Wednesday 28 September 2016

गुरूचा चंद्र Europa वर उडताहेत पाण्याचे फवारे

                           यूरोपावरील पृष्ठभागावर उडणारे पाण्याचे फवारे                                    -फोटो नासा संस्था

नासा संस्था - 28 सप्टेंबर
नासाच्या  Space Telescope Science Institute ( Baltimore )येथील प्रमुख खगोल शास्त्रज्ञ William Sparks व त्यांच्या टीमने हबल टेलिस्कोप च्या साहाय्याने काही छायाचित्रे टिपली
तेव्हा त्यांना युरोपाच्या पृष्ठभागावर पक्षांच्या पिसांप्रमाणे दिसणारे पाण्याचे फवारे उडताना दिसले त्यांनी त्या छायाचित्रांचे सखोल निरीक्षण केले
यूरोपा हा गुरूचा चंद्र गुरु ग्रहाभोवती भ्रमण करत असताना हबल टेलिस्कोपने टिपलेल्या काही छायाचित्रांच्या निरीक्षणा नंतर त्यांनी हि माहिती प्रसारित केली आहे
हे पाण्याचे फवारे 125 मैल उंचीचे असण्याच्या शक्यतेबरोबरच ते समुद्राच्या पाण्यातुन निघत असावेत व हे फवारे त्यांच्या सोबत समुद्रातील पदार्थ यूरोपाच्या पृष्ठभागावर आणत असावेत असा निष्कर्षही शास्त्रज्ञांनी काढला आहे

                              यूरोपाच्या पृष्ठभागावर उडणारी पाण्याची कारंजी                               फोटो -नासा संस्था

यूरोपावर प्रचंड मोठा समुद्र अस्तित्वात असून पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्याच्या दुप्पट पाणीसाठा त्यात असल्याची व हा पाणीसाठा बर्फाच्या जाड थराखाली संरक्षित असणयाची शक्यताही  शास्त्रज्ञांना वाटतेय
ह्या बर्फाच्या थराची जाडी मोजण्यासाठी ह्या थरांमध्ये ड्रिल करून बर्फ खणुन त्याचा नमुना घ्यावा लागेल
आणि जर हे उडणारे फवारे पाण्याचे किंवा वाफेचे असतील तर ड्रिल न करताच निरीक्षणे नोंदवता येतील
ह्या टीमचा मुख्य उद्देश यूरोपावर विरळ वातावरण आहे का ? ह्याचा शोध घेणे हा होता पण अचानक त्यांना युरोपा वर हे पाण्याचे फवारे उडताना दिसले त्या मुळे आता यूरोपावर सौर मंडळाच्या प्रभावाखाली समुद्र व जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता बळावली आहे
2012 साली Lorenz Roth व त्यांच्या टीमने युरोपाच्या बर्फ़ाळ भागावर पाण्याचे वाफारे असंल्याची शक्यता वर्तवली होती त्यांच्या शोधाला आता पृष्ठी मिळाली आहे
जर युरोपा वर पाण्याचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले तर पाणी असणारा तो दुसरा चंद्र ठरेल
ह्या आधी 2005 साली नासाच्या Cassini Orbiter ने शनीच्या Enceladus ह्या चंद्रावर धूळ मिश्रीत पाण्याचे फवारे उडत असल्याचे निरीक्षण नोंदवले होते
असे असले तरीही ह्या छायाचित्रांच्या नोंदीतून ह्या दोनही चंद्रांवर पाणी असण्याची शक्यता आहे पण तसा ठोस पुरावा सद्या तरी उपलब्ध नाही पण लवकरच नासाच्या
आगामी अंतराळ मोहीम 2018 अंतर्गत प्रक्षेपित करण्यात येणाऱया James Webb Space Telescope च्या  साहाय्याने मात्र पाणी अस्तित्वात असल्याचा ठोस पुरावा मिळवता येईल अशी खात्री खगोल शास्त्रज्ञांना वाटतेय शिवाय नासाच्या आगामी अंतराळ मोहिमेत प्रत्यक्ष युरोपा वर जाऊन तिथल्या पृष्ठभागावर उतरुन पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी नासाचे वैज्ञानिक प्रयत्नशील आहेत

