Thursday 25 August 2022

भविष्यकालीन चांद्रमोहिमेतील अंतराळवीरांना चंद्रावर उतरण्यासाठी तेरा जागांची निवड

Shown here is a rendering of 13 candidate landing regions for Artemis III. Each region is approximately 9.3 by 9.3 miles (15 by 15 kilometers).

 भविष्यकालीन चांद्रमोहिमेतील अंतराळवीरांना उतारण्यायोग्य चंद्रावरील तेरा जागा -फोटो नासा संस्था 

नासा संस्था -19 ऑगस्ट

अमेरिकेच्या आर्टेमिस मोहीमेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे पन्नास वर्षांनी पुन्हा एकदा मानवी पाऊल चंद्र भूमीवर पडणार आहे आगामी काळात चंद्रावर मानवी निवासासाठी राहण्यायोग्य वातावरणाचा शोध घेऊन तेथील भूगर्भातील जमिनीचे उत्खनन करून तेथील खडक माती मिनरल्सचे नमुने गोळा करण्याचे काम हे अंतराळवीर करणार आहेत त्या साठी योग्य जागेचा शोध नासा संस्थेने घेतला असून हि तेरा ठिकाणे चंद्रावरील साऊथ पोल जवळ आहेत  

Washington तेथील नासा संस्थेतील Deputy Associate Administrator Mark Kirasich म्हणतात ह्या जागेची निवड झाल्यामुळे आता आपण चांद्र मोहिमेच्या आणखी जवळ पोहोचलो आहोत पन्नास वर्षांनी पुन्हा नव्या जोमाने ह्या मोहिमेची तयारी आता सुरु झाली आहे ह्या आधीचे अंतराळवीर जेथे गेले नव्हते अशा ठिकाणी पोहोचून अंतराळवीर तेथे अंतराळ यान आणि अंतराळवीरांच्या लँडिंगसाठी योग्य ठिकाणाचा शोध घेणार आहेत त्या मुळे भविष्यकालीन चांद्र मोहिमेतील अंतराळवीरांचे तेथे जाणेयेणे सुरु होईल हा प्रत्येक भाग चंद्रावरील साऊथ पोल जवळ सहा अंशावर स्थित आहे,भौगोलिक दृष्टया आणि चंद्रावरील पुरातन काळाचा शोध घेण्यासाठी योग्य आहे  

शास्त्रज्ञांच्या मते चंद्रावर वैज्ञानिक माहितीचा खजिना आहे हि तेरा ठिकाणे भूगर्भीय उत्खनना साठी समृद्ध आहेत ह्या प्रत्येक भागात उंच डोंगर आणि खोल दऱ्या आहेत उंच पहाडांवर पुरेसा सूर्यप्रकाश आहे खोल दऱ्यांमध्ये मात्र अंधार आहे त्या मुळे ऊन आणि सावली पण आहे डोंगरांच्या लांबच लांब रांगा आहेत आणि पाठारी भागही आहे त्या मुळे अंतराळवीरांना उतरण्यासाठी सुरक्षित आहे इथे उतरून अंतराळवीर रोबोटिक आर्मद्वारे भूगर्भातील जमिनीचे उत्खनन करू शकतो चंद्रावरील पुरातन काळातील शेकडो वर्षांआधीची वैज्ञानिक माहिती गोळा करू शकतील हे अंतराळवीर तेथील पाण्याचे अस्तित्व आणि सजीवसृष्ठी अस्तित्वात होती का ह्याचा शोध घेणारे पुरावे शोधतील हा भाग वैज्ञानिक दृष्ठ्या महत्वपूर्ण आहे आणि इथून अंतराळवीर आणि अंतराळ यानाचा पृथ्वीवरील संस्थेशी आणि संस्थेतील शास्त्रज्ञांशी संपर्क साधण्यास अनुकूल आहे 

ह्या तेरा जागेची निवड नासा संस्थेतील शास्त्रज्ञ आणि इंजिनीअर्सच्या टीमने केली आहे त्या साठी त्यांनी नासाच्या Lunar Reconnaissance Orbiter मधील डेटा आणि गेल्या दहा वर्षातील प्रकाशीत माहितीचा तसेच चंद्र विज्ञानाच्या माहितीचा निष्कर्ष काढून अंतिम निरीक्षणानंतर ह्या जागेंची अंतिम निवड केली त्यांनी तेथील लाँच विंडोसाठीची  उपयुक्तता सुरक्षित लँडिंगची सोय,ह्या भागातील भौगोलिक परिस्थिती,तेथील चढउतार योग्य प्रकाश सावली आणि संपर्क साधण्यास अनुकूल वातावरण असल्यामुळे ह्या जागेची निवड केली शिवाय भविष्यकालीन चांद्र मोहिमेतील Space Launch System,Rocket ,Orion Space Craft आणि Space X ह्या यानाच्या आणि मानवी अंतराळ मोहिमांचा विचार करून ह्या जागा निश्चित केल्या

