेय कारण त्यांनी 1958 मध्ये प्रथम सूर्यावर संशोधन करून सौरवारे ,सौरवादळ आणि तेथील चुंबकीय क्षेत्र ह्याचा शोध लावला होता
सूर्याच्या अतिशय उष्ण तापमानाच्या 3.9 million मैल अंतराच्या कक्षेत पाठवण्यासाठी खास उष्णता प्रूफ अंतराळ यान बनवण्यात आले असून ह्या यानातील आतल्या भागात सर्वत्र तापमान सामान्य राहण्यासाठी
ह्या यानाला खास carbon-composite उष्णता रोधक शिल्ड बसवण्यात आल आहे
बुध सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे आणि तो सूर्यापासून 5 करोड 89 लाख लांबीवर भ्रमण करतो
बुध ग्रहावर 801डिग्री f . इतके तापमान असते आणि ह्या तुलनेत 3.9 million मैल अंतरावर असणारया नव्या पार्कर प्रोब अंतरिक्ष यानाचे तापमान 2.550 डिग्री f. इतके असेल म्हणूनच उष्णता रोधक शिल्ड ह्या यानात बसवण्यात आली आहे ह्या यानामुळे शास्त्रज्ञांना सौरमालेतील ताऱ्यांची सखोल ,अत्याधुनिक आणि अचूक माहिती मिळेल हे अंतरिक्ष यान ताऱयांचे जवळून निरीक्षण करून पृथीवर माहिती पाठवेल
ह्या प्रोजेक्टचे प्रमूख शास्त्रज्ञ निकोल फॉक्स ह्यांनी ह्या सौर मिशनला द कुलेस्ट हॉटेस्ट मिशन अंडर सन असे नाव दिले आहे डॉ.यूजीन पार्कर ह्या मिशन बद्दल बोलताना म्हणतात ," मी खूप exited आहे कारण ह्या आधी सूर्याच्या कक्षेत एकही अंतरिक्ष यान गेलेल नाही आता मात्र आपल्याला सूर्याची सखोल माहिती मिळेल सौरवाऱ्यांच्या हालचाली ,त्यांचा प्रचंड वेग ,अत्युच्च उष्णता म्हणजेच प्रत्यक्षात हे वारे कसे आणि किती वेगाने वाहतात त्याची अचूक माहिती मिळेल आणि आपल्यासाठी ते सरप्राईझ असेल शिवाय ह्या अंतरिक्ष यानातील नव्या टेकनॉलॉजी मुळे व त्यातील अत्याधुनिक उपकरणाच्या साह्याने सूर्याच्या पृष्ठभागावरील उष्णतेपेक्षा सूर्याभोवतीचे सौरमंडळ (corona ) हे प्रखर तेजाने का तळपते ? त्याची उष्णता अत्युच्च का आहे ? ह्याचे उत्तर देखील मिळेल अशी आशा वाटते "
दुरून सूर्याच्या प्रखर उष्णतेने पृथ्वीवरील जनता होरपळते इथली हिरवीगार सृष्टी जळून खाक होते त्या आग ओकणाऱया आगीच्या डोंबाजवळ म्हणजेच सूर्याजवळ प्रत्यक्षात जाऊन त्याला गवसणी घालून तिथली माहिती मिळवण्याच शास्त्रज्ञांचं स्वप्न लवकरच साकारतय हे या वैज्ञानिक युगातील यश निश्चितच वाखाणण्याजोग ! अर्थात सध्या सतत अशा अतर्क्य ,अनाकलनीय ब्रम्हन्डातील गोष्टी अत्यंत परिश्रमाने ,कुशलतेने आणि बुद्धिचातुर्याने शास्त्रज्ञ सहजतेने उलगडून दाखवत आहेत
No comments:
Post a Comment