Thursday 22 September 2016

नासाचे तीन अंतराळवीर 23 सप्टेंबरला अंतराळ स्थानकात जाणार

              नासा अंतराळवीर Shane Kimbrough  व रशियाचे अंतराळवीर Sergey Ryzhikov Andrey Borisenko
                                                                                                                                      फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 22  सप्टेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 49 चे तीन अंतराळवीर 23 सप्टेंबरला अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत ह्या अंतराळ मोहिमेत
नासाचे अंतराळवीर Shane Kimbrough
रशियाचे अंतराळवीर Sergey Ryzhikov
व  Andrey Borisenko ह्या तीन अंतराळवीरांचा समावेश आहे
कझाकस्थानातील बैकोनूर येथून सोयूझ MS -02 ह्या अंतरिक्ष यानातून  2.16 p.m.ला हे तीन अंतराळवीर
अंतराळ स्थानकाकडे उड्डाण करतील  (24 sap.12.16 a.m. स्थानिक वेळ व तारिख )
ह्या अंतराळवीरांच्या स्थानकाकडे होणारया उड्डाणाचे लाइव प्रक्षेपण नासा t.v. वरून केल्या जाणार आहे
अंतराळ मोहीम 49/50 चे हे अंतराळवीर पाच महिने अंतराळ स्थानकात राहतील व फेब्रुवारी मध्ये पृथ्वीवर परत येतील
अंतराळ स्थानकात पोहोचण्या आधी दोन दिवस हे अंतराळवीर सोयुझ MS -02 ह्या अंतरिक्ष यानातच राहुन भ्रमण करतील आणि ह्या यानाच्या वेगवेगळ्या systems ची चाचणी घेतील
रविवारी 25 सप्टेंबरला रात्री  3.32 वाजता हे अंतराळवीर अंतराळ स्थानकात प्रवेश करतील
सध्या स्थानकात राहात असलेले केट रुबिन्स ,Lvanishin ,Tokuya Onishi हे तीन अंतराळवीर त्यांचे स्थानकात स्वागत करतील
स्थानकात राहून हे तीन अंतराळवीर तिथे सुरु असलेल्या वैज्ञानिक विषयावरील संशोधनात सहभागी होतील

Sunday 18 September 2016

अंतराळ वीरांगना केट रूबिन्सने अंतराळातून कॅन्सर पीडित रुग्णांशी साधला संवाद

                    केट रूबिन्स  स्थानकातून संवाद साधत पोज घेताना -  फोटो नासा संस्था

नासा संस्था - 17 सप्टेंबर
टेक्सास मधल्या MD अँडरसन कॅन्सर सेंटर Houston इथल्या कॅन्सर पीडित बालकांशी अंतराळ वीरांगना केट रूबिन्सने शुक्रवारी दुपारी अंतराळ स्थानकातून थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना हसतमुखाने उत्तरे दिली  विशेष म्हणजे ह्या वेळेस तिने परिधान केलेला कलरफुल आकर्षक फ्लाईट सूट  कॅन्सर पीडित  रुग्णांनी 2015 मध्ये तयार केला होता
 कॅन्सर पीडित बालकांनी तिला विचारलेल्या ,
अंतराळ स्थानकात राहून तू काय शिकलीस ?
अंतराळवीरांसाठी स्थानकात रहाण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ?
तुझ अंतराळवीरांगना व्हायच स्वप्न होत का ? ह्या प्रश्नांना
केटन हसतमुखान उत्तर दिल लहानपणापासूनच तिला अंतराळवीरांगना व्हायच होत आणि बायॉलॉजीत विशेषतः: जीन्स मध्ये रिसर्च करायचं होत
कठोर परिश्रम आणि आपलं स्वप्न साकार करण्याची जिद्द ह्या जोरावर तीच स्वप्न आता पूर्ण झालय
अंतराळ स्थानकात राहण आणि तिथे  राहून रिसर्च करण अत्यंत कठीण असल तरीही आव्हानात्मक व रोमांचक आहे अंतराळवीरांना स्थानकात राहताना कठीण परिस्थितीला सामोरे जाव लागत कठीण संघर्ष करावा लागतो त्या साठी सतर्कता कुतूहल ,जिद्द आणि चिकाटी हवी त्या मुळेच अंतराळ स्थानकातून रोजच दिसणारया आजूबाजूंच्या ग्रहांचे दुर्बिणीच्या साहाय्याने व अत्याधुनिक कॅमेऱ्याने फोटो घेता येतात इथे रोजच नवीन गोष्टी शिकायला मिळतात, वेगवेगळे प्रयोग करता येतात
तिला अंतराळ मोहिमेच्या प्रशिक्षणा दरम्यान व स्थानकातील निवासामुळे स्थानकाशी संबंधित अत्याधुनिक तांत्रिक गोष्टी शिकता आल्या
केटने  कॅन्सर बायॉलॉजी मध्ये डॉक्टरेट केले असून ती सध्या अंतराळवीरांच्या शरीरात अंतराळस्थानकात राहताना होणारया जिनेटिकल बदलांवर व तिथे उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाटी संशोधन करतेय
नासा संस्थेतील वरिष्ठांच्या उपस्थितीत जवळपास वीस मिनिटे तिने कॅन्सर रुग्णांशी
 थेट अंतराळ स्थानकातून, " Hi ! हॅलो !सी you ! " म्हणत संवाद साधला