Wednesday 10 August 2022

Blue Origin च्या NS-22 मोहिमे अंतर्गत सहा सामान्य प्रवाशांनी केले अंतराळ पर्यटन

                          Blue Origin च्या NS -22 चे अंतराळ प्रवासी -फोटो -Blue Origin 

Blue Origin -4 आँगस्ट

Blue Origin कंपनीच्या NS-22 मोहिमे अंतर्गत सहा प्रवासी गुरुवारी चार ऑगस्टला अंतराळ प्रवास करून परतले ह्या सहा प्रवाशांमध्ये Cobby cotton,Mario Ferrena,Vanessa O'Brien Clint Kelly,Sara Sabryआणी Steve Young ह्यांचा समावेश होता 


 

 Blue Origin च्या West Texas येथील ऊड्डाण स्थळावरून New Shepard यान ह्या सहा प्रवाशांना घेऊन  अंतराळात झेपावल्या नंतर काही वेळातच यान रॉकेट पासून वेगळे झाले आणी प्रचंड वेगाने अंतराळ प्रवासास निघाले अवघ्या काही मिनिटात यान पृथ्वी व अंतराळ ह्यांच्यातील सिमारेषा म्हणजेच Karman line पर्यंत पोहोचले यानाने हि रेषा भेदुन अंतराळात प्रवेश करताच सर्व अंतराळ प्रवाशांनी एकच जल्लोष केला आणी एकमेकांचे हात पकडून We are doing it!We are doing it असे म्हणत यानात तरंगण्याचा अदभूत आनंद लुटला ह्या प्रवाशांनी यानाच्या खिडकीतून अंतराळातील आजुबाजुचा काळोख आणी खाली पृथ्वीचे अलौकिक सौंदर्य पहाण्याचा आनंद घेतला अवघे अकरा मिनिटांचे  हे अविस्मरणीय अंतराळ पर्यटन घडवून New Shepard यान पृथ्वीवर सुखरूप परतले त्या नंतर Blue Origin च्या रिकव्हरी टीमने सर्वांना यानातून बाहेर काढले परतल्यानंतर सर्वांनीच Oh !My God !So Beautiful ! Amazing ! अशी प्रतिक्रिया व्यक्त केली 

Sara Sabry -(Mechanical &Biomedical engineer) अंतराळ प्रवास करणारी पहिली इजिप्शियन महिला आहे उड्डाणाआधी ती भावविवश झाली होती ती म्हणाली ह्या क्षणी माझ्या मनात संमिश्र भावना आहेत मी थोडीशी नर्व्हस आहे,जाण्यासाठी उत्सुकही आहे,Excited झाले आहे आज अंतराळ प्रवासात मी इजिप्तचे प्रातीनिधित्व करत आहे माझ्यासाठी हि सन्माननीय बाब आहे अंतराळ प्रवासाची हि ऐतिहासिक सुरवात आहे परतल्यानंतर ती म्हणाली अंतराळ प्रवासा दरम्यान मी माझ्या देशाचा विचार करत होते मी माझ्या देशाचे नाव अंतराळात घेऊन जात आहे आता माझ्या अनुभवानंतर माझ्या देशातील अनेक नागरिक देखील असा अंतराळ प्रवास करतील माझ्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही हे जग खूप सुंदर आहे हा अदभूत अनुभव देखील अविस्मरणीय आहे ! तो सर्वांनी घ्यायला हवा 

