Wednesday 29 June 2016

29 जुन ते 3 जुलै पर्यंत नासा सप्ताह साजरा होणार


 नासाचे प्रमुख चार्लस बोल्डेन
नासा संस्था - २९ जुन
New Orleans येथे साजऱ्या होणारया 2016 Essence Festival  मध्ये नासाच्या अंतराळ मोहिमांचा समावेश असलेला नासा सप्ताह 29 जुन ते 3 जुलै दरम्यान साजरा केल्या जाणार आहे नासाच्या ह्या अंतराळ मोहिमांचे  वेगवेगळे कार्यक्रम पाहताना नागरिकांना  प्रत्यक्ष अंतराळ सफर केल्याचा आनंद अनुभवता येणार आहे
नासाचे प्रमुख Charles Bolden व अंतराळवीर  Victor Glover हे दोघे  Morial  Convention center येथे स्टेज presentation करतील
1 जुलैला होणारया स्पेस प्रोग्राम संदर्भातील चर्चा सत्रात तीन वक्त्यांचं पथक  अमेरिकन आफ्रिकन अंतराळवीरांचा अंतराळ संशोधनातील ऐतिहासिक सहभाग आणि त्यासाठी खर्च झालेला निधी व केलेले परिश्रम ह्या बाबतीत माहिती देतील
2 जुलैला चार्लस बोल्डेन व व्हिक्टर ग्लोव्हर हे दोघे त्यांच्या नासा संस्थेतील करिअर बद्दल नागरिकांना माहिती सांगतील
शिवाय नासाच्या आगामी अंतराळ मोहिमा आणि संशोधन ह्या बाबतीत खर्च झालेला निधी,शक्ती  व सध्याची
अंतराळवीर व्हिक्टर ग्लोव्हर
आर्थिक स्थिती ह्याचा आढावा घेतील ह्या चर्चे दरम्यान अडीच ते साडेतीन ह्या वेळेत प्रेक्षक त्यांना भेटू शकतील व त्यांची स्वाक्षरी घेऊ शकतील

3 जुलैला  Join the Mars Generation अंतर्गत होणारया कार्यक्रमात अंतराळवीर व्हिक्टर ग्लोव्हर आणि  नासाचे दोन अभियंते नासाच्या मंगळ सफरीबद्दल माहिती देतील
नासाच्या ह्या सप्ताहाला भेट देणारया   नागरिकांना नासाच्या बुथवर नासाची मंगळ मोहीम ,अंतराळ स्थानकाचे महत्व ,त्यात सुरू असलेल्या  Earth Science ,सोलार सिस्टिम व इतर संशोधनात्मक कार्यक्रमांची  माहिती दिल्या जाईल  शिवाय नासाने प्रायोजित केलेल्या शैक्षणिक क्षेत्राबद्दलही मोफत माहिती दिल्या जाणार आहे