           फोटो -नासा संस्था

 कॅन्सर पीडित बालकांमध्ये जागृती निर्माण व्हावी ह्या हेतूने तिने मेडिसिन आणि आर्ट ह्याचा सुरेख मेळ साधत  COURAGE हा आकर्षक कलरफुल फ्लाईट सूट परिधान केला होता
 M D अँडरसन सेंटर आणि नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने हा सुट तयार करण्यात आला निवृत्त अंतराळवीर Nicole Stott आणि इतर अंतराळवीरांच्या साहाय्याने ह्या सुटचे डिझाईन तयार करण्यात आले जर्मनी ,रशिया आणि जपान मधील कॅन्सर सेंटर मधल्या बऱया झालेल्या रुग्णांनी मिळून तो सूट पेंट करून आकर्षित केला
ह्या प्रकल्पा अंतर्गत HOPE ,COURAGE , आणि UNITY असे तीन फ्लाईट सूट तयार केले गेले विशेष म्हणजे तिने हा सूट तयार झाला तेव्हा रंगवण्याआधी पाहिला होता आणि नंतर तो रंगवताना त्या मुळे अंतराळ स्थानकात जेव्हा हा सूट पोहोचला तेव्हा तो कसा दिसतोय हे पाहण्याची अनिवार इच्छा तिला झाली होती म्हणून तो सूट आधी पाहण्याची इच्छा तिने इतर अंतराळ वीरांना केली होती आणि त्यांनी ती पूर्ण देखील केली तेव्हा तिने COURAGE ह्या सुटची निवड केली
जेकब ह्याने तिला जेव्हा विचारले कि," केट तुला हा सूट आवडला का ? हा घातल्यानंतर तुला कसे वाटतेय ?"
तेव्हा केट म्हणाली कि,"अमेझिंग ! आणि प्रेरणादायी वाटतेय !" तुम्ही जेव्हा हा सूट पेंट करत होतात तेव्हा निश्चितच तुमच्या मनात मी हा सूट परिधान केल्यावर कशी दिसेन असा विचार आला असेल ना! आता तुमचा सूट अंतराळ स्थानकात पोहोचलाय आणि मी तो परिधान केलाय असे म्हणत केटन त्याच्यासाठी खास पोज देत  स्थानकात स्वत: भोवती गोल फिरत व उंचावून तो सुट तिला कसा दिसतोय हेही त्याला दाखवले आणि तो तयार कारणाऱयांचे विशेष आभार मानले

Thursday 8 September 2016

नासाच्या मोहीम 48 चे अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतले

                                अंतराळ मोहीम 48 चे अंतराळवीर- फोटो -नासा संस्था

नासा संस्था -7 सप्टेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 48 चे अंतराळवीर जेफ विल्यम्स , रशियाचे अंतराळवीर Alexey Ovchinin आणि Oleg Skripochka  
हे सहा सप्टेंबरला सोयूझ T M A -20 M ह्या अंतरिक्ष यानाने अंतराळ स्थानकातून कझाकस्थानातील Dzhezkazgan येथे रात्री 9.13 वाजता सुखरूप परतले  आहेत 
( कझाकस्थानातील  तारीख 7sep व वेळ  7.13 a.m.)


