Wednesday 21 June 2017

भारताच्या मॉम मंगळयानाने एकोणीस जूनला केले मंगळावर हजार दिवस पूर्ण



                मंगळाच्या कक्षेत शिरून मंगळाभोवती भ्रमण करताना मॉम मंगळयान फोटो -इसरो संस्था

इसरो -20 जुन  
इसरोने मंगळावर पाठवलेल्या मॉम ह्या मंगळ यानाने मंगळाभोवती निर्विघ्नपणे अविरत भ्रमण करत एकोणीस जुनला हजार दिवस पूर्ण केले आहेत आणि मंगळावरील दिवसांच्या गणने प्रमाणे एकूण 973.24 दिवस भ्रमण करत मंगळाभोवती 388 परिक्रमा पूर्ण केल्या आहेत
भारताच्या  इसरो संस्थेमधून 5 नोव्हेंबर 2013 रोजी मार्स ऑर्बिटर मिशन( MOM ) P S L V-C25 ह्या मंगळ यानाने मंगळाकडे प्रयाण केले होते 24 सप्टेंबर 2014 रोजी कुठलेही विघ्न न येता हे मंगळ यान मंगळावर सुखरूप पोहोचले होते सुरवातीला मॉम ह्या मंगळ यानाची कालमर्यादा शास्त्रज्ञांनी सहा महिने पर्यंत गृहीत धरली होती पण सहा महिन्यानंतरही ह्या यानात आवश्यकते पेक्षा जास्त इंधन शिल्लक असल्याने त्याची कार्यमर्यादा वाढवण्यात आली आता हे मंगळयान आणखी काही वर्षे मंगळाभोवती भ्रमण करेल व मंगळावरील उपयुक्त माहिती पृथ्वीवर पाठवेल अशी आशा शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे
कमी वेळेत ,कमी खर्चात ,कमी वजनाचे आणि अध्ययावत कॅमेरा व पाच विषम पेलोड बसवून  मॉम हे मंगळ यान बनवल्याने भारताचे सर्वत्र कौतुक झाले होते पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत प्रवेश करून ह्या मंगळ यानाने हि मोहीम यशस्वी केली आणि भारताने मंगळावर अंतराळ यान पाठवणारया देशात चवथा क्रमांक मिळवत बाजी मारली मॉम मंगळयान अजूनही यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहे आणि आता तर भारताचे मंगळ मिशन यशस्वी करणारया मॉम मंगळयानाने मंगळावर हजार दिवस पूर्ण केले आहेत
मॉम ह्या मंगळ यानाने यानातील कॅमेरा व ऑनबोर्ड  वैज्ञानिक पेलोडच्या साहाय्याने आतापर्यंत  715 प्रतिमा तयार करून पृथ्वीवर पाठवल्या आहेत आणि ह्या यानाने अंतराळातून पाठवलेल्या माहितीचे संशोधन प्रगतीपथावर आहे

               मंगळावर आढळलेल्या  volcano चे मॉम मंगळयानाने पाठवलेले फोटो       फोटो -इसरो संस्था

मॉम ह्या मंगळयानाच्या यशाने वैज्ञानिक आणि विध्यार्थी ह्यांना प्रेरणा मिळाली असून ह्या मोहिमेचा वापर करून वैज्ञानिकांनी व संशोधकांनी देशासाठी अधिक संशोधन करावे ह्या हेतूने इसरोने वैज्ञानिकांना ह्या मंगळ मोहिमेचा डाटा वापरण्याची मुभा दिली आहे ह्या Opportunity Program (A.O.) अंतर्गत मॉम चा डाटा R&D साठी वापरण्याची संधी जाहीर होताच त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला ह्या प्रकल्पा अंतर्गत सध्या बत्तीस प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत शास्त्रज्ञांच्या संशोधनाला आणखी बळकटी येण्यासाठी व त्यांना प्रेरित करण्यासाठी इसरो तर्फे Planetary Data Analysis वर्कशॉपचे आयोजनही करण्यात आले आहे
भारताच्या ह्या मंगळ मोहिमेतील मॉम चे यश स्पृहणीय तर आहेच शिवाय मॉमने मंगळाविषयीचे सर्व गैरसमज दूर करत मंगळ विघ्न आणणारा ग्रह नसून तिथेही पूर्वी जीवसृष्ठी होती हे सिद्ध केले आहे   

