Friday 19 February 2021

नासाचे Perseverance मंगळ यान अखेर निर्विग्घपणे मंगळावर पोहोचले

 Members of NASA’s Perseverance Mars rover team watch in mission control as the first images arrive

नासाच्या Jet Propulsion lab मधील मंगळ मोहिमेतील टीम  Perseverance यान मंगळावर पोहोचल्यानंतर यानाने पाठवलेला मंगळाचा फोटो पाहताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -18 फेब्रुवारी 

नासाचे Perseverance मंगळ यान 18 फेब्रुवारीला निर्विग्घपणे मंगळावर सुखरूप पोहोचले असून मंगळयानाच्या ह्या यशाने नासा संस्थेतील शास्त्रज्ञ आणि टीममधील सर्वजण आनंदित झाले आहेत  हे मंगळ यान 30 जुलै 2020 मध्ये Florida येथील Cape Canaveral Space Force Station येथून मंगळ ग्रहावर जाण्यासाठी अंतराळात झेपावले होते आणि 293 मिलियन मैलाचा अंतराळ प्रवास करून आठ महिन्यांनी आता मंगळावर सुखरूप पोहोचले आहे नासाच्या California येथील Jet Propulsion लॅब मधून प्रसारित झालेल्या बातमी नुसार अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज असलेले Perseverance Mars Rover काल अठरा तारखेला 3.55p.m वाजता (12.55p.m.PST) मंगळभूमीवर सुरक्षितपणे उतरले 

Perseverance च्या मंगळावरील ऐतिहासिक लँडिंगचा क्षण पाहताना ह्या मोहिमेतील टीममधील सारेच भारावले होते Perseverance मंगळाजवळ पोहोचल्यापासून ते मंगळावरील वातावरणात प्रवेश करेपर्यन्त  नासाच्या Jet Propulsion लॅब मधील साऱ्यांचीच उत्कंठा वाढली होती ह्या मंगळयानाच्या मंगळभूमी स्पर्शाचा थरारक क्षण अनुभवण्यासाठी सारेच आतुरतेने वाट पाहात होते आणि अखेर तो क्षण प्रत्यक्षात साकारलेला पाहून सारे आनंदित झाले साऱ्यांनीच हा आनंद टाळ्या वाजवून व एकमेकांना शुभेच्छा देऊन साजरा केला 

 Members of NASA’s Perseverance rover teamPerseverance मंगळयान सुरक्षितपणे मंगळभूमीवर उतरल्यानंतर टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करताना नासाच्या   मंगळमोहिमेतील शास्त्रज्ञ -फोटो -नासा संस्था

Perseverance मंगळयान अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज आहे हे यान मंगळ ग्रहानजीक पोहोचताच त्यातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली आणि प्रचंड वेगाने यानाने मंगळ ग्रहावरील आवरण भेदत मंगळाच्या वातावरणात प्रवेश केला यान अंतराळातून खाली मंगळावरील भूमीवर झेपावत असताना यानातील पॅराशूट उघडले आणि यानाचा वेग कमीकमी होत गेला यानाला बसविलेल्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने यानाने Jezero Crater ह्या मंगळभूमीवरील पृष्ठभागावर उतरण्यासाठी योग्य जागा शोधली आणि खाली जमिनीजवळ येताच यानातील केबलच्या साहाय्याने यानाच्या सहा चाकांवर perseverance सुरक्षितपणे जमिनीवर स्थिरावले त्या नंतर लगेचच यानात बसविलेल्या कॅमेऱ्याने मंगळभूमीचा फोटो काढून तो पृथ्वीवर पाठवला यानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होताना यानात शेकडो अत्यंत कठीण प्रक्रिया पार पाडत यान सुरक्षितपणे मंगळभूमीवर उतरले आणि शास्त्रज्ञ आणि टीममधील साऱ्यांच्या अथक परिश्रम आणि प्रयत्नांना यश मिळाले

 Illustration of NASA’s Perseverance rover begins its descent through the Martian atmosphere Perseverance मंगळयान स्वयंचलित यंत्रणेने कार्यान्वित होऊन मंगळावर उतरतानाचा अंतिम क्षण -फोटो नासा संस्था 