            अंतराळवीर जेफ विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर                                       फोटो -नासा संस्था

जेफ विल्यम्स यांनी त्यांच्या चार मोहिमेत अंतराळस्थानकात 534 दिवस वास्तव्य केले असून त्यांनी अमेरिकन अंतराळवीरांचा स्थानकात जास्त दिवस राहण्याचा विक्रम मोडला आहे आता त्यांनी अंतराळस्थानकात जास्त दिवस राहणारया अंतराळवीरांच्या यादीत प्रथम स्थान नोंदवले आहे
जेफ विल्यम्स कुशल व अनुभवी अंतराळवीर असून त्यांनी 2000 सालापासून अंतराळवारी केली आहे त्यांच्या सुरवातीच्या अंतराळ मोहिमेच्या वेळी तर अंतराळ स्थानकाची बांधणीही पूर्ण झाली नव्हती आता मात्र अंतराळस्थानक अत्याधुनिक सोयीनीं परिपूर्ण करण्यात येत आहे अंतराळस्थानकाला आता व्यावसायिक स्वरूप देण्यावर भर देण्यात येत आहे शिवाय science आणि टेकनॉलॉजी सारख्या अनेक विषयांवर हे अंतराळवीर स्थानकात राहून सतत नवनवीन संशोधन करत आहेत
इंटर नॅशनल स्पेस स्टेशनचे प्रोग्राम मॅनेजर Shireman म्हणतात कि ,जेफ यांनी स्थानकात राहून भविष्यात स्थानकात येणारया व्यावसायिक अंतरिक्ष यानाच्या पार्किंगची सोय करून मोलाची मदत केली आहे त्यांचा आम्हाला अभिमान वाटतोय
रशियाचे अंतराळवीर Oleg Skripochka ह्यांनी 331 दिवस अंतराळ स्थानकात वास्तव्य केले असून हि त्यांची दुसरी अंतराळ मोहीम होती आणि रशियाचे दुसरे अंतराळवीर Alexey Ovchinin ह्यांची  मात्र हि पहिलीच अंतराळ मोहीम होती त्यांनी त्यांच्या ह्या पहिल्याच अंतराळ मोहिमेत 172 दिवस स्थानकात वास्तव्य केले 
ह्या अंतराळ वीरांच्या स्थानकातील वास्तव्या दरम्यान त्यांनी स्थानकात आलेल्या पाच अंतरिक्ष यानांचे स्वागत केले आणि शंभराहून अधिक वैज्ञानिक विषयांच्या संशोधनात सहभाग नोंदविला
सध्या अंतराळ स्थानकात Anatoly Lvanishin,Takuya Onishi हे दोन रशियाचे अंतराळवीर व केट रुबिन्स हि नासाची अंतराळ वीरांगना अंतराळ स्थानकात राहून त्यांच्या वैज्ञानिक विषयांवर संशोधन करत आहेत
23 सप्टेंबरला आणखी तीन अंतराळवीर स्थानकात राहण्यासाठी जाणार असून मोहीम 49 च्या अंतराळ मोहिमेत
Shane Kimbrough (Nasa)
Sergey Ryzhikov व  Andrey Borisenko (Roscosmos) ह्या अंतराळवीरांचा त्यात समावेश आहे

Saturday 3 September 2016

नासाचे जेफ विल्यम्स व दोन अंतराळवीर सहा तारखेला पृथ्वीवर परतणार

           अंतराळवीर जेफ विल्यम्स  ,Alexey Ovchinin  आणि Oleg Skripochka              फोटो -   नासा संस्था 


