Wednesday 16 April 2014

दिमाखदार सोहळ्याने सारेगमपची सांगता

        जुईली जोगळेकर ठरली सारेगमपच्या ह्या पर्वाची महागायिका
         
             रविवारी रंगलेल्या चार तासाच्या सारेगमप च्या अखेरच्या सुरेल गीतांच्या मैफिलीत हरिहरन,स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे ,सावनी रवींद्र आणि आधीच्या शेवटच्या एपिसोडमध्ये कविता कृष्ण्मुर्तीने आपल्या सुरेल आवाजात उत्तमोत्तम गाणी सादर करून रसिक प्रेक्षकांना रिझवले नेहमी प्रमाणेच अभिजित खांडकेकर याच्या खटयाळ सुत्रसंचलनाने प्रेक्षकांची करमणूक तर केलीच शिवाय ह्या वेळेस त्याला फु बाई  फु च्या कलाकारांनी हसवणुकीत साथ दिली अवधूत गुप्तेची खास अवधूत स्टाइल दिलखुलास दाद ,तौफिक कुरेशींनी देखील तेव्हढ्याच उत्स्फूर्ततेन केलेलं कौतुक आणि मनमोकळी दिलेली दाद ,आणि आधीच्या सारेगमप च्या विजेत्यांची ह्या कार्यक्रमातील उपस्थिती ह्या मुळे कार्यक्रम कंटाळवाणा न होता उतरोत्तर रंगत गेला विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमात जेव्हा जयंत पानसरे ,जुईली जोगळेकर ,रेश्मा कुलकर्णी ,प्रल्हाद जाधव आणि महेश कंटे ह्यांनी गायलेल्या तोडीस तोड  जुन्या नव्या गाण्याच्या तालावर त्यांच्या आईवडिलांसोबत प्रेक्षकांनी देखील ताल धरत डान्स केला.
                 सात शहरातून आलेल्या १५ ते ३० वयोगटातील तरुण गायकांच्या ह्या स्पर्धेत प्रथम १४ गायक ,गायिका आणि नंतर सात गायक ,गायीकांची निवड करण्यात आली होती तर शेवटी फक्त पाचजण अंतिम फेरी साठी निवडण्यात आले होते त्यात डोंबिवलीची रेश्मा कुलकर्णी [जिच तौफिक कुरेशी, अवधूत गुप्ते आणि अभिजित खांडकेकर ह्यांनी कट्यार कुलकर्णी अस नामकरण केल होत] तर पुण्याची जुईली जोगळेकर [जिला हे सारे चॉकलेट गर्ल म्हणत]सोलापूरचा जयंत पानसरे ,कोल्हापूरचा प्रल्हाद जाधव आणि मुरबाडचा महेश कंटे ह्यांचा समावेश होता ह्या वेळच्या सारेगमप च्या पर्वाचे वैशिष्ट म्हणजे ह्या एपिसोड मध्ये एकदा बाद ठरवलेल्या स्पर्धकाला पुन्हा कॉल back करून बोलावले नव्हते त्या मुळेच प्रेक्षकांना हि स्पर्धा आवडली परीक्षक म्हणून अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशींनी कधी परखडपणे चूक दाखवून देत तर कधी कौतुकानी" ध. नी "देऊन त्यांना प्रोत्साहन देत आपले काम नि:पक्ष पणे पार पाडले शिवाय ह्या वेळेस ह्या कार्यक्रमातून नवीन नाटक सिनेमांच्या निर्माता ,दिग्दर्शक ,कलाकार गायक ,वादक संगीतकार ह्यांना बोलवून त्यांच्या सिनेमा नाटकाची जाहिरात कम ओळख करुन देण्यात तर आलीच शिवाय त्यातील गायकांनी आपली गाणी सादर केली ह्या मुळे ह्या पर्वाने आपले  वेगळेपण जपत रसिकांची दाद मिळवली नेहमीप्रमाणेच सारेगमपच्या कमलेश भडकमकर आणि वाद्य वृन्दान अवधूत गुप्तेन केलेल्या संगीतातील नव्या बदलाच्या प्रयोगाला  सुरेल साथ दिली  खरेतर सारेगमपचे सारेच पर्व रंगतदार होते त्यातल्यात्यात" लिटील champs "ने सारयांना वेड लावले होते तसेच "युध्द तारयांचे "हे अभिनय विश्वातल्या गायकांचे पर्वही असेच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. गेले अनेक आठवडे सोमवार ,मंगळवार सारेगमपमय झाले होते  
                      यंदाचे स्पर्धक विशेषत: रेश्मा कुलकर्णी ,जयंत पानसरे आणि जुइली जोगळेकर तोडीस तोड आणि शास्र्रीय संगीताची जाण असणारे होते त्या मुळे शेवटपर्यंत कोण जिंकणार ह्याची साऱ्यांनाच उत्सुकता होती आणि सारयांनाच हे तिघेही जिंकावे असे वाटत होते तिघांनाही परीक्षकांनी १००%मार्क दिले होते पण SMS द्वारे मिळालेल्या प्रेक्षकांच्या मतां मुळे जुइली ने बाजी मारत हि स्पर्धा जिंकत "महागायीकेचा" मान पटकावला तिचा रॉकिंग performance रसिकांच्या  पसंतीस उतरला तिच्या आवाजातला चढ उतार खरोखरच वाखाणण्याजोगा होता ती केवळ सतरा वर्षाची असून आता तिची राहिलेली परीक्षा ती देणार आहे जयंत पानसरे उपविजेता ठरला तर रेश्मा कुलकर्णीन तिसरा   क्रमांक पटकावला  
                        ह्या कार्यक्रमाला Zee सिनेमा ,channels वरील मालिकांचे कलावंत तंत्रज्ञ निर्माता दिग्दर्शक ,गायक वादक ह्यांनी आवर्जून उपस्थिती लावली तौफिक कुरेशिंच्या " बॉम्बे कचरा"[plastic ,बाटल्या ,चेपटलेले डबे वै. ]घेवून त्यांनी सादर केलेल्या संगीताच्या नव्या लाजवबाब सादारीकरणा ने कार्यक्रमाची सांगता झाली. 

