यवतमाळ येथे सध्या ग्राहकानां वितरीत करण्यात येणाऱ्या सिलिंडरची अवस्था खराब असून सिलिंडर रंग उडालेले,चपटलेले,धुळीने माखलेले असे असून काही सिलिंडर च्या वरची रिंग थोडीशी तुटलेल्या अवस्थेत आहे असे सिलिंडर लोकांच्या जीवाला घातक असतात मागे यवतमाळात सिलींडरचा स्फोट झाल्याची घटना घडली असून देखील असे सिलिंडर वितरीत केल्या जात आहेत तरी संबंधितानी ह्या कडे लक्ष देवून लोकांना चांगले सिलिंडर देण्याची सोय करावी व खराब अवस्थेतील सिलिंडरस कंपनीने परत घ्यावेत .नागरिकांनी तक्रार केल्यास सिलिंडर बदलून देऊ असे सांगून प्रत्यक्षात मात्र बदलवून दिल्या जात नाही.काही वेळेस गाडीत चांगले सिलिंडर असूनही ते न देता खराब स्थितीतलेच सिलिंडर घ्या नाहीतर नका घेवू अशी उत्तरे मिळतात काही ग्राहकांची सिलिंडरच्या वजना बाबतही तक्रार असते पण आता पेट्रोलीयम व नैसर्गिक वायू मंत्रालय खात्यामार्फत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून आपण घेत असलेल्या सिलिंडरचे वजन आलेल्या कर्मच्यारयांना करून देणे बंधनकारक असून ते वजन १५ किलो किंव्हा १४. ५०किलो एव्हढे असायला हवे जर ते कमी असल्यास खालील वेब साईट वर तक्रार नोंदवता येईल
www.ebharatgas.com , www.indane.co.in ,www.hpgas.com.
www.ebharatgas.com , www.indane.co.in ,www.hpgas.com.
No comments:
Post a Comment