Thursday 12 June 2014

वट पोर्णिमा आधुनिक दृष्टीकोनातून

                  उन्हाच्या  चटक्यान भाजलेली धरणी पावसाच्या आगमनान बहरते,हिरवाईन सजते .धरित्री सोबतच आपल्या असंख्य पारंब्याचा भार सोसत वडाच झाडही हिरवगार होत अशा ह्या निसर्गरम्य वातावरणात नटलेल्या सजलेल्या गृहिणी जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाला दोरा गुंडाळत १०८ फेरया मारत गर्दीत,रेटारेटीत आपल पूजेच ताट आणि आपला तोल सावरत वडाची पूजा करतात, एकमेकींची ओटी भरतात दरवर्षी वट पौर्णिमेला दिसणार हे दृश्य पाहून लहानपणापासून आजतागायत मला अनेक प्रश्न पडतात आणि माझ्या सारख्या अनेकांनाही. सात जन्म तोच पती कसा काय मिळेल?
            एकतर पुनर्जन्म आहे कि नाही हे सिद्ध व्हायचय आणि समजा तो गृहीत धरला तर पुरुष आणि स्त्री हे पुन्हा स्त्री आणि पुरुष म्हणूनच जन्माला यायला हवे तेही एकाच कालखंडात म्हणजेच त्यांचा जन्म मरणाचा काल एकच हवा शिवाय त्यांची नातीही एकमेकांची आई,मुलगी,भाऊ बहीण,वडील अस होता कामा नये आणी सर्वात महत्वाच म्हणजे सात जन्मातला हा जन्म कोणता? कि प्रत्येक जन्मात सात जन्माच बुकिंग?आणि मग जन्म मरणाच्या फेरयातून मुक्तीच काय? बुद्धीच्या कसोटीवर ह्या प्रश्नाची उत्तरे शोधल्यास त्यातला फोलपणा लक्षात आल्यावाचून राहत नाही आणि मुख्य म्हणजे आताच्या समानतेच्या युगात बायकांनीच पतीसाठी हा उपवास का करावा? नवरयाने का नाही? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी काही जणांच्या प्रतिक्रिया घेतल्या तेव्हा अनेकांना ह्यातला फोलपणा जाणवला काहींनी म्हटलं मी हिलाच सांगितलं कि तूच हा उपवास करू नको तर काहीजणांनी बायकोसोबत उपवास करायची तयारी दाखवली पण पूजा करण त्यांन पटत नव्हत कॉलेज मध्ये Zoology शिकत असताना आमचे लेक्चरर [हेड ऑफ डीपार्टमेंट ]आम्हाला वडाच्या झाडाची वैज्ञानिक माहिती सांगताना पुजेमागची अंधश्रद्धा समजावीत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि निसर्ग सानिद्यातून ह्या पूजेचा उगम झाला.
            कलकत्त्यातील वडाच झाड आशियातील सर्वात मोठे व ४ एकरात पसरलेले असून अजूनही वाढतच आहे.काही कारणास्तव त्याचा काही भाग कापावा लागला होता त्याच्या घेराभोवती ३३० मीटर लांबीचा रस्ता बांधलाय.गुजरात मध्ये नर्मदा नदीपात्रा जवळील वडाच्या झाडाचा घेर देखील खूप मोठा असून साताऱ्याच्या म्हसवे इथल वडाच झाड अडीच एकरात पसरलंय वडाच्या पारंब्या जमिनीत घुसून तिथूनच झाड उगवते. वडाच्या झाडातून खूप जास्त प्रमाणात प्राणवायू बाहेर सोडल्या जातो वडाच्या झाडाचा विस्तार खूप दूरवर पसरतो ,त्यात पाणी धरून ठेवण्याची क्षमताही खूप असते त्याच्या भल्यामोठया झाडाखाली पांथस्थांना थंडावा  व विश्रांती मिळते वडाच झाड औषधीयुक्त आहे त्याची साल,पाने ,चिक ,पारंब्या ,अंकुर त्वचारोगावर ,दंतमंजनात ,केसवाढीसाठी आणि इतर कारणासाठी उपयोगी आहे म्हणूनच पूर्वजांनी त्याला पूजनीय केल पुढे त्याला सत्यवान सावित्रीच्या कथेच मिथक जोडल्या गेल सत्यवान सावित्री काही कारणास्तव जंगलात गेले