नासाचे Ingenuity Mars Helicopter मंगळावरील 114 व्या दिवशी 15 जून 2021ला मंगळभूमीवर - फोटो नासा संस्था
नासा संस्था-14 एप्रिल
दोन वर्षांपूर्वी Perseverance यानासोबत मंगळावर गेलेल्या Ingenuity हेलिकॉप्टरने मंगळभुमीवरील आकाशात पन्नासावी यशस्वी भरारी मारली असून परग्रहावर जाणारे आणी तेथील आकाशात पन्नासवेळा यशस्वी ऊड्डाण करणारे पहिले हेलिकॉप्टर अशी विक्रमी ऐतिहासिक नोंद केली आहे विशेष म्हणजे ह्या हेलिकॉप्टरच्या मंगळावरील पहिल्या ऊड्डाणाला येत्या 19 एप्रिलला दोन वर्षे पुर्ण होतील त्या आधीच ह्या हेलिकॉप्टरने अर्धशतकी ऊड्डाण करून विक्रम प्रस्थापित केला आहे
13 एप्रिलला Ingenuity हेलिकॉप्टरने मंगळभूमीवरील Belva Crater ह्या भागात 59 फुट(18 मिटर) ऊंचीवरून ऊड्डाण केले आणि 145.7 सेकंदात मंगळावरील 1,057.09 फुट (322.2 मीटर) म्हणजेच जवळपास अर्धा मैल अंतर पार करून सूरक्षीतपणे खाली ऊतरले आता नासाची टीम Ingenuity हेलिकॉप्टरचे 51चे उड्डाण करण्याची तयारी करीत आहेत मंगळावरील Jezero Crater ह्या भागातील Fall river poss ह्या भागातील शोध घेण्यासाठी Ingenuity तेथील आकाशात 51वी भरारी मारणार आहे
Ingenuity हेलिकॉप्टर फेब्रुवारी 2021 मध्ये Perseverance मंगळयानासोबत मंगळावर पोहोचले होते दोन वर्षांपासून Perseverance यान मंगळावरील पुरातन सजीव सृष्ठीच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरावे शोधण्याचे काम करत आहे मंगळावरील पुरातन काळी अस्तित्वात असलेले पण कालांतराने नष्ठ झालेले पाण्याचे स्रोत,मंगळ भुमीवरील आणी भुगर्भाखालील खडक,मिनरलस्,सजीवांचे अवशेष शोधण्याचे काम Perseverance यान करत आहे नुकतेच Perseverance यानाने तेथील जमिनीचे ऊत्खनन करून संशोधीत केलेले नमुने नमुन्यांंच्या कुपीत भरण्याचे काम यशस्वीपणे पार पाडले आहे ह्या यानाला मंगळावरील सजीवांच्या अस्तित्वाला दुजोरा देणारी आणि पाण्याचे श्रोत असणारी ठिकाणे शोधून देण्याचे काम हे हेलिकॉप्टर करत आहे शीवाय भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी आणी मानवी निवासासाठी पोषक वातावरण असलेला भाग शोधण्याचे कामही हे हेलिकॉप्टर करत आहे
नासाच्या Perseverance टिममधील शास्त्रज्ञांनी Ingenuity हेलिकॉप्टरचे डिझाईन ह्या कामासाठी केले तेव्हा त्यांना Ingenuity हेलिकॉप्टर कडून मंगळावरील आकाशात पाचवेळा उड्डाणाची अपेक्षा होती पण Ingenuity हेलिकॉप्टरने शास्त्रज्ञांच्या अपेक्षेपेक्षा दहापट जास्तवेळा उड्डाण करून त्यांना आश्चर्यचकीत केले आहे नासाच्या वॉशिंग्टन येथील संस्थेचे Planetary Science चे डायरेक्टर Lory Glaze म्हणतात,"1903 मध्ये राईट बंधूंनी पहिल्या प्रयत्नानंतर विमान ऊड्डाण सुरु ठेवले आणी यश मिळवले तसेच Ingenuity च्या पहिल्या ऊड्डाणा नंतर न थांबता आम्ही सतत ऊड्डाण सुरू ठेवले दरवेळी हे हेलिकॉप्टर नव्याने आकाशात ऊड्डाण करते आणी मंगळावरील नवीन भाग शोधून तेथील संशोधीत माहिती गोळा करण्यात यशस्वी होते तेथील फोटो पाहून आम्ही आश्चर्यचकीत होतो त्यामुळे आमच्या दृष्टिकोनात बदल होतो नवनवीन भुभाग शोधण्याची आमची जिज्ञासा वाढते Ingenuity च्या मंगळावरील पहिल्या उड्डाणाने आम्ही आनंदी झालो होतो पण आता Ingenuity ने उड्डाणाचे अर्धशतक गाठले आहे