                                                                                     फोटो सौजन्य -नासा संस्था 

Monday 27 June 2016

रशियन कार्गोशिपची 1 जुलैला अंतराळ स्थानकात होणार चाचणी

                                 फोटो -नासा संस्था

नासा संस्था -24 जुन
नुकतेच अंतराळ स्थानकात गेलेल्या Progress 62 ह्या मालवाहु अंतरिक्ष यानाची अंतराळस्थानकात  1 जुलैला चाचणी केली जाणार असून त्या साठी काही वेळासाठी हे अंतरिक्षयान स्थानकापासून वेगळे केल्या जाईल अंतराळ स्थानकाला जोडलेले हे यान चाचणी नंतर पुन्हा स्थानकाला जोडले जाईल
नासाच्या अंतरिक्ष मोहीम 48 चे अंतराळवीर Alexey Ovchinin   व रशियाचे अंतराळवीर Oleg Skripochka हे दोघे नव्यानेच बसवण्यात आलेल्या स्थानकाच्या  manual docking सिस्टिम च्या चाचणीसाठी हे काम करतील 1 जुलैला स्वयंचलित यंत्रणेच्या सहाय्याने कार्गोशिप वेगळे केल्या जाईल तेव्हा ते स्थानकापासून 600 फुट दूर जाईल टेस्टिंग नंतर दोन्ही अंतराळवीर हे अंतरिक्ष मालवाहू यान पुन्हा स्थानकाला जोडतील त्या साठी त्यांना 30 मिनिटांचा वेळ लागेल
ह्या चाचणी मध्ये Software varification,manual docking system आणि नवीन सिग्नल converter ह्या बाबींचा समावेश आहे ह्या चाचणीमुळे प्राप्त झालेल्या माहितीचा उपयोग सोयुझ यानासाठी होईल
Progress 62 हे मालवाहू अंतरिक्ष यान 23 डिसेंबर 2015 ला तीन टन वजनाचे अन्न ,इंधन व इतर आवश्यक सामान घेऊन अंतराळ स्थानकात पोहोचले होते आता येताना ह्या कार्गोशिप मधून अनावश्यक कचरा व सामान पाठवल्या जाईल व पृथ्वीच्या कक्षेत पोहोचताच हे कार्गोशिप नष्ट केल्या जाईल   


Sunday 19 June 2016

तीनही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप पोहोचले


             नासाचे अंतराळवीर टीम कोप्रा पृथ्वीवर पोहोचल्या नंतर  -फोटो -नासा संस्था
              
नासा संस्था -18 जुन
नासाच्या अंतराळ  मोहीम 47 चे  कमांडर टीम कोप्रा,इसाचे फ्लाईट इंजिनीअर टीम पीक आणि Roscosmos चे सोयुझ कमांडर Yuri  Malenchenko हे तीनही अंतराळवीर अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर सुखरूप पोहोचले आहेत शनिवारी 18 जूनला संध्याकाळी 5.15 वाजता ते कझाकस्थानातील Dzhezkazgan येथे पोहोचले
ह्या मोहिमेतील त्यांच्या 186 दिवसाच्या अंतराळ स्थानकातील वास्तव्यात त्यांनी मानवी आरोग्याविषयक रोगांवरील उपाय शोधण्यासाठी संशोधन केले त्यात प्रामुख्याने Ocular health,,Salivary markers आणि Microbiomes  ह्यांचा समावेश होता त्यांनी Glucoma वरील रोग प्रतिबंधक लस शोधण्यात यश मिळवले असून हे संशोधन मानवी आरोग्यासाठी तर उपयुक्त आहेच शिवाय अंतराळात दीर्घकाळ वास्तव्य करणाऱया अंतराळवीरांना उपयोगी पडेल
ह्या तीन अंतराळ वीरांनी त्यांच्या अंतराळ स्थानकातील वास्तव्यादरम्यान चार मालवाहू अंतरिक्ष यानाचे स्थानकात स्वागत केले
 1) -  त्यात प्रामुख्याने BEAM स्पेस क्राफ्ट (ह्या बाबतीतली विस्तृत माहिती आधीच्या बातमीत वाचा )
 2) -  दोन रशियन सुधारित कार्गो क्राफ्ट डिसेंबर ते एप्रिल दरम्यान कित्येक टन वजनाचे सामान घेऊन                 अंतराळ स्थानकात पोहोचले होते
  3) -टीम कोप्रा आणि टीम पीक ह्यांनी मार्च मध्ये अंतराळ स्थानकात पोहोचलेल्या Cygnus ह्या स्पेस                       क्राफ्टचेही स्वागत केले
  4) -आणि एप्रिल मध्ये स्थानकात आलेल्या कंपनीचे Space X  Dragan स्पेस क्राफ्टचे स्वागत केले
टीम कोप्रा ह्यांनी त्यांच्या स्थानकातील वास्तव्यादरम्यान दोनवेळा तांत्रिक कामासाठी स्थानकाबाहेर space walk केला त्यांच्या दोनवेळच्या अंतराळ मोहिमेत त्यांनी अंतराळ स्थानकात 244 दिवस निवास केला
टीम पीक ह्यांनी त्यांच्या पहिल्याच अंतराळ मोहिमेत 186 दिवस स्थानकात निवास केला
तर Yuri  Malenchenko ( Roscosmos ) ह्यांनी सहा वेळा अंतराळ मोहिमेत भाग घेऊन त्या दरम्यान तब्बल  828 दिवस अंतराळ स्थानकात राहण्याचा विक्रम केला आहे तरीही ते दुसरे जास्त दिवस स्थानकात निवास करणारे  विक्रमी  रशियन अंतराळवीर ठरले कारण रशियन अंतराळवीर Gennady  Padalka ह्यांनी अंतराळ स्थानकात जास्तदिवस राहण्याचा विक्रम ह्या आधीच केला आहे 
आधीच दिलेल्या बातमीनुसार आता अंतराळस्थानकात तीन अंतराळवीर असून जुलै मध्ये आणखी तीन अंतराळवीर स्थानकात जातील त्यात एक महिला अंतराळवीरांगनेचा समावेश आहे

