
नासाच्या Innovative Technology Concepts स्पर्धेतील 2025 च्या विजेत्यांनी संकल्पित केलेल्या कल्पनेचे चित्रकारांनी साकारलेले कोलाज -फोटो -नासा संस्था
नासा संस्था- 27 जानेवारी
नासा संस्था नेहमीच भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील संशोधनासाठी आणी अंतराळवीरांच्या परग्रहावरील सुरक्षीत वास्तव्यासाठी नवनवीन अभियान राबवते शास्त्रज्ञ आणी सर्जनशील नागरिकांना सहभागी होण्यासाठी स्पर्धा जाहीर करते 2025 च्या अभियाना अंतर्गत NIAC द्वारा जाहीर केलेल्या ह्या वर्षीच्या स्पर्धेतील 15 विजेत्यांची नावे नासाने नुकतीच घोषित केली आहेत अमेरिकेतील सर्व राज्यातील संस्था आणी कंपनीतील सहभागी स्पर्धेकामधुन आलेल्या अद्ययावत नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करणाऱ्या स्पर्धेकांची निवड करण्यात आली आहे
नासा संस्थेच्या N.I.AC (NASA Innovative Advance Concept) ह्या मोहिमे अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येतो नासा संस्था भविष्यकालीन अंतराळ मोहिमेसाठी,अंतराळविश्वातील व्यावसायिक वाढीसाठीआणि एरोस्पेस मोहीम सक्षम करण्यासाठी अशा अवकाश तंत्रज्ञानांतील नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिक मदत करते 2025 च्या ह्या निवडक संशोधकांना नासा संस्थेतर्फे $ 2.628 M चे एकत्रित आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे
Washington येथील नासा संस्थेतील Space Technology विभागाचे Associate Administrator -Glayton Turner म्हणतात,"हे संशोधीत तंत्रज्ञान भविष्यकालीन दूरवरच्या अंतराळ मोहिमेसाठी उपयुक्त ठरेल आजवर मानवाला अज्ञात असलेल्या ब्रह्मांडा विषयी,आपल्या सौरमाले विषयीची माहिती संशोधित करण्यास मदत होईल विशेषतः अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीत संशोधन करताना शिवाय आपल्या पृथ्वी संरक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल " ह्या आधीच्या निवडक संशोधकांच्या ह्या नाविन्यपूर्ण संकल्पना आज सत्यात उतरल्या आहेत परग्रहावरील समुद्रात पोहणारा छोटा रोबोट असो किंवा परग्रहावर भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांना तेथील वास्तव्यासाठी बुरशीपासून घर बांधणी असो त्या आता शक्य झाल्या आहेत !'
ह्या नव्या निवडक संशोधित तंत्रज्ञान अविष्कारामध्ये सूर्याचा सौरमालेवर होणारा प्रभाव शोधण्यासाठी,चंद्रावर भविष्यकालीन अंतराळवीरांच्या वास्तव्यासाठी काचेचे घर बनविण्याची अभिनव कल्पना आणि शनीच्या बर्फ़ाळ चंद्रावरील संशोधनासाठी अद्ययावत यंत्रणेचा वापर करण्याच्या संकल्पनेचा समावेश आहे
Helicity Space LLC Pasadena California येथील RyanWeed ह्यांनी संशोधित केलेल्या संकल्पनेत अंतराळयानाचा समुह कल्पित केला आहे जो Compact & Scalable Fusion Propulsion system चा वापर करून हेलिओस्पियर आणि त्याही पलीकडे जलद आणि बहुदिशेने कार्यरत राहू शकतो आणि सूर्याचा सौरमालेतील ग्रहताऱ्यांशी असलेला प्रभाव संशोधित करू शकतो हि संशोधित माहिती भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी उपयुक्त ठरेल
California येथील Martin Bermudez Skyeports ह्यांनी चंद्रावरील कमी गुरुत्वाकर्षणात भविष्यकालीन मानवी वास्तव्यासाठी चंद्रभूमीवरील काचेचा वापर करून शेलच्या आकाराचे घर बांधण्याची संकल्पना मांडली आहे त्या साठी चंद्रभूमीवरील आणि भूगर्भातील काचेचा समावेश असलेल्या खडक व इतर मिनरल्सचा शोध घेऊन त्यावर तेथेच प्रक्रिया करून काच निर्मिती करण्याची संकल्पना संशोधित केली आहे
Urbana येथील Justin Yim ह्यांनी LEAP नावाचा खोल समुद्रात बुडी मारणारा रोबोट तयार केला आहे जो शनीचा बर्फ़ाळ चंद्र Enceladus येथील गरम पाण्याच्या झऱ्याखाली अस्तित्वात असलेल्या खोलवर समुद्राच्या तळाशी अनेक वेळा बुडी मारून तेथील खडक आणि इतर गोष्टीचे नमुने गोळा करेल आणि पुन्हा वर येऊन तेथील आकाशातील विमानात ठेवेल विमानातील अद्ययावत यंत्रणेच्या साहाय्याने तेथेच त्या संशोधित नमुन्यांच्या सूक्ष्म कणांचे संशोधन करण्यात येईल
ह्या सर्व निवडक संकल्पना सध्या प्राथमिक स्वरूपात आहेत त्यावर नासा संस्थेतील शास्त्रज्ञांच्या टीमच्या सहकार्याने सखोल संशोधन करण्यात येईल त्या नंतर नासा संस्थेतील तज्ञांच्या अंतिम संशोधनानंतर सर्व बाबीची पूर्तता तपासण्यात येईल आणि मान्यता मिळेल
नासा संस्थेच्या ह्या N.I.AC उपक्रमा अंतर्गत अशा बुद्धिमान संशोधकांना आर्थिक साहाय्य केले जाते आणि आवश्यक ती टेक्निकल मदतही दिल्या जाते त्या मुळेच आता स्वप्नवत अशक्य वाटणाऱ्या ह्या संकल्पना संशोधित होतील आणि सत्यात उतरतील ह्या उपक्रमा अंतर्गत संशोधनासाठी दिल्या जाणाऱ्या साहित्यात सेन्सर्स,उपकरणे उत्पादन तंत्र,ऊर्जा प्रणाली व इतर आवश्यक गोष्टींचा समावेश आहे