Saturday 17 June 2017

नासाने केली भावी अंतराळवीरांची निवड

                  अवकाशात झेप घेण्यासाठी निवड झालेले नासाचे भावी अंतराळवीर फोटो -नासा संस्था
                        

नासा संस्था - 7 जुन
नासाच्या अधिकाऱयांच्या उपस्थितीत होस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटर मध्ये सात जूनला झालेल्या एका सोहळ्यात अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेन्स ह्यांनी  2017च्या नव्या अंतराळवीरांच्या तुकडीचा परिचय करून दिला ह्या वेळी जॉन्सन पेन्स ह्यांनी जॉन्सन स्पेस सेंटरची माहिती जाणून घेतली
त्यांनी पहिल्या चांद्रयान मोहिमेतील अपोलो 11 च्या वेळेसचे कंट्रोल सेंटर व नवीन सेंटरला भेट दिली ह्या कार्यक्रमात त्यांना नासा संस्थेतर्फे ISS ची प्रतिकृती व अंतराळस्थानकात नेण्यात आलेला अमेरिकेचा झेंडा असलेली फ्रेम भेट म्हणून देण्यात आली
विशेष म्हणजे स्पेसमध्ये राहून exiting करिअर करण्यासाठी हजारो जण इच्छुक होते त्या मुळेच अंतराळवीर होण्यासाठी विक्रमी अर्ज आले होते विशेष म्हणजे ह्या रेकॉर्ड ब्रेक 18,300 उमेद्वारांमधुन फक्त बारा जणांची निवड करण्यात आली असून त्यात महिला व पुरुष ह्यांचा समावेश आहे 2000 सालानंतर निवड करण्यात आलेली हि पहिलीच अंतराळवीरांची मोठी तुकडी आहे
ह्या कार्यक्रमात उपराष्ट्रपती माईक पेन्स ह्यांनी ह्या नव्या अंतराळवीरांच्या तुकडीचे कौतुक करत
अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष Donald Trump ह्यांच्या वतीने अभिनंदन केले ते म्हणाले कि",राष्ट्राध्यक्षांना तुमचा अभिमान वाटतो तसाच मलाही !" निवड झालेले हे भावी अंतराळवीर आपल्या बुद्धीने,धैर्याने आणि कुशलतेने आपल्या राष्ट्राला प्रगतीपथावर नेतील व नव्या पिढीला नक्कीच प्रेरणा देतील
नासाचे Administrator Robert Lightfoot ह्यांनी देखील ह्या अंतराळवीराबद्दल गौरोवोउदगार काढत त्यांनी उत्साहाने व कर्तृत्वाने केलेल्या संशोधनाने देशाचे भविष्य उज्वल होईल अशी आशा व्यक्त केली
ह्या नवीन अंतराळवीरांच्या भरतीने आता नासा परिवाराच्या संख्येत वाढ झाली आहे हे सर्वजण ऑगष्ट मध्ये जॉन्सन स्पेस सेंटर मध्ये दाखल होतील त्यानंतर त्यांना दोन वर्षे ट्रेनिंग दिल्या जाईल
ह्या कठोर परिश्रमाच्या प्रशिक्षणानंतर त्यांना वेगवेगळ्या मोहिमात सहभाग घेता येईल ज्या मध्ये अंतराळ स्थानकात राहून वेगवेगळ्या विषयांवरील वैज्ञानिक संशोधन करणे कमर्शियल कंपनीने तयार केलेल्या अंतराळ यानातून अमेरिकेच्या भूमीवरून अवकाशात झेप घेणे भावी अंतराळातील दूरवरच्या ग्रहावरील विशेषतः: मंगळ मिशन मध्ये सहभागी होणे Orion Space Craft व Space Launch System Rocket मधून अंतराळात प्रयाण करणे ह्या गोष्टींचा समावेश आहे
निवड झालेल्या अंतराळवीरांच्या तुकडीत सात पुरुष व पाच महिलांचा समावेश असून त्यात एक भारतीय वंशाचा अंतराळवीर आहे राजा चारी असे त्याचे नाव असून याचे वडील भारतीय आहेत कल्पना चावला सुनीता विल्ल्यम्स ह्या दोघीनंतर अंतराळात जाणारा हा तिसरा भारतीय अंतराळवीर असेल
ह्या भावी अंतराळवीरांमध्ये सहा सेना अधिकारी ,तीन वैज्ञानिक दोन डॉक्टर्स व एक इंजिनीअर आहे ह्यांच्या सोबत नासाचा एक रिसर्च पायलटही ह्या अंतराळवीरांसोबत असेल

