Wednesday 28 August 2024

Boeing Star liner अंतराळयान अंतराळवीरांविना पृथ्वीवर परतणार

 A group of NASA leaders sit at a table to conduct a live news conference at NASA Johnson.

नासाच्या Houston येथील Johnson Space Center मध्ये नासाचे Administrator Bill Nelson आणि Boeing  संस्थेतील प्रमुख Boeing Star Liner यानाच्या पृथ्वीवर परतण्यासाठी घेतलेल्या मीटिंग दरम्यान -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 25 ऑगस्ट

नासाचे अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore जून महिन्यात Boeing Star Liner अंतराळयानाच्या Flight Test अंतर्गत एक आठवड्याच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेले होते पण स्थानकात पोहोचल्यानंतर त्यांच्या यानातील थ्रस्टर्स मधून हेलियम लीक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांचे पृथ्वीवर परतणे लांबले आता हे दोन्हीही अंतराळवीर फेब्रुवारी पर्यंत स्थानकात वास्तव्य करणार असून Boeing Star Liner अंतराळयान रिकामेच पृथ्वीवर परतणार आहे नासा आणि Boeing star Liner संस्थेतील प्रमुखांनी शनिवारी घेतलेल्या मिटिंग नंतर अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला आहे सध्या हे दोन्ही अंतराळवीर नासाच्या मोहीम 71-72 च्या अंतराळवीरांसोबत स्थानकात सुरु असलेल्या संशोधनात सहभागी झाले आहेत शिवाय ह्या वास्तव्यादरम्यान Boeing Star Liner यानातील System Testing आणि Data Analysisची माहिती गोळा करीत आहेत 

नासाचे Administrator Bill Nelson म्हणतात,आम्ही अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore ह्यांना सुरक्षिततेला महत्व देत  त्यांना Star liner अंतराळयानातून पृथ्वीवर परत न आणण्याचा निर्णय घेतला आहे अंतराळ प्रवास आता नियमित आणि सुरक्षित झाला असला तरीही नव्या अंतराळ यानातून अंतराळ प्रवास करणे रिस्की असते कारण Test  Flight नियमित नसते आणि सुरक्षितही नसते मी नासा आणि Boeing संस्थेतील टीमचा आभारी आहे त्यांनी उत्तम काम केले आहे सप्टेंबर महिन्यात Star Liner अंतराळयानाला पृथ्वीवर रिकामेच परत आणण्यात येईल

जूनमध्ये जेव्हा हे अंतराळयान स्थानकात पोहोचले तेव्हा Boeing आणि नासा संस्थेतील टीम प्रमुखांना यानातील थ्रस्टर्स मधून लिकेज होत असल्याचे लक्षात आले होते तेव्हा पासूनच टीम मधील इंजिनीअर्स थ्रस्टर्स दुरुस्तीसाठी सतत प्रयत्न करत आहेत आणि अंतराळवीरांच्या पृथ्वीवर परतण्यासाठी आणि यानाच्या दुरुस्तीसाठी वेगवेगळे उपाय शोधत आहेत  अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore दोघेही संस्थेतील टीमच्या नियमित मार्गदर्शनात स्थानकातुन थ्रस्टर्स दुरुस्तीसाठी प्रयत्न करत आहेत 

