पाहता वर्ष सरल देखील ! तस ते दरवर्षीच सरत अन पुन्हा नव्यान नव्या उत्साहात उगवतही अगदी सूर्यासारखच रोजच उगवण अन मावळण. पण सूर्य रोज उगवतो तर वर्ष एकदाच भारतात वर्षातून तीनदा वर्ष बदलत हिंदुधर्माप्रमाणे गुडीपाडवा ,दिवाळीच्या पाडव्याला व्यावसायीकांच नव वर्ष सुरु होत जूनमध्ये शाळा ,कॉलेजेस आणि ऑफिसेसच वर्ष बदलत आणि जानेवारीत कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्ष सुरु होत. पण बदलत म्हणजे नेमक काय होत? तर सार तेच तसच रहात ! काही चांगले बदल सुखकारक तर वाईट दुख:दायक!
पण तरीही ३१डिसेंबरला रात्रीच उत्साहाला उधाण येत .हॉटेल्स लाईटिंगन झळाळतात, पार्ट्या रंगतात गायन,नृत्यात रात्र साजरी होते आणि जुन्याची कात टाकत नववर्ष नवा आकडा लेवून वर्षभर कॅलेंडरवर विराजमान होत नवे संकल्प केले जातात अन लवकरच विसरलेही जातात
नेहमी प्रमाणे हेही वर्ष अनेक चांगल्या वाईट घटनांनी गाजल भारतीयांची सगळ्यात अभिमानास्पद बाब म्हणजे यशस्वी मंगळ मोहीम . Nov.२०१३ला इस्रो ने प्रक्षेपित केलेल मंगळयान दिवाळीच्या आधी २४सप्टें ला मंगळावर पोहोचल शास्त्रज्ञानी आपल्या कुशाग्र बुद्धींन,कुशल नेतृत्वात ,कमी खर्चात उच्च प्रतीच तंत्रज्ञान वापरून मंगळ मिशन यशस्वी केल आणि दिवाळीला आपल्या कर्तुत्वाचा दिवा थेट मंगळावरच चेतवला आजवर मंगळ अपशकुनी ,अपयश देणारा म्हणून दोषारोपित होता तो क्षणार्धात आत्मतेजान उजळला आणि अफवा पसरवणारयास त्यान "रेड सिग्नल " दिला तिथे तो पोहोचला तेही " सर्वपित्री अमावस्या" ह्या अपवित्र समजल्या जाणारया दिवशी.मंगळयानान तिथे पोहोचताच वक्री मंगळाचे विलोभनीय सुंदर फोटो पाठवून लोकांना घरबसल्या मंगळाच अमंगळपण पुसत मंगल दर्शन घडवल आणि आता मंगळावर जीवसृष्ठी, पाणी होत ह्या गोष्टीला पृष्ठी देणारे पुरावे तो पाठवू लागलाय त्या मुळे मंगळवारचे प्रगत सूक्ष्म स्वरूपातले लोक तबकडीतून पृथ्वीवर येतात ह्या अफवांना आता पूर्ण विराम मिळालाय
भारत पहिल्याच प्रयत्नात स्वबळावर कमी खर्चात मंगळमोहीम यशस्वी करणारा पहिला देश तर मंगळ मोहीम राबवणारा चवथा देश ठरलाय विशेष म्हणजे ह्या मोहिमेत काही महिला वैज्ञानिकांचाही सहभाग आहे . नुकताच भारतान इस्रो ह्या संशोधन संस्थेतून GSLV mark३ ह्या Rocket च यशस्वी प्रक्षेपण केलय हे रॉकेट ४०००kg वजनाचा उपग्रह आणि मानवालाही अंतराळात पोहचवू शकेल शिवाय दूरसंचार क्षेत्रातही मोठी क्रांती होईल.
ह्या वर्षी निवडणूक होऊन सत्ता पालट झाला हे वर्ष खरया अर्थान मोदींनी गाजवलं निवडुन येण्याआधी आणि नंतरही त्यांनी देशात सभा गाजवल्या विशेषत: काश्मीर सारख्या संवेदनशील भागातला त्यांचा यशस्वी प्रचार दौरा विलक्षण होता त्यांनी तिथल्या लोकांची मने जिंकली त्यांना दिलेली आश्वासने मात्र ते पाळतात का ? हे लवकरच कळेल दरम्यान दहशदवाद आणि पूराच थैमान ह्या मुळे परिस्थिती बदलली असली तरीही भाजप तिथे दुसरया स्थानावर निवडून आलाय आणि लवकरच पी डी पी च्या सोबत सत्ता स्थापण्याच्या तयारीत आहे.