Thursday 8 June 2017

नासाचे अंतरिक्ष यान आता सूर्याला गवसणी घालणार नासाने केल जाहीर


       नासाच्या  2018 च्या सौर मिशन साठी बनवलेले पार्कर सोलर प्रोब अंतरिक्ष यान -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 8 जुन
( नासा संस्थेकडून 31 मेला मिळालेल्या माहिती नुसार )
सूर्य आकाशात प्रचंड उष्णतेने आणि प्रखर तेजान तळपताना त्याच्याकडे जास्तवेळ पाहणही मानवाला अवघड जात सध्यातर उन्हान लोक हैराण झालेत कधी एकदा ह्या असह्य उकाडयातून सुटका होतेय अन पाऊस बरसतोय अस लोकांना झालय तेही सूर्य आपल्यापासून कित्येक हजारो मैल दूर असताना पण पावसाच्या आगमना आधीच ह्याच तळपत्या आणि सतत आगीचा डोंब बाहेर टाकणाऱया सूर्याच्या कक्षेत नासाचे वैज्ञानिक आता अंतरिक्ष यान पाठवणार असल्याची आश्चर्यकारक बातमी नुकतीच नासाच्या वैज्ञानिकांनी दिलीय हि बातमी अविश्व्सनीय असली तरी खरी आहे
नासाचे अंतरिक्ष यान आता सूर्याला गवसणी घालणार असल्याच नासाने जाहीर केलय आणि त्याची तयारीही सुरु आहे त्या साठी खास अंतरिक्ष यान बनवण्यात देखील आले आहे 
2018 च्या उन्हाळ्यात नासाचे वैज्ञानिक पार्कर सोलर प्रोब नावाच अंतरिक्ष यान सूर्याच्या कक्षेत पाठवणार आहेत शिकागो युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर असलेले शास्त्रज्ञ  डॉ युजीन पार्कर ( astrophysicist ) ह्यांच्या नावावरून ह्या अंतरिक्ष यानाच नाव ठेवण्यात आलय पहिल्यांदाच जिवंत शास्त्रज्ञाच्या नावावरून यानाला हे नाव देण्यात आलेय कारण त्यांनी 1958 मध्ये प्रथम सूर्यावर संशोधन करून सौरवारे ,सौरवादळ आणि तेथील चुंबकीय क्षेत्र ह्याचा शोध लावला होता
सूर्याच्या अतिशय उष्ण तापमानाच्या  3.9 million मैल अंतराच्या कक्षेत पाठवण्यासाठी खास उष्णता प्रूफ अंतराळ यान बनवण्यात आले असून ह्या यानातील आतल्या भागात सर्वत्र तापमान सामान्य राहण्यासाठी
ह्या यानाला खास carbon-composite उष्णता रोधक शिल्ड बसवण्यात आल आहे
बुध सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे आणि तो सूर्यापासून  5 करोड 89 लाख  लांबीवर भ्रमण करतो
बुध ग्रहावर 801डिग्री f .  इतके तापमान असते आणि ह्या तुलनेत  3.9 million मैल अंतरावर असणारया नव्या पार्कर प्रोब अंतरिक्ष यानाचे तापमान 2.550 डिग्री f. इतके असेल म्हणूनच उष्णता रोधक शिल्ड ह्या यानात बसवण्यात  आली आहे ह्या यानामुळे शास्त्रज्ञांना सौरमालेतील ताऱ्यांची  सखोल ,अत्याधुनिक आणि अचूक माहिती मिळेल हे अंतरिक्ष यान ताऱयांचे जवळून निरीक्षण करून पृथीवर माहिती पाठवेल
ह्या प्रोजेक्टचे प्रमूख शास्त्रज्ञ निकोल फॉक्स ह्यांनी ह्या सौर मिशनला  द कुलेस्ट हॉटेस्ट मिशन अंडर सन असे नाव दिले आहे डॉ.यूजीन पार्कर ह्या मिशन बद्दल बोलताना म्हणतात ," मी खूप exited  आहे कारण ह्या आधी सूर्याच्या कक्षेत एकही अंतरिक्ष यान गेलेल नाही आता मात्र आपल्याला सूर्याची सखोल माहिती मिळेल सौरवाऱ्यांच्या हालचाली ,त्यांचा प्रचंड वेग ,अत्युच्च उष्णता म्हणजेच प्रत्यक्षात हे वारे कसे आणि किती वेगाने वाहतात त्याची अचूक माहिती मिळेल आणि आपल्यासाठी ते सरप्राईझ असेल शिवाय ह्या अंतरिक्ष यानातील नव्या टेकनॉलॉजी मुळे व त्यातील अत्याधुनिक उपकरणाच्या साह्याने सूर्याच्या पृष्ठभागावरील उष्णतेपेक्षा सूर्याभोवतीचे सौरमंडळ (corona ) हे प्रखर तेजाने का तळपते ? त्याची उष्णता अत्युच्च का आहे ? ह्याचे उत्तर देखील मिळेल अशी आशा वाटते "
दुरून सूर्याच्या प्रखर उष्णतेने पृथ्वीवरील जनता होरपळते इथली हिरवीगार सृष्टी जळून खाक होते त्या आग ओकणाऱया आगीच्या डोंबाजवळ म्हणजेच सूर्याजवळ प्रत्यक्षात जाऊन त्याला गवसणी घालून तिथली माहिती मिळवण्याच शास्त्रज्ञांचं स्वप्न लवकरच साकारतय हे या वैज्ञानिक युगातील यश निश्चितच वाखाणण्याजोग ! अर्थात सध्या सतत अशा अतर्क्य ,अनाकलनीय ब्रम्हन्डातील गोष्टी अत्यंत परिश्रमाने ,कुशलतेने आणि बुद्धिचातुर्याने शास्त्रज्ञ सहजतेने उलगडून दाखवत आहेत



