Friday 30 September 2022

तीन रशियन अंतराळवीर स्थानकातून पृथ्वीवर परतले

 The Soyuz MS-21 crew ship with three cosmonauts aboard is seen parachuting to a landing in Kazakhstan less than three-and-a-half hours after undocking from the space station. Credit: NASA TV

 रशियन अंतराळवीर पृथ्वीवर पोहोचल्यानंतर कझाकस्थानात पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरताना -फोटो नासा संस्था

नासा संस्था -29 सप्टेंबर

नासाच्या अंतराळ मोहीम 67चे रशियन अंतराळवीर Oleg Artemyev अंतराळवीर Denis Matveev आणि अंतराळवीर Sergey Korsakov अंतराळ स्थानकातील सहा महिन्यांचे वास्तव्य संपवून 29 सप्टेंबरला गुरुवारी पृथ्वीवर सुखरूप पोहोचले आहेत 

सोयूझ MS-21 हे अंतराळयान ह्या तीनही अंतराळवीरांना घेऊन 3.34a.m.ला स्थानकातून पृथ्वीच्या दिशेने निघाले आणि 6.57a.m.(EDT)ला कझाकस्थानातील Dzhezkazgan येथे पृथ्वीवर पोहोचले निघण्याआधी स्थानकात  ह्या तिन्ही अंतराळवीरांचा Farewell Ceremony आणि Change of Command Ceremony पार पडला सध्याचे स्थानकाचे कमांडर Oleg Artemyev ह्यांनी स्थानकाची सूत्रे अंतराळवीर Samantha Cristoforetti ह्यांच्या हाती सोपिवली 

 ESA (European Space Agency) astronaut Samantha Cristoforetti assumed command of the space station on Wednesday from Roscosmos cosmonaut Oleg Artemyev.

 अंतराळवीर Samantha Cristoforetti कमांडर पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अंतराळवीर Oleg Artemyev ह्यांच्या सोबत -फोटो नासा संस्था

स्थानकातील 195 दिवसांच्या वास्तव्यात ह्या तीनही अंतराळवीरांनी पृथ्वीभोवती 3,120 वेळा फेऱ्या मारल्या आणि त्या दरम्यान 78 मिलियन मैलाचा अंतराळ प्रवास केला ह्या तिघांनी तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभाग नोंदवला 

अंतराळवीर Artemyev तिसऱ्यांदा अंतराळस्थानकात राहायला गेले होते त्यांनी स्थानकात 561दिवस वास्तव्य केले त्यांच्या आजवरच्या अंतराळ कारकिर्दीत  अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी त्यांनी पाच वेळा स्पेसवॉक केला त्या दरम्यान त्यांनी अंतराळात 33 तास 12 मिनिटे व्यतीत केले 

अंतराळवीर Denis Matveev पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेले होते त्यांनी त्यांच्या ह्या पहिल्या 195 दिवसांच्या वास्तव्यात चारवेळा स्थानकाच्या कामासाठी स्पेसवॉक केला आणि त्या दरम्यान त्यांनी अंतराळात 26 तास 7मिनिटे व्यतीत केले अंतराळवीर Sergey Korsakov हे देखील पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेले होते त्यांनी स्थानकात 195 दिवस राहून तेथील संशोधनात सहभाग नोंदवला 

पृथ्वीवर परतल्यानंतर ह्या तीनही अंतराळवीरांना रशियाच्या हेलिकॉप्टर मधून कझाकस्थानातील Recovery Staging City Karaganda येथे नेण्यात आले तेथे आवश्यक मेडिकल चेकअप नंतर त्यांना Gagarin Cosmonaut ट्रेनिंग सेंटर मध्ये नेण्यात आले तेथून त्यांना रशियन विमानाने Star City येथे पोहोचविण्यात येईल

Monday 19 September 2022

नासाचे तीन अंतराळवीर सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार

                              At the Baikonur Cosmodrome in Kazakhstan, NASA astronaut Frank Rubio performs preflight checkouts in the Soyuz MS-22 spacecraft.

                         नासाचे अंतराळवीर Frank Rubio Preflight ट्रेनींग दरम्यान -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -17 सप्टेंबर 

नासाचे अंतराळवीर Frank Rubio रशियन अंतराळवीर Sergey Prokopyev आणि Dimitri Petelin हे सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी 21सप्टेंबरला स्थानकात जाणार आहेत 

हे तिनही अंतराळवीर कझाकस्थानातील बैकोनूर येथील उड्डाण स्थळावरून सकाळी 9.54a.m.वाजता (6.54p.m.स्थानिक वेळ ) सोयूझ M.S.-22 ह्या अंतराळ यानातून स्थानकात जाण्यासाठी अंतराळात उड्डाण करतील आणि तीन तासांच्या अंतराळ प्रवासानंतर1.11p.m.स्थानकाजवळ पोहोचतील स्थानकाच्या Rassvet Module जवळ पोहोचल्यानंतर दोन तासांनी सोयूझ अंतराळयान आणि स्थानक ह्यांच्यातील Docking आणि Hatching प्रक्रिया पार पडेल त्या नंतर हे तिन्ही अंतराळवीर स्थानकात प्रवेश करतील सध्या स्थानकात राहात असलेले अंतराळवीर ह्या तिघांचे स्थानकात स्वागत करतील 