अशा परिस्थितीत Star liner अंतराळयानातून अंतराळवीरांना पृथ्वीवर आणणे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे त्या मुळे हा निर्णय घेण्यात आला असे नासाच्या Space Flight Operation मोहिमेचे Associate Administrator Ken Bowersox म्हणतात,हा निर्णय घेणे आमच्यासाठी सोपे नव्हते पण आम्ही सखोल चर्चेअंती हा निर्णय घेतला आम्ही नेहमीच अंतराळवीरांच्या सुरक्षिततेला महत्व देतो Boeing Star Linerअंतराळयान अद्ययावत यंत्रणेने युक्त आणि स्वयंचलित आहे त्यामुळे स्थानकातून पृथ्वीवर रिकामे परत आणताना काही समस्या येणार नाही Boeing Star Liner अंतराळ यानाच्या अंतराळ प्रवासा दरम्यान आणि स्थानकात पोहोचल्यावर ह्या दोन्ही अंतराळवीरांनी महत्वपूर्ण माहीती गोळा केली आहे शिवाय ह्या यानाने स्थानकात स्वयंचलित यंत्रणेने Hatching आणि Docking प्रक्रिया यशस्वी केल्या मुळे यानाची कार्यक्षमता समजली आहे आता पृथ्वीवर परतताना देखील अंतराळयान स्वयंचलित यंत्रणेने स्थानकाबाहेर पडेल पृथ्वीवर परतताना अंतराळ प्रवासादरम्यान आम्ही आणखी माहिती मिळवू  या आधी दोनवेळा Star liner अंतराळयान स्थानकात जाऊन आले आहे त्या नंतरच Star Liner अंतराळयान अंतराळवीरांना घेऊन स्थानकात पोहोचले होते पण अचानक थ्रस्टर्स मधून लीकेजची समस्या उद्भवली ह्या Flight test आधी ऐनवेळी उद्भवलेल्या समस्येवर मात करूनच अंतराळयान स्थानकात पोहोचले होते

येत्या काही आठवड्यात दोन्ही संस्थेतील तज्ञ ह्या अंतराळवीरांच्या पृथ्वीवर परतण्यावर चर्चा करतील हे दोन्ही अंतराळवीर Space X Crew Dragon मधून इतर दोन अंतराळवीरांसोबत पृथ्वीवर परततील त्या साठी Dragon मध्ये त्यांच्या बसण्यासाठीच्या सिट्सची आणि स्पेससूटसची व्यवस्था करण्यात येईल

Thursday 22 August 2024

नासाच्या Deep Space Food Challenge स्पर्धेतील अंतिम विजेत्यांची नावे घोषित

 

 नासाच्या Deep Space Food Challenge स्पर्धेतील विजेत्या Interstellar टीममधील France,Texax आणी Florida येथील सहभागी सदस्य -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -20 ऑगस्ट 

भविष्यकालीन दूरवरच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर आणि अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांना पौष्टिक,सकस आणि चविष्ट अन्न निर्मिती करता यावी ह्या साठी आणी पृथ्वीवरील धान्य ऊत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नासा संस्था आणी कॅनडीयन स्पेस एजन्सी (C.SA) ह्यांनी Deep Space Food Challenge स्पर्धा जाहीर केली होती ह्या स्पर्धेत धान्य निर्मितीची नाविन्यपूर्ण पध्दत विकसित करण्याची संधी देण्यात आली होती 

ह्या स्पर्धेत अंतराळवीरांच्या निरोगी आरोग्यासाठी त्यांना जीवनसत्त्वयुक्त सकस आणी पौष्टिक अन्न ऊत्पादन संशोधनाची संधी जाहीर करण्यात आली होती हे अन्न ऊत्पादन कमी साहित्य,कमी पाणी वापरून,कमी जागेत करता येणे आवश्यक होते स्थानकातील झीरो ग्रव्हिटित सगळ्या वस्तू तरंगत असल्याने आणी तीथे पाणी नसल्याने पाणी कमी प्रमाणात वापरणे आवश्यक असते तेथे पाणी देखील थेंबाच्या स्वरूपात तरंगते त्यामुळे तेथे पदार्थ बनवणे अशक्यच ह्या बाबी लक्षात घेऊन ह्या समस्यावर मात करून धान्य ऊत्पादन निर्मितीची नवीन विकसीत पध्दत सादर करणे आवश्यक होते हे संशोधित नवीन धान्य उत्पादनाचे तंत्रज्ञान भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी उपयुक्त ठरणार आहे 