Thursday 10 April 2014

यवतमाळ येथे मतदान शांततेत सुरु

यवतमाळ येथे मतदान शांततेत सुरु
        यवतमाळ येथे सकाळपासून शांततेत मतदान सुरु असून काही मतदारांच्या नावांच्या बाबतीत मात्र घोळ झालेला आहे काहिंचा  मतदार यादीत नाव नसण्याचा प्रकार झालेला असून त्यांना त्यांच्या नावाचे कार्ड देण्यात आले होते त्यात त्यांचा नोंदणी क्रमांक असूनही मतदार यादीत मात्र  त्यांचा समावेश नसल्याचे दिसले विशेष म्हणजे ते सकाळीच मतदान करण्यासाठी आले होते
      येथील वैद्य नगर मधील न. परिषद शाळा क्रमांक ६ मध्ये व्यवस्थित मतदान सुरु असून सकाळपासून बारा वाजेपर्यंत जवळपास १४. ३०% मतदान झाल्याचे तिथल्या कार्मच्यारयांनी सांगितले यवतमाळ येथे उन्हाची तीव्रता जाणवत असूनही मतदार मत देण्यासाठी बाहेर पडले असून मतदान करणाऱ्यात काही म्हातारया आजींचाही समावेश होता
                                       काही मतदारांच्या नावांचा मतदार यादीत समावेश नाही
नुकतीच  चानल  वरून बातमी पाहिली कि काही मतदारांनी आपली नावे नोंदवूनही त्यांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत त्यासाठीचा फार्म त्यांनी भरलेला असूनही त्यांची नावे वगळण्यात आली
अमरावती येथे तब्बल ४६००० मतदारांचे नाव मतदार यादीत नसल्याने ते संतप्त झाले होते ,तर नागपूर मध्येही बरयाच  जणांचे नाव मतदार यादीत नव्हते   तेव्हा असा घोळ होण्यामागे कोण आहे हे  संबंधितांनी शोधावे  अशी नागरिकांनी  मागणी केली आहे
             यवतमाळ येथे संध्याकाळपर्यंत ५०% मतदान झाले 

Wednesday 2 April 2014

यवतमाळला रेल्वे कधी धावणार ?

             सध्या वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर राजकीय नाट्य चांगलच रंगलय निवडणूक जवळ येताच वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा चर्चेला आलाय मुळात वेगळा विदर्भ होण्यासाठी विदर्भाच्या विकासाबाबत बोलायला हवे. लोकांना विकास हवा तर नेत्यांना राजकारण.देशाची एकीकडे प्रगती पथावर वाटचाल सुरु आहे तर दुसरीकडे भ्रष्टाचारही वाढतच आहे.जनतेच भल करण्यापेक्षा नेते एकमेकांच उणदूण काढण्यात गुंतलेत. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ नेहमीच मागे का पडतो ह्याचा विचार व्हायला हवा विदर्भाला एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जायच.महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात यवतमाळ जिल्ह्यातील मंत्र्यांनी प्रतिनिधित्व केलय दोनवेळा मुख्यमंत्रीपद भूषवलय पण दुर्दैवाने यवतमाळचा उल्लेख अजूनही मागासलेला जिल्हा असाच करावा लागेल.