Wednesday 15 June 2016

नासाचे तीन अंतराळवीर 18 जुनला पृथ्वीवर परतणार

  फोटो- नासा संस्था -टीम पिक ,टीम कोप्रा आणि Yuri Malenchenko आपल्या सहकारी अंतराळवीरांसोबत

नासा संस्था - 15  जुन
नासाच्या  47 व्या अंतराळ मोहिमेतील तीन अंतराळवीर स्थानकातील आपला मुक्काम संपवून 18 जुनला पृथ्वीवर परतणार आहेत
         नासाचे अंतराळ मोहीम 47 चे कमांडर टीम कोप्रा 
         इसाचे फ्लाईट इंजीनियर टीम पिक
         आणि सोयुझ कमांडर Yuri Malenchenko (Roscosmos)
ह्या तिघांचा त्यात समावेश आहे
हे अंतराळवीर सोयुझ TMA-19M ह्या अंतरीक्ष यानाने दुपारी 1.32 मिनिटांनी अंतराळ स्थानकातून निघतील आणि कझाकस्थान येथे संध्याकाळी 5.15 मिनिटाला पोहोचतील
हे तीनही अंतराळवीर डिसेंबर 2015 लाच अंतराळ स्थानकात गेले होते आणि त्यांनी 186 दिवस स्थानकात वास्तव्य केले तिथल्या वास्तव्यादरम्यान त्यांनी अंतराळस्थानकातील फिरत्या प्रयोगशाळेत सुरु असलेल्या Biology ,Biotechnology,Earth science ,physical science या सारख्या शंभरावर संशोधनात्मक प्रयोगात तिथल्या संशोधकांसोबत सहभाग नोंदवला
17 जुनला सकाळी  9.15  मिनिटाला  टीम कोप्रा अंतराळ मोहिमेची सूत्रे जेफ विल्यम्स ह्यांच्या हाती सोपवतील आणि  10.15 मिनिटाला अंतराळ स्थानकातील त्यांचे सहकारी ह्या तीन अंतराळवीरांना निरोप  देतील
जेव्हा हे तीनही अंतराळवीर अंतराळ स्थानक सोडतील तेव्हा जेफ विल्यम्स त्यांना कमांड देतील
तीन आठवडे जेफ विल्यम्स ,Oleg Skripochka, Alexey Ovchinin ( Roscosmos ) हे तीन अंतराळवीर अंतराळ स्थानकात राहून आपले संशोधन सुरु ठेवतील तीन आठवड्यांनी नवीन तीन अंतराळवीर स्थानकात राहण्यासाठी पृथ्वीवरून रवाना होतील
नासाची अंतराळ वीरांगना काटे रुबिन्स ,रशियन अंतराळवीर Anatoly I vanishin आणि जपानच्या Takuya Onishi  हे सहा जुलैला कझाकस्थानातील बैकोनूर येथून अंतराळ स्थानकाकडे झेप घेतील 
नासाच्या T V channal  वरून सतरा जूनला सकाळी सव्वा नऊ वाजता ह्याचे लाइव प्रसारण केले जाइल

