अंतराळवीर Andry ,Shane आणि Sergey अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाण्याच्या तयारीत असताना
नासा संस्था -19 ऑकटोबर
बुधवारी 19 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजून 5 मिनिटांनी कझाकस्थानातील बैकोनूर येथील कॉस्मोड्रोम वरून सोयूझ MS-02 ह्या अंतराळ यानाने नासाच्या तीन अंतराळवीरांना घेऊन अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली
नासाच्या अंतराळ मोहिम 49 अंतरगत अंतराळ स्थानकात राहण्यासाठी गेलेल्या अंतराळवीरांमध्ये
नासाचे अंतराळवीर Shane Kimbrough , रशियाचे अंतराळवीर Sergey Ryzhikov व Andry Borisenko ह्यांचा समावेश आहे
बुधवारी पृथ्वीवरून स्थानकाकडे प्रयाण केलेले हे यान शुक्रवारी 21 ऑक्टोबरला अंतराळ स्थानकात पोहोचेल हे तीन अंतराळवीर 5.59 am ला अंतराळस्थानकाच्या Poisk module मध्ये प्रवेश करतील तेव्हा अंतराळ स्थानकातील सद्या राहात असलेले अंतराळवीर त्यांचे स्थानकात स्वागत करतील
हे तीन अंतराळवीर आणि आधीचे तीन असे सहा अंतराळवीर आता स्थानकात राहून त्यांचे तिथे सुरु असलेले सायंटिफिक प्रयोग चालू ठेवतील
ह्या अंतराळवीरांनी स्थानकात राहण्यासाठी आवश्यक असलेले ट्रेनिंग आणि फिटनेस टेस्टची प्रक्रिया पूर्ण केली जाण्याआधी त्यांनी मेडिटेशन ,वृक्षारोपण आणि नासा म्युझियमला भेट दिली
त्या नंतर त्यांनी अंतराळवीरांचा पोशाख घालून कमी जागेत अत्यंत वेगाने फिरणारया खुर्चीत बसून आवश्यक चाचणी पूर्ण केली
अंतराळ मोहिम 49 चे रशियाचे कमांडर Lvanishin , नासाची फ्लाईट इंजिनीअर Kate Rubins आणि जपानचे अंतराळवीर Takuya Onishi हे तीघेही तीस ऑक्टोबरला पृथ्वीवर परत येतील
Kimbrough ,Ryzhikov आणि Borisenko हे तीन अंतराळवीर फेब्रुवारी पर्यंत स्थानकात राहतील
नासाचे अंतराळवीर Shane Kimbrough लाँचिंग नंतर अंगठा दाखवताना
त्यांच्या ह्या निवासा दरम्यान ते अंतराळ स्थानकात येणारया मालवाहु अंतरिक्ष यानाचे स्वागत करतील त्या मध्ये 23 ऑक्टोबरला सोमवारी व्हर्जिनिया येथून स्थानकात जाणारया Orbital AT KS Cygnus कार्गोशिपचा समावेश आहे ह्या कार्गोशिप मधून 5,100 पाउंड वजनाचे अंतराळ वीरांना सायंटिफिक प्रयोगासाठी लागणारे सामान व हार्डवेअर पाठवण्यात येईल
Cygnus shipment मधून अंतराळ स्थानकात सुरु असलेल्या फायर स्टडी करण्यासाठी आवश्यक असलेले पेलोड , अंतराळवीरांच्या शरीरातील अंतराळस्थानकातील वातावरणात होणारे बदल ,त्यांची नियमित झोप व आवश्यक हालचालीवर होणारा लाईट इफेक्ट ह्या विषयीच्या संशोधनासाठी आवश्यक साहित्य व Neurans वरील नवीन संशोधनासाठीचे आवश्यक साहित्य पाठवण्यात येईल
जपानी कार्गोशिप मधून नवीन lithium ion बॅटरीज पाठवण्यात येतील सध्या अंतराळ स्थानकात वापरण्यात आलेल्या निकेल हायड्रोजन बॅटरीज डिसेंबर मध्ये बदलण्यात येतील
या शिवाय Space X 10th कमर्शियल रिसप्लायशिप आणि दोन रशियन प्रोग्रेस रिसप्लाय मिशन मधून हजारो टॅन अन्न ,इंधन आणि इतर आवश्यक सामुग्री पाठवण्यात येईल
गेल्या पंधरा वर्षांपासून सतत सातत्याने अंतराळवीर अंतराळस्थानकात राहून मानवी आरोग्यासाठी व जीवनासाठी आवश्यक असे व पृथ्वीवर करता न येणारे प्रयोग अंतराळस्थानकातील फिरत्या प्रयोग शाळेत करत आहेत हे प्रयोग आगामी काळातील दूरवरच्या व खोलवरच्या अंतराळ मोहिमेसाठी मानवाला अंतराळात राहण्यासाठी आणि रोबोटिक मिशन साठी उपयुक्त ठरतील अशी संशोधकांना आशा वाटतेय