Saturday 22 March 2014

यंदाचा उमेदवार निवडीचा नकाराधिकार आधी द्यावा

                                  सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे तिकीट वाटप सुरु आहे आपल्याला तिकीट मिळावे ह्या साठी नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत काहींनी पक्ष देखील सोडला आहे देशात भ्रष्टाचार,चोरया ,घोटाळे गाजताहेत शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय [ राळेगाव इथल्या खेड्यातील काहीजण क्लास मध्ये बसून बिनधास्तपणे कॉपी करतानाचे वृत्त सकाळ ह्या दैनिकात फोटोसहीत प्रकाशित झालय[लोकसत्ताच्या २१  मार्चच्या अंकातील" यहां सब कूछ बिकता है "ह्या बातमीत शाळेच्या प्रोजेक्ट ,पी एच डी .व थीसिस च्या ऑन लाईन विक्रीची बातमीही प्रसारित झालीय] काही निष्क्रिय ,भ्रष्टाचारी नेत्यांना पुन्हा तिकीट देण्यात आलय यंदा नकाराधिकार देण्यात आलाय पण निवडणुकीच्या वेळेस नकाराधिकार दिल्यास पुन्हा त्रीशंकू स्थिती येईल आणि पुन्हा निवडणुकीचा खर्च करावा लागेल म्हणून नेता निवडीचा अधिकार तिकीट वाटपाच्या आधी द्यावा म्हणजे नाकार्धिकार दिल्याचा उपयोग होईल कित्येकदा पक्षातील निष्ठावान नेत्यांना  डावलून दलबदलू नेत्यांना तिकीट दिल्या जाते असे नेते पुन्हा निवडून आल्यावर पक्ष बदलतात किंव्हा पाठींबा काढतात शिवाय त्यांना पक्षातील अंतर्गत माहितीही मिळालेली असते त्या मुळे पक्षाचे नाव तर खराब होतेच शिवाय लोकांचा पक्षावरचा नेत्यावरचा विश्वास उडतो म्हणून नकाराधिकार आधी मिळायला हवा शिवाय ज्यांनी जनतेचा पैसा न खाता निस्वार्थ भावनेने समाजसेवा केलीय व ज्यांनी खरोखरच काही कामे देशासाठी व आपल्या मदारसंघात करून दाखवलीत त्या कर्तुत्ववान नेत्यांची नावे जर मतदानाच्या वेळेस बाजूला दिली व त्यांना मत देण्यास सांगितले तर काही फायदा होईल   

                                         नरेंद्र मोदींची यवतमाळ भेट

                                 नुकतीच नरेंद्र मोदींनी गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांशी यवतमाळ येथील दाभडी ह्या गावातून संवाद साधला तेव्हा त्यांनी सीमेवरील जवानांशी शेतकऱ्यांची तुलना केली हि गोष्ट चुकीची आहे सीमेवरील जवान कठीण परिस्थितीत प्राण पणाला लावून देशासाठी लढतात व देशाचे संरक्षण करतात तर शेतकरी परिस्थिती पुढे हार मानून आपणच काढलेल्या कर्जाच्या परत फेढीच्या चिंतेने आत्महत्त्या करतात परिस्थितीला घाबरून शरण न जाता धैर्याने शत्रूला नामोहरम करताना शूर  जवानांना  वीरमरण येते हा फरक उद्यमशील वृत्तीच्या नरेंद्र मोदिंनी जाणून घेणे आवश्यक होते
                            त्यांनी एकाचवेळी देशाच्या ३३ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉनफरन्सि द्वारे संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली शेतकऱ्यांनी त्यांनी अनुभवलेला भ्रष्टाचार ,असुविधा आर्थिक समस्या ,शिक्षणातील येणाऱ्या अडचणींना वाचा फोडली त्या वेळी मोदिंनी शेतीचे आधुनिक तंत्र व सोयीसुविधा ह्या बद्दल माहिती दिली इथे कापूस पिकतो तेव्हा त्या पासून कापड इथेच तयार व्हावे व इथूनच ते बाजारात विक्रीस जावे त्या साठी रेल्वे सुरु होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले शिवाय भाजीपाला व इतर नाशवंत वस्तूसाठी शीतगृह,गोदाम असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले उसासाठी खूप पाणी पाहिजे हा समज चुकीचा असून गुजरात मध्ये कमी पाण्यात ठिबक सिंचन पद्धतीने उस पिकवला जातो असेही त्यांनी सांगितले अर्थात सद्या मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असून ते निवडून आल्यास ह्या बाबीची कितपत पूर्तता करतात ते लवकरच कळेल

No comments:

Post a Comment