असतील आणि सत्यवान झाडावरून खाली पडून बेशुद्ध पडला असेल आणि वडाच्या झाडातील जास्त प्रमाणात प्राणवायू बाहेर सोडण्याच्या गुणधर्मामुळे त्याची शुद्ध परत आली असेल दरम्यानच्या काळात सावित्रीन देवाचा धावा {यम }केला असेल आणि चातुर्याने वर मागितले असतील आणि योगायोगाने सत्यवान शुद्धीवर आला म्हणजेच जिवंत झाला कारण आजवर कोणीही मृत व्यक्ती जिवंत झाली नाही आणि होतही नाही त्या मुळे सावित्रीची वडाच्या झाडावर श्रद्धा बसली तिने वडाची पुजा केली आणि नंतर सावित्रीला लोकांनी देवीपद बहाल केल आणि बायकांनी वडासोबत तिचीही पूजा करण सुरु केल.
                    पूर्वी बायकांच जग घरापुरत मर्यादित होत तेव्हा अशा पूजेच्या निमित्याने त्यांना चार घटका मोकळीक मिळायची सुखदुखा:ची देवाण ,घेवाण व्हायची पण आज बायका शिक्षणाच्या , नोकरीच्या निमित्याने देशाबाहेर परदेशात जाताहेत मोबाइल,इन्टरनेट वरून ती संवाद साधतेय. पुर्वीच्या निष्ठा ,मुल्य आता बदललीत अशा वेळेस अशा पूजेसाठी तिला वेळ मिळत नाही शिवाय बुद्धीच्या कसोटीवर तिला हे पटत नाही पण उगाचच कराव लागत म्हणून ती हे व्रत कसबस उरकते कधी बाजारातून वडाची फांदी आणुन तर कधी वडाच बोन्साय पूजेसाठी वापरून ती हि पुजा उरकते .अशा वेळेस प्रश्न पडतो हा अट्टाहास कश्यासाठी ?शिवाय सद्या मालीकांमधून असे सण दाखवले जाताहेत बायका त्यांच अंधानुकरण करतात मालिका वाल्यांच पाऊल काळाच्या मागे पडतंय प्रत्यक्षात  मालिकेतल जग हे आभासी असत. मालिकेतील अभिनेत्री शुटींग संपताच आपल्या आधुनिक जगात वावरते.
             सावित्रीची जी गोष्ट वर्षानुवर्षे सांगितल्या जातेय त्यात तिने दाखवलेल्या अतुलनीय अशा धैर्याची तिच्या पतीवरील एकनिष्ठ प्रेमाची आणि अशा कठीण प्रसंगी कोणाचीही वाट न पाहता आलेल्या प्रसंगाला र्धैर्यान चातुर्यान तोंड देण्याची वृत्ती दिसून येते शिवाय आपल्या पतीला प्रत्यक्ष यमाच्या तावडीतून सही,सलामत परत आणण्याचा तिचा निश्चय वाखाणण्याजोगा आहे आज गरज आहे ती सावित्रीचे हे सर्व गुण अंधश्रद्धा न बाळगता आत्मसात करण्याची.
         काहीजण दारू पिऊन बायकोला बडवतात तिचेच पैसे घेऊन दारू पितात ,तिला घराबाहेर हाकलतात अशा वेळेस त्या बायकांनी कशासाठी पूजा करावी ? उलट सावित्रीन सत्यवानाला जस मृत्युच्या दाढेतून परत आणल तस व्यसनाच्या जाळ्यातून त्याला बाहेर काढण्याची गरज असते उच्चभ्रू उच्च विद्याविभूषित समाजाच उदाहरण घ्यायचं झाल्यास अजूनही किती स्त्रीयांना मानानं वागवल जात दररोज हुंड्यासाठी बळी घेतल्याच्या बातम्या येतातच हुंड्यासाठी डॉक्टर ,इंजिनिअर किंवा तत्सम उच्चशिक्षित तरुणीचा बळी जातो तेव्हा नवल वाटत कारण हे अत्त्याचार करणारेही उच्च शिक्षित असतात अशा वेळेस गरज असते ती सावित्रीच्या धारीष्ट्याची ,निडरतेन अन्यायाचा प्रतिकार करण्याची कथेतल्या सावित्रीन जसा न घाबरता यमाशी संवाद साधला आणि यश मिळवल तो गुण घेण्याची केवळ उपवास आणि पूजा करून चालत नाही तर त्या सोबत सावित्रीचे आणि वडाचे गुण आत्मसात करण्याची गरज आहे .

No comments:

Post a Comment