Ingenuity ने संशोधीत केलेल्या ह्या माहितीचा ऊपयोग भविष्यकालीन मंगळमोहिमेसाठी तर होईलच शीवाय तेथील आकाशात ऊड्डाण करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या Mars Helicopter साठी होईल Ingenuity ची टिम ह्या हेलिकॉप्टरच्या ऊड्डाण क्षमतेचे संशोधन करून भविष्यकालीन मंगळमोहिमेसाठी Helicopter बनवताना त्यात काय त्रुटी आहेत काय बदल आवश्यक आहेत ह्याचा विचार करत आहेत सध्या Perseverance यानाने गोळा केलेले संशोधीत नमुने आणी ईतर माहिती आणण्यासाठी मंगळावर दोन Sample recovery Helicopters पाठवण्यात येणार असून त्याच्या डिझाईनसाठी हि संशोधीत माहिती वापरण्यात येत आहे
मंगळावरील Jezero Crater ह्या भागातील आकाशात Ingenuity हेलिकॉप्टरने अकरावेळा यशस्वी भरारी मारली आहे मंगळावरील कडाक्याच्या थंडीत तेथे सुर्यप्रकाश कमी असतो आणी मंगळावरील धुळीच्या वादळात हेलिकॉप्टरच्या पंख्यावर धुळ जमते तेव्हा सौर ऊर्जेच्या कमतरतेमुळे ऊड्डाण करणे कठीण असते आणी Perseverance यानाला हेलिकॉप्टरचे ठिकाण शोधणेही अशा वेळी कठीण जाते पण सकाळी सुर्यप्रकाशात पंख्यावरील धुळ ऊडुन जाते आणी Ingenuityपुन्हा नव्या जोमाने ऊड्डाण करण्यासाठी सज्ज होते
आता Ingenuity मंगळावरील Martian Kansas ह्या भागात आहे ह्या भागात पुरातन पाण्याचे आटलेले स्त्रोत,नदीपात्र त्या भोवती वाळूचे ढिगारे आणी नदीच्या पाण्याच्या आटलेल्या लहरींच्या खुणा सापडल्या आहेत तो भाग डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांनी वेढलेला आहे हा भाग भविष्यकालीन मंगळमोहिमेसाठी ऊपयुक्त आहे ह्या मोहिमेतील अंतराळवीर आणी मानवी निवासासाठी योग्य आहे Ingenuity हेलिकॉप्टर मध्ये नवीन Software fix केल्यामुळे त्या भागातील सुक्ष्म निरीक्षण नोंदवण्यास मदत होईल आणी सुरक्षित ऊड्डाणासाठीही
नासाच्या J.PL संस्थेचे Ingenuity Operation Lead - Josh Anderson म्हणतात," Perseverance यान आणी नासा संस्था ह्यांच्यात संपर्क साधण्यास Ingenuity मदत करते पण हेलिकॉप्टर ह्या भागात ऊड्डाण करताना टेकडीमागे किंवा दुरवर जाऊन दिसेनासे झाले तर हा संपर्क तुटु शकतो म्हणून टिमला सतत सर्तक रहावे लागते ह्या आधीही Ingenuityने अशा अनेक आव्हानात्मक परिस्थितीवर मात करीत यशस्वी उड्डाण केले आहे येत्या काही दिवसात देखील ह्या समस्या पार करून Ingenuity हेलिकॉप्टर आणखी वेगाने उड्डाण करेल आणी त्यात बसविलेल्या नवीन सॉफ्टवेअर मुळे तेथील भागात उड्डाण करताना अडचण येणार नाही Ingenuity हेलिकॉप्टर त्यातील अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या साहाय्याने आम्हाला लवकरच Belva Crater ह्या भागातील सुंदर मनोरम दृश्यांचे फोटो पाठवेल Ingenuity हेलिकॉप्टरची कार्यक्षमता Perseverance यानाच्या सौर उर्जेवर अवलंबून असते आणि Perseverance यान दररोज शेकडो मीटर प्रवास करतो त्यामुळे Ingenuity हेलिकॉप्टर आणखी किती दिवस तेथे कार्यरत राहील हे नक्की सांगता येत नाही कदाचित काही महिने किंवा काही वर्षेही! आम्ही प्रत्येक उड्डाण बोनस समजतो शेवटी चांगल्या गोष्टीलाही शेवट असतोच "असे नासा संस्थेतील Ingenuity टीमचे प्रमुख म्हणतात