Jezero Crater हा पंचेचाळीस k.m. लांबीचा परिसर मंगळ ग्रहाच्या उत्तरेस आणि Isidis Planitia च्या पश्चिम टोकावर आहे शास्त्रज्ञाच्या मते ह्या भागात 3.5 बिलियन वर्षांपूर्वी नदी वाहात होती कालांतराने ती आटली त्या मुळे ह्या भागातील माती,खडक,गाळ,मिनरल्स ह्यांचे सॅम्पल्स गोळा केले तर पुरातन काळातील सजीव सृष्ठीचे अवशेष सापडतील आणि तिथे सजीव सृष्ठी अस्तित्वात होती ह्याचे पुरावे मिळतील 

Perseverance मंगळ यान छोट्या कारच्या आकाराचे असून 2,263 पाउंड वजनाच्या ह्या यानात Robotic Geologist आणि Astrobiologist बसविलेले आहेत ह्यांच्या साहाय्याने मंगळयान दोन वर्षे मंगळावरील पृष्ठभागा वरील आणि भूगर्भातील जमीन खणून तेथील माती खडक,मिनरल्स आणि जीवाष्मांचे अवशेष शोधेल आणि त्यांचे सॅम्पलस पृथ्वीवर आणेल त्यानंतर नासा आणि इसा ह्या दोन संस्थेमार्फत ह्या सॅम्पल्सवर पुन्हा संशोधन करण्यात येईल हे यान अत्याधुनिक यंत्रणेने अद्ययावत बनविलेले आहे यानात सात प्रायमरी सायन्स Instruments ,cameras ,sample catching system बसविली आहे यानात बसविलेल्या Multi-Mission Radioisotope Thermoelectric Generator मुळे यानाला heat आणि electricity मिळेल  

नासाचे Associate Administrator Thomas Zurbuchen म्हणतात Perseverance च्या यशाचा हा exciting event पाहून आम्ही पुढच्या मंगळमोहिमेसाठी प्रेरित झालो आहोत Perseverance प्रथमच मंगळावरील खडक ,माती ,जीवाष्म आणि इतर पुरातन अवशेषांचे नमुने गोळा करून पृथ्वीवर आणेल त्या मुळे मानवासहित मंगळमोहिमेत हि माहिती उपयुक्त ठरेल तर 

Steve Jurczyk म्हणतात आताच्या अत्यंत कठीण काळातील ह्या मंगळ मोहिमेतील Perseveranceच यश अमेरिकेसाठी अत्यंत अभिमानाचे आहे अंतराळविश्वात ह्या यशाच्या पेनने  ऐतिहासिक नोंद झाली आहे Perseverance मुळे आम्हाला आता भविष्यकालीन यशाचे बुक लिहायला प्रेरणा मिळेल

Wednesday 17 February 2021

नासाचे Perseverance मंगळ यान उद्या मंगळभूमीवर उतरणार नागरिकांना ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी

  An illustration of NASA’s Perseverance rover landing safely on Mars.

 नासाचे Perseverance मंगळ यान मंगळावर पोहोचल्यानंतरचा काल्पनिक फोटो -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -13फेब्रुवारी 

नासाचे Perseverance मंगळ यान आता मंगळ ग्रहाच्या अंतिम टप्प्यात पोहोचले असून जुलै मध्ये मंगळाच्या दिशेने निघालेल्या ह्या यानाचा अंतराळप्रवास संपून हे यान आता मंगळभूमीवर उतरणार आहे Perseverance मंगळ यान मंगळाच्या अत्यंत जवळ पोहोचले असून  उद्या अठरा तारखेला अंदाजे 3.55 p.m.(EST) ते मंगळभूमीवर उतरेल असा अंदाज नासाच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे ह्या यानाचा मंगळ ग्रहावरील प्रवेशाचा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष पाहण्यासाठी नासाच्या Perseverance Mars Rover टीम मधील सर्वच जण उत्सुक झाले आहेत आणि त्याची आतुरतेने वाट पाहात आहेत 

हा ऐतिहासिक क्षण पृथ्वीवासीयांना पाहता यावा म्हणून नासा ससंस्थेतर्फे ह्या Perseverance मंगळयानाच्या मंगळप्रवेश आणि मंगळभूमी स्पर्शाचे लाईव्ह प्रसारण नासा T.V. वरून 18 फेब्रुवारीला 2.15 p.m. वाजता करण्यात आहे 

