सोन्याच्या भावात सतत चढउतार होत असते कधी सोन तीस हजाराच्या वर जात तर कधी कमीही होत पण सोन्याचे भाव खूप कमी प्रमाणात अजून तरी खाली आले नाहीत सध्या असा अंदाज जाणकार व्यक्त करताहेत कि लवकरच सोन पंचवीस हजार रुपय्रे तोळा होईल अर्थात तो होईल किव्हा नाही हे लवकरच कळेल तीस हजाराच्या वर पल्ला गाठत सोन पुन्हा झळाळत कारण ऱुपयाच वाढत अवमूल्यन ,आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्या तेलाचे वाढलेले भाव आणि शेअर बाजारातील अनिश्चितता ह्या मुळे लोक सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळलेत एकतर सोन जून झाल तरी त्याच मोल वाढतच जात शिवाय दागिन्यात गुंतवणूक केल्यास दागिने हौसेन वापरताही येतात आणि अडीनडीला विकल्यावर पैसेही मिळतात हा उद्देश त्या मागे असतो पण ह्याचा फायदा फक्त बड्या उद्योगपातींनाच मिळतो शिवाय दागिने विकताना त्यात घट येते म्हणून मध्यमवर्गीयांना हि गुंतवणूक मानवणारी नाही कारण आयुष्य भराची कमाई सोन्यात गुंतवली तर सोने कधी चोरीला जाइल ह्याचा नेम नाही मग पैसे आणि सोन दोन्ही गमवाव लागेल म्हणूनच सध्याचा चोरांचा धुमाकूळ पाहता सोन गुंतवणूक म्हणून घेण खरच फायद्याच आहे का ? ह्याचा विचार होतोय परिणामी सोनाराच्या दुकानात शुकशुकाट दिसतोय फक्त लग्नसराईत गरज म्हणून किंवा जुनेच दागिने मोडून नवे करण्याकडे महिलांचा कल दिसतोय विशेष म्हणजे एकीकडे सोन्याचे भाव वाढत चाललेत तर दुसरीकडे चोऱ्यांच प्रमाणही मंदिरात दानात किलोंनी सोन व सोन्याच्या वस्तू वाहणारयाच प्रमाण मात्र वाढतंय
ह्या वर्षी सोन चर्चेत आल ते उत्तरप्रदेशातील "उन्नाव " ह्या गावातील "शोभन सरकार " ह्यांना पडलेल्या स्वप्ना मुळे त्यांना दिसलेल्या "राजा राम बक्ष सिह" ह्यां राजाच्या खजिन्यातील १०००टन सोन्यामुळे त्यांनी सांगितलेल्या [आकड्या पेक्षा थोडही कमी किंवा जास्त नाही] सोन सापडणारच ह्या ग्वाही मुळे सरकारन पुरातत्व विभागाची मदत घेत आणि शोभन सरकारवर विश्वासत भूगर्भ शास्त्रन्यांच्या साह्याने [A S I ]उन्नाव मध्ये खोदकाम सुरु केल .एका रात्रीत "उन्नाव सोन्याच गाव "म्हणून चर्चेत आल राजवाड्याचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ झाला खजिना पाहण्यासाठी देशोदेशिचॆ पत्रकार ,पर्यटक ,गावातील लोक उन्नाव मध्ये जमा झाले ,T .V .चानल्स वर चर्चा रंगल्या पण कसच काय महिनाभर खोदकाम करूनही खजिना तर दूरच तसूभरही सोन सापडलं नाही पण तिथे जमलेल्या लोकांच्या गरजेखातर खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने थाटणारयांनी मात्र धंदा चालवून पैसे मिळवले त्यातून त्यांनी सोन खरेदी केल की त्यांना सोन सापडलं अस आपण म्हणू शकू.