           ठळकपणे नोंद घेण्याजोगी यवतमाळची मुख्य समस्या रेल्वेची आहे भारतीय रेल्वेला दीडशेच्या वर वर्षे पूर्ण झालीत तर यवतमाळला शंभरच्या वर वर्षे पण अजूनही यवतमाळ रेल्वेच्या बाबतीत उपेक्षितच आहे
यवतमाळ रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आली अस  लोकांच्या कानावर आल पण पुन्हा रेल्वे कोठे अडली कळाले नाही कारण आता पुन्हा निवडणूक आलीय पुन्हा हाच मुद्दा चर्चेला येईल आश्वासनांचा पाऊस पडेल आणि निवडून येताच पुन्हा हे नेते रेल्वेचा मुद्दा विसरून जातील जे नेते थोडे फार प्रयत्न करतात ते देखील रेल्वे मंत्र्यांनी असमर्थता दाखविली की चूप बसतात ह्या अन्यायाविरुद्ध ते का आवाज उठवत नाहीत? त्यांना सामन्यांच्या समस्ये विषयीची कळकळ केवळ मता  पुरतीच असते कारण एकदा निवडून आल कि पाच वर्षांची निश्चिंती!

दरवर्षी रेल्वेच अंदाजपत्रक जाहीर होत यवतमाळचा त्यात समावेशच नसतो कारण ज्या तडफेन तो प्रश्न विधानसभेत मांडायला हवा तो मांडल्याच जात नाही एरव्ही छोटया ,छोट्या प्रश्नावर एकमेकावर तुटून पडणारे नेते त्याच तडफेने यवतमाळ रेल्वेचा मुद्दा उपस्थित का करत नाहीत?

         यवतमाळ येथील शकुंतला हि Narrow गेज रेल्वे, करार संपताच पुन्हा संघर्षाने सुरु झाली.यवतमाळ ब्रॉडगेज रेल्वेसाठीचा संघर्ष मात्र कमी पडतोय यवतमाळ ब्रॉडगेजने पश्चिम महाराष्ट्राशी जोडल्या गेल्यास व्यापारी, नोकरदार, प्रवाशी सारयांचाच फायदा होईल. यवतमाळ करांना त्यासाठी धामणगाव नागपूर अमरावतीला धाव घ्यावी लागते त्यात वेळ व पैसा वाया जातो यवतमाळ रेल्वेने अमरावती ,अकोला ,नागपूर,वर्धा हैद्राबाद,नांदेड ,सोलापूर,पुणे,मुंबईला सहज जोडता येईल कारण तिथे आधीच ब्रॉडगेज रेल्वेलाईन आहे ह्या सर्व ठिकाणी रेल्वेची सुविधा असताना यवतमाळ मात्र उपेक्षितच आहे कारण लोकांची आणि नेत्यांची उदासीनता.
         
यवतमाळच विमानतळही कित्येक दिवस नामांतराच्या घोळात अडकल होत तेव्हा लोक उपहासान विमानतळाला "प्रतीक्षा" नाव द्या अस म्हणत लोकांना अजूनही त्याचा काहीच उपयोग नाही कारण मोठी विमाने इथे येतातच कोठे?  फक्त नेत्या आणि अभिनेत्यांची सोय मात्र झाली
जेव्हा मंत्रीपद जात किंव्हा हुकत तेव्हा त्यांना नाविलाजाने गाडीने प्रवास करावा लागतो तेव्हा त्यांना रस्ते
विकासाचा पुळका येतो थोडाफार रस्ता सुधारतोही  पण तो लवकरच मूळ पदावर येतो तरीही कित्येक वर्षे टोल वसुलीच्या नावाने जनतेची लुट होतच राहते ती रस्त्यात खड्डे पडले तरी चालूच राहते

     यवतमाळला मुख्यमंत्री व इतर मोठया नेत्यांनी कित्येकदा भेटी दिल्यात पण रेल्वे काही सुरु झाली नाही म्हणूनच निवडणुकी आधीच लोकांना नकाराधिकार द्यायला हवा म्हणजे निष्क्रिय उमेदवाराला तिकीट मिळणार नाही जो उमेदवार खरोखरच कर्तुत्ववान ,क्रियाशील आणि इमानदार असेल त्यालाच तिकीट मिळेल गुन्हेगारी प्रवृत्तीच्या निष्क्रिय भाष्टचारी नेत्यांना आता लोक कंटाळलेत अशांना निवडणूक होण्या आधीच लोकांनी नाकारल्यास विकास होईल .
शिवाय एखादा नेता निवडून आलयास  व त्यांनी दिलेली विकासाची आश्वासने पूर्ण न केल्यास त्यांना  त्यांचा
कार्यकाळ पूर्ण करण्या आधीच परत बोलवण्याची सुविधा असावी हीच गोष्ठ  भ्रष्टाचारी आणि दलबदलू नेत्यांच्या बाबतीतहि आमलात आणावी म्हणजे जनतेची फसवणूक करणारया नेत्यांना धडा मिळेल
सद्या दूरदर्शनवरून दाखवण्यात येणाऱ्या बातम्यामधुन आपण नेते लाखो रुपयांची  कशीनावे तर  चोरून नेआण
करत आहेत ते पहात आहोतच अशा वेळेस तर मतदारांनी मत देताना नेत्यांचा कावेबाजपणा ओळखून त्यांनी न केलेल्या विकासाचा निधी  कोठे गेला हे विचारून  मतदान करावे  कारण आपले मत मौल्यवान आहे