त्यांचा शेजारील राष्ट्रांचा परदेश दौराही विशेष गाजला पाकिस्तानन नेहमी प्रमाणे आपला दुटप्पीपणा दाखवला पण इतर देशांनी मोदींच सहर्ष स्वागत केल मोदिभेटीच्या परदेश दौरयाच वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकारांनी लोकांना घरबसल्या जपानच "Golden Pavilion Temple ", नेपाळच "पशुपतीनाथ मंदिर" च नव्हे तर "अमेरिका वारी "घडवली अमेरिकेतल्या भारतीयांची दुकाने ,हॉटेल्स तिथे मिळणारे भारतीय पदार्थ ,इडली,डोसा,साउथ इंडियन नार्थ इंडियन जेवण ,भारतीय वस्तु ,तिथल्या लोकांच राहणीमान ,गरजा अपेक्षा सारच पत्रकारांनी लोकांपुढे आणल "Madison square " इथल भाषण ऐकायला आलेल्या तिथल्या भारतीयांची उपस्थिती लक्षणीय होती आणि त्या निमित्य विक्रीसाठी ठेवण्यात आलेली मोदी फरसाण लाडू ,मिठाईची पाकिटेही
गृहिणींसाठी हे वर्ष आनंददायी ठरल ते आताच्या कमी झालेल्या सोन्याचांदीच्या भावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील उतरलेले कच्च्या तेलाचे भाव ,डॉलरचे वाढते भाव ,शेअर्सची वाढती किंमत आणि ह्या मुळे काही देशात विक्रीस निघालेले सोने ह्या मुळे सोन्या चांदीचे भाव उतरले पण लगेचच सोने व्यापाऱ्यांची बैठक झाली सोने आयात केल्या गेले त्या मुळे भाव काही प्रमाणात वाढले अजूनही भावात चढ उतार सुरु आहे.
ह्या वर्षी विशेष नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झाला आणि कित्येक वर्षापासून भोळ्या भाबड्या भक्तांचा गैरफायदा उठवणाऱ्या आसारामबापू ,त्याचा मुलगा नारायण साई,भोंदू साधू रामपाल ह्यांचा पर्दाफाश होऊन त्यांना अटक झाली त्यांच्या अगम्य लीला पाहून लोक आवाक झालेत असे भोंदू साधू आणि त्यांचे चेले त्यात महिलाही असतात लोकांच्या अज्ञानाचा फायदा उठवत आपल्या जाळ्यात ओढतात त्यांना अंधश्रद्धेच्या नादी लावून भजन कीर्तनात अडकवतात जे नागरिक भजन कीर्तनाला जात नाहीत त्यांना एकी करून त्रास दिल्या जातो विशेष म्हणजे ज्या नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धेला विरोध केला त्यांची हत्या झाली आणि वर्षानंतरही मारेकरी सापडत नाहीत हे दुर्दैव! ह्या वर्षीही गुप्त धनासाठी बळी दिल्या गेले आणि त्यांना पकडण्यात यशही आल.ह्या वर्षी आफ्रिकेत इबोला रोगाची साथ आली त्याचे काही रुग्ण भारतातही आढळले ह्या रोग्यांवर उपचार करणारया काही डॉक्टरांनाही ह्या रोगाची लागण झाल्याने प्राणास मुकावे लागले डेंगू ह्या डासामुळे होणारया रोगाचीही साथ आली आणि अजूनही सुरु आहे डेंगू मुळे ही काहीजण मरण पावले
ह्या वर्षी उशिराने आलेल्या पावसान काश्मिरात हाहा:कार उडवला रस्ते ,पूल वाहून गेले घर,शेती पाहता,पाहता उध्वस्त झाली कोट्यावधीच नुकसान झालं बरयाच वर्षांनी पर्यटकांनी गजबजलेल अध्ययावत काश्मीर क्षणात होत्याच नव्हत झाल पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीला लष्कर धावल त्यांच्या राहण्याची जेवण खाण्याची औषधाची त्यांनी सोय केली आता हळू हळू काश्मीर सावरलय हे तिथे झालेल्या निवडणुकीन सिद्ध केलय",माळीण" गावही असच एका रात्रीत उध्वस्त झाल अवकाळी झालेल्या गारपिटीन ह्याही वर्षी शेतकऱ्यांच नुकसान झाल आणि काही प्रमाणात थांबलेलं शेतकरी आत्महत्या सत्र पुन्हा सुरु झाल हि चिंतनीय बाब आहे.
ह्या वर्षी दुनियादारीप्रमाणे" टाईम पासन" लोकांना सिनेमागृहा पर्यंत आणल fandry ,टपालन आंतरराष्ट्रीय बक्षीस पटकावल सुचित्रा सेन ,नंदा ,रवि चोपडा ,देवेन वर्मा ,स्मिता तडवळकर ,विनय आपटे ,कुलदीप पवार,जोहरा सैगल नयनतारा आपटे ,सदाशिव आम्रापुरकर ह्या सारखे दिग्गज सिनेतारे काळाच्या पडद्याआड गेले. टी वी जगतात काही नवीन मालिका आल्या काही बंद झाल्या पण काही अपवाद वगळता मालिकेत तोचतो मसाला, कुटील कारस्थान सुरु आहेत अमिताभ बच्चन यांनी मात्र करोडपतीतून आपली लोकप्रियता कायम राखलीय
नव्या वर्षात लोकांना नव्या सरकारकडून नवे बदल अपेक्षित आहेत त्यांना सुरक्षित ,शांत,महागाई ,भ्रष्टाचार मुक्त जीवन जगायचय त्यांच्या दैनदिन गरजा भागवून चोर ,दरोडेखोरांना पकडून तुरुंगात डांबून कठोर कारवाई करावी अशी लोकांची रास्त अपेक्षा आहे पाहूयात काय होतय ते !
तूर्तास वर्ष संपतय नव उगवतय ते चांगल असू दे अशी अपेक्षा करू यात !