पंढरपूर जवळील भीमेच्या तीरावर वसलेल्या "बेगमपूर इथल वडाच झाडही असच "सोन्याच झाड" म्हणून चर्चेत आल होत ह्या झाडाच्या पानाचा मागचा भाग अचानक सोन्याप्रमाणे चकाकू लागला म्हणून तिथल्या अभ्यासकांनी ह्या पानांचं आणि मातीच प्रयोग शाळेत परीक्षण केल तेव्हा त्यात सोन्याचा अंश आढळला मुळाद्वारे शोषलेल्या मातीतील सोन्याचे अंश पानातून बाहेर पडल्याने पाने चकाकत होती तेव्हा इथेही उत्खनन व्हाव अशी तिथल्या जनतेन मागणी केली होती अभ्यासकांच्या मते औरंगजेबान साडेचार वर्ष इथून राज्य कारभार चालवला तेव्हा सोन्या,चांदीची नाणी चलनात होती औरंगजेबाच्या काळात इथे टांकसाळ होती त्या मुळे इथल्या खडकात सोन्याचे कण सापडू शकतात आणि सद्याच्या हट्टी आणि कोलार गोल्ड माइन पेक्षा जास्त सोन इथे सापडू शकत, सिंधुदुर्ग आणि मंगळवेढा इथल्या मातीतही सोन्याचे कण सापडू शकतात . पण उन्नावच्या अनुभवान शाहाण झालेल्या सरकारन ह्या मागणी कडे दुर्लक्ष केलय लहानपणी नाईल ह्या आफ्रीकेतल्या नदीच्या किनाऱ्यावरची वाळू सोन्याची आहे अस वाचल कि आश्चर्य वाटायचं पण कॉलेजात Geology अभ्यासताना त्यातल वैज्ञानिक सत्य उलगडल.
पूर्वी भारतात सोन्याचा धूर निघायचा अस आपले पूर्वज सांगायचे सोन्याचे भाव तेव्हा अगदी कमी म्हणजे पाच पंचवीस रुपये तोळा होता . तेव्हा अनेकजण त्यावर अविश्वास दाखवत असतील पण गेल्या तीस पस्तीस वर्षात आणि अगदी आताच्या दहाबारा वर्षात सोन्याचे वाढलेले भाव पाहून आजची पिढी जेव्हा नव्या पिढीला सांगेल कि आमच्या वेळेस सोन स्वस्त होत तर तेही असच आश्चर्य व्यक्त करतील कारण सोन्याचे वाढते भाव.
ऐशीच्या दशकात सोन दीडदोन हजारावर होत, आणि ६९' साली सोन अवघ ५०० रुपये तोळा .२००४ पर्यंत सोन सहा हजारावर गेल तेव्हा सोनारांच्या दुकानात शुकशुकाट होता त्या बाबतीत सोनारांना विचारल तेव्हा ते म्हणाले की लोक सोन्याचे भाव कमी होण्याची वाट पाहताहेत पण भाव कमी होण्याऐवजी वाढतच गेला त्याच काळात सोन्याचे भाव सात हजार झाले पण भाजपचे सरकार येताच भाव चार हजारापर्यंत खाली आले तेव्हा लोकांनी दुकानात सोन घेण्यासाठी गर्दी केली होती त्या वेळेस सोन गुंतवणुकीसाठी घेणारे तोट्यात गेले आता दीडदोन हजारच काय २००८ पर्यंत ८०००रु तोळा असणार सोन स्वस्त वाटतंय ह्या सात आठ वर्षात सोन्यान इतकी उसळी मारलीय की सोन स्वस्त होईल हि आशाच फोल ठरतेय मध्यंतरी सोन एकदा पंधरा हजाराहून दहा हजार तर तीसच्या वर गेलेले सोन्याचे भाव पंचवीस हजारावर आले तेव्हा देखील बायकांनी सोनारांच्या दुकानात गर्दी केली होती पुण्यात तर सोन घेण्यासाठी दुकानाच्या बाहेर पर्यंत रांग लागली होती पण एलबीटीच्या विरोधातल्या संपामुळे सोनाराची दुकान जी बंद झाली ती सोन्याचे भाव वाढल्यावरच उघडली.