Vanessa O' Brien ( British -American Explorer )ह्यांनी पृथ्वीवरील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट सर केलय आणि सुमुद्राच्या तळाशी अत्यंत खोलवर बुडी मारलीय आता ह्या अंतराळ प्रवासानंतर त्यांनी अंतराळातील Karman line  भेदून अंतराळातही प्रवेश केला आहे त्या महिला समानतेसाठी कार्य करतात त्यांनी ह्या अंतराळ प्रवासात UN Women Flag सोबत नेला होता उड्डाणा आधी त्या म्हणाल्या थोडा नर्व्हसनेस असला तरी हि माझ्यासाठी सुवर्णसंधी आहे आता मी साऱ्या जगाशी मानवतेच्या दृष्ठीने जोडल्या गेले आहे मला आता हे रियलाईझ झालय कि स्त्रीयांना काहीही अशक्य नाही Blue Origin ने अंतराळविश्वात नव दालन खुल केलय त्या साठी thanks ! ह्या आधी अंतराळ प्रवास करण्यासाठी,अंतराळवीर होण्यासाठी वर्षानुवर्षे ट्रेनिंग घ्याव लागायच मिल्ट्रीत जाव लागायच पण आता सामान्य नागरिक थोडस ट्रेनिंग घेऊन अंतराळ प्रवास करू शकतो हि प्रगत जगाची नवी सुरवात आहे प्रवासा नंतर त्यांनीही हा अनुभव अविस्मरणीय असल्याचे सांगितले आणि त्या साठी Blue Origin आणि टीममधील सर्वांचे आभार मानत त्यांच्यामुळेच आम्ही हा अंतराळ प्रवासाचा अनुभव घेतल्याचे सांगितले

 Cobby Cotton -ह्या दहा बारा मिनिटातला हया वजनरहित अवस्थेतला अनुभव मजेशीर होता वरून पृथ्वीकडे पाहताना तिची व्यापकता पाहून आपण तिच्यापुढे किती छोटे आहोत ह्याची जाणीव मला झाली खूपच सुंदर अनुभव होता अविश्वसनीय होता 

Mario Ferreira हे देखील अंतराळ प्रवास करणारे पहिले पोर्तुगीज नागरिक आहेत New Shepard ची हि अंतराळ भरारी पाहून मी थक्क झालो अंतराळात प्रचंड काळोख होता आणि खाली पृथ्वीच अलौकिक सौन्दर्य !गेल्या अठरा वर्षांपासून मी अंतराळ प्रवासाची वाट पहात होतो खूप सुंदर आश्चर्यकारक प्रवास होता 

Clint Kelly - Technology Pioneer आहेत ते म्हणतात ह्या अंतराळ प्रवासाने माझ लक्ष अंतराळ विश्वातील मानवी अंतराळ प्रवासाच्या ऐतिहासिक सुरवातीकडे वेधल प्रवासात आधी आकाशातील बदलता निळा,जांभळा रंग अनुभवाला आणि मग काळोख पाहिला आणि क्षणात जाणवल आपण दुसऱ्या ठिकाणी आलो आहोत अंतराळात पोहोचलो आहोत ! तो क्षण अविस्मरणीय आहे

 Steve Young (Telecommunications Executive ) म्हणतात मला वाटत आता लोकांना आमच्याकडे पाहून असा अंतराळ प्रवासाचा अनुभव घ्यावासा वाटेल ते आमच्याकडे पाहून प्रेरित होतील ह्या अंतराळ पर्यटनाकडे आकर्षित होतील 

 ह्या मोहिमेतील पहिली इजिप्शियन अंतराळ प्रवाशी Sara Sabry पहिले पोर्तुगीज अंतराळ प्रवासी Mario Ferreria आणि सर्वात उंच शिखर सर करणारी आणि समुद्रात खोलवर बुडी मारून Guinness World Record करणारी Venessa O' Brien ह्या तिघांच्या समावेशामुळे हे उड्डाण ऐतिहासिक नोंद करणारे ठरले 

Blue Origin -NS -22 मोहिमेत New Shepard यानाने सहाव्यांदा नागरिकांनाअंतराळ पर्यटन घडवले  ह्या वर्षातील हे तिसरे मानवी अंतराळ उड्डाण होते आणि आजवरचे बाविसावे अंतराळ उड्डाण होते ह्या यशस्वी उड्डाणानंतर Blue Origin चे Vice President Phil Joyce प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले " मागच्या वर्षी आम्ही अंतराळ पर्यटन सुरु केले आणि एका वर्षात New Shepard यानाने एकतीस नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवून आणले हि आमच्यासाठी सन्माननीय बाब आहे आम्ही आणि आमची टीम सामान्य नागरिकांना क्षणात पृथ्वीवरून अंतराळात नेऊन अंतराळ प्रवास घडवतो आमच्या टीममधील ह्या मोहिमेतील सर्वच टीमचे आभार त्यांच्यामुळेच हि मोहीम यशस्वी होत आहे "!