 हि स्पर्धा 2021 मध्ये  जाहीर करण्यात आली होती ह्या स्पर्धेला जगभरातुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला 32 देशातील 300 स्पर्धकांनी ह्यात भाग घेतला आणि त्यांनी नाविन्यपूर्ण अन्न उत्पादन प्रणाली सादर केल्या त्यातुन ह्या  Deep Space Food Challenge साठी आवश्यक असलेल्या सर्व बाबीची पूर्तता करणाऱ्या स्पर्धकांची तीन टप्प्यात निवड करण्यात आली ह्या स्पर्धकांचे विकसित अन्न तत्रंज्ञानाचे निरीक्षण नोंदवून अंतिम टप्प्यात चार विजेत्या अमेरिकन टीमची नावे घोषित करण्यात आली 

2023 मध्ये ह्या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात झाली Methuselah Foundation आणि Ohio State University ह्यांच्या सहकार्याने दोन महिने ह्या निवड झालेल्या विकसित अन्न प्रणालीची चाचणी Ohio University च्या कॅम्पस मधील विद्यार्थ्यांच्या निरीक्षणात करण्यात आली ह्या विद्यार्थ्यांनी ह्या दोन महिन्यांच्या कालावधीत निवड झालेल्या ह्या नाविन्यपूर्ण अन्न तंत्रज्ञानाची संशोधित माहिती गोळा केली ह्या दरम्यान त्यांनी ह्या अन्न प्रणालीची नियमित उत्पादन क्षमता,उत्पादनाचा कालावधी पोषकता आणि टिकाऊपणा ह्याचे निरीक्षण नोंदवले ह्या प्रणालीद्वारे पिकवलेले अन्न व भाजीपाल्याची सकसता,जीवनसत्वयुक्तता,सुरक्षितता आणि स्पर्धेतील इतर बाबींची पुर्तता तपासली त्या नंतर त्यांनी ह्या उत्पादित अन्नाची चव चाखून रुचकरता जाणून घेतली आणि सखोल निरीक्षणाअंती हि संशोधित माहिती जजेसच्या टिमकडे अंतिम निवडीसाठी पाठविली ह्या संशोधनासाठी Ohio Universityला नासा संस्थेतर्फे अर्थसहाय्य देण्यात आले

शेवटचा तिसरा टप्पा पंधरा आणि सोळा ऑगस्टला Ohio University Form Bureau मधील 4-H center ground मध्ये झालेल्या दोन दिवसीय Networking & Learning Summit कार्यक्रमात पार पडला ह्या कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांचे संशोधीत अन्न तंत्रज्ञान आणी ऊत्पादित अन्नाचे प्रदर्शन भरवण्यात आले त्यासाठी ह्या स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना आमंत्रित करण्यात आले तसेच नासा संस्थेतील मान्यवर,ऊद्योजक,अन्नप्रक्रिया ऊद्योगातील मान्यवर व सेलीब्रिटी शेफ देखील ह्या कार्यक्रमा साठी आमंत्रित होते ह्या सर्वांनी ह्या विजेत्या स्पर्धकांशी संवाद साधुन त्यांच्या ऊत्पादित पदार्थांची चव चाखली आणी सुरक्षिततेची पहाणी केली आणी त्या विषयीची माहिती जाणून घेतली  कार्यक्रमात  सेलीब्रिटी शेफ आणी Cookbookचे लेखक Tyler Florence देखील ऊपस्थित होते त्यांनी ह्या अंतीम निवड झालेल्या स्पर्धकांशी संवाद साधला त्यांच्या ऊत्पादित अन्नपदार्थाची माहिती घेऊन चव चाखली त्या नंतर जजेसच्या टिमने अंतीम विजेत्या स्पर्धकांची नावे घोषित केली आणी कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना बक्षीसाची रक्कम देण्यात आली