Perseverance मंगळ यान जेव्हा मंगळ ग्रहानजीक पोहोचेल तेव्हा मंगळ ग्रहावरील पातळ आवरण भेदण्यासाठी   यान 12,000 mph (20,000Kph) इतक्या वेगाने आत प्रवेश करेल पण एकदा का यानाने मंगळाच्या वातावरणात  प्रवेश केला कि यानातील यंत्रणा कार्यान्वित होईल व यानाचा वेग 2 mph(3 mph) इतका कमी होईल,यानातील पॅराशूट उघडेल आणि यान अंतराळातून मंगळभूमीकडे झेपावेल यान खाली आल्यानंतर यानाचा वेग आणखी मंदावेल आणि यानातील केबल आणि सहा चाकांच्या साहाय्याने Perseverance मंगळ ग्रहावरील भूपृष्ठावर स्थिरावेल 

Perseverance मंगळ यानासोबत प्रथमच Ingenuity Mars Helicopter ही मंगळावर पाठवण्यात आले आहे हे हेलिकॉप्टर मंगळ भूमीवर आकाशात उडून तेथील माहिती गोळा करेल शिवाय भविष्यकालीन मानवासहित मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी  राहण्यासाठी पृथ्वी सारखे पोषक वातावरण असलेले ठिकाण शोधेल 

नासाचे Associate Administrator Marc Etkind म्हणतात कि,मंगळ ग्रहावर मंगळ यान उतरवणे सोपे नाही अत्यंत कठीण आहे हे नासाचे पाचवे मंगळयान मंगळभूमीवर Softly land व्हावे म्हणून नासाच्या Perseverance च्या टीमने अथक प्रयत्नाने खास यंत्रणा बनविली आहे म्हणूनच ह्या यानाच्या मंगळावरील प्रत्यक्ष लँडिंगचा क्षण पाहण्यासाठी आम्ही excited आहोत 

अमेरिकेत सध्या उत्साही वातावरण आहे नागरिक ह्या ऐतिहासिक मंगळ यानाच्या मंगळभूमीवरील लँडिंगचा क्षण अनुभवण्यासाठी उत्सुक आहेत ह्या Perseverance Mars Landing चे यश साजरे करण्यासाठी अमेरिकन यंत्रणा कार्यरत झाली आहे अमेरिकेतील New York मधील Empire State Building 16  फेब्रुवारीला सूर्यास्तानंतर सकाळ पर्यंत लाल रंगांच्या लाईटच्या प्रकाशात झगमगणार आहे तर Los Angeles मधील International Airport gateway pylons 17 तारखेला लाल दिव्याच्या प्रकाशात झगमगणार आहे शिवाय 19 तारखेला उर्वरित भागातील शहरे तसेच Chicago मधील Skyline Adler Planetarium देखील लाल प्रकाशात झगमगणार आहे नासा संस्थेने देशविदेशातील नागरिकांनाही ह्या मंगळभूमीवरील Perseverance मंगळयानाच्या मंगळभूमीवरील प्रवेशाचे सेलिब्रेशन साजरे करण्यासाठी इमारतीवर लाल प्रकाशझोत पाडण्यावर भर देण्याचे आवाहन केले आहे 

नासा संस्थेतर्फे Perseverance मंगळयानाच्या launching प्रमाणेच नागरिकांना ह्या ऐतिहासिक मंगळभूमी प्रवेशाचा रोमांचक क्षण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी Virtually guest experience ची संधी जाहीर केली आहे # Countdown To Mars  ह्या मोहिमेअंतर्गत ह्या प्रत्यक्ष लँडिंग सोहळ्यात आभासी उपस्थित राहता येणार असून लाईव्ह प्रसारणा दरम्यान ह्या मोहिमेसंदर्भातील  प्रश्न विचारता येतील शिवाय जेव्हा Perseverance मंगळयान मंगळावर उतरेल तेव्हा सर्व सहभागी नागरिकांना  Virtual Passport Stamp ही मिळेल त्या साठी नासा संस्थेशी संपर्क साधून त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे 

 Mission to Mars Student Challenge ह्या मोहिमे अंतर्गत विध्यार्थ्यांना नासा संस्थेतील ह्या मंगळ मोहिमे संदर्भात सोशल मीडिया वरून Perseverance टीममधील इंजिनीअर्स आणि शास्त्रज्ञांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली होती  

