Tuesday, 28 October 2025

नासाचे अंतराळवीर Chris Williams दोन रशियन अंतराळवीरांसह स्थानकात वास्तव्यास जाणार

                    NASA astronaut Chris Williams poses for an official portrait at the agency’s Johnson Space Center in Houston.


नासा संस्था- 25 सप्टेंबर 

नासाच्या अंतराळमोहिम 73/74 अंतर्गत नासाचे अंतराळवीर Chris Williams रशियन अंतराळवीर Sergey Kud-Sverchkov आणी Sergey Mikaev सह अंतराळ स्थानकात वास्तव्यास जाणार आहेत 

कझाकस्थानातील बैकोनुर ऊड्डाणस्थळावरुन सोयुझ MS-28 ह्या अंतराळयानातुन 27 नोव्हेंबरला हे तीनही अंतराळवीर स्थानकात जाण्यासाठी अंतराळात ऊड्डाण करतील हे अंतराळवीर आठ महिने स्थानकात वास्तव्य करतील व तेथे सुरू असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी होतील

अंतराळवीर Chris हे पहिल्यांदाच अंतराळ स्थानकात रहायला जाणार असल्यामुळे हा त्यांचा पहिलाच अंतराळ प्रवास असेल अंतराळवीर Chris ह्यांची 2021 मध्ये अंतराळवीर होण्यासाठी निवड झाली आणी 2024 मध्ये 23 व्या Astronauts Class मध्ये त्यांचे Graduation पुर्ण झाले त्यानंतर लगेचच त्यांचे प्राथमिक अंतराळवीर पदाचे ट्रेनिंग सुरू झाले 

Chris न्युयार्कचे रहिवासी आहेत त्यांनी Standford University California येथून BSc Physics, Massachusetts University Cambridge येथून Physics मध्ये PHD आणी Harvard Medical School Boston येथून Medical Physics पुर्ण केले त्यांची अंतराळवीर होण्यासाठी निवड झाली तेव्हा ते  Boston येथील Brigham & Women Hospital मध्ये Physicist & Researcher पदी कार्यरत होते 

गेल्या पंचवीस वर्षांपासून नासाचे अंतराळवीर अंतराळ मोहिमे अंतर्गत स्थानकात वास्तव्य करतात आणि पृथ्वीच्या विकासासाठी मानवी आरोग्यासाठी आणि भविष्यकालीन दूरवरच्या अंतराळ मोहोमेतील अंतराळवीरासाठी उपयुक्त अत्याधुनिक सायंटिफिक संशोधन करत असतात  

अंतराळवीर Chris ह्या मोहिमेविषयी एक ऑक्टोबरला पत्रकारांना माहिती देणार होते पण अमेरिकेत Shut Down घोषित झाल्यामुळे ह्या बाबतीत माहिती मिळु शकली नाही

Sunday, 26 October 2025

भविष्यकालीन मंगळ व चंद्रमोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षित निवासासाठी नासाच्या शास्त्रज्ञांचा सायंटिफिक प्रयोग यशस्वी

 A person holds a sledgehammer while wearing an orange safety vest and standing in an arid landscape while other people look on.

 नासाच्या शास्त्रज्ञाची टीम California येथील Arizona भागात  सायंटिफिक प्रयोग करताना -फोटो -नासा संस्था 

 

नासा संस्था - 26 आक्टोंबर (NASA science news )

नासाच्या भविष्य कालीन चंद्र व मंगळ मोहिमेची तयारी जोरात सुरू आहे नासाचे शास्त्रज्ञ हि मोहीम सुरक्षित व यशस्वी व्हावी ह्या साठी सतत नवनवीन सायंटिफिक प्रयोग करत असतात भविष्य कालीन  दुरवरच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर परग्रहावरील भुमीवर ऊतरुन तेथे काही काळ वास्तव्य करणार आहेत आणी तेथे भविष्य कालिन मानवी निवासासाठी आणी अंतराळवीरांना रहाण्यासाठी पृथ्वी सारख्या पोषक व सुरक्षित जागेचा शोध घेणार आहेत

मागच्या महिन्यात नासाच्या शास्त्रज्ञांच्या टिमने अंतराळवीरांना रहाण्यायोग्य परग्रहावरील सुरक्षित जागा शोधण्यासाठी  एक नाविन्यपूर्ण सायंटिफिक प्रयोग केला आणी तो यशस्वी देखील झाला ह्या टिमने California तील Flagstaff येथील Arizona आणी Tulelake ह्या भागात भुगर्भातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या भुगर्भीय घडामोडींमुळे व त्यातून बाहेर पडुन वहात गेलेल्या लाव्हा मुळे तयार झालेल्या लाव्हा ट्यूब व भुमीगत गुहांच्या शोधासाठी हा सायंटिफिक प्रयोग केला त्या साठी त्यांनी सीटी स्कँन पध्दतीचा ऊपयोग केला