सध्या नासाच्या अंतराळ मोहीम 67चे रशियन अंतराळवीर व स्थानकाचे कमांडर Oleg Artemyev अंतराळवीर Denis Matveev अंतराळवीर Sergey Korsakov  अमेरिकन अंतराळवीर Bob Hines अंतराळवीर Kjell Lindgren अंतराळवीर Jessica Watkins आणि युरोपियन अंतराळवीर Samantha Cristiforetti हे अंतराळ स्थानकात वास्तव्य करत आहेत आणि तेथील लॅबमध्ये सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभागी होऊन संशोधन करत आहेत 

हे तिनही अंतराळवीर स्थानकात सहा महिने वास्तव्य करतील व तेथील संशोधनात सहभागी होतील अंतराळवीर Sergey Prokopyev हे दुसऱ्यांदा अंतराळस्थानकात राहायला जाणार आहेत त्यांची हि दुसरी अंतराळवारी आहे अंतराळवीर Dimitri Petelin मात्र पहिल्यांदाच स्थानकात राहायला जाणार असून त्यांचा हा पहिलाच अंतराळ प्रवास आहे 

ह्या अंतराळवीरांच्या Launching ,Docking ,Hatching आणि स्थानकातील प्रवेशाचे लाईव्ह प्रसारण नासा T.V. वरून करण्यात येणार आहे

Thursday 15 September 2022

Artemis मोहिमेतील अंतराळविरांचा स्पेससुट बनविण्यासाठी Axiom Space ची निवड

Artist’s Illustration: Two suited crew members work on the lunar surface. One in the foreground lifts a rock to examine it while the other photographs the collection site in the background.'

 Artemis मोहिमेतील अंतराळवीर स्पेससूट घालून चंद्रावरील भूमीवर फिरतानाचे काल्पनिक चित्र -फोटो नासा संस्था

 नासा संस्था-7 सप्टेंबर

पन्नास वर्षांनी अमेरिकन अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवणार आहेत त्यामुळे नासाच्या Artemis चांद्रमोहिमेची जय्यत तयारी सुरु आहे ह्या मोहिमे अंतर्गत वेगवेगळ्या नाविन्यपुर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे ह्याच मोहिमेअंतर्गत आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीरांना चंद्रावरील भूमीवर फिरताना आणि स्पेसवॉक करताना घालण्यासाठी उपयुक्त असा स्पेससूट बनविण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली  होती त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला अंतिम दोन कंपन्यामधून नासा संस्थेने Axiom Space ह्या व्यावसायिक कंपनीची निवड निश्चित केली आहे आणि त्यांना स्पेससूट बनविण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले 

Artemis III ह्या मोहिमेतील अंतराळवीरांसाठी ह्या स्पेस सुटची निर्मिती करण्यात येणार आहे अंतराळवीरांना  तेथील भूमीवर फिरताना सुरक्षित आणि अंतराळात स्पेसवॉक दरम्यान टेक्निकल सिस्टिम्स व इतर आवश्यक बाबीसाठीची उपयुक्त्तता पारखून ह्या स्पेस सूटची निवड करण्यात आली ह्या स्पेससूटच्या निर्मिती साठी सुरवातीला $228.5 मिलियन खर्च देण्यात येणार आहे

नासाच्या ह्या मोहिमेतील मॅनेजर Lara Kearney म्हणतात ह्या ऐतिहासिक Artemis मोहिमेतील स्पेससूट व इतर आवश्यक गोष्टींच्या निर्मितीसाठी अंतराळविश्वातील Axiom Space ह्या व्यावसायिक कं.शी भागीदारी करण आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे ह्या स्पेससूट निर्मितीच्या निर्णयामुळे पन्नास वर्षानंतर ह्या मोहिमेतील अंतराळवीरांच्या चांद्रभूमीवरील पुन:प्रवेशाचा पाया रोवला जातोय आगामी काळात अंतराळवीर तेथे जातील तेथील भूमीवरील,वातावरणातील सायंटिफिक नमुने गोळा करतील तेथे मानवाला राहण्यायोग्य जागा शोधतील पृथ्वीवरील मानवासाठी उपयुक्त संशोधन करतील आणि अंतराळविश्वातील व्यावसायिक मोहिमेचीही सुरवात होईल

ह्या स्पेससूटचे डिझाईन बनविताना गेल्या पन्नास वर्षातील स्पेससूट एक्स्पर्टशी चर्चा करून काही त्रुटी दूर करून नवीन उपयुक्त बाबींचा समावेश त्यात करण्यात आला टेक्निकल सिस्टिम्स आणि सेफ्टीला प्राधान्य देण्यात आले ह्या स्पेस सूटची निर्मिती करताना त्याचे डिझाईन,क्वालिटी,अंतराळवीरांना लागणाऱ्या सर्व सिस्टिम्सची पूर्तता आणि सुरक्षितता ह्या सर्वांची जबाबदारी Axiom Space वर असेल ह्या सर्व बाबी नासा संस्थेतर्फे तपासल्या जातील ह्या करारानुसार 2034पर्यंत मागणीनुसार स्पेस सूटचा पुरवठा करावा लागेल त्या नंतर आवश्यकतेनुसार भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी स्थानकात आणि स्थानकाबाहेर स्पेस वॉक दरम्यान घालण्यासाठी स्पेस सूट निर्मितीची ऑर्डर देण्यात येईल  