ह्या स्पर्धेत पहिले बक्षीस अमेरिकेतील Merritt Island Florida मधील Interstellar Lab च्या प्रमुख Barbara Belvisi ह्यांंना मिळाले त्या लघु ऊद्योजक आहेत त्यांच्या अनेक पर्यावरण पुरक ग्रीन हाऊसच्या शाखा आहेत त्यात त्या आरोग्यदायी पर्यावरण पुरक फळभाज्या व पोषक अन्न निर्मिती करतात त्यांच्या संशोधीत विकसित अन्न तत्रंज्ञान प्रणाली मध्ये सुक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेल्या ताज्या हिरव्या भाज्या,मायक्रो ग्रीन,मायक्रो न्युट्रिअंट रोपवाढीसाठीच्या खत निर्मितीसाठी आवश्यक किटक निर्मितीच्या अन्न ऊत्पादन यंत्रणेचा समावेश आहे त्यांना नासा संस्थेतर्फे 750,000 $ चे बक्षीस देण्यात आले

Nolux of Riverside आणी SATED ह्या  दोन ऊपविजेत्यांना 250,000 $चे बक्षीस देण्यात आले Nolux टिमने Robert Jinkerson च्या नेतृत्वात कृत्रीम Photosynthesis System तयार केली ह्या कृत्रिम प्रकाश सिस्टीम यंत्रणेद्वारे  वनस्पती विपरीत परिस्थितीत सुर्यप्रकाशाच्या अभावात आवश्यक अन्न निर्मिती करू शकतात 

SATED संस्था Jim Sears ह्यांची स्वतःची आहे त्यांनी सुरक्षित,जिवनसत्वयुक्त पोषक अन्न तयार केले आहे त्यांनी अनेक प्रकारचे Customizable अन्नपदार्थ निर्मित केले आहेत त्यात Peach Cobbler,Pizza चा समावेश आहे त्यांनी तयार केलेले अन्नपदार्थ अग्नीरोधक आणी दिर्घकाळ टिकणारे आहेत ह्या संस्थेला Cookbook चे लेखक Tyler Florence ह्यांनी वैयक्तिक बक्षीस दिले

याशिवाय नासा संस्थेने सौर ऊर्जेवर तयार केलेल्या अन्नपदार्थ बनवणाऱ्या International टिमला बक्षीस दिले आहे Finland मधील Lappaeenranta ह्या संस्थेतील टिमने Gas Fermentation System वापरून Single Cell Protein निर्मिती केली आहे 

ह्या सर्व विजेत्याचे नासा संस्थेतील मान्यवरांनी अभिनंदन केले ह्या Deep Space Food स्पर्धेच्या आयोजक आणि नासाच्या Marshall Space Flight Center च्या मॅनेजर Angela Herbelt म्हणतात,नासाने कॅनडीयन स्पेस एजन्सी सोबत प्रथमच अशी स्पर्धा आयोजित केली त्यामुळे जगभरातील सर्जक वृत्तीचे नागरिक एकत्र आले त्यांना  कल्पकतेने नाविन्यपूर्ण विकसित अन्न तत्रंज्ञान सादर करण्याची प्रेरणा मिळाली ह्याचा ऊपयोग भविष्यकालीन अंतराळवीरांना त्यांच्या परग्रहावरील वास्तव्यात होईल तसेच जगभरातील दुर्गम भागात जिथे सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पुरेसे जिवनसत्वयुक्त अन्न मिळत नाही त्यामुळे त्यांना रोगाशी सामना करावा लागतो अशा लोकांना देखील होईल हे स्पर्धेक आमच्या मोहिमेत सहभागी होऊन आम्हाला अंतराळविश्वातील संशोधनास मदत करत आहेत त्यामुळे आम्ही देखील प्रेरित झालो आहोत

Saturday 17 August 2024

अंतराळवीर Sunita Williams आणी Tracy Dyson ह्यांनी Womens Engineers Society सोबत साधला लाईव्ह संवाद

 