शास्त्रज्ञांच्या टिमने जमिनीवर ठेवलेल्या धातूच्या प्लेटच्या खालच्या भागात सिस्मिक यंत्रणा व रडार यंत्रणेचा वापर केला आणी ह्या धातूच्या प्लेटवर 10 पौंड (4.5k.g) वजनाच्या Sledgehammer च्या सहाय्याने शंभरवेळा प्रहार केला त्यामुळे प्लेटखालील तारांमधुन भुकंपाप्रमाणे कंपने निर्माण झाली आणी हि कंपने भुगर्भातील संरचनेत सर्वत्र पसरली शास्त्रज्ञांनी ह्या भागातील ज्वालामुखीच्या ऊद्रेकामुळे बाहेर पडलेल्या आणी वहात गेलेल्या लाव्हारसामुळे तयार झालेल्या लाव्हाट्युब व तेथील भुमीगत गुहाच्या वरील 420 फुट भागात थोड्या थोड्या अंतराने पुन्हा हातोड्याने प्रहार केला तेव्हा शास्त्रज्ञांना तेथील गुहांच्या ऊपस्थितीचा अंदाज आला 

चंद्र व मंगळावरील भुमीगत लाव्हाट्युब व गुहा पुरातन काळी ज्वालामुखीच्या ऊद्रेकांच्या सक्रीयते मुळे निर्माण झाल्या असाव्यात असे शास्त्रज्ञांचे मत आहे ज्वालामुखीच्या ऊद्रेकामुळे भुकंपप्रवण क्षेत्रात निर्माण झालेल्या ह्या भागातील गुहेभोवतीचे खडक टणक व जाड आहेत त्यामुळे भविष्य कालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर ह्या भागात तेथील अत्युच्य तापमान हानिकारक काँस्मिक किरणोत्सर्ग व ईतर हानिकारक प्रसंग ऊद्भवल्यास स्वतःचे संरक्षण करु शकतात व काही काळ वास्तव करु शकतात

भविष्य कालिन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर तेथे  ऊदभवणाऱ्या आकस्मिक समस्येपासुन स्वतःचा बचाव करण्यासाठी ह्या सायंटिफिक हातोड्यानी केलेल्या प्रहारा प्रमाणे अत्याधुनिक मशीनचा वापर करु शकतात ह्या अत्याधुनिक मशीन मधील कमी वजनाच्या अत्यंत वेगाने खोलवर जाणाऱ्या सिस्मिक व रडार यंत्रणेचा वापर खोलवर व दुरवरच्या भागातील भुमीगत गुहा शोधण्यासाठी ऊपयुक्त ठरेल 

ह्या प्रयोगामुळे भविष्य कालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर भुगर्भातील अशा भागात सुरक्षित निवास करून संशोधन करु शकतात Geophysical research -GEODES Project अंतर्गत शास्त्रज्ञांनी केलेल्या ह्या सायंटिफिक प्रयोगाची हि माहिती प्रसारित करण्यात आली आहे

Friday, 10 October 2025

Blue Origin NS-36 मोहिमेतील सहा नागरिक अंतराळ पर्यटनावरुन परतले

 

 Blue Origin NS-36 मोहिमेतील अंतराळ पर्यटक -फोटो- Blue Origin

Blue Origin - 8 आक्टोंबर

Blue Origin ची अंतराळ पर्यटन मोहीम आता नियमीत सुरु झाली आहे ह्या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे Blue Origin च्या NS -36 अंतराळ पर्यटन मोहिमे अंतर्गत सहा नागरिक आठ आक्टोंबरला अंतराळ पर्यटन करून परतले आहेत आणि हि ह्या वर्षातील आठवी मानवी अंतराळ पर्यटन मोहीम होती 

ह्या अंतराळ पर्यटकामध्ये Jeff Elgin, Danna Karagussova,Dr.Clint Kelly III,Aaron Newman,Vittalli Ostrovsky,Will Lewis ह्यांचा समावेश होता Blue Origin चे हे15वे मानवी पर्यटन होते आतापर्यंत 86 नागरिक ह्या मोहिमे अंतर्गत अंतराळ पर्यटनास जाऊन आले आहेत

ऊद्योजक Jeff  ह्यांची Franchise Industry आहे गेल्या पंचवीस वर्षात त्यांच्या ऊद्योगाचे नेटवर्क संपूर्ण युनायटेड स्टेटस मध्ये पसरले असून त्या द्वारे ते होतकरु ऊद्योजकांना मार्गदर्शन करतात 