Sunday 7 August 2022

Space X Crew 5चे चार अंतराळवीर सप्टेंबरमध्ये स्थानकात रहायला जाणार

An image of NASA’s SpaceX Crew-5: NASA astronauts Nicole Mann and Pilot Josh Cassada, JAXA (Japan Aerospace Exploration Agency) astronaut Koichi Wakata, and Roscosmos cosmonaut Anna Kikina.

 Space X Crew -5 चे अंतराळवीर कमांडर Nicole Mann आणि पायलट Josh Cassada सोबत जपानचे अंतराळवीर Koichi Wakata आणि रशियन अंतराळवीर Anna Kikina -फोटो नासा संस्था 

नासा संस्था -4 ऑगस्ट 

नासाच्या Space X Crew -5  मोहिमे अंतर्गत चार अंतराळवीर 29 सप्टेंबरला सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार आहेत नासाचे अंतराळवीर Nicole Mann व Josh  Cassada जपानचे अंतराळवीर Koichi Wakata आणि रशियन अंतराळवीर Anna Kikina ह्या चार अंतराळवीरांचा त्यात सहभाग आहे 

ह्या मोहिमेत अंतराळवीर Nicole Mann  ह्यांची कमांडरपदी तर अंतराळवीर Josh Cassada ह्यांची पायलट पदी निवड झाली आहे अंतराळवीर Koichi Wakata आणि Anna Kikina ह्या मोहिमेत मिशन स्पेशॉलिस्ट म्हणून काम पाहतील हे चारही अंतराळवीर 29सप्टेंबरला नासाच्या Kennedy Space Center Florida येथील उड्डाणस्थळावरून Space X Crew Dragon आणि Falcon 9 रॉकेटच्या साहाय्याने स्थानकात जाण्यासाठी अंतराळात उड्डाण करतील 

A collage of NASA’s SpaceX Crew-5 from left to right, top to bottom :NASA astronauts Nicole Mann and Josh Cassada, JAXA (Japan Aerospace Exploration Agency) astronaut Koichi Wakata, and Roscosmos cosmonaut Anna Kikina.

अंतराळवीर Nicole Mann ,Anna Kikina आणि Josh Cassada हे पहिल्यांदाच स्थानकात राहायला जाणार असून अंतराळवीर Koichi Wakata मात्र पाचव्यांदा स्थानकात राहायला जाणार आहेत 

अंतराळवीर Nicole Mann ह्या अमेरिकेतील California येथील रहिवासी असून त्यांनी US Naval Academy मधून BE Mechanical Engineering ची पदवी घेतली आणि Standford University मधून Specialty in Fluid Mechanics मध्ये ME केले 2013 मध्ये त्यांची नासा संस्थेत अंतराळवीर होण्यासाठी निवड झाली तेव्हा त्या F/A-18 Hornet &Supper Hornet मध्ये Test Pilot पदी कार्यरत होत्या ह्या मोहिमेच्या कमांडर असल्यामुळे त्यांच्यावर अंतराळयानाच्या Launching पासून परत पृथ्वीवर Landing पर्यंतची जबाबदारी आहे 

अंतराळवीर Josh Cassada ह्यांचे देखील 2013 मध्ये नासा संस्थेत अंतराळवीर होण्यासाठी निवड झाली ते अमेरिकेतील Minnesota येथील रहिवासी आहेत त्यांनी Physicist आणि US Navy Test Pilot पदी काम केले आहे विशेषतः त्यांनी Naval Aviator होण्याला प्राधान्य दिले त्यांनी Albion College -Albion Michigan येथून Physics ची बॅचलर डिग्री घेतली आणि New York येथील University Of Rochester येथून डॉक्टरेट केले ते ह्या मोहिमेत Pilot पद सांभाळणार असल्याने त्यांच्यावर यानाच्या Systems आणि Performance ची जबाबदारी आहे शिवाय ते ह्या मोहिमेत Flight engineer म्हणूनही कार्यरत राहतील 

जपानचे अंतराळवीर Koichi Wakata हे पाचव्यांदा अंतराळ स्थानकात राहायला जाणार आहेत ह्या त्यांच्या चारवेळच्या अंतराळ कारकिर्दीत त्यांनी तीन वेगवेगळ्या अंतराळ यानातून अंतराळ प्रवास केला आहे मिशन स्पेशॉलिस्ट म्हणून अंतराळ यानाच्या Dynamic Launch च्या वेळी अंतराळातील उड्डाण आणि परत पृथ्वीवर landing च्या वेळी कमांडर आणि Pilot सोबत त्यांचा विशेष सहभाग असेल ह्या मोहिमेत स्थानकात पोहोचल्यावर ते मोहीम 68 च्या Flight Engineer पदावर कार्यरत राहतील 

