Sunday 1 March 2015

यवतमाळ जिल्यात अवकाळी पाऊस

यवतमाळ येथे भर उन्हाळ्यात अचानक शनिवारी दुपारी गारासह पावसाला सुरवात झाली असुन दुसरया दिवशीही पावसाचा  जोर कायम आहे हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्या नुसार यवतमाळ सह आजूबाजूच्या खेडयात दुपारी तीन नंतर पावसाने हजेरी लावली सुरवातीला संथ गतीने पडणाऱ्या पावसाचा जोर अचानक वाढला सोबतच गारांचाही वर्षाव सुरु झाला सुमारे दहापंधरा मिनिटे गारा पडत होत्या पावसासोबतच आलेल्या वादळाने काही ठिकाणचे मोठे वृक्ष ,घरावरील पत्रे उडून गेले यवतमाळ येथील रस्त्यावरचे  मोठे वृक्ष वादळामुळे उन्मळून पडले विजेच्या तारांनाही वादळाचा तडाखा बसल्याने काही काळ वीज खंडित झाली अमरावती मार्गावर मोठे वृक्ष उन्मळून पडल्यामुळे काहीकाळ वाहतूक कोलमडली , संद्याकाळी थोडावेळ कमी झालेल्या पावसाचा जोर रात्री उशिरा पुन्हा वाढला पावसाने जिल्हा कारागृहाच्या कर्मचारी निवासस्थानाचे छप्पर उडाले तर एका शोरूमच्या समोरील भागातील काचा निखळल्या
फोटो -पुजा दुद्दलवार-BE(Soft)BMC
अवकाळी पावसाने आंब्याचा मोहोर गळून पडला तर,संत्रा ,गहू,हरबरा व इतर पिकांचे नुकसान झाले
यवतमाळ सह दारव्हा,दिग्रस,आर्णी,बाभूळगाव,उमरखेड या तालुक्यांनाही वादळी पावसाचा तडाखा बसला बिटरगाव येथे वीज पडून एक शेतकरी मरण पावला तर त्याची दोन मुले जखमी झाली आहेत गेल्या आठवडाभरात उन्हाळ्याच्या सुरवातीलाच तीव्र ऊनाचा सामना कराव्या लागणारया नागरिकांना अवकाळी पावसाने गारवा अनुभवायला मिळाला पण शेतीचे नुकसान झाले. 

No comments:

Post a Comment