Saturday 3 June 2017

अंतराळवीर Thomas Pesquet आणि Oleg Novitskiy पृथ्वीवर परतले

              नासाचे अंतराळवीर  Thomas Pesquet  पृथ्वीवर परतल्यानंतर फोटो -नासा संस्था

नासा संस्था -3 जून
नासाच्या अंतराळ मोहीम 51 चे अंतराळवीर Thomas Pesquet आणि Oleg Novitskiy अंतराळस्थानकात 196 दिवस मुक्काम करून दोन जूनला  पृथ्वीवर परतले आहेत सोयूझ MS-03 ह्या अंतराळ यानातून हे दोन्ही अंतराळवीर सकाळी 10.10m वाजता कझाकस्थान येथे पोहोचले
हे अंतराळवीर कझाकस्थान येथे पोहोचल्यानंतर रशियन रिकव्हरी टीमने अंतराळवीरांना सोयूझ यानातून बाहेर आणले व अंतराळस्थानकातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातून पृथ्वीवरील वातावरणात adjust होण्यासाठी मदतही केली
हे दोन्ही अंतराळवीर 19 नोव्हेंबर 2016 मध्ये नासाच्या Peggy Whitson ह्यांच्या सोबत अंतराळ स्थानकात राहायला गेले होते तेथे सुरु असलेल्या वैज्ञानिक संशोधनात त्यांनी सहभाग नोंदवला
Peggy ह्यांनी अंतराळस्थानकातील त्यांचा मुक्काम वाढवल्यामुळे युरोपियन अंतराळवीर Thomas Pesquet आणि रशियन अंतराळवीर Oleg Novitskiy  हे दोघेच पृथ्वीवर परतले आहेत अंतराळ स्थानकातून निघण्याआधी अंतराळ स्थानकातील निरोपाच्या क्षणी सर्वच अंतराळवीर क्षणभर भावविवश झाले होते


         अंतराळ स्थानकात रशियन अंतराळवीर Oleg Novitskiy व युरोपियन अंतराळवीर Thomas Pesquet
               Thomas ह्यांचा वाढदिवस साजरा करताना  फोटो -नासा संस्था

सध्या रशियन अंतराळवीर Fyodor Yuchikhin  ,नासाच्या Peggy Whitson व Jack Fischer हे तिघे स्थानकात राहून आपले संशोधन सुरु ठेवतील
आता अंतराळ मोहीम 52 चे नेतृत्व मात्र Peggy ह्यांच्या ऐवजी रशियन अंतराळवीर Fyodor Yuchikhin ह्यांच्या हाती सोपवण्यात आले आहे