रशियन अंतराळवीर Anna Kikina ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी आहे त्या देखील अंतराळ यानाच्या Dynamic Launch आणि Landing च्या वेळी मिशन स्पेशॉलिस्ट म्हणून सहभागी होतील आणि ह्या मोहिमेत Flight engineer पदावर कार्यरत राहतील 

सध्या अंतराळ स्थानकात रहात असलेले चार अंतराळवीर ऑक्टोबर मध्ये Freedom Space X Crew Dragon मधून पृथ्वीवर परततील तोवर सर्व अंतराळवीर एकत्रित स्थानकात सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील सध्या हे चारही अंतराळवीर अंतिम ट्रेनिंगसाठी उड्डाणस्थळी पोहोचले असून जाण्याआधी चार तारखेला त्यांनी नासा संस्थेतील प्रमुखांशी आणि अमेरिकेतील निवडक पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी नासा संस्थेतील त्यांना अंतराळवीर होण्यासाठीचे ट्रेनिंग देणाऱ्या ह्या मोहिमेतील सर्व कर्मचारी,शास्त्रज्ञ आणि इंजिनीअर्स चे आभार मानले आणि आम्ही सर्वजण स्थानकात जाण्यासाठी उत्सुक आहोत आणि त्या क्षणाची आतुरतेने वाट पहात आहोत असे सांगितले

Thursday 4 August 2022

Perseveranceयानाने गोळा केलेले मंगळावरील खडकांचे नमुने 2033 मध्ये पृथ्वीवर आणणार

This illustration shows a concept for multiple robots that would team up to ferry to Earth samples collected from the Mars surface by NASA's Mars Perseverance rover.

 Perseverance मंगळयानाने रोबोटिक टीमद्वारे गोळा केलेले मंगळावरील नमुने पृथ्वीवर आणतानाचे मंगळावरील काल्पनिक चित्र -फोटो -नासा संस्था 

 नासा संस्था -

 नासा आणी इसा ( युरोपियन स्पेस एजन्सी) संस्थेतील प्रमुखांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत Perseverance यानाने गोळा केलेले मंगळभुमीवरील खडकांचे नमुने 2033 मध्ये पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे  मंगळावरील Jezero Crater ह्या भागात कार्यरत असलेल्या Perseverance यानाने मंगळ ग्रहावरील पुरातन काळच्या सजीव सृष्ठीच्या अस्तित्वाला दुजोरा देणाऱ्या प्रवाहित पाण्याच्या आटलेल्या स्त्रोताच्या आसपासच्या भागातील व भुप्रुष्ठाखालील जमीनीचे उत्खनन करून तेथील खडकांचे नमुने गोळा केले आहेत 

आजवर Perseverance यानाने तेथील खडक,माती,मिनरल्सचे अनेक नमुने व एक Atmospheric नमुना गोळा केला आहे आगामी काळात Perseverance यानाद्वारे आणखी नमुने गोळा करण्यात येणार आहेत ह्या कामात Perseverance यानासोबत मंगळावर पोहोचलेल्या Ingenuity Mars helicopter ने देखील मोलाची मदत केली आहे Ingenuity mars हेलिकॉप्टरने मंगळग्रहावरील आकाशात आता 29 वेळा यशस्वी ऊड्डाण केले आहे आणि तेथील आसपासच्या भागातील,वातावरणातील निरीक्षण नोंदवून ऊपयुक्त संशोधीत माहिती व त्या भागातील फोटो काढुन पृथ्वीवर पाठवले आहेत विशेष म्हणजे शास्त्रज्ञांच्या अपेक्षेनुसार ह्या हेलिकॉप्टरची कार्यक्षमता एक वर्षापर्यंतच होती पण Ingenuity हेलिकॉप्टरने अपेक्षेपेक्षा जास्त काळ कार्यरत राहून टिममधील सर्वांना आश्चर्य चकीत केले आहे Ingenuity च्या ह्या यशाने प्रेरित होऊन शास्त्रज्ञांनी आता मंगळावरील नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टरचे डिझाईनही Ingenuity वर आधारित बनवण्याचा निर्णय घेतला आहे सध्या Perseverance यान  Mars Ascent Vehicle आणि ESA चे Sample Transfer Arm ह्यांच्या साहाय्याने गोळा केलेले खडकांचे नमुने Sample Retrieval Lander मध्ये साठवत आहे 