Sunday 12 June 2016

सिग्नस स्पेस क्राफ्ट 14 जुनला अंतराळस्थानकातून पृथ्वीवर परतणार

                     फोटो -नासा संस्था
 नासा संस्था -12 जुन
अंतराळ स्थानकात गेलेले मालवाहु   A T K Cygnusस्पेस क्राफ्ट 14 जुनला अंतराळस्थानकातून पृथ्वीवर परतणार आहे  A T K Cygnus  हे मालवाहु मानव विरहीत अंतरीक्ष यान 26 मार्चला अंतराळ स्थानकात गेले होते. अंतराळवीरांना त्यांच्या संशोधनात्मक सायंटिफिक  250 हून अधिक प्रयोगासाठी लागणारे व अंतराळ वीरांना आवश्यक असलेले 7,500 पाउंड वजनाचे सामान अंतराळ स्थानकात पोहोचवून आता 14 जूनला सिग्नस अंतरीक्ष यान पृथ्वीवर परतणार आहे
14 तारखेला सकाळी साडेनऊ वाजता नासाचे अंतराळवीर टीम कोप्रा व इसाचे अंतराळवीर टीम पिक हे दोघे रोबोटिक हाताचा उपयोग करून व आवश्यक ते कमांड देऊन सिग्नसला अंतराळ स्थानकापासून विलग करतील त्या नंतर ते पृथ्वीकडे प्रयाण करेल नासा टी वी वरून 14 जुनला सकाळी 9.30 वाजता ह्याचे लाइव प्रक्षेपण केले जाणार आहे तर 15 जूनला सिग्नस अंतरीक्ष यानाला बाहेरून जोडलेले व विश्वातील हवामानविषयक माहिती देणारे पाच उपग्रहही अंतराळस्थानकातून अंतराळात सोडले जातील   
अंतराळ स्थानकापासून विलग झाल्यानंतर पाच तासांनी ह्या मालवाहू मानव विरहीत सिग्नस अंतरीक्ष यानात Saffire -1 हा नवा प्रयोग केल्या जाइल हा एक नवा वास्तववादी ज्वाळेचा प्रयोग असून तो अंतराळ स्थानकात करणे धोकादायक असल्याने आधी करणे शक्य नव्हते ह्या प्रयोगामुळे अंतराळात ,अत्यल्प गुरुत्वाकर्षणात प्रज्वलित झालेल्या ज्योतीचा आकार ,त्याची वाढ आणि त्या साठी लागलेले oxygen चे प्रमाण ह्या बाबतीतली उपयुक्त माहिती मिळेल ह्या माहितीचा उपयोग आगामी अंतराळ मोहिमेतील अंतराळ यानांसाठी कमी गुरुत्वाकर्षणात ज्वलनशीलतेची सीमा निर्धारित करण्यासाठी होईल 
22 जून पर्यंत सिग्नस अंतरीक्ष यान अंतराळात भ्रमण करेल तोवर त्याच्या इंजिनात दोनवेळा अग्नी प्रज्वलित होईल  आणि त्याच्या भ्रमण काळादरम्यान संशोधकांमार्फत आगीच्या ज्वलनशीलतेचा प्रयोग केल्या जाइल  पृथ्वीच्या कक्षेत शिरल्या नंतर प्रशांत महासागरावर त्याचा अग्नी प्रज्वलित होईल व विस्पोट होऊन यान नष्ठ केल्या जाइल
नासाच्या अंतराळ मोहीम 47 व 48 द्वारे कलेले Biology,Biotechnology,Earth Science व इतर अनेक वैज्ञानिक प्रयोग पृथ्वीवासियांसाठी तर महत्वपूर्ण ठरतीलच शिवाय आगामी मंगळ मोहिमेसाठीही उपयुक्त ठरतील    