नासाची अंतराळवीर Sunita Williams आणी Tracy Dyson स्थानकातून लाईव्ह संवाद साधताना-फोटो नासा संस्था

नासा संस्था - 17 ऑगस्ट

नासाच्या Huston Space Station येथून मागच्या आठवड्यात Women's Engineer Society च्या अध्यक्ष Karen Roth ह्यांंनी अंतराळवीर Sunita Williams आणी Tracy Dyson ह्यांच्याशी लाईव्ह संवाद साधला त्या वेळी सोसायटीतील ईतर मान्यवर व नासा संस्थेतील प्रमुख मान्यवर ऊपस्थित होते सुरवातीला अंतराळवीरांचे आभार मानुन संवादाला सुरुवात झाली

Hello! कसे आहात आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत काही प्रश्न सोशल मिडिया वरून आले आहेत तुम्ही दोघी कसे आहात ? सुनिता तुझ्या 26 वर्षांच्या कारकीर्दित तुला अंतराळ विश्वात  काय बदल जाणवतात कोणता नवा बदल तुला आवडला?

-अंतराळवीर सुनिता आणी ट्रेसी 

Thank You ! आम्ही ठिक आहोत !  हा प्रश्न आमच्यासाठी खूप छान आहे माझी आणि ट्रेसीचे अंतराळ करीअर सोबतच सुरु झाली आम्ही दोघींनी एकत्रच Interview दिला थोड्याफार फरकाने आमच सिलेक्शनही झाल ट्रेनींगमध्ये आम्ही सोबतच होतो ईंजीनिअरिंग मध्ये सुरवातीला पुरुषांच वर्चस्व होत पण मी ठरवल होत कि,आपण आपला job करायचा आणी आपल काम चांगले करण्याचा प्रयत्न करायचा ह्या पंचवीस वर्षात अंतराळविश्वात खूप चांगले बदल झाले आधी अंतराळ स्थानकातील वास्तव्यात खूप कमी महिलांचा स्पेसवॉक मध्ये सहभाग असायचा आता त्या सहजतेने Spacewalk करतात अंतराळवीरांच्या ट्रेनिंगमध्ये स्पेसवॉकही शिकवल्या जातो त्या मुळे स्पेससुट वजनदार आणी मोठ्या साईजचा असला तरीही आम्ही तो घालून सहजतेने स्पेसवॉक करु शकतो आणी हा मोठा महत्त्वपुर्ण बदल आहे शिवाय भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळयानाची रचना नाविन्यपूर्ण करताना त्यातून कमी ऊंचीचे अंतराळवीर प्रवास करू शकतील त्यांनाही स्पेसवॉक,मुनवॉक करता येईल असा बनविण्याचा प्रयत्न सुरु आहे हे बदल निश्चितच स्वागतार्ह आहेत

- ट्रेसी तुझ काय मत आहे तुझ्या पहिल्या अंतराळ मोहिमेतील ट्रेनिंगमधला आणि अंतराळ स्थानकात जास्ती दिवस वास्तव्य करतानाचा अनुभव कसा आहे ?

सुनीता म्हणाली तसेच स्पेसवॉक बद्दलचे माझेही मत आहे तो असा एरिया आहे जीथे काम करायला मला देखील आवडत मला अंतराळवीर Doug Whee lock  सोबत अचानक स्पेसवॉक साठी बाहेर पडाव लागल होत तेव्हा मला कळाल कि,स्पेसवॉकची  तयारी आधीपासूनच करावी लागते  स्पेसवॉक करताना अचानक समस्या आली त्यावर त्वरित मात करून समस्या सोडवावी लागते Aircraft उड्डाणाच्या वेळी Navy Aviation Training मध्ये जस अननुभवी वैमानिकाला एकट्याने विमान उड्डाण शिकवल जात तसच इथे अंतराळात स्पेसवॉक करतानाचा अनुभव असतो ऐनवेळी आलेल्या समस्यांना सामोरे जाताना आपल कौशल्य कामी येत सगळ्याच अंतराळवीरांना प्रत्यक्ष स्थानकाबाहेर जाऊन स्पेसवॉक करण्याचा अनुभव नसतो पण नंतर हळूहळू ते शिकतात मला माझा Space Flight आणि Aircraft Trainingचा अनुभव कामी आला 

-तुम्हा दोघींचं प्रेरणास्थान कोण आहे तुम्हाला अंतराळवीर होण्यासाठी कोणी प्रेरित केल ?

