Wednesday 18 September 2013

यवतमाळ येथील गणेश सजावट


  यवतमाळचा राजा
          

               येथील मारवाडी चौकातील नवयुवक गणेश उत्सव मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षात गणेशा पुढे शीश महालाचा देखावा साकारला आहे प्रवेश दारावर दोन्ही बाजूने लाईट च्या साह्याने जल महालाचे दृश्य साकारले आहे तर पायरया वर काचेखाली कुंदन व क्रिस्टलचा उपयोग करून सुंदर नक्षीकाम केले आहे .
 
फ्लोअरिंग वर देखील चौकोनी काचेखाली कमळ व इतर साहित्य वापरून पाण्याचे कारंजे त्यात आकर्षकता आणत आहे.



बाजुच्या भिंती वरील छत देखील आकर्षक काचकामानी सजवले आहे.




 मूर्तीचा सभामंडप ५१ फूट असून ही मूर्ती मूर्तिकार वनकर बंधूनी तयार केली आहे मूर्ती २५ किलौ चांदीच्या सिहासनावर विराजमान असून मुकुट सोन्याचे व दागिने रत्न जडीत आहेत समोरचा मूषक साडे आठ किलो चांदीचा आहे.



      यवतमाळ येथील आर्णी रोड वरील महारुद्र गणेश मंडळाने ह्या वर्षी विसाव्या वर्षात पदार्पण केले आहे त्यांनी कलकत्त्याच्या मूर्तीकारांनी बनवलेल्या मुर्तीद्वारे साकारलेले हे दृश्य


फोटो -पुजा दुद्दलवार BE (Soft ),BMC  

Friday 13 September 2013

यवतमाळ येथे गौरी गणपतीचे उत्साहात स्वागत

                             यवतमाळ येथे गौरी गणपतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले यवतमाळ येथील मारवाडी चौकातील नवयुवक मंडळाने यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे त्या मुळे ह्या मंडळाच्या "यवतमाळचा राजा" असे संबोधण्यात येणारया गणेशाचे स्वागत खास पेशवाई थाटात झाले गणेशाच्या मिरवणुकीत हत्ती , उंट ,घोडे ह्यांचा सहभाग होता तर गणेशाची स्वारी पुष्पक विमानाच्या प्रतिकृतीवर विराजमान झाली होती सोबत पेशवाई वेष घातलेले तरुण सहभागी झाले होते गणरायावर तोफेद्वारे पुष्प वृष्ठी केल्या जात होती ही मूर्ती शिश महालात विराजमान झाल्याचा देखावा साकारण्यात आला आहे .
                                       यवतमाळ येथे गौरीचे स्वागतही उत्साहात झाले विदर्भात महालक्ष्मीच्या प्रसादाचे विशेष महत्व असते इथे महालक्ष्मीच्या जेवणाच्या दिवशी जेवणावळी असतात ज्यांच्या कडे महालक्ष्मी बसतात तिथे प्रसादाच्या पंक्ती च्या पंक्ती जेवू घातल्या जातात महालक्ष्मी पुढे रास टाकल्या जाते व नंतर राशीचे जेवण दिल्या जाते जेवणात सोळा भाज्या पूरण पोळी ,वडे ओतपल्लु [घारगे]तर असतातच पण इथे महत्व असते ते आंबीलीला आंबील दोन प्रकारे केल्या जाते काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात ज्वारीच्या कण्या ज्या प्रकारे केल्या जातात तशी फोडणीची आंबील तर काही ठिकाणी साधी आंबील शिजवून त्याच्या वड्या पाडून त्यात दुध साखर घालून दिल्या जातात शिवाय पंचपक्वानांचा नैवेध्य्ही असतोच पश्चिम महाराष्ट्रात महालक्ष्मी आल्या दिवशी भाकरी पालेभाजी व शिरयाचा नैवेद्य दाखवतात.
                      तर पश्चिम महाराष्ट्रात बाहेरच्यांना जेवण दिल्या जात नाही कारण जर कोणी जेवायला आलेच तर त्याला तिथेच मुक्काम करावा लागतो आणि जर राहणे शक्य नसेल तर लक्ष्मी पुढे पैसे दक्षिणा म्हणून टाकून मगच बाहेर जाता येते विदर्भात जेवल्यानंतर हात धुण्यासाठी घरातच एक जागा करून तिथेच हात धुवावे लागतात जेणे करून खरकटे इकडे तिकडे जाऊ नये तर पश्चिम महाराष्टात महालक्ष्मी आल्यानंतर तीन दिवस पैसे खर्च करत नाहीत कचरा बाहेर टाकत नाहीत आणि घर झाडतही नाहीत .
                पश्चिम महाराष्ट्रात हळदी कुंकवाचे विशेष महत्व असते तेव्हा बरयाच जणांना बोलावले जाते महालाक्ष्मिपुढे सजावट केली जाते पूर्वी सोलापुरात काम शेट्टी ,नामदेव चिवडेवाले ह्याच्या कडची आरास पाहण्यासाठी खूप गर्दी व्हायची चिवडे वाल्यांकडे तीन आरसे महालक्ष्मी मागे असे ठेवल्या जात कि त्या मोठया आरशात महालक्ष्मीच्या अगणीत प्रतिमा दिसत तो अप्रतिम देखावा पाहताना पाहणारयाचे भान हरपे.
                          आता सणांना उत्सवी स्वरूप आलय सोळा भाज्या एकमेकात मिसळून भाज्यांची संख्या कमी करण्यात आलीय त्या मुळे त्यात नाविन्य तर आलच शिवाय भाजी संपवण पण सोप झालय माझ्या दोन्ही कडच्या आजोळी महालक्ष्म्या बसत सोलापूरला आम्ही आमच्या आजोळी महालक्ष्मी साठी जात असू तेव्हा सारे जमत आजच्या भाषेत गेट टूगेदर होई जेवल्या नंतर तिथेच रहाव लागे तेव्हा आजी आजोबांचा येव्हडा धाक असे कि ताटातल्या सोळा भाज्या संम्पवाव्याच लागत आता खूप बदल झालाय तेव्हा महालक्ष्मी पुढे आरास करताना समोर छान छान खेळण्या मांडल्या जात आता सजावटी साठी बरयाच वस्तू बाजारात उपलब्ध आहेत.

Thursday 12 September 2013

यवतमाळ येथे होतोय अजूनही एक दिवसाआड व अनियमित पाणी पुरवठा

            पूर्ण विदर्भात ह्या वर्षी अतिवृष्ठी झाली पुरामुळे धरणाचे दरवाजेही उघडण्यात आले त्या मुळे गावात पाणी शिरून शेत,घरे,दुकानांचे नुकसान झाले पण तरीही पाणी पुरवठा विभागाच्या योग्य नियोजना अभावी अजूनही व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही खरेतर इतका पाऊस पडल्यानंतर दररोज नियमित पाणी नळाद्वारे सोडण्यात यायला हवे पण पाणी एक दिवसा आडच सोडले जाते दाते कॉलेज मागील शास्त्री नगर मध्ये व काही भागात कमी फोर्सने ते ही अनियमित वेळेत दुपारी बारा ते चार वाजता पाणी सोडले जाते.मग मात्र रात्री पर्यंत पूर्ण फोर्सने पाणी सोडल्या जाते सकाळी दहा पर्यंत बाहेर थेंब,थेंब पाणी येते व नंतर बंद होते हि वेळ गृहिणींसाठी गैरसोयीची आहे तेव्हा आधी प्रमाणे दररोज पहाटे पासून दुपारी दोन पर्यंत नियमित पाणी सोडण्यात यावे शिवाय दिवसभर पाणी न सोडता तो नियमित करावा म्हणजे जास्तीचे पाणी वाया न जाता पाणी उन्हाळ्या पर्यंत नागरिकांना पुरेल व लोकांना विशेषत: गृहिणींना उन्हाळ्यात पाणी टंचाई ला तोंड ध्यावे लागणार नाही.

Tuesday 3 September 2013

यवतमाळ येथे डासांचा त्रास वाढला

                                                     यवतमाळ येथे सद्या डासांचा त्रास वाढला असून दिवसभर डासांना प्रतिबंध करण्यारया ऑल आउट ,मच्छर अगरबत्ती व तत्सम साधनांचा वापर करावालागतोय ,मध्यंतरी यवतमाळ येथे डेंगू चे रुग्ण आढळले होते शिवाय येथे मलेरिया ,हिवतापाचीही साथ सुरु आहे अशा वेळेस नियमितपणे नाल्या साफ करणे गाजर गवत काढणे गरजेचे आहे  कारण गाजर गवता मुळेही बऱ्याच समस्या उदभवतात पण सध्या यवतमाळ येथे नगरपालिकेत अविश्वास ठरावावरून राजकारण सुरु आहे त्या मुळे निवडून आलेल्या प्रतिनीधींना आपण दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलाय आपण ज्यांच्या बळावर निवडून आलोय हे ते विसरलेत.
                     डासांच्या समस्येवर उपाय म्हणून फ्वागिंग मशीन द्वारे फवारणी करण्यासाठी मशीन खरेदी झाली काही दिवस नियमित फवारणीही केल्या गेली पण पुन्हा वादाच्या भोवरयात फ्वागिंग मशिन फवारणी अडकल्याने नागरिकांना मात्र डासाच्या त्रासाला व त्या मुळे होणारया त्रासांना सोमोरे जावे लागते नगरपालिकेत  वाद सुरु असताना काही कर्मचारी नागरिकांच्या घरातील कामे करण्यात गुंतले आहेत त्या बाबतीत विचारणा केल्यास ते आपल्यालाच धमकावतात ह्या बाबतीत काही नगर सेवकानाही माहिती असून ते काहीही कारवाई करत नाहीत त्या मुळे त्यांचावर वचक बसत नाही अशा नगर सेवकांवर ,काम करून घेणारया नागरिकांवर व कर्मच्यारयांवर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे कारण येथे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे.
                     शिवाय नाली साफ केल्यानंतर काही कर्मचारी काढलेला कचरा तिथेच टाकून निघून जातात त्यामुळे सुद्धा डासांचे प्रमाण वाढते त्या मुळे तो कचरा लगेचच उचलून गाडीत टाकण्यास बाध्य करावे ,बंद पडलेली फ्वागिंग मशीन फवारणी सुरु करावी शिवाय बरयाच दिवसापासून यवतमाळ मधील नागरिकांची अंडर ग्राउंड नालीची मागणी पूर्ण करावी म्हणजे उघडया नाल्यांमुळे होणारा त्रास कमी होईल(नालीत कचरा साचून तुंबणे,नालीत साचलेल्या कचरया मुळे वाढणारी डासांची पैदास ,त्यातच डुंबणारी डुकरे)शिवाय घंटागाडी कर्मचारयानाही नाली साफ करावी लागणार नाही.
                       फक्त निवडून येण्यापुरते आम्ही हे करू ते करू म्हणून आश्वासने देवून कामाकडे व नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास लोकांनी अशा प्रतिनिधींना परत बोलवावे आता लोकांना रोग प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप होईल व निरोगी लोकांना उगाचच गोळ्या घ्याव्या लागतील त्या मुळे रोग उद्भवण्या आधीच योग्य उपाय केल्यास डासांना प्रतिबंध बसेल.