Tuesday 7 June 2016

आज जेफ विल्यम्स विकसित मोड्यूल बीम मध्ये प्रवेशणार

              फोटो -नासा संस्था 
नासा संस्था -6 जून
नासाचे संशोधक व Bigelow Aerospace इंजिनीअरच्या टीमने रात्रंदिवस मेहनत करून आधीच्या त्रुटीवर मात करत अंतराळ स्थानकात आवश्यक असलेली व विस्तारित होणारया हवा भरलेल्या खोलीचे नवे module तयार करण्यात यश मिळवले आहे
विशेष म्हणजे हि खोली नको असेल तेव्हा घडी करून ठेवता येईल आणि कमी जागा व्यापेल तरीही आतमध्ये मात्र शास्त्रज्ञांसाठी जास्त जागा उपलब्ध करून देईल हे मोड्यूल आठ एप्रिललाच अंतराळ स्थानकात पोहोचले होते आणि आता अंतिम चाचणी नंतर ते वापरण्यासाठी तयार झाले आहे
अंतराळवीर जेफ विल्यम्स ह्यांनी व्हाल्वचा वापर करून  ह्या मोड्यूल मध्ये हवा भरून त्याचा विस्तार केला व हि खोली बनवली ह्या खोलीला  Bigelow Expandable Activity Module ( BEAM ) असे नाव दिले असून नुकतेच हे मोड्यूल योग्य हवेच्या दाबाने फुगवुन त्यातून हवा लिक होत आहे का ?  त्यात आणखी काही त्रुटी राहिल्या आहेत का? थोडक्यात हे मोड्यूल वापरण्यायोग्य क्षमतेचे व सुरक्षित आहे का ? ह्या बाबतीतली अंतिम चाचणी घेण्यात आली आणि त्या नंतरच हि खोली अंतराळस्थानकाला जोडण्यात आली
सोमवारी 6 जूनला (अमेरिकन तारीख )अंतराळवीर जेफ विल्यम्स या बीम मध्ये प्रवेश करतील व आगामी दूरवरच्या अंतराळ मोहिमेसाठी बिमची उपयुक्तता तपासतील  नंतर जवळपास दोन वर्षे ह्या मोड्युलची सतत चाचणी घेतल्या जाइल सहा जूनला जेफ हवेचा नमुना घेतील हवेच्या योग्य प्रवाहासाठी duct व sensors बसवून हवेचा दाब व्यवस्थित ठेवण्यासाठी tank उघडतील सेन्सर दोन दिवसांनी कार्यान्वित होतील बीमवर अंतराळातील वातावरणाचा ,छोटया धूमकेतूंचा ,अंतराळातील कचऱ्याचा आणि भ्रमणाचा काय परिणाम होतो हे अभ्यासून त्याची नोंदणी केल्या जाइल
अंतराळवीर ह्या बिम मध्ये वर्षातून दोन तीनदाच प्रवेश करतील व संशोधन करून माहिती गोळा करतील दोन वर्षाच्या चाचणी नंतर मात्र  बीमला पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याचा शास्त्रज्ञांचा विचार आहे
ह्या बिमचा उपयोग भविष्यातील अंतराळ मोहिमेसाठी विशेषत: मंगळ मोहिमेतील मंगळ ग्रहावरील मानवी निवासासाठी होईल अशी शास्त्रज्ञांना आशा वाटतेय
   