सुनीता -प्रायमरी टीचर,माझे आता पर्यंतचे मित्र पण खरी प्रेरणा देणारे माझे आईवडील आहेत आम्ही दोघी खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आमचे रोल मॉडेल सारखेच आहेत माझे वडील भारतातून इथे आले आणि करिअरमध्ये बिझी झाले त्यांचं द्येय साध्य करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले ते एक प्रथितयश डॉ आणी Neuro Scientist आहेत माझी आई पण Athleticआहे मी जर तिला मला एखादी गोष्ठ जमत नाही अस सांगितल तर ती म्हणायची का जमणार नाही तू आधी प्रयत्न तर कर त्याची कारण शोध तुला नक्की जमेल माझ्या वडीलांनी त्यांचं द्येय साध्य केल त्यांच्या कडून मला प्रेरणा मिळाली मी आतापर्यंत तेच केलय आणि यशस्वी झालेय त्यांच्या कडून  जिद्द आणि चिकाटीने यश मिळवायला शिकले

ट्रेसी -माझही तसच आहे माझी आई पण असच म्हणायची तुला नक्की जमेल तु आधी करून तर पहा आता नाही तर कधीच नाही तू प्रयत्न तर कर माझ्या वडीलांनी  Mechanical Work ,Electrical Car Work करताना Construction Work करताना शिकवलेल टेक्निक मला प्रेरणादायी ठरल मी आणि सुनीता कॉलेज फ्रेंड आहोत Athletes आहोत सुनी Marathon दौड मध्ये भाग घ्यायची ती बुटही न घालता रनिंग करायची तेव्हा तिथे तीची आई हजर असायची आणी माझ्यासाठी वडील मी रनिंगची practice करायची तेव्हा माझे वडील माझ्या मागे Car drive करत यायचे आणी मी जेव्हा Long Bike ride साठी जायचे तेव्हा माझी आई हायवेवर मला भेटायला यायची अशा अनेक गोष्टी आहेत जिथे आम्हाला आमच्या आईवडीलांनी सपोर्ट केलय साथ दिलीय त्यांनी आम्हाला प्रेम दिल आणी ध्येय साध्य करण्याचा आत्मविश्वास दिलाय 

-तुम्ही ईंजीनिअरिंगमध्ये शिकलेल ज्ञान तिथे उपयोगी पडत का ?विषेशतः स्थानकात संशोधन करताना,अद्ययावत यंत्रणा हाताळताना ? हा प्रश्न सोशल मीडियावरुन अनेकांनी विचारलाय

सुनीता -इथे अद्ययावत यंत्रणा असल्याने संशोधन करताना त्याचा फारसा ऊपयोग होत नसला तरीही ईथे कॉलेजमध्ये शिकताना आलेल्या काही समस्या आम्ही कशा सोडवल्या ते आठवतो आमच्या प्रोफेसरांची कठीण प्रश्न सोडवण्याची पध्दत ईथे कामी येते 