गेल्या पंचवीस वर्षांपासून Danna मिडिया वितरण विभागात कार्यरत आहेत त्यांनी पोर्टलची सहस्थापना देखील केली आहे धाडसी कल्पना वास्तवात रुपांतरित करण्याऱ्या कर्तृत्वान Danna ह्यांना गीर्यारोहणाची आवड आहे त्यांनी किलीमांजरो,माऊंट एलब्रस पर्वतावर गीर्यारोहण केले आहे अंतराळ पर्यटन म्हणजे केवळ मनोरंजन नाही तर मानवी विकासाचे परीवर्तनकारी ऐतिहासिक पाऊल आहे असे त्यांचे मत आहे कझाकस्थानातील अंतराळ पर्यटन करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळयात्री होण्याचा मान त्यांनी प्राप्त केला आहे

Clint- Electrical Engineer(PHD) आणि संशोधक आहेत  Computer Science &Robotics ह्या विभागातील सरकार आणी ऊद्योग संशोधन विकास प्रमुख पदावर काम केले Clint ह्यांनी 1984 मध्ये DARPA येथे Autonomous Land Vehicle प्रकल्पाची सुरवात केली त्यामुळे आताच्या ड्रायव्हर लेस कारना चालना मिळाली त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी अवकाश संवेदन संशोधन केले त्यांना वन्यजीव संशोधन व छायाचित्रणाची आवड आहे त्यांनी त्यांच्या पत्नी सोबत अनेक खंडातील मोठ्या मांजरी,ध्रुवीय अस्वल व 21 प्रकारच्या पेंग्विन प्रजाती आणि वन्यजीवांची संशोधीत माहिती गोळा केली त्यांचे पेग्विन विषयी 486 पानाचे संशोधित पुस्तक प्रकाशित झाले आहे त्यांचे हे दुसरे अंतराळ पर्यटन होते ह्या आधी  Blue Origin च्या NS -22 मोहिमेअंतर्गत ते अंतराळ पर्यटनास गेले होते 

Aaron -मालिका उद्योजक व संशोधक आहेत त्यांनी पाच यशस्वी Software Startup ची स्थापना केली ते लेखक आहेत त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असुन सहा पेटंटचे मालकी हक्क त्यांच्याकडे आहेत त्यांनी संशोधनासाठी टायटॅनिक च्या काठावर प्रवास केला त्यांना देखील गिर्यारोहणाची आवड आहे त्यांनी दोनदा एव्हरेस्ट शिखरावर चढण्याचा प्रयत्न केला ते पहिल्या आखाती युद्धातील अनुभवी स्वाभिमानी अमेरिकन सैनिक आहेत त्यांच्या Exploration Deep World संस्थेमार्फत पृथ्वीवरील समुद्रातील खोल पाण्याचे अन्वेषण,संवर्धन आणि वैज्ञानिक संशोधन केल्या जाते 

Vitalli -युक्रेनियन हॉटेल उद्योजक,रियल इस्टेट गुंतवणूकदार ,सिस्टीम अनॅलिस्ट आणि वेब डेव्हलपर आहेत  कामानिमित्त त्यांनी गेल्या दहा वर्षात शंभरहून अधिक देशात वास्तव्य केले असून त्यात आर्क्टिक सर्कल पासून अंटार्क्टिकाचा बर्फ़ाळ भागाचा समावेश आहे 

हे सहाही अंतराळ पर्यटक Blue Origin च्या West Texas येथील उड्डाण स्थळावरून New Shepard अंतराळयानातून सकाळी 9.40 मिनिटांनी अंतराळ पर्यटनास निघाले आणि अवघ्या काही मिनिटात त्यांचे यान अंतराळ आणि पृथ्वीमधील सीमारेषा कर्मन लाईन भेदून अंतराळात पोहोचले अंतराळातील झीरो  ग्रव्हिटित पोहोचताच सर्वांच्या तोंडुन ऊत्स्फुर्त प्रतिक्रिया बाहेर पडल्या सर्वांनी अंतराळातील झीरो ग्ग्रॅव्हिटित तरंगण्याचा आनंद घेतला सर्वांनी एकमेकांना आपण खरेच अंतराळात पोहोचल्याची जाणीव करून दिली 

WOW! WOW ! We are Flying , Its Amazing ! Oh !My God !आपण पृथ्वीच्या वर कर्मन रेषेच्या वर अंतराळात पोहोचलो आहोत  ह्या मोठ्या खिडकीतून चंद्र पहा ! पृथ्वीकडे पहा असे म्हणत अंतराळातील झीरो ग्रँव्हिटित तरंगण्याचा आनंद लुटला आणी हा अदभूत आनंद अनुभवुन हे पर्यटक दहा बारा मिनिटात पृथ्वीवर परतले तेव्हा त्यांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक हजर होते