शिवाय सहभागी प्रेक्षकांना नासा संस्थेतील Virtual Photo Booth वर ह्या लाईव्ह प्रसारण आणी commentary च्या वेळेस त्यांचा फोटो पाठवता येणार आहे हे फोटो नासाच्या फोटो बूथ वर Perseverance च्या  बॅकग्राऊंड वर पोस्ट केल्या जातील 

Send Your Name to Mars ह्या मोहिमे अंतर्गत पृथ्वीवरील नागरिकांना त्यांचे फोटो मंगळ यानासोबत मंगळावर पाठविण्याची संधी नासा संस्थेने दिली होती ह्या मोहिमेला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला  Perseverance मंगळ यानासोबत 11 मिलियन लोकांनी त्यांची नावे पाठवली होती आता ज्यांना आपली नावे मंगळावर पाठवायची आहेत त्यांना पुन्हा संधी देण्यात आली असून हि नावे आगामी मंगळ मोहिमेतील  मंगळ यानासोबत मंगळावर पाठवण्यात येतील  

ह्या वेळेस  प्रथमच ह्या ऐतिहासिक Perseverance Mars Rover च्या मंगळभूमीवरील लँडिंग सोहळ्याचे प्रसारण स्पॅनिश भाषेतही करण्यात येणार आहे "Juntos Perseveramos " ह्या कार्यक्रमाअंतर्गत नासाच्या वेबसाईट वर 2.30p.m.वाजता प्रसारणाला सुरवात होईल आणि 3.55p.m.ला सोशल मीडियावरून प्रसारित केल्या जाईल

Sunday 14 February 2021

अंतराळस्थानकात अंतराळवीरांनी केला Plant Transplant चा प्रयोगही यशस्वी

 Pak choi in Veggie aboard the ISS

 अंतराळवीर Mike Hopkins स्थानकातील Veggie चेंबर मधील वाफाऱ्यात Pak choi चे रोप transplant करताना -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -

नासाच्या अंतराळ मोहीम 64चे अंतराळवीर Mike Hopkins ह्यांनी मागच्या महिन्यात Plant Transplant चा प्रयोग केला आणि विशेष म्हणजे त्यांच्या ह्या प्रयत्नाला यश मिळाले असून ह्या Veggie project चे सायंटिस्टही ह्या यशाने आश्चर्यचकित झाले आहेत 

गेल्या वीस वर्षांपासून नासाचे अंतराळवीर सलग अंतराळस्थानकात वास्तव्य करून तिथल्या फिरत्या लॅबमध्ये मानवी आरोग्यासाठी उपयुक्त संशोधन करत आहेत पण तिथल्या झिरो ग्रॅविटीत राहताना त्यांना पृथ्वीवरच्या सारखे ताजे अन्न,भाजी व फळे मिळत नाहीत त्यांना प्रिझर्व केलेले प्रक्रियायुक्त अन्न खावे लागते त्यांना ताजे अन्न व भाजी मिळावी म्हणून अंतराळस्थानकात Veggie प्रोजेक्ट राबविल्या जात आहे आणी तो यशस्वी पण होत आहे ह्या Veggie project अंतर्गत पिकवलेल्या भाजीचा आस्वाद अंतराळवीर घेतातच शीवाय अंतराळातील झीरो ग्रँव्हिटीत हि भाजी व फळे कशी वाढतात तेथील आणी पृथ्वीवर वाढणाऱ्या रोपात काय फरक आहे ह्याचे सखोल निरीक्षण नोंदवून त्या वर संशोधन करतात त्यातील काही भाजी नमुना म्हणून ठेवून पृथ्वीवर येताना आणतात आणि नासा संस्थेच्या labमध्ये त्यावर संशोधन होते 

मागच्या महिन्यात अंतराळ वीरांनी स्थानकात ऊगवलेल्या लाल मुळ्याच्या रोपांची कापणी करून  त्यांच्या जेवणात ह्या पानांचा समावेश करून त्याची चवही घेतली होती आणी काही पाने नमुना म्हणून पृथ्वीवर पाठवली आहेत