पण आता ह्या टीममधील शास्त्रज्ञांनी मंगळ ग्रहावरील नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या Sample Retrieval Lander आणि दोन Helicopters चे डिझाईन नवीन व अद्ययावत यंत्रणेने बनविले आहे त्या मुळे यानाला नमुने गोळा करण्यासाठी आता Fetch रोव्हर किंवा त्याच्याशी संलग्न अशा दुसऱ्या Lander ची आवश्यकता भासणार नाही ह्या नवीन Sample Retrieval Lander सोबत पाठविण्यात येणारे हेलिकॉप्टर बनविताना आधीच्या Ingenuity हेलिकॉप्टरचे डिझाईन वापरून त्यातील त्रुटी कमी करून काही सुधारणा करण्यात आल्या आहेत ज्या मुळे हे काम कमी त्रासाचे आणि सोपे होईल आता ह्या हेलिकॉप्टर मध्येच नमुने गोळा करण्याची क्षमता निर्माण केली असल्यामुळे हे काम आता हेलिकॉप्टर द्वारे केले जाईल 

2027-28 च्या उन्हाळ्यात Earth Return Orbiter आणि Sample Retrieval Lander मंगळग्रहावर पाठविण्यात येणार असून 2033 मध्ये ते तेथील खडकांचे व इतर नमुने घेऊन पृथ्वीवर परतेल नुकत्याच झालेल्या बैठकीत ह्या नव्या डिझाईन वर शिक्कामोर्तब झाल्याने लवकरच म्हणजे ऑक्टोबर महिन्यात ह्या कामाचा शुभारंभ होईल आणि एक वर्षांनी हे काम पूर्ण होईल त्यानंतर नासा संस्थेतील ह्या टीममधील इंजिनीअर्स ह्या डिझाईनची परिपूर्णता तपासून पाहतील त्यानंतर अंतिम मान्यता मिळेल 

Human &Robotic Exploration ESA चे Director David Parker ह्यांच्या मते आता हे काम लवकरच जोमाने सुरु होईल आणि आगामी काळात Earth Return Orbiter आणि हेलिकॉप्टर्स पृथ्वीवरून मंगळ आणि पुन्हा पृथ्वी असा ऐतिहासिक अंतराळ प्रवास सुरु करेल आणि Sample Transfer Arm द्वारे रोबोटिकली नमुन्यांच्या tubes Orbiting Sample Container मध्ये भरेल 

ह्या मंगळ मोहिमेतील नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी नासा आणि ESAने मिळून एकत्रित केलेले काम वैशिष्ठपूर्ण आहे हे ऐतिहासिक असामान्य कर्तृत्व आहे अस नासाच्या वॉशिंग्टन येथील संस्थेचे Associate Administrator Thomas Zurbuchen म्हणतात सध्या मंगळावरील पहिल्या टप्प्यातील नमुने गोळा करण्याचे काम प्रगतीपथावर आहे 2021पासून Perseverance यान मंगळावरील Jezero Crater ह्या भागात कार्यरत आहे आणि तेथील खडकांचे नमुने गोळा करण्याचे काम यशस्वीपणे पार पाडत आहे आता तेथील खडकांचे अकरा नमुने आणि वातावरणातील एक नमुना (atmospheric sample) त्याने गोळा केले आहेत  हे नमुने जेव्हा पृथ्वीवर पोहोचतील तेव्हा नासाचे हे कर्तृत्व जगाला प्रेरित करेल हेलिकॉप्टरच्या नव्या डिझाईन मध्ये दीर्घकाळ उपयुक्ततेचा विचार करून  पूर्वीच्या तुलनेत काही बदल केले आहेत अंतिम मान्यतेआधी तज्ञांकडून त्याचे सूक्ष्म निरीक्षण करणे अत्यंत आवश्यक असते नासाच्या ह्या टीममधील इंजिनीअर्स हे काम करतील हे नमुने पृथ्वीवर आणल्यानंतर जगभरातील शास्त्रज्ञांना मंगळावरील खडकांचे अत्याधुनिक यंत्रणा वापरून त्यावर संशोधन करण्याची संधी दिली जाईल हे काम मंगळावर जाऊन करता येणे सध्यातरी शक्य नाही त्यामुळेच तेथील नमुने पृथ्वीवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला अपोलो चांद्र मोहिमेतील खडकांचे आणि मातीचे नमुने आता आपण अद्ययावत यंत्रणा वापरून पाहू शकलो तसेच भविष्यात मंगळग्रहांवरील नमुने पाहता येतील आणि संशोधित करता येतील