सत्तर ऐशीच्या दशकात सोन विकत घेण्याकडे लोकांचा फारसा कल नसायचा कारण त्या वेळेस सुवर्ण नियंत्रण कायदा होता त्या मुळे लोक सोन्यात पैसे गुंतवत नसत कष्टाची कमाई सोन्यात गुंतवली आणि जास्तीच सोन जप्त झाल तर ते परत मिळेलच ह्याची ग्यारंटी नसे शिवाय चोरीची भीतीही होतीच त्या मुळे बायका फक्त मंगऴसूत्रच घालत फक्त घरातल्या लग्नातच दागिने घालत आताची परिस्थिती पाहता त्या वेळेस बायका मंगळसूत्र घालून निर्धास्त पणे बाहेर येवू जाऊ शकत होत्या आता सुवर्ण नियंत्रण कायदा नसूनही आणि बाजारात नवनवीन डिझाईन चे दागिने निघूनही बायका दागिने घेण्यास अनुत्सुक असतात कारण घराच्या बाहेर साध मंगळसूत्र घालून फिरणंही चोरांनी अशक्य केलय पूर्वी वीस पैश्याच्या पिवळ्या नाण्याचे दागिने बनविण्याची fashion होती आणि आता कमी ग्रॅम च्या दागिन्यांची असे दागिने स्वस्त असतात आणि ते चोरांनी चोरले तरी त्याला रीसेल व्ह्यल्यु नसते हे दागिने पातळ पत्रा किव्हा ईलेक्टरोप्लेटिंग केलेले असतात.आत मधे लाख भरलेले असतात ,आणि वरून सोन्याचा मुलामा दिलेले असतात त्या मुळे मोड म्हणून विकल्यावर त्याला काहीच किंमत मिळत नाही
सध्या भारतातल्या हट्टी व कोलार गोल्ड माईन बंद पडल्यान सोन आयात कराव लागतंय आणि आयात शुल्क वाढीमुळे सोन्याची भाववाढ झाल्याच सांगण्यात येतेय त्या मुळे आयात शुल्क कमी करण्याचा विचार सुरु आहे अर्थमंत्री पी चिदम्बरम यांनी तस आश्वासन दिल्याची बातमी वाचण्यात आली शिवाय आपल्या देशात सोन महाग असल तरी इतर देशात सोन स्वस्त असल्यान सोन्याच स्मगलिंग होतंय
परदेशातून होणारी सोन्याची चोरटी आयात विमानतळावर नेहमी पकडल्या जातेय शिवाय सोन्याची गुंतवणूक कायमस्वरूपी चालणारी नसल्याच जाणकार सांगतात कारण व्यवहारात चलनी नोटा लागतात त्या मुळे सोन विकाव लागतच आणि इतर देशांनी सोन विकायला काढल कि सोन स्वस्त होत . चोरांमुळेही सोन्यातली गुंतवणूक असुरक्षित झालीय जेव्हा चोर पकडल्या जातील,तुरुंगात खडी फोडायला जातील तेव्हा लोक सोन घेतील अर्थात बायकांना घेतलेलं सोन म्हणजे दागिने निर्धास्त पणे घालून फिरता येणही तितकच आवश्यक आहे कारण सोन्याची जास्त खरेदी बायकांसाठीच होते आणि सोन स्वस्त झाल तरच सोनारांचा धंदाही चालेल नाहीतर शुकशुकाट ठरलेलाच
समस्त महिला वर्ग मात्र सोन स्वस्त होण्याची वाट पाहतोय कधी सोन स्वस्त होईल आणि त्या सुरक्षितपणे मंगळसूत्र घालून फिरू शकतील म्हणूनच त्या म्हणतात " जून ते सोन पण सोन स्वस्त हव ".
No comments:
Post a Comment