नासा संस्था -3 सप्टेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 48 चे कमांडर जेफ विल्यम्स ,सोयूझ कमांडर Alexey Ovichinin  आणि फ्लाईट इंजिनीअर Oleg Skripochka (Roscosmos) हे तीन अंतराळवीर सहा सप्टेंबरला अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतणार आहेत (कझाकस्थानची तारीख सात सप्टेंबर )
सोयूझ T M A-20 M ह्या अंतरिक्ष यानातून हे तीन अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहेत
संध्याकाळी 5.51 मिनिटांनी हे अंतराळवीर अंतराळ स्थानकातून निघतील व  रात्री  9.14 वाजता ते कझाकस्थान येथे पोहोचतील
5 सप्टेंबरला सकाळी 9  वाजता जेफ विल्यम्स अंतराळ स्थानकाच्या कमांडर पदाची सूत्रे अंतराळवीर Anatoly Lvanishin  ह्याच्या हातात देतील
दुपारी 2.15 वाजता  अंतराळ स्थानकात फेअरवेलचा कार्यक्रम होईल आणि  संध्याकाळी 5.51 वाजता
अंतराळवीर अंतराळ स्थानक सोडतील
हे अंतराळवीर मार्च महिन्यात अंतराळ स्थानकात राहण्यासाठी गेले होते व ह्या अंतराळ वीरांनी 172 दिवस स्थानकात मुक्काम केला
मोहीम 48 च्या अंतराळवीरांनी मिळुन Earth Science,Physical science ,Biology ,Biotechnology ह्या विषयांचे शंभरहून अधिक वैज्ञानिक प्रयोग करून त्यावर सखोल संशोधन केले आहे आता त्यांचा कार्यकाळ पूर्ण करून ते पृथ्वीवर परतणार आहेत
              जेफ विल्यम्स ह्यांनी 2000 सालापासूनच्या त्यांच्या चार अंतराळ मोहिमे दरम्यान अंतराळ स्थानकात 534 दिवस राहण्याचा विक्रम केला आहे आणि आतापर्यंतच्या अमेरिकन अंतराळवीरांच्या जास्त दिवस अंतराळ स्थानकात राहण्याचा विक्रम मोडला आहे त्यांनी ह्या अंतराळ मोहिमेत स्थानकाच्या कामासाठी दोनवेळा स्पेस वॉक केला हा त्यांचा पाचवा स्पेस वॉक होता  
हे तीनही अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर आता अंतराळ स्थानकाच्या अंतराळ मोहीम 49 ह्या पथकाची सूत्रे रशियाचे अंतराळवीर  Anatoly Lvanishin हे  सांभाळतील
आता केट रूबिन्स ,Takuya Onishi व Anatoly हे तीन अंतराळवीर नवीन तीन अंतराळवीर स्थानकात येईपर्यंत दोन आठवडे अंतराळ स्थानकात राहून त्यांचे वैज्ञानिक संशोधन सुरु ठेवतील  

Friday 2 September 2016

अंतराळवीर जेफ विल्यम्स व केट रूबिन्स ह्यांचा स्पेसवॉक संपन्न



                                                 अंतराळवीर जेफ विल्यम्स आणि केट रूबिन्स  -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -2 सप्टेंबर
अंतराळवीर जेफ विल्यम्स व केट रूबिन्स ह्यांचा एक सप्टेंबरचा स्पेसवॉक संपन्न झाला
हा स्पेस वॉक ठरल्या प्रमाणे सकाळी आठ वाजता सुरु झाला व सहा तास अठ्ठेचाळीस मिनिटांनी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटाला संपला
आधी दिलेल्या बातमीनुसार ह्या स्पेस वॉक दरम्यान ह्या दोन्ही अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकाबाहेरील थर्मल रॅडिएटर काढणे .स्थानकाला दोन उच्च प्रतीचे कॅमेरे बसवणे आणि सोलर array च्या जॉईंटचा बोल्ट टाईट करणे हि कामे नियोजित वेळेत अत्यंत कुशलतेने पूर्ण केली आहेत
आतापर्यंत अंतराळवीरांनी जवळपास 1,217 तासांचा स्थानकाच्या कामासाठी अंतराळस्थानका बाहेर स्पेस वॉक केला आहे