Wednesday 20 May 2015

विदर्भ उष्णतेच्या तडाख्यात तापमानाचा उच्चांक

विदर्भात सद्या प्रचंड ऊन तापत असुन ह्या आठवडयात तापमानाने उच्चांक गाठला आज सर्वाधिक तापमान वर्धा व चंद्रपूर येथे ४७. ५ पर्यंत गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ह्या आठवड्याची सुरवातच जास्त तापमानाने झाली रविवारपासूनच सूर्य प्रचंड उष्णतेने तळपू लागलाय यवतमाळ येथेही सोमवारी तापमान ४५. ६ इतके नोंदले गेले राजस्थान मधुन वहात येणाऱ्या उष्ण वारयामुळे  उन्हाची तीव्रता वाढली असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येतेय रविवार पासूनच नागपूरच्या तापमानाचा पारा ४६ अंशाच्या वर गेला असल्याची चर्चा होती त्या मुळे रस्त्यावर शुकशुकाट होता सकाळी नऊ  पासूनच उन्हाची तीव्रता वाढत असून रात्री उशिरापर्यंत उन्हाच्या झळा जाणवत होत्या
उन्हाच्या तीव्रते मुळे लोक आवश्यक कामानिमित्यच  बाहेर पडतात उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक डोक्याला स्कार्फ,शेला बांधून डोळ्याला गॉगल लावुन बाहेर पडताना दिसतात  दुपारच्या वेळेस रस्ते निर्मनुष्य झाले आहेत रस्त्यावर ठिकठिकाणी थंड पेय सरबत,रसाच्या गाडया उभ्या असून लोक तिथे उन्हापासून बचाव करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत
ह्या वर्षी अवकाळी पाऊस,गारपिटीमुळे इतके दिवस ऊन जाणवले नाही पण आता मात्र उन्हाची तीव्रता दररोज वाढतच आहे मंगळवारी  वर्धा येथे सर्वाधिक ४७.५ इतके तापमान नोंदले गेले त्या नंतर नागपूर ,चंद्रपूर अकोला येथे ४६ अंश सेल्सिअस तापमान होते  मागच्या वर्षी नवतपाच्या उन्हाने वैदर्भीय त्रासले होते यंदाही तापमान वाढतच आहे उन्हाच्या तीव्रतेमुळे कुलरची हवा ,माठातले पाणीही गरमच असते शिवाय दिवसभरच्या उन्हामुळे नळातून येणारे पाणीही गरम असते  अजून एकदोन दिवस तापमान असेच राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलाय  विदर्भात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत पाच जणांचा उष्माघाताने बळी गेल्याची नोंद झाली आहे सध्या मे महिन्याचे शेवटचे दिवस असून लवकरच नवतपाचे (अत्तुच्च उष्णतेचे ) ऊन पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय

                                

Friday 8 May 2015

शास्त्री नगर येथे उशिराने पाणी पुरवठा

                                  शास्त्री नगर येथे गुरवार दि. ७ तारखेला होणारा पाणी पुरवठा सायंकाळ पर्यंत झालाच नाही विशेष म्हणजे यवतमाळ येथे दोन दिवसाआड पाणी सोडण्यात येते तेही कमी दाबाने अचानक पाणी न आल्याने बायकांची तारांबळ उडाली ह्या बाबतीत विचारणा करण्यासाठी पाणीपुरवठा कार्यालयात फोन केला असता तो उचलण्यात येत नव्हता वारंवार फोन करूनही जेव्हा फोन उचलल्या गेला नाही तेव्हा सकाळ कार्यालयाशी संपर्क साधला असता व्हाल्व बिघडल्याचे व उशिराने पाणी सोडण्यात येणार असल्याचे कळाले.शेवटी संध्याकाळी कार्यालयातील अधिकाऱ्यांना फोनवर संपर्क साधला तेव्हा पाणी सोडल्या जाईल असे सांगण्यात आले अखेर उशिराने पाणी आले तेही अत्यंत कमी दाबाने त्या मुळे नागरिकांना दोन दिवस पुरेल एव्हडा पाणीसाठा करता आला नाही विशेष म्हणजे व्हाल्व नादुरुस्त झाल्यामुळे पाणीपुरवठा उशिराने होईल अशी बातमीही दैनिकांना देण्यात आली नव्हती किंवा फोनवरून नागरिकांनाही सांगण्यात येत नव्हते पूर्वी पाणीपुरवठा होणार नसला किंवा काही अडचणी आल्यास रिक्षा फिरवून नागरिकांना सुचित करण्यात येत होते पण आता रिक्षाही फिरवल्या जात नाही आणि ऑफिस मधले फोन रिंग वाजत असूनही उचलल्या जात नाहीत
ह्या वर्षी मधून आधुन सतत पाऊस,गारपीट झाल्याने पाणी जून पर्यंत पुरेल इतके शिल्लक असल्याचे सांगण्यात आलेय तरी देखील गेल्या अनेक वर्षापासून एक दिवसाआड होणारा पाणी पुरवठा दोन दिवसांनीच होतो पावसाळ्यात भरपूर पाऊस,पूरस्थिती येऊनही लोकांना मात्र कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते कारण पूर आल्यानंतर पाणी धरणाची दारे उघडुन रस्त्यावर सोडले जाते त्या मुळे नागरिकांचे नुकसान होते शिवाय पाणी नियोजन योग्य प्रकारे न केल्याने भरपूर पाऊस पडूनही लोकांना नियमित पाणी पुरवठा होत नाही पूर्वीप्रमाणे लोकांना नियमित पाणी पुरवठा करावा व त्यात येणारया अडचणींचे लवकरात लवकर निवारण करावे अशी नागरिकांची मागणी आहे