आता VEG-031 ह्या प्रोजेक्ट अंतर्गत स्थानकात लावलेल्या ऊर्वरीत रोपांची देखभाल सध्या स्थानकात रहात असलेले अंतराळवीर करत आहेत 29 जून 2018 मध्ये स्थानकात आलेल्या नासाच्या अंतराळवीरांनी ह्या प्रोजेक्ट अंतर्गत स्थानकात भाज्यांची लागवड सुरु केली होती अंतराळवीर Mike Hopkins  मागच्या महिन्यात रोपांची देखभाल करत असताना त्यांना व्हेजी चेंबर मधील ऊशी वाफ्यात काही रोपांची वाढ खूप हळूहळू होत असल्याचे दिसले काही रोपांची वाढ मात्र जोमाने झाली होती  तेव्हा ह्या अंकुरलेल्या पण ठराविक काळात नियमित वाढ न झालेल्या रोपांना पाहुन Mike ह्यांच्या मनात plant transplant चा विचार आला अंतराळवीर Mike सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी अंतराळस्थानकात आले आणि तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी झाले संशोधनातून मिळालेल्या मोकळ्या वेळात ते ह्या Veggie चेंबर मधील रोपांची देखभाल करत आहेत ह्या Veggie चेंबरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे Lettuces आणि Mustard ची रोपे लावली आहेत ह्या व्हेजी चेंबरमध्ये पृथ्वीसारखे कृत्रिम वातावरण व तापमान निर्माण करण्यात आले आहे त्या साठी लाईटचा वापर करून दिवस आणि रात्रीसारखा उजेड आणि अंधार निर्मीती केल्या जाते ह्या उशी वाफाऱ्यात चिकण माती आणि खतांचा वापर केल्या जातो 

ह्या रोपांच्या निरीक्षणा दरम्यान Mike ह्यांच्या लक्षात आले की,दोन उशी वाफाऱ्यातील Red Romaine आणि Dragon Lettuce ह्या भाजीच्या बिया खूप हळूहळू अंकुरत आहेत तर काही रोपांची वाढ व्यवस्थित झाली असून ती रोपे दुसऱ्या रोपांमागे हळूहळू उगवत आहेत त्यांनी हि बाब पृथ्वीवरील नासा संस्थेतील ह्या व्हेजी प्रोजेक्टच्या प्रमुख सायंटिस्टला सांगीतली तेव्हा त्यांच्या सल्ल्याने हा Plant Transplant चा निर्णय घेण्यात आला अंतराळवीर Mike ह्यांनी वाफाऱ्यातील जास्तीची अंकुरित रोपे काढून ह्या दोन वाफाऱ्यात लावली खरतर अशा अंकुरित अवस्थेतील नाजूक रोपे काढून ती पुन्हा दुसऱ्या जागी लावण इथे पृथ्वीवर देखील रिस्की आहे अशी एकीकडून काढलेली रोपे दुसरीकडे लावली तर पुन्हा उगवतील ह्याची शाश्वती नसते मग अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅविटीत तर हा प्रयोग यशस्वी होण तस  कठीणच होत पण आश्चर्य म्हणजे इथे कठीण असलेला हा प्रयोग अंतराळस्थानकात मात्र यशस्वी झाला 

 Red kale in Veggie aboard the ISS

अंतराळवीर Mike Hopkins Veggie चेंबर मधील Red Kaleचे  रोप transplant करताना

अंतराळवीर Mike ह्यांनी  Plant transplant चा प्रयोग यशस्वी केला त्यांनी लावलेली Red Russian Kale आणि Extra Dwarf pak choi हि रोपे व्यवस्थित उगवली आणि तग धरून जोमाने वाढतही आहेत हि दोन रोपे डोनर Kale आणि Pak choi सोबत वाढत आहेत आता उर्वरित वाफाऱ्यातील Red Romaine lettuce आणि Wasabi mustard हि रोपे सुद्धा चागली वाढली असून लवकरच अंतराळवीर त्यांची कापणी करून ह्या भाज्यांचा त्यांच्या जेवणात आस्वाद घेतील 