ह्या सर्व पर्यटकांना Blue Origin कंपनीतर्फे त्यांची कर्तृत्व वैशिष्ट्ये कोरलेला patch आणी ते अंतराळवीर झाल्याचे सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले 

NS-36 Mission Patch

Blue Origin NS-36 च्या अंतराळ पर्यटकांसाठी तयार करण्यात आलेला Patch

Clint ह्यांच्या साठी चंद्र आणी पृथ्वी हे अंतराळप्रवास आणी व्यापाराचे प्रतिक,Danna साठी कझाकस्थानातील पर्वत ह्या विशाल पर्वताची ऊत्तुंगता पाहून Danna ला मानवाच्या छोटेपणाची जाणीव होते Vitalli ह्यांचे चिन्ह युक्रेन मधील तारांकित आकाश त्यांच्या जन्मभुमी व कर्मभूमीची आठवण देणारे Aaron ह्यांंच्या महासागराचे संशोधन आणी संवर्धनासाठीचे प्रतिक चिन्ह Jeff ह्यांचे Mercury Capsule Alan shepard च्या ऊड्डाण आणी Jeff ह्यांंचे अंतराळ ऊड्डाण स्वप्न पुर्तता दर्शवतात 

ह्या यशस्वी अंतराळपर्यटनाने Blue Originचे वरिष्ठ ऊपाध्यक्ष आनंदित झाले ते म्हणतात हे अंतराळयात्री जेव्हा प्रुथ्वी ते अंतराळ प्रवास करून परततात तेव्हा त्यांच्या पृथ्वी कडे पहाण्याच्या द्रुष्टी कोनात बदल होतो पृथ्वी सौंदर्य पाहून त्यांना जागतिक एकात्मकतेची जाणीव होते आणी पृथ्वी संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे 

Monday, 6 October 2025

नासाच्या आर्टिमस II मोहिमेतील अंतराळवीरांनी ORION चंद्रयानासाठी Integrity नाव निश्चित केले


 नासाच्या आर्टिमस मोहिमेतील अंतराळवीर Victor Glover ,Reid Wiseman,Christina Koch आणि कॅनडियन अंतराळवीर Jeremy Hansen -Orion अंतराळयानासोबत फोटो- नासा संस्था 

नासा संस्था- 6 आक्टोंबर

नासाच्या आर्टिमस मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे नुकतीच अंतराळवीरांनी ह्या मोहिमेतील अंतराळप्रवासात त्यांच्या सोबत नेण्यासाठी Zero G Indicater ची निवड केली आहे  लवकरच नासा संस्थेतर्फे त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे (नासा संस्थेतर्फे Zero G बनविण्यासाठी स्पर्धा जाहीर करण्यात आली होती) 

आता आर्टिमस मोहिमेतील अंतराळवीरांनी त्यांच्या Orion चंद्र यानासाठी Integrity नाव निश्चित केले आहे 24 सप्टेंबरला झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि घोषणा केली 

Integrity हे नाव आदर,विश्वास,मानवता व विनम्रतेचे प्रतिक आहे आर्टिमस मोहिमेतील अंतराळयान बनवण्यासाठी जगभरातील सहभागी ईंजीनिअर्स,तंत्रज्ञ,टेक्निशियनस आणी आर्टिमस मोहिमेचे स्वप्न सत्यात ऊतरविण्यासाठी ह्या यानाची निर्मिती करणारे शास्त्रज्ञ त्यांंच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी  अंतराळवीरांनी हे नाव निवडले ह्या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी अथक परीश्रम करणाऱ्या 300,000 हुन अधिक सहभागी कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाला वाव देण्यासाठी आणी भावी पिढीला प्रेरित करण्यासाठी हे नाव निवडण्यात आले 

भविष्य कालीन अंतराळविश्वातील नाविन्यपूर्ण सुवर्ण युगाचा हा शुभारंभ आहे 2026 च्या एप्रिलमध्ये दहा दिवसांच्या आर्टिमस मोहिमेतील अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत पुन्हा एकदा चंद्रावर मानवी पाऊल पडणार आहे हे अंतराळवीर चंद्रावर काही काळ फिरून संशोधन देखील करणार आहेत

नासाच्या आर्टिमस मोहिमेसाठी,अंतराळ विश्वातील भविष्य कालीन दुरवरच्या अंतराळ मोहिमांच्या यशस्वीतेसाठी आणी मंगळ ग्रहावरील भविष्य कालीन मानव निवासासाठी जगभरातील सहभागी देशातील संस्थेतील शास्त्रज्ञांचे योगदान महत्त्व पुर्ण आहे नासा आणी ईसा संस्थेतील Astronaut Agency Office मधील मान्यवरांचा ह्या नाव निश्चितीत सहभाग आहे