स्पेससूट तयार  झाल्यानंतर नासा संस्थेतील अंतराळवीरांच्या ट्रेनिंग दरम्यान पृथ्वीवरील अंतराळासारख्या झिरो ग्रॅविटीच्या कृत्रिम वातावरणात अंतराळवीर हा स्पेस सूट घालून त्याची चाचणी घेतील त्यानंतर तज्ञांमार्फत सर्व बाबींची पूर्तता आणि सुरक्षितता तपासून ह्या मुन वॉकिंग आणि स्पेस वॉकिंग स्पेससूटच्या निर्मितीवर अंतिम शिक्का मोर्तब होईल

Tuesday 6 September 2022

अंतराळ स्थानकाच्या कामासाठी रशियन अंतराळवीरांचा Space Walk संपन्न

 Spacewalkers Oleg Artemyev (bottom left) and Denis Matveev (right) extend the Russian Strela cargo crane from the Zarya module toward the Poisk module following work on the European robotic arm. Credit: NASA TV

 अंतराळवीर Oleg Artemyev आणि अंतराळवीर Denis Matveev रशियन सेगमेंट मध्ये Space Walk दरम्यान Strela Cargo Crane Zarya module पासून Poisk module पर्यंत वाढवत नेताना -फोटो नासा संस्था 

नासा संस्था-2 सप्टेंबर

नासाच्या अंतराळ मोहीम 67 चे कमांडर Oleg Artemyev आणी Flight engineer Denis Matveev ह्यांनी अंतराळ स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील कामासाठी शुक्रवारी Space Walk केला शुक्रवारी दोन सप्टेंबरला सकाळी 9.25 मिनिटांनी हे दोनही अंतराळवीर स्थानकाच्या समोरील भागातील Poisk Module मधून Space Walk साठी स्थानकाबाहेर पडले आणी 7 तास 47 मिनिटांनी Space Walk पुर्ण करून स्थानकात परतले 

सात तास सत्तेचाळीस मिनिटांच्या ह्या Space Walk मध्ये ह्या अंतराळवीरांनी स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील Nauka Laboratory बाहेरील भागात युरोपियन रोबोटिक आर्म फिट करण्यासाठी काम केले त्यांनी त्या भागातील External Control पॅनल काढून दुसऱ्या भागात फिट केले हे पॅनल युरोपियन रोबोटिक आर्मच्या वापरासाठी आवश्यक आहे ह्या युरोपियन रोबोटिक आर्मचा ऊपयोग अंतराळविरांना Space Walk करताना Payloads पकडण्यासाठी व ईतर आवश्यक सामान एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी तसेच ईतर कामासाठी होतो ह्या Space Walk मध्ये अंतराळवीरांनी Zarya Module भागातील Strela telescoping boom स्थानकाच्या Poisk module पर्यंत वाढविला शिवाय पुढिल Space Walk साठीची पूर्व तयारीही करून ठेवली

ह्या आधी 17 ऑगस्टला झालेल्या Space Walk दरम्यान अंतराळवीर Artemyev ह्यांच्या Orlan स्पेससुट मध्ये अचानक बिघाड झाला होता त्यांच्या बॅटरीचे रिडींग अनियमित येत असल्याचे नासा संस्थेतील संबंधीताच्या लक्षात आले त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून सुरक्षितते साठी त्यांना हा Space Walk त्वरित थांबवून परत स्थानकात बोलवण्यात आले होते हा बिघाड लक्षात येईपर्यंत ह्या दोन्ही अंतराळवीरांनी दोन तास सतरा मिनिटांच्या Space Walk पूर्ण केला होता त्यांनी रोबोटिक आर्मवर दोन कॅमेरे फिट करण्याचे काम त्या वेळात पुर्ण केले होते पण त्या वेळेसचे उर्वरित काम अपुर्ण राहिले होते ते काम ह्या Space Walk मध्ये पूर्ण करण्यात आले

ह्या Space Walk साठी अंतराळवीर Artemyev ह्यांनी परीधान केलेल्या रशियन स्पेससुटवर लाल रंगाच्या रेषा होत्या आणी अंतराळवीर Matveev ह्यांनी परीधान केलेल्या रशियन स्पेससुटवर निळ्या रंगाच्या रेषा होत्या अंतराळवीर Artemyev ह्यांच्या अंतराळ कारकिर्दीतला हा आठवा Space Walkहोता तर अंतराळवीर Matveev ह्यांच्या अंतराळ कारकिर्दीतला हा चवथा Space Walk होता आणी ह्या वर्षातला अंतराळस्थानकाच्या कामासाठी केलेला हा आठवा Space Walk होता