 Pak choi transplant on the ISS

 स्थानकातील Veggie चेंबरमध्ये लावलेले Pak choi चे  वाढलेले रोप-फोटो -नासा संस्था 

नासाच्या ह्या VEG-031 च्या Project प्रमुख सायंटिस्ट Gioia Masa ह्या plant transplant च्या यशाने आनंदित झाल्या आहेत त्या म्हणतात कि,खरंच हे आश्चर्यकारक यश आहे इथे पृथ्वीवर अशी नाजूक अंकुरित रोपे काढून  दुसरीकडे लावली तर सुकतात किंवा मरतात मग स्थानकातील झिरो ग्रॅविटीतील वातावरणात तर हा प्रयोग यशस्वी होण अत्यंत कठीण होत पण अंतराळवीरांनी अत्यंत कुशलतेने हा प्रयोग यशस्वी केलाय हे यश अंतराळवीर Mike ह्यांच आहे स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत द्रव पदार्थ  उलट्या दिशेने वाहतात पण तिथल्या रोपांना मात्र हि परिस्थिती अनुकूल ठरतेय इथे पृथ्वीवरच्या रोपांपेक्षा स्थानकात लावलेली रोपे जास्त जोमाने वाढत आहेत जेव्हा Mike ह्यांनी हि रोपे काढतानाचे फोटो मला दाखवले तेव्हा ती पुन्हा उगवतील अशी आशा नव्हती पण ती खोटी ठरली आणि रोपे छान वाढली plant transplantचा हा प्रयोग अंतराळवीरांसाठी उपयुक्त ठरला तिथे अंतराळात त्यांना पृथ्वीवरच्या सारखे ताजे अन्न,फळे भाज्या खायला मिळत नाहीत अन्न प्रक्रिया करताना प्रिझर्व करताना त्यातील जीवनसत्वे कमी होतात पण आता त्यांना स्थानकात उगवलेल्या भाज्यांमधून ती मिळतील शिवाय आगामी दूरवरच्या अंतराळ मोहीमांतील अंतराळवीरांना स्थानकात आणि मंगळ मोहिमेतील निवासात स्वतःचे अन्न धान्य पिकवण्यासाठी होणार आहे

Friday 5 February 2021

अंतराळवीरांचा एक फेब्रुवारीला दुसरा स्पेसवॉक संपन्न Mike Hopkins ह्यांनी काढला स्पेस सेल्फी

 NASA astronaut Michael Hopkins takes an out-of-this-world "space-selfie" during Monday's spacewalk.

 अंतराळवीर Mike Hopkins स्पेसवॉक दरम्यान Space Selfie काढताना  -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था - 2 फेब्रुवारी 

नासाच्या अंतराळमोहीम 64 चे अंतराळवीर Mike Hopkins आणि Victor Glover ह्यांनी एक फेब्रुवारीला स्थानकाच्या  दुरुस्तीच्या उर्वरित कामासाठी दुसरा स्पेसवॉक पूर्ण केला 

ह्या दुसऱ्या स्पेसवॉक मध्ये अंतराळवीरांनी स्थानकाच्या बाहेरील Solar system मधील दुरुस्तीचे काम पूर्ण केले पाच तास वीस मिनिटांच्या ह्या स्पेसवॉक दरम्यान ह्या दोन्ही अंतराळवीरांनी स्थानकाबाहेरील Solar arrays वरील जुन्या जीर्ण झालेल्या बॅटऱ्या काढून त्या जागी नव्या जास्त पॉवरफुल आणि दीर्घकाळ चालणाऱ्या Lithium-ion बॅटऱ्या बसविल्या शिवाय स्थानकाच्या बाहेरील भागात बसविलेले कॅमेरे upgrade केले  ह्या शिवाय पुढील स्पेसवॉक साठीची आवश्यक कामे करून ठेवली

NASA astronauts Michael Hopkins and Victor Glover are pictured during a spacewalk on Jan. 27, 2021, for antenna work and future solar array upgrades.

   अंतराळवीर Mike Hopkins आणि Victor Glover स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था 

गेल्या चार वर्षांपासून स्थानकाच्या बाहेरील भागातील जुन्या जीर्ण झालेल्या बॅटऱ्या बदलवून नवीन जास्त पॉवरफुल lithium-ion बॅटऱ्या बसविण्याचे काम सुरु आहे आजवरच्या स्पेसवॉक दरम्यान स्थानका बाहेरील भागात नवीन 48 बॅटऱ्या व adapters बसविण्यात आले आहेत रात्री स्थानक जेव्हा अंधारात असते तेव्हा स्थानकात उजेड व आवश्यक ऊर्जा निर्मिती साठी ह्या बॅटऱ्या उपयुक्त ठरल्या आहेत 