Monday 6 June 2016

नासाचे ज्युनो अंतराळयान चार जुलैला गुरूच्या कक्षेत प्रवेशणार

              फोटो -नासा संस्था
नासा संस्था -6 जून
देशोदेशीच्या शास्त्रज्ञांची संशोधनात्मक यशस्वी कामगिरी अचंबित करणारी असून आता त्यांची अवकाशभरारी अवकाशातील एक,एक ग्रह पार करत गुरु ग्रहापर्यंत पोहोचली आहे
अमेरिकेच्याचा नासाचे ज्युनो अंतराळ यान चार जुलैला गुरु ग्रहाच्या कक्षेत पोहोचेल गुरु ग्रहापर्यंत पोहोचण्यासाठी ज्युनो अंतराळ यानाला तब्बल पाच वर्षांचा अंतराळ प्रवास करावा लागला
चार जुलैच्या संध्याकाळी जेव्हा गुरु ग्रहाच्या कक्षेत ज्युनो अंतराळ यान प्रवेश करेल तेव्हा प्रचंड वेग व उष्णतेमुळे तप्त झालेले त्याचे मुख्य इंजिन थंड होण्यास जवळपास अर्धा तास लागेल तोवर त्यामधून तप्त ज्वाळा जळत राहतील
ज्युनो यान गुरु कक्षेत प्रवेश करण्याआधी त्याचा वेग ताशी 1,212 मैल पर्यंत खाली आणेल व मगच गुरु ग्रहाच्या कक्षेत शिरेल आणि तिथेच स्थिरावेल
ज्युनो अंतराळ यान गुरूच्या कक्षेत वीस महिने राहील आणि गुरु भोवती फेरया मारेल आजवरच्या मोहिमेतील गुरु ग्रहाभोवती भ्रमण करणारे ज्युनो हे पहिलेच अंतराळ यान आहे
गुरूच्या कक्षेतील कार्यकाळात ज्युनो यान गुरु भोवती 37 फेरया पूर्ण करेल ह्या दरम्यान गुरु ग्रहाची रचना ,गुरुग्रहावरील चुंबकीय क्षेत्र , तिथले वातावरण व इतर बाबतीतली माहिती गोळा करेल
 ह्या अंतरीक्ष यान मोहिमेमुळे शास्त्रज्ञांना गुरु ग्रहावरील अनेक गूढ रहस्याची उकल होण्यास मदत मिळेल

Wednesday 1 June 2016

मार्क झुकेरबर्ग आज फेसबुकद्वारे अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांशी संवाद साधणार

नासा संस्था -1 जुन 
फेसबुकचे जनक आणि चीफ एक्झीक्युटिव्ह ऑफिसर मार्क झुकेरबर्ग आज अंतराळस्थानकाशी फेसबुक द्वारे लाइव्ह संपर्क साधणार आहेत 
अंतराळ स्थानकातील नासाचे अंतराळवीर Tim Kopra व Jeff Williams आणि इसाचे अंतराळवीरTim Peake  ह्यांच्याशी झुकेरबर्ग फेसबुकद्वारे फोनवरून संभाषण करणार आहेत.  
अमेरिकन वेळेनुसार दुपारी 12 वाजून  55 मिनिटांनी हे संभाषण सुरु होणार अजून ते वीस मिनिटाचे असेल ह्या वीस मिनिटात मार्क झुकेरबर्ग नासाच्या फेसबुक पेज वर आधीच सबमिट केलेले व नागरिकांनी विचारलेले प्रश्न ह्या अंतराळवीरांना विचारतील या संवादाचे लाइव प्रसारण पाहण्यासाठी  इच्छुकांना नासाच्या फेसबुक पेजशी संपर्क करता येईल   
सध्या अंतराळ स्थानकात निवास करत असलेले अंतराळवीर कमी गुरुत्वाकर्षणाचा मानवी आरोग्यावर होणारे परिणाम व तिथल्या वातावरणात मानव जास्त दिवस राहू शकण्यासाठी आवश्यक असलेले संशोधन करत आहेत हे संशोधन भविष्यात मानवाला मंगळावर रहाण्यासाठी व इतर ग्रहावरही राहून संशोधन करण्यासाठी उपयुक्त ठरेल तसेच अशा कमी व अत्यल्प गुरूत्वाकर्षण असलेल्या ग्रहांवर रोबोट पाठवण्याच्या दृष्टीनेही  हे संशोधन उपयोगी पडेल ह्या व  अंतराळवीर करत असलेल्या वेवेगळ्या अनेक सायन्स विषयक प्रयोगाविषयी त्यांना विविध प्रश्न विचारले जाणार आहेत