[ कुलदीप पवार यांच २४ मार्चला मुंबईच्या कोकीळाबेन हॉस्पीटल येथे आजारपणामुळे निधन झाले ते यवतमाळ येथे " बायको बिलंदर नवरा कलंदर "ह्या नाटकाच्या निमित्याने आले होते तेव्हाचा हा वृत्तांत ]
मधुसुदन कालेलकर लिखित हे नाटक स्वत: कुलदीप पवार दिग्दर्शित करत होते.
त्याचं हे नाटक व त्यांच्या अभिनय कारकिर्दीविषयी जाणून घेण्यासाठी रीतसर परवानगी घेतली तेव्हा वेळेअभावी त्यांच्या मेकअप रूम मधेच प्रवेश मिळाला कुलदीप पवार प्रसन्न चित्ताने आपल्या सहकाऱ्यांशी नाटकाविषयी चर्चा करत होते तर इतर महिला कलाकारांचा एकीकडे मेकअप सुरु होता इथल्याच अभ्यंकर कन्या शाळेच्या मोकळ्या प्रांगणात नाटक होणार असल्याने शाळेच्याच एका hall च रुपांतर मेकअप रुममध्ये करण्यात आल होत रुमच्या मध्यभागी ड्रेसिंग टेबल आणि स्पेशल लाइटची व्यवस्था होती तर एकीकडे प्रेसमन कपड्यांना इस्त्री करत होता रुमच्याच अर्ध्या भागात पडदा बांधून महिला कलाकारांची चेंजिंगची सोय करण्यात आली होती साउंडमन आणि इतर कलाकारांची येजा सुरु होती एकंदरीत सगळीकडे धावपळ सुरु होती एकाने मला कुलदीप पवार तिकडे बसलेत अस सांगितलं तेव्हा मी त्यांना भेटून आनंद झाल्याच सांगितलं त्यांनी देखील हसून thanks म्हटल मी मुलाखतीबद्दल विचारताच ते नम्रपणे म्हणाले की ते खूप थकलेत सारेच थकलेत शिवाय अर्ध्यातासात नाटक सुरु होईल खरेतर माझ्याबद्दल इतक छापून आलय कि मी नवे काय सांगू ? पण तरीही तुम्ही तुमचे
प्रश्न लिहून ठेवा मी नाटक संपल्यावर मुलाखत देईन मी होकार दिला तेव्हा कुलदीप पवारांनी कीर्ती गोसावी ह्या सिने सिरियल मध्ये काम करणारया उमद्या आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या अभिनेत्याची मुलाखत घ्या अस सुचवलं कारण ते मेकअप करून तयार होते पवईच्या IIT मधून इंजिनीअर झालेल्या कीर्ती गोसावींनी अनेक नाटके ,सिनेमे आणि सिरिअल्स मधून कामे केलीत त्यांच्याशी बोलत असताना कुलदीप पवार मेकअप मनकडून चेहऱ्यावरून शेवटचा हात फिरवत होते.
माझी मुलाखत घेण चालू असताना एका प्रश्ना दरम्यान कीर्ती गोसावी पवई मधून इंजिनीअर झालेत हे ऐकून मला आश्चर्य वाटल्याच पाहून आणि आमच बोलण ऐकून कुलदीप पवार म्हणाले ,"अहो लोकांना काय वाटत कि इथले लोक मद्दड असतात ,अर्धशिक्षित असतात ! अभिनय करण नाटकात काम करण काय इतक सोप्प असत?" मी म्हटलं लोकांचा समज असेल माझा नाही [ कारण ह्या आधी मी अशोक शिंदेंची मुलाखत घेतली होती ते देखील इंजिनीअर आहेत ] ते म्हणाले उलट इथे तर कॉमन सेंसचा खूप वापर करावा लागतो वेळेवर अभिनय करावा लागतो डायलॉग पाठ करून येत नाहीत लक्षात ठेवावे लागतात, कुठल्याही कठीण प्रसंगी नाटक सादर कराव लागत वैयक्तिक अडचणी दूर ठेवाव्या लागतात, खूप संकट येतात पण न डगमगता त्याला तोंड ध्याव लागत हे इतक सोप नसत कितीतरी व्यवधान सांभाळावी लागतात कित्येकदा एखाद्या व्यावसाईकाचा फोन येतो कि आमचा मुलगा अभ्यासात लक्ष देत नाही त्याच तिथे काही जमत नाही तुमच्याकडे घ्या त्याला पण एकवेळ doctor,engineer होण सोप असत अभ्यास करून घोकंपट्टी करून पास होता येत पण इथे तस नसत इथे अंगभूत कलागुणांना आणि कॉमन सेंसला महत्व असत वेळ निभावून न्यावी लागते सुरवातीला काहीतरी वेगळ सांगा म्हटल्यावर ह्या तीस वर्षात माझ्या बद्दल इतक काही छापून आलय कि मी काय वेगळ सांगणार म्हणणारे कुलदीप पवार वेगळ सांगून गेलेच ते म्हणतात ,"इथे पण डॉक्टर आहेत पण पाहिलत न त्यांनी इथे काय करून ठेवलंय ते !" बोलता बोलताच त्यांनी नाटकातील गायत्री महाडिक ह्या नवोदित कलाकाराला स्टेप्स सांगायला सुरुवात केली नाटकात कस यायचं,कस बोलायचं ह्याच प्रात्यक्षिक ध्यायला सुरुवात केली ,कीर्ती गोसाविंनाही ते दृश्य समजावून सांगत होते त्यांनी काहींना हेअर स्टाइल बदलायला लावली इतके दिवस दुसरयांच्या दिग्दर्शनाखाली काम करणाऱ्या कुलदीप पवारांना स्वत: दिग्दर्शन करतानाच दृष्य अनोख होत अर्थात नाटक सिनेमातून आपल्या उत्तम अभिनयाची छाप पाडणाऱ्या कुलदीप पवारांचं दिग्दर्शनही कुशलच होत नाटक विनोदी होत त्यांनी त्यात केलेला खलनायकी बेरकी रोल उत्तम होता हे नाटक संपल्यावर बायकांनी त्यांना घातलेल्या शिव्यांवरून कळत होत खरोखरच नाटक पाहिल्यावर कोणाचीच इच्छा त्यांच्याशी बोलण्याची होणार नाही पण अभिनय आणि वास्तव वेगळ असूही शकत .
अभिनयाच्या आवडीखातर कोल्हापूरहून वाह्या पुणे मुंबईत आलेल्या कुलदीप पवार यांनी नाटके,सिनेमे आणि सिरिअल्स मधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली त्यांनी बेरकी खलनायक ,खेडवळ नायक ,विनोदी अभिनेता आणि डीटेक्टीव्ह नायक सारख्याच ताकदीन रंगवला त्यांचे " इथे ओशाळला मृत्यू ,अश्रूंची झाली फुले ,नवरा बिलंदर बायको कलंदर ,पती माझा उचापती ,होनाजी बाळा हि नाटके ,शापित ,दरोडेखोर ,अरे संसार संसार ,बिनकामाचा नवरा ,जावयाची जात ,खरा वारसदार ,नवरे सारे गाढव इत्यादी अनेक सिनेमे आणि परमवीर ,तू,तू,,मै,मै हे सिरिअल्स गाजले .