अंतराळवीर Mike Hopkins ह्यांचा हा चवथा स्पेसवॉक होता त्या साठी त्यांनी आजवर अंतराळात 25 तास 14 मिनिटे व्यतीत केले आहेत ह्या दुसऱ्या स्पेसवॉक दरम्यान त्यांनी खास Space सेल्फी काढून तो त्यांच्या फॉलोवर्सना सोशल मीडियावर शेअरही केला आहे

अंतराळवीर Victor Glover ह्यांचा हा दुसरा स्पेसवॉक होता त्यांनी त्या साठी अंतराळात 12 तास 16मिनिटे व्यतीत केले आजवरचा अंतराळस्थानकाच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी केलेला हा 234 व स्पेसवॉक होता

अंतराळवीर Mike Hopkins आणी Victor Glover ह्यांनी स्थानकाच्या तांत्रिक दुरुस्ती साठी केला Space Walk

Spacewalkers Victor Glover (top) and Michael Hopkins are pictured working on upgrades to the Bartomoleo science platform attached to Europe's Columbus lab module. Credit: NASA TV

 अंतराळवीर Mike Hopkins आणि Victor Glover स्थानकाबाहेरील Columbus Module भागात स्पेसवॉक करताना -फोटो नासा संस्था 

नासा संस्था - 28 जानेवारी

नासाच्या अंतराळमोहीम 64 च्या अंतराळवीरांनी ह्या आठवड्यात स्थानकाच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी दोन वेळा Space Walk केला 27 जानेवारी आणि एक फेब्रुवारीला Mike Hopkins आणि Victor Glover ह्यांनी स्थानकाच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी स्पेसवॉक केला

27 जानेवारीला दुपारी 1.24 मिनिटाला स्पेसवॉक सुरु झाला आणि साडेसहा तासांनी संपला Mike Hopkins आणि Victor Glover ह्या दोन्ही अंतराळवीरांनी सकाळीच स्पेसवॉकची तयारी सुरु केली होती त्यांनी त्यांच्या स्पेससूटची बॅटरी आधीच चार्ज करून ठेवली होती 

 अंतराळवीर Victor Glover आणि Mike Hopkins स्पेससूट घालून स्पेसवॉक साठी बाहेर पडण्याच्या तयारीत सोबत Kate Rubins आणि जपानी अंतराळवीर Soichi Noguchi -फोटो नासा संस्था 

ह्या साडेसहा तासांच्या स्पेसवॉक दरम्यान अंतराळवीर Mike Hopkins आणि Victor Glover ह्यांनी स्थानकाच्या बाहेरील भागातील तांत्रिक दुरुस्तीचे काम केले त्यांनी स्थानकाच्या युरोपियन स्पेस एजन्सीच्या Columbus Module ह्या भागात नवीन अद्ययावत व जास्त कार्यक्षमतेचा antenna fix  केला आणि त्यासाठी लागणारे केबल व adapter बसविण्याचे कामही पूर्ण केले ह्या नवीन केबल प्रणाली आणि अँटेना मुळे आता पृथ्वीवरील युरोपियन संस्थेशी स्थानकातून सहजतेने संपर्क साधणे सोपे होईल 

ह्या शिवाय ह्या अंतराळवीरांनी पुढच्या 1 फेब्रुवारीच्या दुसऱ्या स्पेसवॉकच्या तयारीसाठी आवश्यक कामेही केली त्यांनी स्थानकाच्या Truss ह्या भागातील जुने Grapple Fixture Brackets हि काढून ठेवले अंतराळवीर Victor Glover ह्यांनी स्थानकातील Airlock सिस्टिम दुरुस्त केली व त्यांनी त्यातील खराब झालेला पार्ट replace केला 

अंतराळवीर Mike Hopkins ह्यांचा हा तिसरा स्पेसवॉक होता त्या दरम्यान त्यांनी अंतराळात 19 तास 54 मिनिटे व्यतीत केली तर अंतराळवीर Victor Glover ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी असल्यामुळे त्यांचा हा पहिलाच स्पेसवॉक होता त्या दरम्यान त्यांनी अंतराळात 6 तास 56 मिनिटे व्यतीत केली 

अंतराळवीरांनी आजवर स्थानकाच्या तांत्रिक कामाच्या दुरुस्तीसाठी केलेला हा 233वा स्पेसवॉक होता त्या साठी अंतराळवीरांनी अंतराळात 61दिवस एक तास 54 मिनिटे व्यतीत केली