ट्रेसी- मला रिसर्च करतानाची आठवण झाली व्हॅक्युम चेंबरमध्ये अद्ययावत यंत्रणा आणि लेसर प्रणाली असलेल्या   लॅबमध्ये अत्यंत महत्वपूर्ण संशोधन करताना अडचण आली मला काही केल्या जमेना तेव्हा मी माझ्या वडिलांना फोनवर सांगितल तेव्हा त्यांनी V चा आकार सांंगीतला मी खूप प्रयत्न केले तेव्हा मला  त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजला त्यांना प्रयत्न कर मग जमेलच असं म्हणायच होत मी प्रयत्न केला आणि ते काम सहजतेने जमल ईथे एखादे अद्ययावत ऊपकरण हाताळताना यंत्रणेत समस्या ऊद्भवल्यास मला वडिलांनी शिकवलेल्या टेक्निकचा ऊपयोग होतो ईथल स्थानकातल वातावरण आणी पृथ्वीवरच वातावरण वेगळ आहे ईथे काही समस्या आली तर बुद्धीचा वापर करून आपल्यालाच त्याच निराकरण कराव लागत नासा संस्थेतील प्रमुख मार्गदर्शन करतात पण काम आम्हालाच कराव लागत त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षण आणी अनुभव ह्यात फरक असतो 

 सुनिता- मला नेहमी विचारल जात स्थानकातील वातावरण विपरीत असताना तिथे ईतक्या समस्या असताना तुला तिथे जायला का आवडत आमच्या दोघींची हि तिसरी अंतराळवारी आहे मी स्थानकात प्रवेश केला तेव्हा तिथे स्वागताला ट्रेसी हजर होती मला खूप आनंद झाला तिला भेटल्याचा ईथल्या झीरो ग्रॅग्व्हिटित एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तरंगत जाता येत वर खाली ऊलट सुलट तरंगण्याचा आनंद नव्याने अनुभवताना मजा येते स्थानकाच्या बाहेर अंतराळात स्पेसवॉक साठी जाता येत हे सार पृथ्वीवर करता येत नाही स्थानकाच्या खिडकीतून खाली पृथ्वीकडे पहाताना नवा आनंद मिळतो नवा दृष्टीकोन मिळतो पहिल्यांंदा स्थानकात प्रवेश केला तेव्हा सुरुवातीला सार कठीण गेल होत पाण्याची समस्या,खाण्याची समस्या जाणवायची विशेषतः जेव्हा स्थानक समुद्राच्या वरुन जाताना आणी पृथ्वीवर ढगाळलेल वातावरणात पाऊस पडण्याची शक्यता असताना वाटायच आता आपण पृथ्वीवर असतो तर बाहेर पडून पावसात भीजलो असतो ईथे पाऊस पडत नाही केस धुण्यासाठी शॉवर  नसतो खूप कमी पाण्यात सार करताना पाण्याच्या थेंबाच महत्त्व कळत पृथ्वीवरच्या वातावरणातील पाणी,वायू,जमीनीच महत्त्व कळत आणी ते वाचवण्यासाठी पर्यावरण रक्षणाची आवश्यकता प्रकर्षांने जाणवते 

ट्रेसी - ईथल्या झीरो ग्रव्हिटित वास्तव्य करताना ऊलट,सुलट होताना आपले विचार पण बदलतात आम्ही क्लिन होतो,फ्रेश होतो ईथे पहिल्यांंदा आल्यावर सुनिता म्हणाली तस पाण्याची समस्या जाणवली खाण्याची समस्या जाणवली तेव्हा वाटल होत आपण येताना थोडे जास्तीचे चॉकलेटस आणायला हवे होते ईथुन खाली पहाताना पृथ्वीच महत्त्व कळत सृष्ठिच महत्त्व कळत ईथे तिची ऊणीव जाणवते पृथ्वीवर जीवन आहे त्याच रक्षण करण आवश्यक आहे त्या साठी आपापसात न भांडता एकत्रितपणे प्रयत्न करयला हव ईथे स्थानकात काही समस्या ऊद्भभवली तर आम्ही सर्वजण एकत्र येऊन ती सोडवतो पृथ्वीवरुन नासा संस्थेतील टिम आम्हाला मार्गदर्शन करते तसच पृथ्वी संरक्षणासाठी एकत्र यायला हव

Friday 2 August 2024

Blue Origin NS-26 मोहिमे अंतर्गत सहा नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवणार

 

 Blue Origin च्या NS- 26 अंतराळ पर्यटन मोहिमेतील अंतराळ प्रवासी -फोटो -Blue Origin 

Blue Origin- 2 ऑगस्ट

अमेरिकेने अंतराळ विश्वात खाजगी कंपन्यांंना अंतराळ पर्यटनाची परवानगी दिल्यानंतर Blue Originने New Shepherd अंतराळयानातुन सामान्य नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवले आहे आता NS-26 अंतराळ पर्यटन मोहिमे अंतर्गत सहा नागरिक अंतराळ पर्यटनास जाणार असुन त्यांची नावे Blue Origin कंपनीने मागच्या आठवड्यात जाहीर केली आहेत 

ह्या मोहिमेत Nicolina Elrick,Rob Ferl,Eugene Grin,Dr.Eiman Jahangir,Karsen kitchen आणी Ephraim Robin हे सहा नागरिक सहभागी होणार आहेत Karsen सगळ्यात लहान असुन ह्या मोहिमे नंतर ती अंतराळ पर्यटन करणारी सगळ्यात कमी वयाची तरुणी ठरेल

Rob Ferl हे Research scientist आहेत आणी ते नासा संस्थेतर्फे कमर्शियल अंतराळवीर म्हणून ह्या म़ोहिमेत सहभागी होणार आहेत ह्या अंतराळ प्रवासा दरम्यान ते सायंटिफिक प्रयोग करणार आहेत मायक्रो ग्रव्हिटित झाडाच्या रोपावर काय परिणाम होतो ते ह्या परिस्थितीला कसे सामोरे जातात विषेशतः त्यांच्या जिन्समध्ये काय बदल होतात ह्याचे निरीक्षण ते नोंदवणार आहेत 

नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मधून त्यांना Arabidopsis Thaliana ह्या झाडाचे रोप देण्यात येणार असून हे रोप Ferl  KFT Fixation tube मध्ये ठेऊन सोबत नेणार आहेत आणी प्रवासा दरम्यान ह्या रोपाच्या जिन्समधील बदलांचे निरीक्षण नोंदवणार आहेत त्याचवेळी पृथ्वीवर नासा संस्थेतील शास्त्रज्ञ Anna Lisa ह्या देखील ह्या संशोधनात सहभागी होणार आहेत त्या अंतराळ प्रवासा दरम्यान Ferl ह्यांच्या Activities वर नजर ठेवतील आणी KFT वर नियंत्रण ठेऊन चार वेळा रोपाला सक्रीय करतील आणी पृथ्वीवरील वातावरणात व अंतराळातील मायक्रो ग्रॅव्हीटीत  ह्या रोपातील होणारे बदल टिपतील पृथ्वीवर परतल्यानंतर नासाचे शास्त्रज्ञ ह्या बदलांचे निरीक्षण नोंदवुन त्यावर सखोल संशोधन करतील

New Shepherd अंतराळयानाने आजवर सातवेळा सामान्य नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवले असुन आता आठव्यांदा ह्या सहा नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवणार आहे हे सर्व अंतराळ प्रवासी पृथ्वीच्या वर 62 मैल  अंतरावरील  पृथ्वी आणि अंतराळातील karman रेषा पार करून अंतराळातील मायक्रो ग्रॅव्हीटीत प्रवेश करतील आणि वजनरहित अवस्थेचा आनंद घेतील त्या नंतर काही मिनिटातच हे अंतराळ प्रवासी पृथ्वीवर परततील 

आजवर 37 नागरिकांनी Blue Origin च्या New Shepard अंतराळयानातून अंतराळ प्रवासाचा आणि अंतराळ  पर्यटनाचा आनंद घेतला आहे New Shepard अंतराळ यानाची हि 26 वी अंतराळ मोहीम आहे ह्या नागरिकांच्या अंतराळ ऊड्डाणाची निश्चित तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे